icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Deepak YangadDeepak YangadFollow30 Aug 2025, 11:13 am

महाराष्ट्र पोलीस अधीक्षक बाॅईज संघटना यवतमाळचे जिल्हाध्यक्ष अतीक अफजल शेख व‌ पोलीस बाॅईज राहुल सुभाष वंजारी राष्ट्रीय क्रिडा दिनानिमित्त सन्मान

Waghapur, Maharashtra:राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचा सन्मान यवतमाळ : स्व. मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन शहरातील अमोलकचंद महाविद्यालय सभागृहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना यवतमाळचे जिल्हाध्यक्ष अतीक अफजल शेख आणि पोलीस बॉईज राहुल सुभाष वंजारी यांना जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते यांच्या हस्ते गौरवचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमास जिल्हाधिकारी विकास मीना, पोलीस अधीक्षक कुमार चिंता, जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड, तसेच हॉकिसंघाचे पदाधिकारी, क्रीडा शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

फडणवीस-उद्धव ठाकरे की एक विमान यात्रा, महाराष्ट्र के राजनीतिक समीकरण गरम

Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्ग ठाकरे गट नेते वैभव नाईक बाइट पॉईंट्स. ऑन देवेंद्र फडणवीस और उद्धव ठाकरे एकाच विमानातून प्रवास. तो निवळ योगायोग होता. परंतु उद्धवजी सुद्धा माजी मुख्यमंत्री आहेत आणि प्रमुख नेते हे महाराष्ट्राचे आहेत. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. दोघांनी युती म्हणून काम केलेलं आहे. एकत्र बोलणं चर्चा करणं राजकारणाला अपेक्षित आहे. मीडियाने किंवा विरोधी पक्षाने चर्चा करू नये. राजकारणामध्ये संबंध वेगवेगळे होत चालले आहेत. अशा भेटीमुळे राजकीय संबंध सुधारतील याचा फायदा महाराष्ट्राला होईल. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर पक्षाच्या नावावर, उद्धवजींचे फोटो लावून हे खासदार निवडून आले होते. त्यांच्या मतदारसंघांमध्ये जाऊन उद्धवजींना माफी मागावी लागत आहे. उद्धवजी ने सांगितलं म्हणून तिथल्या जनतेने यांना निवडून दिलं. संजय दिना पाटील यांच्या मतदारसंघांमध्ये सुद्धा उद्धवजीने माफी मागितली. ज्यां कार्यकर्त्यांनी निवडून दिलं त्यांच्यासाठी हा दौरा आहे. अणुऊर्जा प्रकल्पाला जनतेचा नेहमीच विरोध आहे. याआधी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला कोकणातील जनतेने विरोध केला होता. मुणगेतील अणुऊर्जा प्रकल्प आहे त्या प्रकल्पाला कोण आडवी मांजर येतील त्यांना आपण ठेचून काढू असं नारायण राणे म्हणाले होते. अणुऊर्जा प्रकल्पाला आम्ही ठामपणे विरोध करणार आहोत. पालकमंत्री नितेश राणे यांच्या या प्रकल्पाला आम्ही विरोध करू असं सांगितलं आहे. पालकमंत्र्यांची भूमिका विरोध विरोधाची असेल तर त्याचा आम्ही स्वागत करू. आंबा काजू नुकसान भरपाई गेल्या मार्च एप्रिलमध्ये शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी आंदोलन केलं. मागच्या अधिवेशनामध्ये तुटपंजी मदत 220 रुपये कलमाला जाहीर झाले होती. त्याला विरोध केला होता आणि दुसऱ्या दिवशी मोर्चा देखील काढला होता. शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम निलेश राणे यांनी केल आहे. कोकण कृषी विद्यापीठ हे कोकणातील महत्त्वाचे विद्यापीठ आहे या विद्यापीठाने अनेक शेती शास्त्रज्ञ दिलेले आहेत.
0
0
Report

