Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

नागपुर अधिवेशन में 20–25 वर्ष से कर्मचाऱियों की पक्की नियुक्ति की मांग पर आंदोलन

SRSHRIKANT RAUT
Dec 11, 2025 13:34:23
Yavatmal, Maharashtra
नागपूर हिवाळी अधिवेशनात समग्र शिक्षा पूर्वीचे सर्व शिक्षा अभियान अंतर्गत 20 ते 25 वर्षापासून कार्यरत कर्मचाऱ्यांना शासन सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी अन्नत्याग आंदोलन केले. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन शासन स्तरावर त्यांच्या मागण्या सोडविण्याचे आश्वासन दिले. या अभियानात कार्यरत 6483 कर्मचारी व इतर 3105 कर्मचाऱ्यांना शासन निर्णय दिनांक 08 ऑक्टोबर 2024 नुसार शासन सेवेत कायम करावयाचे होते, परंतु अद्यापही 3378 कर्मचारी यांना शासन सेवेत कायम करण्यात आलेले नाही. करिता कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषण व स्वेच्छा मरण्याची परवानगी मागितली आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
JJJAYESH JAGAD
Mar 03, 2026 03:20:05
Akola, Maharashtra:होळीची धूम देशभरात सुरू झाली आहे रंगीबेरंगी रंगांची उधळण करत रंगउत्सवाचा आनंद सर्वजण लुटत आहे. अकोल्यात ही धूम पाहायला मिळत आहे, शहरात अनेक ठिकाणी रंग उत्सवाला सकाळपासूनच सुरुवात झाली आहे.शहरातील मुंगीलाल शाळेच्या परिसरात श्रीराम ग्रुप तर्फे नैसर्गिक रंगांच्या होळीच आयोजन करण्यात आलं होतं..गाण्याच्या तालावर थिरकत सर्वांनी होळीचा आनंद लुटला..श्रीराम समूहा तर्फे गेल्या अनेक वर्षांपासून नैसर्गिक रंगांच्या होळीच आयोजन करण्यात येत आहेय यामध्ये शहरातील नामवंत डॉक्टर , व्यापारीसह शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी उपस्थित राहून आनंद लुटला.तर एकमेकांवर रंगांची उधळण करत एकमेकांना होळीच्या शुभेच्छा दिल्या ..
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 03, 2026 03:15:59
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:सर्वसाधारण सभेबाबत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ऐनवेळचे विषय घेणार नाही आणि प्रश्न लेखीच द्यावे लागतील, अशा कडक सूचना महापौर समीर राजूरकर यांनी सर्वपक्षीय गटनेत्यांना दिल्या आहे. त्यामुळे कोणत्याही सदस्याला सभागृहात प्रश्न विचारायचा असल्यास तो सात दिवस आधी लेखी स्वरूपात द्यावा लागेल. दिलेल्या प्रश्नावर प्रशासन आधी लेखी उत्तर देईल. त्यानंतरच सभागृहात त्यावर उपप्रश्न विचारण्याची मुभा असेल. तसेच सभा सुरू असताना अचानक कोणतेही नवीन विषय चर्चेला घेतले जाणार नाहीत. केवळ विषयपत्रिकेवरील मुद्द्यांवरच गांभीर्याने चर्चा होईल, असा निर्णय घेण्यात आला आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 03, 2026 03:02:38
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपति संभाजीनगर शहरातील सातारा परिसरातील आलोकनगर भागात दोन बांगलादेशी महिलांना बेकायदेशीररित्या आश्रय दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) कारवाई करत संबंधित घरमालकावर गुन्हा दाखल केला आहे. विनोद कडुबाळ करमासे असे गुन्हा दाखल झालेल्या घरमालकाचे नाव आहे. संबंधित दोन्ही महिलांकडे भारतात राहण्याची वैध कागदपत्रे नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. शिवली अख्तर (वय ३९, रा. खुलना, बांगলादेश) आणि शाकिबा अख्तर निशा (वय १९, रा. मदारीपूर, बांगलादेश) अशी त्या दोन्ही महिलांची नावे असून, त्या बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असल्याचे निष्पन्न झाले आहे. तपासादरम्यान घरमालकाने संबंधित महिलांची माहिती प्रशासनापासून लपविल्याचे समोर आल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दोन्ही महिलांना हद्दपार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 03, 2026 03:02:23
