रुईकोटच्या भक्तांचा आक्रोश: कोळसा खान आणि जमीन विक्रीवर आंदोलन!
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या झरीजामनी तालुक्यातील रुईकोट येथे श्री संत सद्गुरू जगन्नाथ महाराज देवस्थानाची जमीन परस्पर विक्री करून कोळसा खान सुरू केल्याचा आरोप भक्तांनी केला आहे. धर्मदाय आयुक्तांची परवानगी न घेता ही जमीन BS ईस्पात कंपनीला देण्यात आली, ज्यामध्ये सचिव संजय देरकर यांची भूमिका संशयास्पद असल्याचे म्हटले आहे. जमीन विक्रीपूर्वीच कोळसा उत्खनन सुरू झाल्याने मनी लॉंड्रींग प्रतिबंध अधिनियमांतर्गत कारवाई सुरू आहे. भक्तांनी झेंडा रोवून भजन, पूजा करून आंदोलन केले आणि कारवाईसह मंदिर बांधण्याची मागणी केली.
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