इंदापूर प्राथमिक शिक्षक पतसंस्थे की वार्षिक सभा में हंगामा, 14 निदेशकों पर आरोप

Rui, Maharashtra:इंदापूर प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गोंधळ.. संचालकांमध्ये जुंपली. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेची 103 वी वार्षिक सभा वादळी ठरली. 12.05 टक्के लाभांश मंजूर झाला असला तरी अहवालातील चुकांवरून सभेत मोठा गोंधळ झाला. विविध विषयावरून संचालकांमध्ये जुंपली. दिव्यांग माजी सभापतींनी 14 संचालकांवर आरोप करताच काही संचालक त्यांच्या अंगावर धावले. सुदैवाने त्यांना इजा झाली नाही. सत्ताधारी गटातील पाच संचालक व्यासपीठावर न बसता खाली सभासदांमध्ये बसले होते. यामुळे संचालक मंडळातील दुफळी उघड झाली आहे.
0
0
Report

इंदापुर में जबरी चोरी: दो आरोपी गिरफ्तार, 56 हजार का माल जप्त

Rui, Maharashtra: इंदापूरात जबरी चोरीचा गुन्हा उघड... स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई... दोन आरोपी जेरबंद... आरोपींकडून 56 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत... ANCHOR इंदापूर पोलीस ठाण्यात दाखल जबरी चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून गुन्ह्यातील मुद्देमाल ही जप्त करण्यात आला आहे.. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती विभागाच्या पथकाने गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे ही कारवाई केली... अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये कृष्णा राजू गिरी (वय 20) आणि वैभव देविदास साळुंखे (वय 22), दोघेही अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर येथील रहिवासी आहेत. आरोपींकडून विवो कंपनीचा मोबाईल, सेकंड कॉपी घड्याळ आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली होंडा स्प्लेंडर मोटारसायकल असा एकूण 56 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे... जप्त मुद्देमालासह आरोपींना पुढील कारवाईसाठी इंदापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे...
0
0
Report
Advertisement

दौड़ती लोकल ट्रेन में हत्या के बाद रेलवे पुलिस अलर्ट; कल्याण स्टेशन पर कड़ा सुरक्षा बंदोबस्त

Kalyan, Maharashtra:धावत्या लोकलमधील हत्येनंतर रेल्वे पोलिसांचा अलर्ट मोड. कल्याण स्थानकावर कडेकोट बंदोबस्त तैनात.. अंधेरी बोरिवली दरम्यान धावत्या लोकल ट्रेनमध्ये किरकोळ वादातून २२ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या झाल्याच्या घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी संपूर्ण उपनगरी रेल्वे मार्गावर सतर्कता वाढवली आहे. कल्याण रेल्वे पोलीस देखील ऍक्टिव्ह मोडवर आले असून कल्याण रेल्वे स्थानकावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे .कल्याण रेल्वे पोलिसांनी तातडीने सुरक्षा उपाययोजना वाढवल्या आहेत. कल्याण रेल्वे स्थानकावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून संशयित प्रवाशांची झडती घेतली जात आहे. प्लॅटफॉर्म, प्रवेशद्वार आणि लोकल गाड्यांमध्येही पोलिसांकडून विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.
0
0
Report

शिंदे गुट के नेता आला की वडेट्टीवार को लेकर उथल-पुथल: क्या वडेट्टीवार जाएंगे?

