Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ के वणी में क्षयरोग जागरूकता रैली आयोजित; लोगों को मार्गदर्शन

SRSHRIKANT RAUT
Mar 24, 2026 10:54:27
Yavatmal, Maharashtra
जागतिक क्षयरोग दिनानिमित्त यवतमाळच्या वणी येथे क्षयरोग जनजागृती रॅली काढण्यात आली. क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत  शिक्षण प्रसारक मंडळ वणी चे विद्यार्थी आणि शिक्षक या रॅलीत सहभागी झाले. आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी नागरिकांना क्षयरोग मुक्तीच्या दृष्टीने मार्गदर्शन केले. "होय आपण क्षयरोगाचा अंत करु शकतो" हया घोषणां यावेळी देण्यात आल्या. जास्त काळ खोकला, वजनात  लक्षणीय घट, मानेवर गाठी अशी लक्षणे असल्यास ताबडतोब उपचार घेण्याचा सल्ला तालुका आरोग्य अधिकारी डॉ समीर थेरे यांनी दिला.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
KJKunal Jamdade
Mar 24, 2026 12:00:58
Shirdi, Maharashtra:Anc - संगमनेर पंचायत समितीतील कर्मचारी मारहाण प्रकरणाला आता नवं वळण मिळालं आहे. कार्यालयात घुसून अधिकाऱ्याला मारहाण केल्याच्या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून काही आरोपींना अटक केली होती. मात्र आता या मारहाणीमागचं कारण समोर येत असून एका महिलेने संबंधित अधिकाऱ्यावर गंभीर आरोप केल्याने प्रकरण अधिकच गुंतागुंतचं बनलं आहे. पाहूया सविस्तर रिपोर्ट... संगमनेर पंचायत समितीतील तालुका अभियान व्यवस्थापकाला काल दुपारी कार्यालयात घुसून मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर संबंधित अधिकाऱ्याच्या फिर्यादीवरून शरद थोरात यांच्यासह त्यांच्या दोन मुलांवर आणि इतर नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आणि न्यायालयात हजरही केलं. मात्र या मारहाणीमागचं नेमकं कारण स्पष्ट होत नव्हतं. आज या प्रकरणाला नवं वळण मिळालं. बचत गटाच्या माध्यमातून काम करणाऱ्या महिलांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलं. संबंधित अधिकाऱ्याने गेल्या नऊ महिन्यांपासून मानधन दिलं नसल्याचा आरोप करत , त्याच अधिकाऱ्याने महिलेबरोबर विनयभंग केल्याची तक्रारही संगमनेर पोलिसांना देण्यात आली आहे. दरम्यान माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या बहीण माजी नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात महिलांनी तब्बल तीन तास ठिय्या दिला. यावेळी अधिकारी आणि महिलांमध्ये शाब्दिक चकमकही झाली. दुर्गा तांबे , माजी नगराध्यक्षा ( बाळासाहेब थोरात बहीण ) पोलिसांनी अधिकाऱ्याच्या तक्रारीवर कारवाई केली असली, तरी आता महिलेच्या तक्रारीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे. याबाबत संगमनेर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांनी दाखल गुन्ह्याबत अधिक माहिती दिलीये... डॉ. कुणाल सोनवणे , उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर विभाग दरम्यान, या मारहाणीत राजकीय नावे समोर आल्याने संगमनेरमध्ये वातावरण तापलं आहे. विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना राजकीय रंग चढण्याची शक्यता आहे. आता पोलिस तपासातून नेमकं सत्य काय समोर येतं, आणि दोन्ही बाजूंच्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
622
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 24, 2026 12:00:25
