Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

बेडग में 200 साल पुरानी परंपरा: आठ दिन दळप-कांडप बंध, ग्रहस्थ महिला यात्रा में सहभाग

SMSarfaraj Musa
Mar 24, 2026 12:00:25
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - म्हणून, गावात पीठ गिरणी, दळप- कांडप राहतात आठ दिवस बंद.. बेडगावातली 200 वर्षांपासून सुरू असलेली अनोखी.. अँकर - सांगलीच्या मिरज तालुक्यातल्या एका गावात गुढीपाडव्यापासून गावची यात्रा संपेपर्यंत कोणत्याही प्रकारचं दळप कांडप केलं जात नाही. श्री मरगाई देवीची यात्रेनिमित्ताने गेल्या 200 वर्षांपासून ही अनोखी परंपरा जोपासण्यात येत आहे, चवळी गावात कोणत्याही प्रकारचा पीठ दळलं जात नाही किंवा विहिरीवरची मोटर देखील सुरू केली जात नाही.. पाहूया काय आहे, ही अनोखो परंपरा.. आठ दिवस गावात कोणत्याही प्रकारचं दळप-कांडपावर निर्बंध गावातल्या एकाही घरात पीठ दळलं जात नाही गावातल्या ग्रामदैवत असणारी श्री मरगाआई देवीची यात्रा सुरू होते, त्या दिवशीपासून यात्रा संपे पर्यंत गावातील सर्व पीठ गिरण्या, कांडप मशीन किंबहुना विहिरीवरील मोट ते बंद ठेवले जातात. गावात कोणत्याही प्रकारचे पीठ दळलं जात नाही, गावातील महिला यात्रा सुरू होण्याच्या आधीच सर्व पीठ किंवा आवश्यक दळप-कांडप करून घेतात. मरगाआई देवीच्या यात्रेत गावातील ग्रामस्थ महिला यांचा सहभाग असावा, यात्रे दरम्यान महिला व ग्रामस्थ कोणत्याही कामात व्यस्त राहू नयेत, म्हणून दळप-कांडप व विहिरीवरची मोट बंद राहिल्यास सर्व ग्रामस्थ महिला यात्रेत सहभागी होऊ शकतात, या भावनेतून ही परंपरा सुरू झाल्याची आख्यायिका गावात सांगितली जाते. या यात्रेमध्ये त्राटकी सोंग, रामायण कथेतील दंडकारण्याचे क्षेत्र हे फार मोठे होते. दंडोबा डोंगर सह बेडग ही दंडकारण्यात होते. त्यामुळे या दंडकारण्यात रावणाची बहिण शृर्पणखा ( त्राटीका) ही या अरण्यात वास्तव्यास होती, त्यामुळे यात्रेच्या निमित्ताने त्राटकी सोंग, काढली जातात, जे पाहण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील लाखो भक्त बेडक मध्ये आवर्जून उपस्थितीत लावतात. गेल्या दोनशे वर्षांपासून बेडग गावात मरगाई देवीची यात्रा भरते, या यात्रेनिमित्ताने वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा ग्रामस्थ भक्ती भावाने जोपासत, गावातल्या या यात्रेत मुक्तपणे सहभागी होतात...