Nagpur, Maharashtra:शिंदे सेनेचा नेता आला कीं विचारणार वडेट्टीवार येणार कां ? कोणी म्हणेल घेतो....कारण विजय व वड्डेवार यांना घ्यायला सगळेच तयार असणार... मात्र वडेट्टीवार यांना घ्यायला कोण तयार नसणार? पण वडेट्टीवार जाणार का? त्यांची काही इच्छा? हे तर कोणी विचाराव.... वारंवार मी त्याचे खंडन करतो... -- आपणच बातमी करता आपणच विचारता... आपणच ठरवताय... तुम्ही ठरवलाय का मला बदनाम करून टाकायच? आणि बदनाम करून माझी प्रतिमा मलिन करायची?.... असं काही नागपूरच्या टीमने कोणाच्या इशा-यावर ठरवलं असेल तर तेही सांगा?... मला शोध घेता येईल? --- कशाला जाऊ?या पक्षामध्ये नताकद आहे.... ठीक आहे दिवस चांगले असतात वाईट असतात.... म्हणजे याचा अर्थ सगळ्यांनी भाजप आणि शिवसेनेबरोबर जाणे असा हा नव्हे... विरोधक शिल्लकच राहिला नाही पाहिजे अशी मीडियाचीच इच्छा दिसत आहे.. तुमच्या या बातम्यांमुळे -- मी गेल्या तीन दशकापासून राजकारण करतोय... -- पक्षाने मला इतकी ताकद दिली विरोधी पक्षनेতা आता विधिमंडळ नेता आहे... आता पक्ष संकटात आहे.. वाईट परिस्थिती आहे... मात्र बदल नक्की होतील.... माझ्या काही मुकुट घालून येत नाही.... --- सामन्य माणसाचे प्रश्न मी मांडत आहे ( टायगर ऑपेरेशननंतर केंद्रीय मंत्री वाढतोय महाराष्ट्रातील ) -- त्यांना शुभेच्छा आहे मात्र त्याचा उपयोग मोदी साहेबांनी करू दिला पाहिजे.... सध्या देशाचा गुराखी असा आहे की कोणत्या जनावराला इकडे तिकडे जाऊ देत नाही.... वाकडे तिकडे गेले की पटकन त्यांना सोटा बसतो... त्यांना खाऊ आणि पिवळी देत नाही... मोदी रुपी गुराखी त्यांना उपयोग करता येईल का हा प्रश्न (on RTO -बावनकुळे पत्र ) --- 56 जीबी च्या ऑडिओ क्लिप आहे.... विदर्भातल्या नव्या अधिकाऱ्यांना टार्गेट केले जातेय... त्यांना वसुलीच्या धंद्यात सामील होण्याकरता अनेक प्रकारचा प्रयोग केला यात आहे.... राजेंद्र भुयार,आनंद मोहड, आता खरमाटे थोडे बॅक फुटवर गेले आहे... गुरु खरमाटेच... मात्र आता यांचा गुरु राजेंद्र भुयार झाला आहे... ते नागपूरातच बसतात.... अमरावतीला नियुक्ती असून जात नाही.. आनंद मोहोड गोंदियाला असतात.. यांचा एजंट गुड्डू सेठ आहे.... आतापर्यंतच्या तीन ट्रॅप मध्ये याचेच मोबाईल क्रमांक आढळून आले.... --- आनंद मोहोड या गुड्डू शेठच्या मोबाईलवरून कॉल करतो..आपल्याच गाड्या लावतो... मध्‍यप्रदेश मधून आलेल्या चोरीच्या गाड्या राजरोसपणे चालवण्यासाठी --ACB -RTO अधिकारी आणि काही एजंट संगमतकरून सरांना या स्कॅम मध्ये ओढता त आणि जो येत नाही..त्यांच्यावर ट्रॅप लावतात -- माझ्या मतदारसंघातील अधिकारी साजन शेंडे --- ती गाडी नंबर वर फोन नंबर आहे म्हणजे माझ्या मतदारसंघातील जाणून बुजून तो झोपला असताना...लगेच त्याची बेल... झाली ... त्या ठिकाणी नाशिकची एक महिला अधिकारी होती तिच्यावर कारवाई नाही.... विदर्भातील अधिकाऱ्यांवर मात्र जाणूनबुजून कारवाई --- महाराष्ट्रात 20 कोटीची दर महिन्याला वसुली सुरू आहे.... विदर्भात सर्वाधिक वसुली होत असते... दहा ते पंधरा कोटी ची --- याचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत आहे... शंभर अधिकाऱ्यांनी रीतसर तक्रार करून पहिली तक्रार घाण केली... दुसरी तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करावी लागली... हा प्रश्न विधिमंडळातीलच.... संभाषण व्हायरल झाले आहे --- अमोल मोहोड नावाचा माणूस आहे... इन्स्पेक्टरला गाडी सोड म्हणून सांगतो... अनेक ठिकाणी राजेंद्र भुयार, आनंद मोहोड -- या चेक पोस्ट बंद करा म्हणजे वसुलीचा धंदा बंद होईल... मंत्रालयाच्या इशा-यावर भुयार, मोहोड आणि हा गुड्डू शेठ --- तरुण प्रामाणिक आरटीओ अधिकाऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार आहे -- शंभर आरटीओ अधिकाऱ्यांनी पत्र दिल्यानंतरही ते पत्र गहाळ झालं किती बदमाश आणि ह****** लोक आहे... ते पत्र आता मुख्यमंत्र्यांपर्यंत गेला आहे (on उदय सामंत स्टेटस ) --- लोकात चर्चा मात्र हा हात नावापुरताच आहे अशी आहे... हा हात सेकंड करण्याकरता की दाबण्याकरता धरला आहे? हे येणाऱ्या काळात दिसेल -- आम्हाला आनंद आहे? ते دوघे एकत्र असतील तर आम्हाला दुःख होण्याचं कारण नाही? (on विमानप्रवास नंतर ) -- कदाचित त्यामुळे चर्चा झाली असेल असं त्यांना वाटत असेल.. मात्र एकनाथ शिंदे हा सुद्धा जिगरी माणूस आहे ना? एवढी माणूस घेऊन जात आहे? कोणी म्हणतो पैशांनी मात्र माणूस इमान का विकतो? इमान विकण्याकरता माणसाची मानसिकता का ढळते हा प्रश्न आहे? त्यामुळे या ऑपरेशन मध्ये मुख्यमंत्री होते की नाही मला माहित नाही? मात्र काल दोघांमध्ये ji चर्चा झाली रात्री त्यानंतर हे स्टेटस आलं असेल असे स्टेटस आलेले -- सध्याच्या राजकारणात एकत्र दिसत असले तरी ते एकत्र नाही... अनेक गोष्टींवरून दिसून येते. नाशिकची जागा पडली... एकनाथ शिंदे यांच्या मनात खदखद आहे... हातात हात असले तरी हृदयाला हृदय मिळते का?
0
0
Report
Advertisement

