Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445323

राज ठाकरेंचे आव्हान: सत्ता द्या, राज्य कसे चालवायचे ते दाखवतो

Aug 24, 2024 02:30:00
Karegaon, Maharashtra

यवतमाळच्या वणी येथील जाहीर सभेत राज ठाकरेंनी सत्तेचे आव्हान दिले. त्यांनी म्हटले की, राज्यात कायद्याचा वचक राहिला नाही आणि सरकारच्या दबावाखाली संपूर्ण यंत्रणा काम करत आहे. एकदा सत्ता मिळाल्यास राज्य कसे चालवायचे ते दाखवून देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पोलिसांना 48 तास देऊन गुन्हेगारी साफ करण्याचे आश्वासन दिले. राजकीय वातावरण गढूळ झाल्याचे सांगून, निवडणुकीत मतदान केलेले लोक विकले जात असल्याची टीका केली. विधानसभा निवडणूक हा राग व्यक्त करण्याचा योग्य वेळ असल्याचे त्यांनी नमूद केले.

1
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SMSATISH MOHITE
Nov 14, 2025 03:39:22
Nanded, Maharashtra:नांदेड शहरातील शासकीय वसतिगृह शहराच्या बाहेर हलवण्यात आल्याच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षाबाहेर अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. विद्यार्थ्यांनी हातात पुस्तकं घेऊन शांतपणे वाचन करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. समाजकल्याण विभागाच्या वतीने नांदेड शहरात मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह सुरू होते. मात्र अलीकडेच हे वसतिगृह शहरापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर हलवण्यात आले आहे. त्यामुळे शहरात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर ये-जा करण्याचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. दररोज 20 किलोमीटर प्रवास करून महाविद्यालयात जाणे शक्य नाही. वाहतुकीचा खर्च व वेळ दोन्ही वाढले आहे. त्यामुळे निषेध नोंदवण्यासाठी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात शांततापूर्ण ‘पुस्तक वाचन’ आंदोलन सुरू केले. वसतिगृह पुन्हा शहरातील स्थलांतरित करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली.
42
comment0
Report
SMSATISH MOHITE
Nov 14, 2025 03:38:59
Nanded, Maharashtra:अवैध वाळू उपसा करणाऱ्या चार बोटी इंजिनसह महसूल प्रशासनाने स्फोट घडवून उडवल्या. नांदेड तालुक्यात काल महसूल विभागाने तालुका दंडाधिकारी यांच्या उपस्थितीत स्फोट घडवला. हा स्फोट नांदेड तालुक्यातील वाहेगाव येथील नदीपात्रात करण्यात आला. वाहेगाव इथ इंजिनच्या मदतीने अवैध रेती उपसा सुरू असल्याची माहिती तहसीलदार संजय वारकड यांना मिळाली. पथकासह पहाटे 5 वाजता छापा टाकण्यात आला. त्यावेळी तिथे अवैध उपाश्यासाठी वापरले जाणारे 4 इंजिन आणि 20 तराफे आढळून आले. जिलेटीनच्या मदतीने चारही इंजिन स्फोटाने उडवून दिले तर 20 तराफे जाळून नष्ट करण्यात आले. महसुलच्या या कारवाईने अवैध रेती व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यापुढे MPDA कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
90
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Nov 14, 2025 03:38:28
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज ... लातूरमध्ये तापमानाची घसरण... गावागावांत शेकोट्यां पेटल्या.... लातूर जिल्ह्यात तापमानात मोठी घसरण होत असून, हिवाळ्याची चाहूल आता स्पष्टपणे जाणवू लागली आहे. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये सकाळी आणि संध्याकाळ नागरिक शेकोट्यांचा आधार घेताना दिसत आहेत. यंदा पावसाने अक्षरशः कहर केल्यामुळे थंडीचे आगमन साधारण महिनाभर उशिरा झाले आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांत अचानक वाढलेल्या गारठ्यामुळे तापमान १४ ते १५ अंशांवर गेल्याने गारवा प्रकर्षाने जाणवतोय. त्यामुळे नागरिकांनी थंडीपासून काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केला आहे. गावोगावांत रस्त्याच्या कडेला, चौकांत शेकोट्या पेटून उबेचा आसरा घेत असलेल्या नागरिकांची दृश्यं हिवाळ्याची नांदी देत आहेत.