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAABHISHEK ADEPPA
Mar 24, 2026 12:49:41
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर – पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सावळेश्वर टोल नाक्याची तोडफोड सोलापूर–पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सावळेश्वर टोल नाक्यावर मोठा गोंधळ उडाला आहे एका ट्रक चालकाला मारहाण झाल्याच्या आरोपामुळे इतर संतप्त ट्रक चालकांनी एकत्र येत टोल नाक्याची मोठ्या प्रमाणात तोडफोड केल्याची प्राथमिक माहिती या घटनेदरम्यान टोल कर्मचारी आणि चालकांमध्ये जोरदार झटापट एका अज्ञात ड्रायव्हरला मारहाण झाल्याची घटना समोर आल्यानंतर इतर ट्रक चालक संतप्त सावळेश्वर टोल नाक्यावर गोंधळ उडाल्याने सोलापूर - पुणे राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा सोलापूर ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे
955
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 24, 2026 12:33:15
Khed, Maharashtra:नागरिकांची पाठ फिरवली; राजगुरुनगरातील “वंदे मातरम्” कार्यक्रमात खुर्च्या रिकाम्याच नागरिकांनी पाठ फिरवल्याने “वंदे मातरम्” सादरी शताब्दी वर्षानिमित्त हुतात्मा राजगुरु यांच्या जन्मगाव राजगुरुनगर येथे आयोजित भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाला अत्यंत अल्प प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले. देशप्रेम आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात संपूर्ण कार्यक्रमस्थळी प्रेक्षकांच्या खुर्च्या रिकाम्याच राहिल्या, तर केवळ शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि कलाकार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडताना दिसला. हुतात्मा राजगुरु यांच्या/बलिदानभूमीत होत असलेल्या या कार्यक्रमाला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. देशभक्तीचा संदेश देणाऱ्या कार्यक्रमांकडेच नागरिकांनी पाठ फिरवल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.
952
comment0
Report
KJKunal Jamdade
Mar 24, 2026 12:00:58
Shirdi, Maharashtra:Anc - संगमनेर पंचायत समितीतील कर्मचारी मारहाण प्रकरणाला आता नवं वळण मिळालं आहे. कार्यालयात घुसून अधिकाऱ्याला मारहाण केल्याच्या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून काही आरोपींना अटक केली होती. मात्र आता या मारहाणीमागचं कारण समोर येत असून एका महिलेने संबंधित अधिकाऱ्यावर गंभीर आरोप केल्याने प्रकरण अधिकच गुंतागुंतचं बनलं आहे. पाहूया सविस्तर रिपोर्ट... संगमनेर पंचायत समितीतील तालुका अभियान व्यवस्थापकाला काल दुपारी कार्यालयात घुसून मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर संबंधित अधिकाऱ्याच्या फिर्यादीवरून शरद थोरात यांच्यासह त्यांच्या दोन मुलांवर आणि इतर नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आणि न्यायालयात हजरही केलं. मात्र या मारहाणीमागचं नेमकं कारण स्पष्ट होत नव्हतं. आज या प्रकरणाला नवं वळण मिळालं. बचत गटाच्या माध्यमातून काम करणाऱ्या महिलांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलं. संबंधित अधिकाऱ्याने गेल्या नऊ महिन्यांपासून मानधन दिलं नसल्याचा आरोप करत , त्याच अधिकाऱ्याने महिलेबरोबर विनयभंग केल्याची तक्रारही संगमनेर पोलिसांना देण्यात आली आहे. दरम्यान माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या बहीण माजी नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात महिलांनी तब्बल तीन तास ठिय्या दिला. यावेळी अधिकारी आणि महिलांमध्ये शाब्दिक चकमकही झाली. दुर्गा तांबे , माजी नगराध्यक्षा ( बाळासाहेब थोरात बहीण ) पोलिसांनी अधिकाऱ्याच्या तक्रारीवर कारवाई केली असली, तरी आता महिलेच्या तक्रारीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे. याबाबत संगमनेर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांनी दाखल गुन्ह्याबत अधिक माहिती दिलीये... डॉ. कुणाल सोनवणे , उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर विभाग दरम्यान, या मारहाणीत राजकीय नावे समोर आल्याने संगमनेरमध्ये वातावरण तापलं आहे. विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना राजकीय रंग चढण्याची शक्यता आहे. आता पोलिस तपासातून नेमकं सत्य काय समोर येतं, आणि दोन्ही बाजूंच्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