पातूर घाट पर गजानन महाराज पालखी का भव्य दृश्य, भक्तों का उत्साह चकित

Akola, Maharashtra:शेगावचे संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचा अकोला जिल्ह्यातील चार दिवसांचा मुक्काम आज संपला असून, पहाटे पातूर शहरातून पालखीने वाशिम जिल्ह्याकडे प्रस्थान केले. हजारो भाविकांच्या जयघोषात पालखी सध्या पातूर-वाशिम मार्गावरील निसर्गरम्य घाटातून मार्गक्रमण करत आहे. यावेळी पातूर घाटातील पालखीचे मनमोहक विहंगम दृश्य आमचे प्रेक्षक मोहन पाटील यांनी ड्रोनच्या माध्यमातून टिपले आहे. हिरव्यागार डोंगररांगा, घाटातील वळणावळणाचा रस्ता आणि त्यावरून भक्तिरसात न्हाऊन निघालेली पालखी पाहताना एक वेगळाच आध्यात्मिक अनुभव मिळत आहे. श्री गजानन महाराजांच्या जयघोषाने पातूर घाट परिसर दुमदुमून गेला आहे. चार दिवस अकोला जिल्ह्यात मुक्काम केल्यानंतर पालखीने आज पहाटे पंढरपूरच्या दिशेने पुढील प्रवास सुरू केला. पातूर-वाशिम मार्गावरील घाटातून पालखी मार्गक्रमण करत असताना हजारो वारकरी टाळ-मृदंगाच्या गजरात आणि अभंग गात पायी चालत आहेत. हिरवाईने नटलेला घाट, शिस्तबद्ध पद्धतीने पुढे सरकणारी पालखी आणि भक्तांचा उत्साह यामुळे परिसराला भक्तिमय वातावरण लाभले आहे. ड्रोनमधून टिपलेले हे विहंगम दृश्य पालखी सोहळ्याचे भव्य स्वरूप आणि वारकरी परंपरेचे दर्शन घडवणारे ठरत आहे. हे खास दृश्य पाहूया...
0
0
Report

