Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ मध्ये बेलविक्रेत्याचा खून, लोहारात दहशत

Aug 20, 2024 06:38:06
Yavatmal, Maharashtra

यवतमाळ जिल्ह्यात खुनाचे सत्र सुरूच असून आता लोहारा परिसरात एका बेल विक्रेत्यांचा धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आला आहे। भर वस्तीत अनेकांसमक्ष हा खून झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण आहे। रामनाथ सोनटक्के असे मृताचे नाव आहे, लोहाराच्या देवी नगर मध्ये तो बेल विक्री करून सायकल ने जात असताना अज्ञात व्यक्तीने त्याच्या छातीत चाकु भोसकला, ज्यात तो जागीच गतप्राण झाला. मृतक हा कोळंबी चा मूळ रहिवासी असून ह्या खुनामागे अनैतिक संबंधाची किनार असल्याची चर्चा आहे।

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
GDGAJANAN DESHMUKH
Dec 17, 2025 04:07:34
Parbhani, Maharashtra:अँकर- राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून आता सर्वच राजकीय पक्ष निवडणूकच्या कामाला लागले आहेत. परभणीत ही नाराज असलेले माजी महापौर तथा शहरप्रमुख प्रताप देशमुख सर्व रुसवे फुगवे सोडून निवडणुकीच्या कामाला लागलेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या इच्छुकांची महत्वपूर्ण बैठक पार पडली. परभणी महानगरपालिका कायम राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात राहिली असून येथे राष्ट्रवादीच्या विचारांचे मत आहेत. आमची 65 जागांवर लढण्याची तयारी असून आमच्याकडे सक्षम उमेदवार आहेत,पण पक्ष जी भूमिका घेईल त्याप्रमाणे आम्ही लढू,पण महापौर मात्र राष्ट्रवादीचाच बनऊ असा निर्धार यावेळी माजी महापौर प्रताप देशमुख यांनी व्यक्त केलाय. बाईट- प्रताप देशमुख- माजी महापौर, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Dec 17, 2025 04:06:48
0
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 17, 2025 04:05:28
Nagpur, Maharashtra:नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यात बोरगाव शास्त्री येथील शेतशिवारात वाघाने गोठयात असलेल्या एका गोऱ्यावर हल्ला चढवित त्याला ठार केल्याची घटना घडलीय. त्यानंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे. एकामागे एक शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्याचा जिव वाघ हल्ला करून घेत असल्याने यावेळी शेतकऱ्यांनी घटनास्थळी एकत्र येत आपला रोष व्यक्त केला. यावेळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचा रोषाला समोर जावे लागले. गोठयात तिन बैल, दोन गाई व एक गोरा गोठयात बांधून ठेवले होते. या गोठ्यालातील दरवाज्याला टिणा झाकून ठेवल्या होत्या. परंतु वाघाने काल पहाटेच्या सुमारास वाघाने टिना काढून गोऱ्यावर हल्ला करीत त्यास जखमी करून ठार मारले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली... गेल्या काही दिवसांपासून वाघ अस्वल या वन्य प्राण्यांमुळे भिवापूर नजीक सर्वसामान्य धास्तीत वावरत आहे
0
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Dec 17, 2025 04:03:28
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Dec 17, 2025 04:03:11
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 17, 2025 03:53:46
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Dec 17, 2025 03:37:22
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Dec 17, 2025 03:37:01
Pimpri-Chinchwad, Maharashtra:पिंपरी चिंचवड मध्ये भाजप विरुद्ध अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस ही सरळ लढत होणार हे स्पष्ट झाल्यानंतर शहरात प्रचंड राजकीय उलथापालत होत असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महत्त्वपूर्ण मानले जाणारे नेते राहुल कलाटे पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झालीय. त्यामुळे शहरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसण्याची चिन्ह आहेत. तलाठी यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून संपर्क साधला जात असल्याची चर्चा सुरू आहे. राहुल कलाटे भाजपमध्येही जाणार अशी चर्चा शहरात सुरू आहे. पण राहुल कलाटे यांनी मात्र सध्या तरी वेट अँड वॉच ची भूमिका घेतली आहे...! नेमकं राहुल कलाटे यांच्या मनात काय चाललं आहे जाणून घेतले आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी....!
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 17, 2025 03:36:37
0
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 17, 2025 03:35:03
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Dec 17, 2025 03:32:29
Dhule, Maharashtra:राज्यात नगरपालिकांच्या निवडणुकीमुळे घराणेशाहीचा मुद्दा चांगला गाजला. आमदारांनी आपल्या कुटुंबातीलच सदस्यांना नगराध्यक्ष पदाचा उमेदवार केल्यामुळे चांगलीच चर्चा झाली होती. याच पार्श्वभूमीवर धुळे महानगरपालिकेमध्ये धर्मपत्नीला नगरपालिकेमध्ये निवडणुकीत उभं करण्यात नसल्याच भाजप आमदार अनुप अग्रवाल यांनी जाहीर केले आहे. पक्षातील कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल असं त्यांनी स्पष्ट केले आहे. गेल्या काही दिवसांपासून आमदार अनुप अग्रवाल हे आपल्या धर्मपत्नीला निवडणूक रिंगणात उतरवतील आणि महापौर बनवतील अशी चर्च रंगलेली होती. या चर्चेला अनुप अग्रवाल यांनी स्वतःच पूर्णविराम दिलेला आहे. पत्नीला निवडणुकीच्या रिंगणात उभा करणार नसल्याचा त्यांनी जाहीर केलेला आहे. अल्फा अग्रवाल या समाजकारणातच सक्रिय राहतील, राजकारणात सक्रिय होणार नाहीत असं त्यांनी स्पष्ट केले आहे.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Dec 17, 2025 03:31:09