80
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Nov 14, 2025 03:38:13
47
comment0
Report
SGSagar Gaikwad
Nov 14, 2025 03:37:56
81
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Nov 14, 2025 03:37:46
Dharashiv, Maharashtra: धाराशिव शहरातील रोड वाद उच्च न्यायालयात, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाला न्यायालयाची स्थिती धाराशिव शहरातील रोडचा वाद आता कोर्टात! गुत्तेदार डी.सी. आजमेरा यांनी छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या स्थगिती आदेशाला गुत्तेदाराचा हायकोर्टात चॅलेंज हायकोर्टानं शिंदे यांच्या स्थगिती आदेशालाच स्थगिती दिल्याची माहिती. 28 नोव्हेंबरला पुढील सुनावणी “आमचं म्हणणं ऐकलंच नाही, आणि राजकीय दडपणाखाली अवघ्या 12 दिवसांत काम बंद!” केल्याचं याचिकाकर्त्याचं म्हणणं 59 DP रस्ते आणि ड्रेनेजच्या 140 कोटींच्या कामाला पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या तक्रारीनंतर नगरविकास विभागानं दिली होती स्थगित
101
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Nov 14, 2025 03:37:31
Ratnagiri, Maharashtra:जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी २६ नोव्हेंबर रात्री १२ वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात प्रतिबंधात्मक मनाई आदेश दिला आहे. जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रामध्ये आगामी काळात सण, उत्सव साजरे करण्यात येणार आहेत. तसेच जिल्ह्यात विविध कारणांवरून आंदोलनात्मक कार्यक्रम करण्यात येत आहेत. तसेच नगरपरिषद / नगरपंचायत निवडणुकांच्या अनुषंगाने आचारसंहिता लागू झालेली आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तसेच सामाजिक संघटना व राजकीय पक्षांचे दौरे, तसेच सभा होत असून, त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर मनाई आदेश जारी करण्यात आला आहे.
32
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Nov 14, 2025 03:37:20
Ratnagiri, Maharashtra:लांजा नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या चौथ्या दिवशी देखील एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. त्यामुळे पुढील तीन दिवसांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी होणार असल्याची शक्यता आहे. सध्या महायुती होण्याबाबत वरिष्ठ पातळीवरून संकेत देण्यात आले आहेत. मात्र, तरीही महायुती मधील जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. हा तिढा सोडवण्यासाठी महायुतीच्या घटक पक्षांच्या बैठकांचा सिलसिला सुरू आहे. महايوतीच्या जागा वाटपाचा तिढा लवकरच सुटेल, असा विश्वास कार्यकर्त्यांना वाटत आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीमधील पक्षाच्या बैठकीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचे बोलले जात आहे. मात्र, त्यांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर ३ दिवसांमध्ये अर्ज दाखल करण्यासाठी धावपळ उडणार आहे. तर प्रचारासाठी पंधराच दिवस मिळणार आहेत.
24
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Nov 14, 2025 03:36:16
Ratnagiri, Maharashtra:खेडशीत बिबट्याचा मोकाट वावर सुरूच; वन विभागाचे दुर्लक्ष रत्नागिरी जवळच्या खेडशी डफळवाडी परिसरात गेल्या काही महिन्यांपासून वन्यप्राण्यांची दहशत वाढली आहे. मागील काही महिन्यांपासून या परिसरात रात्रीच्या सुमारास बिबट्याचा वावर वाढला आहे. खेडशीच्या माजी सरपंच जान्हवी घाणेकर यांचे घरी बसवलेल्या सीसीटीव्ही मध्ये बिबट्या कैद झाला असून रोज रात्री 12 ते 4 या वेळेत बिबट्या या परिसरात येत असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. बिबट्याला जेरबंद करा अशी मागणी वनविभागाकडे करूनही यावर अद्याप पावले उचलण्यात आली नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. या भागात गवा रेड्यांचा वावर देखील आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान करणाऱ्या गवा रेड्यांचा प्रश्न अजून सुटलेला नसतानाच, आता चक्क पूर्ण वाढ झालेल्या बिबट्याची भर पडली आहे. यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात बिबट्या या परिसरात आढळून आला होता. बिबट्या एका नागरिकाच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून, त्याने अंगणात झोपलेल्या एका कुत्र्याच्या पिल्लाला भक्ष्य बनवले होते. आता खेडशीच्या माजी सरपंच जान्हवी घाणेकर यांचे घरी बसवलेल्या सीसीटीव्ही मध्ये बिबट्या कैद झाला आहे. दररोज रात्री 12 ते पहाटे 4 या कालावधीत बिबट्याचा या परिसरात मुक्त वावर सुरू असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. डफळचोळ वाडीतील अनेक तरुण एमआयडीसी (MIDC) परिसरात कामाला आहेत. त्यांची दुसरी शिफ्ट (सेकंड शिफ्ट) सुटण्याची वेळ ही मध्यरात्रीची असते. अशा वेळी बिबट्या आणि गवा रेड्यांचा मुक्त संचार पाहता, हे तरुण रोज जीव मुठीत घेऊन घरी परतत आहेत. या वन्यप्राण्यांमुळे रात्री-अपरात्री बाहेर पडणे नागरिकांसाठी अत्यंत धोकादायक बनले आहे. ग्रामस्थांनी तातडीने संबंधित वनविभागाने या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी येथील ग्रामस्थानी वन विभागाने केली होती. मात्र ग्रामस्थांच्या या मागणीकडे वन विभागाने अद्याप लक्ष दिले नसल्याचा आरोप येथील स्थानिक ग्रामस्थांनी केला.