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वपक्षीय नेत्यांची एकत्र होळी Anchor छत्रपती संभाजीनगर येथे संस्थान गणपतीसमोर सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत होळी साजरी केली. यावेळी विविध पक्षांचे नेते एकमेकांना रंग लावत आनंदोत्सवात सहभागी झाले.यावेळी महापौर समीर राजूरकर , उपमहापौर राजेंद्र जंजाळ आमदार प्रदीप जैस्वाल ,उबाठा गटाचे नेते चंद्रकांत खैरे आणि माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित राहून एकमेकांना रंग लावला.राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्व नेते एकत्र येत सण साजरा करत असल्याने सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यात आला. संस्थान गणपती परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 03, 2026 03:01:41
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर मनपाच्या निवडणुकीमधील वॉर्ड क्रमांक १६ मधील अ आणि ब प्रभागमधील विजयी उमेदवारांच्या निवडीला आव्हान देणाऱ्या निवडणूक याचिकेच्या अनुषंगाने औरंगाबाद खंडपीठाने महत्वाचे आदेश दिले आहे. सदरील निवडणुकीतील ईव्हीएम, सीसीटीव्ही फुटेज जतन करून ठेवण्याचे अंतरिम आदेश निवडणूक आयोग आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांना दिले देण्यात आले आहे. १५ जानेवारी २०२६ ला झालेल्या महापालिका के निवडणुकीत प्रभाग क्रमांक १६ अ आणि ब मधून अनुक्रमे संगीता नितीन सांगळे, राजू जगन्नाथ वाडेकर विजयी झाले होते. निकालयानंतर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार अॅड. अभय टाकसाळ आणि शिवसेना उद्धवसेना पक्षाचे जहूराबी नासेर खान यांनी दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर येथे निवडणूक याचिका दाखल केली आहे.
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Mar 03, 2026 02:46:01
Ahilyanagar, Maharashtra:शनि शिंगणापूर देवस्थानच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत साखळी उपोषण सुरू केलंय... कायम कर्मचारीांचा 2025 चा दिवाळीचा बोनस मिळालेला नाही तो मिळावा, वेतनबदलातील फरक कर्मचाऱ्यांना वेतनासोबत अदा करण्यात यावा, वेतनासोबत इ.पी.एफ., एलआयसी, कामगार सोसायटी वेतनातील कपातीचे चेक उशिरा दिले जातात किंवा दिलेले नाहीत या कारणामुळे कर्मचाऱ्यांना कामगार सोसायटीचा व्याजाचा वाढीव भुर्दंड पडलेला आहे. कपातींचे चेक देय वेतनासोबतच अदा करावेत,कर्मचाऱ्यांना मासिक वेतन महिन्याच्या 5 तारखेपर्यंत अदा करावे अशा विविध मागण्यांसाठी हे साखळी उपोषण सुरू करण्यात आलंय...जोपर्यंत सर्व मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण आंदोलन सुरूच राहील असं कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे...शनिशिंगणापूर मंदिर परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर कर्मचारी आंदोलनाला बसले आहेत.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 03, 2026 02:32:48
Shirur, Maharashtra:पुण्याच्या रांजणगाव औद्योगिक वसाहतीलगत असलेल्या गावांमध्ये सायंकाळच्या सुमारास सौम्य धक्का जाणवल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिलीय, अचानक जमिनीला हलकासा कंपन जाणवल्यामुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, काही घरांच्या भिंतींना अतिशय किरकोळ स्वरूपाच्या चिरा पडल्याचे दिसून आले असून या घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. धक्के नेमके भूकंपामुळे जाणवले की औद्योगिक परिसरातील यंत्रसामग्री, स्फोटक कामे अथवा अन्य कारणांमुळे निर्माण झाले, याबाबत प्रशासनाकडून अधिकृत माहिती मिळालेली नाही. दरम्यान, नागरिकांनी संबंधित प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन विभागाने तात्काळ पाहणी करून घटनेचे कारण स्पष्ट करावे तसेच परिसरातील सुरक्षिततेबाबत खात्री द्यावी, अशी मागणी केली आहे.