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - म्हणून, गावात पीठ गिरणी, दळप- कांडप राहतात आठ दिवस बंद.. बेडगावातली 200 वर्षांपासून सुरू असलेली अनोखी.. अँकर - सांगलीच्या मिरज तालुक्यातल्या एका गावात गुढीपाडव्यापासून गावची यात्रा संपेपर्यंत कोणत्याही प्रकारचं दळप कांडप केलं जात नाही. श्री मरगाई देवीची यात्रेनिमित्ताने गेल्या 200 वर्षांपासून ही अनोखी परंपरा जोपासण्यात येत आहे, चवळी गावात कोणत्याही प्रकारचा पीठ दळलं जात नाही किंवा विहिरीवरची मोटर देखील सुरू केली जात नाही.. पाहूया काय आहे, ही अनोखो परंपरा.. आठ दिवस गावात कोणत्याही प्रकारचं दळप-कांडपावर निर्बंध गावातल्या एकाही घरात पीठ दळलं जात नाही गावातल्या ग्रामदैवत असणारी श्री मरगाआई देवीची यात्रा सुरू होते, त्या दिवशीपासून यात्रा संपे पर्यंत गावातील सर्व पीठ गिरण्या, कांडप मशीन किंबहुना विहिरीवरील मोट ते बंद ठेवले जातात. गावात कोणत्याही प्रकारचे पीठ दळलं जात नाही, गावातील महिला यात्रा सुरू होण्याच्या आधीच सर्व पीठ किंवा आवश्यक दळप-कांडप करून घेतात. मरगाआई देवीच्या यात्रेत गावातील ग्रामस्थ महिला यांचा सहभाग असावा, यात्रे दरम्यान महिला व ग्रामस्थ कोणत्याही कामात व्यस्त राहू नयेत, म्हणून दळप-कांडप व विहिरीवरची मोट बंद राहिल्यास सर्व ग्रामस्थ महिला यात्रेत सहभागी होऊ शकतात, या भावनेतून ही परंपरा सुरू झाल्याची आख्यायिका गावात सांगितली जाते. या यात्रेमध्ये त्राटकी सोंग, रामायण कथेतील दंडकारण्याचे क्षेत्र हे फार मोठे होते. दंडोबा डोंगर सह बेडग ही दंडकारण्यात होते. त्यामुळे या दंडकारण्यात रावणाची बहिण शृर्पणखा ( त्राटीका) ही या अरण्यात वास्तव्यास होती, त्यामुळे यात्रेच्या निमित्ताने त्राटकी सोंग, काढली जातात, जे पाहण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील लाखो भक्त बेडक मध्ये आवर्जून उपस्थितीत लावतात. गेल्या दोनशे वर्षांपासून बेडग गावात मरगाई देवीची यात्रा भरते, या यात्रेनिमित्ताने वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा ग्रामस्थ भक्ती भावाने जोपासत, गावातल्या या यात्रेत मुक्तपणे सहभागी होतात...
557
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 24, 2026 10:40:13
Washim, Maharashtra:अँकर:आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद आता बांधकाम क्षेत्रावर उमटताना दिसत आहेत. गॅस टंचाईमुळे गुजरातमधील टाईल्स उद्योग ठप्प झाल्याने टाईल्सचा पुरवठा मोठ्या प्रमाणात घटला आहे. परिणामी वाशीम जिल्ह्यात टाईल्सच्या दरात प्रति ब्रास तब्बल ५०० ते ७०० रुपयांची वाढ झाली आहे, तर ग्रॅनाइटच्या दरात प्रति स्क्वेअर फूट १० रुपयांनी वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे बांधकामाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला असून नागरिक आणि व्यापारी दोघेही अडचणीत सापडले आहेत. बाईट:सुरेश पुरोहित,व्यापारी व्हिओ:या दरवाढीचा थेट परिणाम बांधकाम खर्चावर झाला असून घर बांधकामच्या कामात ग्राहकांच्या बजेटमध्ये सुमारे २० टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिक आर्थिक खर्च वाढला आहे. व्यापाऱ्यांकडे मर्यादित साठा उरला असून पुढील काही दिवसांत टंचाई आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकूणच या परिस्थितीमुळे बांधकाम क्षेत्र सध्या मोठ्या अडचणीत सापडले आहे. बाईट:प्रवीण वानखेडे,ग्राहक बाईट:भारत इंगळे,ग्राहक
1066
comment0
Report
KPKAILAS PURI
Mar 24, 2026 10:21:37
1025
comment0
Report
KJKunal Jamdade
Mar 24, 2026 09:48:25