84
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Nov 14, 2025 03:36:02
Parbhani, Maharashtra:अँकर- काही ठिकाणी स्वबळाचे स्पष्ट संकेत असतानाही उमेदवार चाचपणीत पक्षनेत्यांचा वेळ जात आहे. तर जेथे आपले बळ अपुरे आहे, तेथे युती व आघाडी करण्यासाठी मित्रपक्षाच्या भावना जाणून घेतल्या जात आहेत. त्यामुळे सातही पालिकांमध्ये पक्षीय इच्छुक अजूनही उमेदवारी मिळेल की नाही? या विवंचनेतच दिसतायेत. काल संध्याकाळ पर्यंत नगराध्यक्षपदासाठी ७ तर नगरसेवक पदासाठी ५२ अर्ज सात नगर पालिका निवडणुकीसाठी दाखल झाले आहेत. परभणी जिल्ह्यात जेथे पक्षाचे बळ आहे, अशा ठिकाणी इच्छुकांची संख्या एकेका प्रभागातील दहा ते बाराच्या पुढे जात आहे. जेथे अपुरे बळ आहे, तेथे एखादा इच्छुक असेल तर त्याला साथीदार मिळत नसल्याची अडचण आहे. एका प्रभागात दोन वेगवेगळ्या प्रवर्गातील जागा लढवताना एका प्रवर्गातील उमेदवार मिळाला तर दुसरा मिळत नाही. आघाडी किंवा युतीत लढायचे तर प्रचार करताना अडचण येणार आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांसह नगरसेवक पदाच्या उमेदवाराची वेगवेगळी चिन्हे असल्यास प्रचार करताना अडचणी येतात. त्यामुळे निदान वरचे वेगळे आणि खाली दोन एकत्रित वेगळी चिन्हे असली तर मतदारांपर्यंत पोहोचणे सोपे जाते. या एका कारणानेही अनेक ठिकाणच्या उमेदवारीचे भिजत घोंगडे कायम आहे. मानवत व सेलूमध्ये अद्याप नगराध्यक्षपदासाठी एकही उमेदवारी अर्ज आला नाही; तर सोनपेठमध्ये मात्र नगराध्यक्षपदाचे तीन व नगरसेवकपदाचे तब्बल ३२ अर्ज आले आहेत.
77
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 14, 2025 03:01:57
Dhule, Maharashtra:धुले शहरासह जिल्ह्याचा तापमानाचा पारा दिवसागणिक कमी होत आहे. जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक कमी तापमानाची नोंद होत आहे. विशेष म्हणजे आता तापमानाचा पारा हा आठ अंश सेल्सिअस कडून पाच अंश सेल्सिअस कडे वाटचाल करीत आहे. वाढत्या थंडीचा कडाका हा शाळकरी विद्यार्थ्यांसाठी मात्र त्रासदायक ठरत आहे. शाळांचे वेळ बदलावी अशी मागणी पालकांनी केलेली आहे. मात्र शिक्षण विभागाने त्याची दखल घेतलेली नाही. कडाक्याच्या थंडीचा जनजीवनावर प्रचंड परिणाम दिसून येत आहेत. रस्ते निर्मनुष्य होत आहेत. तर अनावश्यक घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची संख्या देखील कमी झालेली आहे. शाळकरी विद्यार्थी आणि व्यायाम करणारी मंडळी आणि बाजार समितीमध्ये येणारे शेतकरीच सध्या रस्त्यांवर दिसून येत आहे. जिल्ह्यातील थंडीचा प्रवास हा शीतलहरीकडे होत है. उत्तर भारतामध्ये गार वाऱ्यांचा परिणाम हा धुळे जिल्ह्यातही दिसून येत आहे.
165
comment0
Report
Advertisement
Back to top