चंद्रपुर: 28 जून से राष्ट्रीय पल्स पोलियो टीकाकरण अभियान, 0–5 वर्ष के बच्चों को टीका

Chandrapur, Maharashtra:टायटल:--- चंद्रपुरात 28 जून रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम, संपूर्ण जिल्ह्यात  बालकांना पोलिओ प्रतिबंधक लस पाजण्याचे नियोजन अँकर:-- पोलिओ रोगाचे संपूर्ण निर्मूलन करण्याच्या  उद्देशाने भारतात सन १९९५ पासून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. जानेवारी २०११ पासून भारतात एकही पोलिओ रुग्ण आढळून आलेला नसल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO – South-East Asia Region) वतीने भारताला दिनांक २७ मार्च २०१४ रोजी पोलिओ निर्मूलनाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. तरीही, संपूर्ण जगातून पोलिओचे निर्मूलन होईपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे. यावर्षी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम रविवार, दिनांक २८ जून २०२६ रोजी राबविण्यात येणार असून, ० ते ५ वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजण्यात येणार आहेत. मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. शाळा, समाजमंदिरे, अंगणवाड्या, दवाखाने आदी ठिकाणी एकूणतात्पुरती लसीकरण केंद्रे (बुथ) स्थापन करण्यात येणार आहेत. सकाळी ८.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत राहणार आहे. प्रवासात असलेली, स्थलांतरित तसेच निवासाची व्यवस्था नसलेली बालके लसीकरणापासून वंचित राहू नयेत यासाठी २० मोबाईल पथके कार्यरत राहणार आहेत. तसेच बसस्थानक, रेल्वे स्थानक, मेळावे आदी गर्दीच्या ठिकाणी ट्रान्झिट पथकांमार्फत पोलिओ लसीकरणाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. चंद्रपूर
0
0
Report

शिरूर अस्पताल में डॉक्टर केबिन में शराब मिलने से प्रशासन पर सवाल

Shirur, Maharashtra:शिरूर ग्रामीण अस्पतालातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. गोरगरिबांचे हक्काचे ठिकाण असलेल्या या रुग्णालयात मद्यधुंद वातावरण आणि निष्काळजीपणाचा कळस पाहायला मिळालाय. रुग्णालयातील डॉक्टर विलास तांदळकर यांच्या कक्षात दारूच्या बाटल्या आढळल्याने खळबळ उडाली. या घटनेने सामान्य रुग्णांच्या जिवाशी चाललेला खेळ आणि प्रशासनाचा सुस्त कारभार उघड झालाय. काही दिवसांपूर्वीच याच रुग्णालयाने एका गर्भवती महिलेला उपचार नाकारले होते, ही घटना ताजी असतानाच हा दुसरा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त होत असून, अशा बेजबाबदार डॉक्टरांवर आणि प्रशासनावर कडक कारवाई होणार का, हाच मोठा प्रश्न आहे.
0
0
Report
Advertisement

उदय सामंत के स्टेटस से राजनीति गर्म, शिंदे-फडणवीस के साथ भाजपा-शिवसेना संकेत

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. योग्य लोकांचे हात हातात असतील तर...मंत्री उदय सामंत यांच्या 'त्या' स्टेटसमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण! राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आपल्या सोशल मीडियावर ठेवलेल्या एका व्हॉट्सॲप स्टेटसने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या स्टेटसमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एकत्रित फोटो असून, सोबत शिवसेना आणि भाजपचे पक्षचिन्ह दिसत आहे. या फोटोवर खाली एक सूचक संदेश लिहिण्यात आला आहे - योग्य लोकांचे हात हातात असतील तर चुकीच्या लोकांची साथ धरायची कधीच वेळ येत नाही. सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांनी थेट विरोधकांना किंवा महाविकास आघाडीला लक्ष्य करण्यासाठीच हे स्टेटस ठेवले आहे का? अशा विविध चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत..
0
0
Report