Shirdi, Maharashtra:दोना दिवसीपूर्वी खरातच्या फार्म हाऊसवरच्या कर्मचाऱ्यांची झाली होती चौकशी... खरातच्या फार्म हाऊसवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दिली पहिली प्रतिक्रिया.. SIT चौकशीनंतर कर्मचाऱ्यांची पहिली प्रतिक्रिया आली समोर... मला याबाबत काहीच कल्पना नव्हती... मी सहा महिन्यापासून फॉर्म हाऊसवर काम करतो... शेती बघणे, झाडांना पाणी घालणं, गार्डन बघणं, बंगल्याची साफ सफाई करणे हे काम करतो.. 17 जहां एकरात उभारलाय फार्म हाऊस.. महिन्यातून 3 ते 4 वेळेस खरात हे बंगल्यावर यायचे, कधी फॅमिलीसोबत यायचे... कधी एकटे यायचे.. चार दोन पाहुणे खरात साहेबांना भेटायला यायचे आणि काही वेळाने निघून जायचे... आम्ही नवरा बायको इथे काम करतो.. आता जे प्रकार त्यांच्याबाबत समोर आला आहे त्याबाबत मला काहीही कल्पना नव्हती... मला कधी याबाबत शंका आली नाही.. खरातच्या बंगल्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची प्रतिक्रिया... दोन तीन दिवसांपूर्वी मला SIT ने चौकशीला बोलावलं होतं...
937
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 24, 2026 09:47:41
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगलीमध्ये प्रहार मूकबधिर दिव्यांग संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले आहे. महापालिका कार्यालयासमोर विविध प्रलंबित मागण्यांसाठी मुकबधिर दिव्यांग तरणांकडून निदर्शने करण्यात आली आहेत. शहरांमधील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम या ठिकाणी जिल्ह्यातील दिव्यांग मूकबधिर तरुणांना कार्यालय मिळावे, तसेच राज्य शासनाच्या वेगवेगळ्या सुविधांचा लाभ मिळावा, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. सांगलीचे आमदार सुरेश गाडगीळ यांच्याकडून कार्यालय उपलब्ध करून देण्याबाबत महापालिका प्रशासनाकडे शिफारस करण्यात आली आहे, मात्र गेल्या दोन वर्षांपासून मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने संतप्त मूकबधिर दिव्यांग तरुणांनी पालिकेच्या दारात शिट्टी वाजवत आंदोलन केलं आहे।
1036
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 24, 2026 09:36:39
982
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Mar 24, 2026 09:18:17
Buldhana, Maharashtra:Bulddhana में आगे कौन लोकसभा लड़ेगा? शिवसेना विधायक संजय गायकवाड का सवाल। विद्यमान शिवसेना सांसद प्रतापराव जाधव की आगे की उमेदवारी पर यह प्रश्नचिन्ह है। साथ ही मित्र पक्ष भाजपा को चुनौती देते हुए आमदार संजय गायकवाड की जीभ घिसरी। आमदार के कार्यालय में चिखली विधानसभा मतदारसंघ के विभिन्न गांवों और विभिन्न पक्षों के कार्यकर्ताओं का शिंदें की शिवसेना में प्रवेश कार्यक्रम पार पड़ा। इस आयोजन में आमदार ने कहा कि मित्र पक्ष से अन्याय होता है तो हमे साथ आने वाले समय में क्या-क्या धोखे होते हैं, यह सभी जानते हैं। चिखली मतदारसंघ में यह चित्र हमने देखा, पर हमने मित्र पक्ष के तौर पर दुर्लक्ष किया। आगे भाषण होंगे, कार्यकर्ताओं पर कितने अत्याचार होते हैं, यह सब अब मेरे पास है। चिखली निर्वाचन क्षेत्र में पार्टी की ताकत बढ़ानी है, अगले लोकसभा कौन लड़ेगा यह सब स्पष्ट है। फिलहाल शिवसेना का सांसद वहां मौजूद है, इसलिए उसे चिंता नहीं। पार्टी के तौर पर चिखली निर्वाचन क्षेत्र मेरा है। दिये गए बयानों से जिले के राजनीतिक गलियारों में हलचल मच गई है क्योंकि संजय गायकवाड ने अगले लोकसभा चुनाव में शिवसेना से किसे लड़ाने पर सवाल उठाए हैं। मित्र पक्ष भाजपा ने भी चिखली में मौजूदा विधायक आश्वेता महाले को चुनौती दी है। इससे महायुती और शिवसेना दोनों में आंतरिक कलह की चर्चा है।
