Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chhatrapati Sambhajinagar431001

छत्रपती संभाजीनगर में सभी दलों के नेता एक साथ होली मनाते हुए रंग मिलाए

VKVISHAL KAROLE
Mar 03, 2026 03:02:23
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वपक्षीय नेत्यांची एकत्र होळी Anchor छत्रपती संभाजीनगर येथे संस्थान गणपतीसमोर सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत होळी साजरी केली. यावेळी विविध पक्षांचे नेते एकमेकांना रंग लावत आनंदोत्सवात सहभागी झाले.यावेळी महापौर समीर राजूरकर , उपमहापौर राजेंद्र जंजाळ आमदार प्रदीप जैस्वाल ,उबाठा गटाचे नेते चंद्रकांत खैरे आणि माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित राहून एकमेकांना रंग लावला.राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्व नेते एकत्र येत सण साजरा करत असल्याने सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यात आला. संस्थान गणपती परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
YKYOGESH KHARE
Mar 03, 2026 04:17:17
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 03, 2026 04:05:02
Solapur, Maharashtra:आरोग्य विमाच्या कॉन्फरन्ससाठी गेलेले राज्यातील सुमारे 400 विमा प्रतिनिधी दुबईत अडकले. विमा कंपनीतर्फे आयोजित कॉन्फरन्स साठी सोलापूरसह राज्यभरातील 370 विमा प्रतिनिधी 27 फेब्रुवारी रोजी दुबईला गेले होते. यामध्ये सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील 43 लोकांचा समावेश आहे. हे सर्व विमा प्रतिनिधी आज मायदेशी भारतात परतणार होते मात्र इराण-इजऱाईल युद्धमुळे भारताकडे येणाऱ्या सर्व फ्लाईट्स रद्द झालेत. त्यामुळे पुढील आदेशापर्यंत या सर्व लोकांना दुबईतच थांबावं लागणार आहे. दरम्यान महाराष्ट्र आणि केंद्र शासनाने लवकरात लवकर भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती या विमा प्रतिनिधिनी केलीय.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 03, 2026 04:04:39
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 03, 2026 04:04:09
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Mar 03, 2026 04:02:36
Dhule, Maharashtra:राज्यातील आदिवासी संस्कृतीचा सर्वात मोठा सण होळी ... होळी म्हणजे आदिवासी बांधवांसाठी दिवाळी दसरा असतो ... यंदा सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये होळीचा उत्साह दांडगा पाहायला मिळाला. राज्याचे आदिवासी विकास मंत्र्यांनी होळीला हजेरी लावत दोन कोटी रुपयांच्या विकास निधीची घोषणा केली. त्यामुळे ही होळी आदिवासी बांधवांसाठी विशेष आहे. प्रत्येक आदिवासी बांधव सर्व काम सोडून होळी साजरा करण्यासाठी आपल्या पाड्यांवर परतला आहे ... काठीच्या राजवाडी होळीपासून आठवडाभर सातपुड्यात होळी साजरी होते .. होळी उत्सवामुळे सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये चैतन्याचे वातावरण पाहण्यास मिळत आहे... काठीच्या या होळी साठी देशभरातून पर्यटक हजेरी लावली ... विशेष म्हणजे होळीचे नवस फेडण्यासाठी आदिवासी बांधवानी केलेल्या वेगवेगळ्या वेशभूषा या लक्षवेधी ठरल्या ... डोक्यावर मोरपिसांचा टोप, कमरेला दुधडी बांधलेल्या आदिवासी तर कमरेला घुंगरू असलेला बावा अश्या सर्वानी होळी रात्र बेधुंद होत उत्साहात काठीची होळी साजरा केली ... ज्या पुरुषांनी महिलेचे सोंग घेतलेले होते अश्या ढानकाडोको तर महिलेच्या वेशात हे पुरुष आहेत हे हि ओळखता येत नव्हते ... या निधीमुळे आता काठीच्या