कल्याण के पत्रीपूल में विषैला नाग मिला; सर्पमित्र ने सुरक्षित रेस्क्यू कर जंगल भेजा

Kalyan, Maharashtra:कल्याणच्या पत्रीपूल रहेजा कॉम्प्लेक्समध्ये विषारी नाग आढळला. सर्पमित्राने केले सुरक्षित रेस्क्यू ANC- कल्याण पश्चिमेतील पत्रीपूल परिसरातील रहेजा कॉम्प्लेक्समध्ये विषारी नाग आढळल्याने काही काळ रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. इमारतीच्या विंगमधील जिन्याजवळ नाग जातीचा विषारी साप दिसताच रहिवाशांची एकच धावपळ उडाली. घटनेची माहिती मिळताच इमारतीतील एका रहिवाशाने तातडीने सर्पमित्र संदीप पंडित यांच्याशी संपर्क साधला. घटनास्थळी पोहोचलेल्या संदीप पंडित यांनी अत्यंत सावधगिरीने आणि सुरक्षित पद्धतीने नागाचे रेस्क्यू केले. रेस्क्यू केल्यानंतर सापाला कोणतीही इजा न होता वनक्षेत्रात सुरक्षितपणे सोडण्यात आले. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. दरम्यान, पावसाळ्यात साप बिळांमध्ये पाणी शिरल्यामुळे मानवी वस्तीकडे वळण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे नागरिकांनी साप आढळल्यास घाबरून न जाता किंवा त्याला मारण्याचा प्रयत्न न करता तात्काळ सर्पमित्र किंवा वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन सर्पमित्र संदीप पंडित यांनी केले आहे.
0
0
Report
Advertisement

ठाकरे के छह सांसद शिंदे के साथ, वाशिम दौरे में पार्टी की असल ताकत दिखेगी

Washim, Maharashtra:यवतमाळ–वाशिम दौऱ्यावर आहेत. बंडखोर खासदार संजय देशमुख यांच्या मतदारसंघातून संघटना पुनर्बांधणीचा संदेश देण्याचा प्रयत्न केला जात आहे. सकाळी यवतमाळ येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर दुपारी वाशिमच्या जैन भवनात संवाद मेळावा होणार आहे. सहा खासदाराच्या पक्षांतरानंतर प्रथमच उद्धव ठाकरे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधून संघटना बळकट करणे, कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवणे आणि पक्षाची पुढील भूमिका स्पष्ट करणार आहेत. या सहा बंडखोर खासदाराना संवाद मेळाव्यातुन काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले या दौऱ्यात आदित्य ठाकरे, संजय राऊत, अरविंद सावंत यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. वाशीम येथील सभास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी.
0
0
Report

कामण में दुखद सड़क हादसा; महिला की मौके पर मौत

Vasai-Virar, Maharashtra:कामणमध्ये दुर्दैवी अपघात; महिलेचा जागीच मृत्यू वसई : वसई तालुक्यातील कामण येथील पोमण गावातील डोंगरीपाडा परिसरात झालेल्या भीषण अपघातात जयवंती पडवले (रा. बामणपाडा) यांचा जागीच मृत्यू झाला. कामावरून घरी परतत असताना दुचाकीवरून त्यांचांचा तोल जाऊन त्या रस्त्यावर पडल्या. त्याचवेळी त्यांच्या अंगावरून आयशर ट्रक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, सध्या कामण-भिवंडी रोडवर सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सुरू असल्याने कुठे कुठे दोन्ही लेनच्या गाड्या एका लेनवर चालू असतात. एका लेनवरुन दुसऱ्या ऐकेरी लेनवर जात असताना हा अपघात घडला. ठेकेदाराने सुरक्षेचे दृष्टीने योग्य नियोजन न केल्याचा आरोप होत आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, पोलिसांनी घटनेची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top