1067
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 24, 2026 09:17:34
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यातील बिद्री इथं बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरण उघडकीस आलं असून पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. श्रद्धा हॉस्पिटलवर टाकलेल्या छाप्यात डॉक्टर युवराज पाटील आणि एजंटला रंगेहात पकडण्यात आलं आहे. या कारवाईनंतर बेकायदेशीर गर्भपाताच्या अनेक सेंटर्सचा पर्दाफाश होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे गर्भधारणेनंतर गर्भाचं लिंग जाणून घेणं हे कायद्याने गुन्हा आहे. तरीही मुलाच्या हव्यासापोटी अनेकजण गर्भलिंग निदान करून घेत असल्याचं वास्तव समोर येत आहे. बेकायदेशीर गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टरांबरोबच त्यासाठी पुढाकार घेणारे पालकही तितकेच जबाबदार आहेत. प्रशासन यंत्रणा अपेक्षेप्रमाणे सतर्क नसल्यामुळे अशा प्रकरणांची व्याप्ती वाढत असल्याचं दिसत आहे. विशेषतः महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागात अशा प्रकारच्या रॅकेटचं जाळं वाढत चाललं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील बिद्री येथील श्रद्धा हॉस्पिटलमध्ये गर्भलिंग निदान सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि इस्फुर्ली पोलिसांनी संयुक्त सापळा रचला. पोलिसांनी एका महिलेला बनावट ग्राहक म्हणून पाठवलं. यावेळी एजंट संभाजी शिंदे याने त्या महिलेकडून २२ हजार रुपये घेतले. त्यानंतर डॉक्टर युवराज पाटील यांनी गर्भलिंग निदान सुरू केलं. याचवेळी पोलिसांनी छापा टाकत डॉक्टर युवराज पाटील आणि एजंट संभाजी शिंदे यांना रंगेहात अटक केली. घटनास्थळावरून पोर्टेबल सोनोग्राफी मशीन, गर्भपातासाठीच्या गोळ्या आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली. यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. 2022 साली मुरगुड पोलीस ठाण्यात अवैध वैद्यकीय व्यवसाय प्रकरणी त्याच्यावर गुन्हा नोंदण्यात आला होता. त्या वेळी जिल्हा आरोग्य विभागाच्या छाप्यात रुग्ण नोंदणीशिवाय प्रसूती, गर्भपात आणि शस्त्रक्रिया केल्याचं उघड झालं होतं. मात्र त्याने बेकायदेशीर कृत्य सुरूच ठेवलं. सुरुवातीला ५० हजार रुपये सांगून नंतर तडजोडीअंती २२ हजार रुपयांमध्ये गर्भलिंग निदान झालं असल्याचंही उघड झालं आहे. गर्भलिंग निदानानंतर गर्भपात कुठे करायचा याबाबतही संबंधित डॉक्टर महिलांना मार्गदर्शन करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. कोल्हापूर, कराड आणि सीमावर्ती भागातील काही हॉस्पिटल्स यासाठी सुचवली जात असल्याचं संशय आहे. या प्रकरणात पुढील तपासातून मोठं रॅकेट उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागात गर्भलिंग निदानाची यंत्रणा सक्रिय असल्याचं संशय व्यक्त होत आहे. याच माध्यमातून पोर्टेबल सोनोग्राफी मशीन आणि औषधांचा पुरवठा केला जात असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. राज्यात PCPNDT सारखा कडक कायदा अस्तित्वात असतानाही आरोग्य विभागामार्फत या कायद्याचा योग्य वापर केला जात नसल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्त्यांची आहे.. त्यामुळे PCPNDT कायद्यातील त्रुटी दूर करून आणि सामाजिक कार्यकर्त्यांना पाठबळ देऊनच या समस्येवर प्रभावी नियंत्रण मिळवता येणार आहे. नाहीतर आईच्या पोटातच मुलींचा जीव घेतला जाणार.
1048
comment0
Report
Advertisement
Back to top