होळीला जागतिक पर्यटनाचा दर्जा मिळण्यास मदत होणार आहे. यावर्षी होळीला आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी हजेरी लावली. उईके यांनी या परिसराच्या विकासासाठी 2 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली आहे. या निधीतून भाविकांसाठी पिण्याचे शुद्ध पाणी, सुसज्ज प्रेक्षक गॅलरी आणि महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे उभारली जाणार आहेत. पुढच्या होळीपर्यंत या सुविधा पूर्ण करण्याचे माझे वचन आहे, असे आश्वासन उईके यांनी दिले. या निधीमुळे आता काठीच्या होळीला जागतिक पर्यटनाचा दर्जा मिळण्यास मदत होणार आहे. रात्रभर ढोल, बासरीच्या आवाजात पारंपरिक नृत्य.... महिल्यांच्या वेषातील पुरुष मंडळी ..... डोंगर उतारावर बसलेली हजारोंच्या गर्दी ..... आणि भव्य अग्नी ज्वालांच्या साक्षीने काठीची होळी यंदा मोठ्या थाटात संपन्न झाली. होळीच्या पवित्र अग्निमध्ये निराशा , आळस , दारिद्र्य , आजार यांचा नाश होईल या ऊर्जेने समृद्ध शांततामय जीवनाची आस घेऊन काठीला सर्वानी होळीला नमस्कार केला आणि आपल्या घराची वाट धरली ..
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 03, 2026 03:50:52
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - आखाती देशातील युद्धाचा शेतकऱ्यांना मोठा फटका, 400 टनापेक्षा जास्त द्राक्ष कोल्ड स्टोरेज मध्ये पडून राहिल्याने शेतकरी अडचणीत - आखाती देशातील युद्धामुळे जिल्ह्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत - सोलापूर जिल्ह्यातील अनेक कोल्ड स्टोरेज मध्ये परदेशात निर्यात होणारे 400 टनापेक्षा जास्त द्राक्षे पडून - सध्या सुरू असलेल्या आखाती देशातील युद्धामुळे रशिया, युरोपला पाठवण्यात येणारा शेकडो टन माल जैसे थे - सुवेझ कालव्यातील वाहतुकीवर निर्बंध आल्याने आता अनेक पट पैसे मोजून दक्षिण आफ्रिकेला वळसा घालून द्राक्ष निर्यात करण्याचा पर्याय उपलब्ध - युद्धाची परिस्थिती आणखी चिघळल्यास एक्सपोर्ट दर्जाचा माल शेतकऱ्यांवर स्थानिक बाजारपेठेत मिळेल त्या भावात विकण्याची वेळ
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Mar 03, 2026 03:50:36
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Mar 03, 2026 03:48:38
Latur, Maharashtra:मुरूड ब्रेकिंग न्यूज... मुरूड शहरासह परिसरात वाढत्या अवैध धंद्यांविरोधात आता महिलांसह गावातील तरूण आणि वयोवृद्ध नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अवैध दारूविक्री, मटका, जुगार आणि गुटख्याची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पण गेल्या काही दिवसांपासून कोणतीही ठोस कारवाई मुरूड पोलीसाकडून होत नाही हे अवैध व्यवसाय खुलेआम पोलिस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच सुरू असल्याचा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. दरम्यान, अवैध दारू, मटका आणि गुटखा विक्री तात्काळ बंद करण्यात यावी म्हणत आंदोलकांनी मुरूड पोलीस स्थानकासमोर ठिय्या आंदोलन केले. वेळीच कारवाई झाली नाही तर रणरागिणी रस्त्यावर उतरतील आणि तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 03, 2026 03:35:34