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Mar 03, 2026 02:00:52
Yeola, Maharashtra:पैठण येथे संत एकनाथ महाराज यांच्या नाथ षष्टी सोहळ्यास निमित्त गेल्या 50 वर्षापासून ह.भ.प कै विठ्ठलतात्या खिल्लारे यांनी सुरु केलेल्या पारेगाव ते पैठण या दिंडी सोहळ्यास आज 51 वर्षे पूर्ण झाली आहे दिंडीचे यावर्षीचे प्रस्थान पारेगाव येथून झाले असुन् यानंतर कोटमगाव,गवंडगाव,वैजापूर महालगाव,गंगापूर,ढोरेगाव,इसारवाडी आदी गावे एकूण 140 किमी चा पायी चालत कडक उन्हाची तमा न बाळगता नाथभाजनाच्या जय घोष करत आणि टाळ मृदुंगाच्या तालावर ठेका घेत घेत असा 8 दिवसांचा मुक्काम करत दिंडी सोहळा नाथ षष्ठीच्या दिवशी पैठण येथे पोहोचणार आहे . दिंडीत एकूण शेकडो भाविक सहभागी झाले आहे यात महिला आणि अबालवृद्धांची संख्या लक्षणीय आहे दिंडी सोबत प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी पंचाक्रोशीतील प्रसिद्ध कीर्तनकरांच्या कीर्तनाची मेजवानी भाविकांना मिळणार आहे ।
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 03, 2026 01:01:36
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली महापालिकेची पहिलीच महासभा ठरली वादळी, सर्वपक्षीय नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना धरलं धारेवर.. अँकर - सांगली महापालिकेची पहिल्याच महासभा प्रचंड वादळी ठरली.पहिल्याच पार पडलेल्या सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले, शहरातल्या स्वच्छता, पाणी पुरवठा, उद्यानांची दुरवस्था, ड्रेनेज योजना, आणि एलइडी प्रकल्पासह प्रशासकीय काळातील कारभारावरून अधिकारयांना चांगलेचं धारेवर धरले. तर प्रशासकीय काळात महासभा घेऊन करण्यात आलेले ठराव रद्द करण्याची जोरदार मागणी देखील महासभेत करण्यात आली,यावर महापौर धीरज सूर्यवंशी यांनी याबाबत पडताळणी करून बेकायदेशीर असणारे ठराव विखंडित करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात येईल,असा आश्वासन या सभेमध्ये दिले. तसेच एलइडी बाबत महापौरांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्याचा निर्णय महासभेत घेण्यात आला. बाईट - मंगेश चव्हाण - विरोधी पक्ष नेते - सांगली महापालिका.
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Mar 03, 2026 01:00:51
Amravati, Maharashtra:पाच फाईल आहे बच्चू कडूंच्या मेळघाट संघर्ष यात्रेचा आज तिसरा दिवस; बच्चू कडू यांच्या मेळघाट संघर्ष यात्रा आणि कर्जमाफी आठवण पदयात्रेला मोठा प्रतिसाद 30 जून पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही तर 1 जुलैपासून एकही रेल्वे फिरू देणार नाही; AI तंत्रज्ञानाचा वापर करून बच्चू कडू करणार आंदोलन अँकर :- देशाला स्वतंत्र मिळून 75 वर्ष झाले मात्र अमरावतीच्या मेळघाट मधीलआदिवासी लोकांना त्यांच्या मूलभूत सुविधा मिळत नाही, अजूनही मेळघाट्यातील आदिवासी समाज मागासलेच आहे त्यांच्या अस्तित्वासाठी व शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीची सरकारला आठवण करून देण्यासाठी मेळघाटातील अतिदुर्गम भागातून बच्चू कडू यांनी संघर्ष यात्रेला सुरुवात केली आहे, ही संघर्ष यात्रा नऊ तारखेपर्यंत चालणार असून 9 तारखेला सलोना ते चिखलदरा या यात्रेचा स्वरूप बदलणार आहे... सरकारने आमच्या प्रश्नाची दखल न घेतल्यास 9 तारखेला सरकार हतबल केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, आणि 9 तारखेला भगतसिंग च्या विचाराच पाऊल टाकू असा इशारा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी राज्य सरकारला इशारा दिला...प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडूंची मेळघाट मध्ये 250 किलोमीटरची मेळघाट संघर्ष व कर्जमाफीसाठी आठवण पदयात्रा सुरू झाली असून याला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे 1 ते 9 मार्च पर्यंत बच्चू कडूंची मेळघाटातील मूलभूत प्रश्नांवर आणि सरकारला कर्जमाफीची आठवण करून देण्यासाठी ही पदयात्रा आहे, मेळघाटातील समस्या आदिवासींच्या मूलभूत गरजा रस्ते पाणी,रोजगार, माता मृत्यू कुपोषण यासाठी बच्चू कडूंची यात्रा आहे,9 मार्चला सलोना ते चिखलदरा महापदयात्रा काढून करणार यात्रेचा समारोप होणार आहे. दरम्यान 30 जून पर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही तर एक जुलैला एकही रेल्वे रुळावर फिरू देणार नाही तसेच AI तंत्रज्ञानाचा वापर करून आंदोलन करण्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे बाईट :- बच्चू कडू, माजी राज्यमंत्री
0
comment0
Report
sidebar-img
Advertisement
Back to top