Akola, Maharashtra:अकोला महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजताच सर्वच राजकीय पक्षांसह इच्छुक उमेदवार वेगाने कामाला लागले आहेत. मात्र, अकोल्यात या निवडणुकीआधी भाजपसमोर अंतर्गत नाराजी आणि बंडखोरीचे मोठे आव्हान उभे ठाकल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. मागील विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी नाकारल्याने नाराज असलेले, तब्बल ३० वर्षे नगरसेवक राहिलेले भाजपचे ज्येष्ठ नेते हरीश अलीमचंदानी यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करून विधानसभा निवडणूक लढवली होती. त्याचप्रमाणे भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते अशोक ओळंबे यांनाही उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाकडून भाजपविरोधात निवडणूक लढवली. या दोन्ही उमेदवारांमुळे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात मतांचे विभाजन झाले आणि त्याचा फटका भाजपला बसत पराभव स्वीकारावा लागला.या पराभаванंतर भाजपने पक्षविरोधी कारवायांचा आरोप करत अनेक आजी-माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करत त्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला.आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप या निष्कासित कार्यकर्त्यांचा विचार करणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे या सर्व नाराज आजी-माजी नगरसेवकांनी एकत्र येत ‘नागरिक संवाद मंच’ची स्थापना केली आहे.या मंचाच्या माध्यमातून आयोजित संवाद कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहिले तर या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या सूचना भेटीत नागरिकांनी लिखित स्वरूपात आपल्या सूचनाही मांडल्या.आगामी महापालिका निवडणुकीत नगरसेवक कसा असावा, नागरिकांच्या नेमक्या अपेक्षा काय आहेत, तसेच शहराच्या विकासाबाबत कोणत्या मुद्द्यांना प्राधान्य द्यावे, यावर नागरिकांनी आपली मते मोकळेपणाने मांडली. या संवाद मंचातून अप्रत्यक्षपणे भाजपला थेट आव्हान देण्यात आल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले.या शक्तिप्रदर्शनानंतर ‘विकास आघाडी’च्या नावाने भाजपविरोधात एकत्रित मोर्चेबांधणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. “नाराजांची एक मूठ” जर प्रत्यक्षात आकाराला आली, तर भाजपची डोकेदुखी निश्चितच वाढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.दरम्यान, भाजप या नव्या आव्हानाकडे कशा प्रकारे पाहते आणि पक्षापासून नाराज झालेल्या या कार्यकर्त्यांना थांबवण्यासाठी कोणती रणनीती आखते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.आगामी महापालिका निवडणुकीत अकोल्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची नांदी या घडामोडींमधून दिसून येत आहे.
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Dec 17, 2025 03:30:18
Parbhani, Maharashtra:परभणी मनपाच्या राजकारणात आता गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी एंट्री केली असून त्यांनी तुरुंगातून निवडणूक लढवीत गंगाखेड विधानसभा जिंकली होती. आता आमदार गुट्टे यांनी यशवंत सेना परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून आपलं पॅनेल उभं करणार असल्याची घोषणा केली. आपण युती आघाडी कुणाशी ही करणार नसून स्वबळावर मनपा निवडणूक लढविणार आहोत. सत्ताधारी महागडी नळयोजना परभणी करांच्या माथी मारण्याचा प्रयत्न करीत असतांना सत्ताधारी असलेले नगरसेवक सचिन देशमुख यांनी स्वपक्षाला विरोध करून नागरिकांची खिशातील जाणारे हजारो रुपये वाचवले होते. महा पालिकेतील भ्रष्टाचारा विरोधात मोहीम उभे करणारे सचिन देशमुख यांना रत्नाकर गुट्टे यांनी यशवंत सेनेचा पॅनल प्रमुख केलाय,अनेक दिग्गज नगरसेवक गुट्टे यांच्या सोबत दिसून आले. नागरिकांचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी यशवंत सेना व परभणी परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून मनपाची निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची घोषणा रासपाचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी येथे केली. परभणीतील सेटलमेंटच्या राजकारणाच्या विरोधात आपण नवा पर्याय देत असल्याच ही आमदार गुट्टी म्हणाले,यामुळे आता परभणी महापालिकेच्या निवडणुकीत चुरस निर्माण होणार आहे. महानगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन जनतेसमोर जाणार आहोत. गंगाखेड मध्ये अकराशे कोटी रुपयांची कामे करून गंगाखेडचा चेहरा मोहरा आम्ही बदललाय,आता परभणीकरांच्या समस्यां सोडवायच्या आहेत,त्यासाठी आम्ही परभणी मनपा लढवणार असल्याचे गुट्टे यांनी स्पष्ट केले...
0
comment0
Report
Advertisement
Back to top