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:Sng_kombdi_vikri स्लग - ग्रहणामुळे धुळवडच्या कोंबड्या विक्रीला फटक.. अँकर - धुळवड निमित्ताने मटण आणि कोंबड्यांवर ताव मारला जातो,मात्र धुळवडच्या दिवशीच ग्रहण आल्याने त्याचा फटका कोंबड्या विक्रीला बसल्याचं पाहायला मिळतंय.धूळवड निमित्ताने सांगलीत ठीक-ठिकाणी देशी कोंबड्याला मोठी मागणी असते,कोंबड्यांचे दर देखील मटणापेक्षा अधिक आहेत.पाचशे रुपये पासून तब्बल 1500 पर्यंत कोंबड्यांचा दर आहे.मात्र धुळडच्या दिवशीच ग्रहण आल्याने कोंबड्या खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याने,त्याचा फटका कोंबड्या विक्रीवर झाल्याचे पाहायला मिळतंय.विटा या ठिकाणी चौका चौकात कोंबड्या विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात विक्रेते दाखल झाले होते, मात्र कोंबड्या खरेदीला ग्राहकांनी पाठ केली आहे. बाईट - कोंबड्या विक्रेता -विटा
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 03, 2026 03:32:06
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 03, 2026 03:20:05
Akola, Maharashtra:होळीची धूम देशभरात सुरू झाली आहे रंगीबेरंगी रंगांची उधळण करत रंगउत्सवाचा आनंद सर्वजण लुटत आहे. अकोल्यात ही धूम पाहायला मिळत आहे, शहरात अनेक ठिकाणी रंग उत्सवाला सकाळपासूनच सुरुवात झाली आहे.शहरातील मुंगीलाल शाळेच्या परिसरात श्रीराम ग्रुप तर्फे नैसर्गिक रंगांच्या होळीच आयोजन करण्यात आलं होतं..गाण्याच्या तालावर थिरकत सर्वांनी होळीचा आनंद लुटला..श्रीराम समूहा तर्फे गेल्या अनेक वर्षांपासून नैसर्गिक रंगांच्या होळीच आयोजन करण्यात येत आहेय यामध्ये शहरातील नामवंत डॉक्टर , व्यापारीसह शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी उपस्थित राहून आनंद लुटला.तर एकमेकांवर रंगांची उधळण करत एकमेकांना होळीच्या शुभेच्छा दिल्या ..
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 03, 2026 03:15:59
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:सर्वसाधारण सभेबाबत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ऐनवेळचे विषय घेणार नाही आणि प्रश्न लेखीच द्यावे लागतील, अशा कडक सूचना महापौर समीर राजूरकर यांनी सर्वपक्षीय गटनेत्यांना दिल्या आहे. त्यामुळे कोणत्याही सदस्याला सभागृहात प्रश्न विचारायचा असल्यास तो सात दिवस आधी लेखी स्वरूपात द्यावा लागेल. दिलेल्या प्रश्नावर प्रशासन आधी लेखी उत्तर देईल. त्यानंतरच सभागृहात त्यावर उपप्रश्न विचारण्याची मुभा असेल. तसेच सभा सुरू असताना अचानक कोणतेही नवीन विषय चर्चेला घेतले जाणार नाहीत. केवळ विषयपत्रिकेवरील मुद्द्यांवरच गांभीर्याने चर्चा होईल, असा निर्णय घेण्यात आला आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 03, 2026 03:02:38
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपति संभाजीनगर शहरातील सातारा परिसरातील आलोकनगर भागात दोन बांगलादेशी महिलांना बेकायदेशीररित्या आश्रय दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) कारवाई करत संबंधित घरमालकावर गुन्हा दाखल केला आहे. विनोद कडुबाळ करमासे असे गुन्हा दाखल झालेल्या घरमालकाचे नाव आहे. संबंधित दोन्ही महिलांकडे भारतात राहण्याची वैध कागदपत्रे नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. शिवली अख्तर (वय ३९, रा. खुलना, बांगলादेश) आणि शाकिबा अख्तर निशा (वय १९, रा. मदारीपूर, बांगलादेश) अशी त्या दोन्ही महिलांची नावे असून, त्या बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असल्याचे निष्पन्न झाले आहे. तपासादरम्यान घरमालकाने संबंधित महिलांची माहिती प्रशासनापासून लपविल्याचे समोर आल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दोन्ही महिलांना हद्दपार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
0
comment0
Report
sidebar-img
Advertisement
Back to top