Back
संगमनेर पंचायत समिति में मारहाण के बाद महिलाओं का प्रदर्शन तेज
KJKunal Jamdade
Mar 24, 2026 12:00:58
Shirdi, Maharashtra
Anc - संगमनेर पंचायत समितीतील कर्मचारी मारहाण प्रकरणाला आता नवं वळण मिळालं आहे. कार्यालयात घुसून अधिकाऱ्याला मारहाण केल्याच्या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून काही आरोपींना अटक केली होती. मात्र आता या मारहाणीमागचं कारण समोर येत असून एका महिलेने संबंधित अधिकाऱ्यावर गंभीर आरोप केल्याने प्रकरण अधिकच गुंतागुंतचं बनलं आहे. पाहूया सविस्तर रिपोर्ट... संगमनेर पंचायत समितीतील तालुका अभियान व्यवस्थापकाला काल दुपारी कार्यालयात घुसून मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर संबंधित अधिकाऱ्याच्या फिर्यादीवरून शरद थोरात यांच्यासह त्यांच्या दोन मुलांवर आणि इतर नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आणि न्यायालयात हजरही केलं. मात्र या मारहाणीमागचं नेमकं कारण स्पष्ट होत नव्हतं. आज या प्रकरणाला नवं वळण मिळालं. बचत गटाच्या माध्यमातून काम करणाऱ्या महिलांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलं. संबंधित अधिकाऱ्याने गेल्या नऊ महिन्यांपासून मानधन दिलं नसल्याचा आरोप करत , त्याच अधिकाऱ्याने महिलेबरोबर विनयभंग केल्याची तक्रारही संगमनेर पोलिसांना देण्यात आली आहे. दरम्यान माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या बहीण माजी नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात महिलांनी तब्बल तीन तास ठिय्या दिला. यावेळी अधिकारी आणि महिलांमध्ये शाब्दिक चकमकही झाली. दुर्गा तांबे , माजी नगराध्यक्षा ( बाळासाहेब थोरात बहीण ) पोलिसांनी अधिकाऱ्याच्या तक्रारीवर कारवाई केली असली, तरी आता महिलेच्या तक्रारीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे. याबाबत संगमनेर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांनी दाखल गुन्ह्याबत अधिक माहिती दिलीये... डॉ. कुणाल सोनवणे , उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर विभाग दरम्यान, या मारहाणीत राजकीय नावे समोर आल्याने संगमनेरमध्ये वातावरण तापलं आहे. विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना राजकीय रंग चढण्याची शक्यता आहे. आता पोलिस तपासातून नेमकं सत्य काय समोर येतं, आणि दोन्ही बाजूंच्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 24, 2026 12:49:41964
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 24, 2026 12:33:151031
Report
AKAMAR KANE
FollowMar 24, 2026 12:21:391042
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 24, 2026 12:20:591062
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 24, 2026 12:00:251091
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 24, 2026 11:36:331025
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 24, 2026 11:01:541048
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 24, 2026 10:54:271075
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 24, 2026 10:54:131077
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 24, 2026 10:40:131066
Report
PNPratap Naik1
FollowMar 24, 2026 10:34:441078
Report
KPKAILAS PURI
FollowMar 24, 2026 10:21:371025
Report
KJKunal Jamdade
FollowMar 24, 2026 09:48:25937
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 24, 2026 09:47:411036
Report