1086
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Mar 24, 2026 10:54:27
1075
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 24, 2026 10:40:13
Washim, Maharashtra:अँकर:आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद आता बांधकाम क्षेत्रावर उमटताना दिसत आहेत. गॅस टंचाईमुळे गुजरातमधील टाईल्स उद्योग ठप्प झाल्याने टाईल्सचा पुरवठा मोठ्या प्रमाणात घटला आहे. परिणामी वाशीम जिल्ह्यात टाईल्सच्या दरात प्रति ब्रास तब्बल ५०० ते ७०० रुपयांची वाढ झाली आहे, तर ग्रॅनाइटच्या दरात प्रति स्क्वेअर फूट १० रुपयांनी वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे बांधकामाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला असून नागरिक आणि व्यापारी दोघेही अडचणीत सापडले आहेत. बाईट:सुरेश पुरोहित,व्यापारी व्हिओ:या दरवाढीचा थेट परिणाम बांधकाम खर्चावर झाला असून घर बांधकामच्या कामात ग्राहकांच्या बजेटमध्ये सुमारे २० टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिक आर्थिक खर्च वाढला आहे. व्यापाऱ्यांकडे मर्यादित साठा उरला असून पुढील काही दिवसांत टंचाई आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकूणच या परिस्थितीमुळे बांधकाम क्षेत्र सध्या मोठ्या अडचणीत सापडले आहे. बाईट:प्रवीण वानखेडे,ग्राहक बाईट:भारत इंगळे,ग्राहक
1066
comment0
Report
KPKAILAS PURI
Mar 24, 2026 10:21:37
1025
comment0
Report
KJKunal Jamdade
Mar 24, 2026 09:48:25
Shirdi, Maharashtra:दोना दिवसीपूर्वी खरातच्या फार्म हाऊसवरच्या कर्मचाऱ्यांची झाली होती चौकशी... खरातच्या फार्म हाऊसवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दिली पहिली प्रतिक्रिया.. SIT चौकशीनंतर कर्मचाऱ्यांची पहिली प्रतिक्रिया आली समोर... मला याबाबत काहीच कल्पना नव्हती... मी सहा महिन्यापासून फॉर्म हाऊसवर काम करतो... शेती बघणे, झाडांना पाणी घालणं, गार्डन बघणं, बंगल्याची साफ सफाई करणे हे काम करतो.. 17 जहां एकरात उभारलाय फार्म हाऊस.. महिन्यातून 3 ते 4 वेळेस खरात हे बंगल्यावर यायचे, कधी फॅमिलीसोबत यायचे... कधी एकटे यायचे.. चार दोन पाहुणे खरात साहेबांना भेटायला यायचे आणि काही वेळाने निघून जायचे... आम्ही नवरा बायको इथे काम करतो.. आता जे प्रकार त्यांच्याबाबत समोर आला आहे त्याबाबत मला काहीही कल्पना नव्हती... मला कधी याबाबत शंका आली नाही.. खरातच्या बंगल्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची प्रतिक्रिया... दोन तीन दिवसांपूर्वी मला SIT ने चौकशीला बोलावलं होतं...
937
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 24, 2026 09:47:41
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगलीमध्ये प्रहार मूकबधिर दिव्यांग संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले आहे. महापालिका कार्यालयासमोर विविध प्रलंबित मागण्यांसाठी मुकबधिर दिव्यांग तरणांकडून निदर्शने करण्यात आली आहेत. शहरांमधील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम या ठिकाणी जिल्ह्यातील दिव्यांग मूकबधिर तरुणांना कार्यालय मिळावे, तसेच राज्य शासनाच्या वेगवेगळ्या सुविधांचा लाभ मिळावा, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. सांगलीचे आमदार सुरेश गाडगीळ यांच्याकडून कार्यालय उपलब्ध करून देण्याबाबत महापालिका प्रशासनाकडे शिफारस करण्यात आली आहे, मात्र गेल्या दोन वर्षांपासून मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने संतप्त मूकबधिर दिव्यांग तरुणांनी पालिकेच्या दारात शिट्टी वाजवत आंदोलन केलं आहे।
1036
comment0
Report
Advertisement
Back to top