Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ में बारिश से सोयाबीन की फसल कमजोर, किसान चिंतित, लागत बढ़ने का डर

SRSHRIKANT RAUT
Oct 12, 2025 11:32:22
Yavatmal, Maharashtra
यवतमाळ मध्ये यंदा सतत झालेल्या पावसामुळे सोयाबीनची पिके कमकुवत झाली असून चांगले पीक हाती येईल की नाही याची शाश्वती नाही. तरीही शेतकऱ्यांनी सोयाबीनचीं सोंगणी सुरू केली आहे. अर्धे अधिक पीक सडले असले तरी जे हाती येईल ते पीक सोंगण्याची लगबग शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. सोयाबीनच्या शेंगा तोडून बघितल्यास त्यातील दाना अतिशय बारीक आहे. शेंगांची संख्या देखील कमी आहे. अशा परिस्थितीत मजुरीचा मोठा खर्च शेतकऱ्यांना करावा लागतो आहे. त्यानंतर सोयाबीन काढून ते विक्रीस न्यावे लागेल. हा सर्व खर्च बघता हाती येणारे पीक अत्यल्प आहे. तरीही काही शेतकरी भाबड्या आशेने ही जोखीम पतकरीत आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SMSarfaraj Musa
Oct 12, 2025 15:45:45
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली फ्लॅश झी 24 तास टू द पॉईंट मध्ये गोपीचंद पडळकरांनी केलेल्या जयंत पाटील यांच्या आरोपाचं रमेश पोरवाल यांच्या मुलाकडून स्पष्टीकरण गोपीचंद पडळकरांकडून करण्यात आलेले आरोप बेताल - रमेश पोरवाल यांचे चिरंजीव राहुल पोरवाल यांच्याकडून स्पष्टीकरण. आमच्या कुटुंबीयांबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल आम्ही पडळकरां विरोधात कायदेशीर कारवाई करणार. जयंतराव पाटील यांनी आमची प्रॉपर्टी हडप केलेली नाही,अंगठे घेतले असं कुठलीच घटना घडलेली नाही. 2013 ला आमच्या वडिलांचे निधन झाले. आज 2025 ला बारा वर्षानंतर चुकीचे व बेताल वक्तव्य केलेले आहे,हे पूर्णतः चुकीचे. राजकीय वर्चस्वासाठी हे केलेले बेताल वक्तव्य आहे. जयंत पाटलांनी रमेश पोरवाल यांच्या मृत्यूनंतर अंगठयाचे ठस्से घेऊन पोरवाल यांची जमीन बाळकावल्याचा पडळकरांकडून करण्यात आला होता आरोप.. बाईट - राहुल पोरवाल - मृत रमेश पोरवाल यांचे चिरंजीव - ईश्वरपूर (इस्लामपूर )-सांगली
0
comment0
Report
MKManoj Kulkarni
Oct 12, 2025 15:31:37
Mumbai, Maharashtra:अँकर -- झी 24 तास च टू द पॉईंट या कार्यक्रमात भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जयंत पाटील यांनी जमिनी बळकावण्याचा आरोप केला आहे. या संदर्भात आमचे प्रतिनिधी मनोज कुळकर्णी यांनी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याशी खास बातचीत केली. शशिकांत शिंदे म्हणाले: जयंत पाटलांचा राजकीय प्रवास बऱ्याच लोकांना माहिती आहे ते सोज्वळ आहे. त्यांना राजारामबापू पाटील यांचा वारसा आहे. राजकारणात वैयक्तिक टिके बरोबर आरोप प्रत्यारोप होत आहेत. जयंत पाटलांचे बाबतीत असं काही असेल असं मला वाटत नाही. अधिवेशन काळात एक महिला आपल्यावर अन्याय झाला म्हणून आली होती पण तिला न्याय देण्याची भूमिका कोणी घेतली नाही. या सर्वांची चौकशी करावी. सरकारने चौकशी करण्याच्या बाबतीत निर्णय घेतला तर सगळ्यांची चौकशी व्हावी; एकतर्फी विरोधकांची चौकशी करण्याचा अधिक होणार नाही. जयंत पाटळ हे मातब्बर नेते आहेत; अनेक नेत्यांना दबावाखाली अशा प्रकारचा राजकारण फोडण्याचा प्रयत्न होतोय. ते फुटत नाही म्हटल्यावर वेगवेगळ्या प्रकारे करणार. जनता ठरवेल महाराष्ट्राच्या मनामनात ठरवेल. जनता ठरवते आम्ही कसं सांगायचं, मी जनतेच्या मनात आहे.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Oct 12, 2025 15:01:34
Kalyan, Maharashtra:दुचाकीच्या हेडलाईटच्या प्रकाशात स्मशानभूमीत अंत्यविधी उरकावा लागला KalyaNच्या सापड गावातील एका स्मशानभूमीचा व्हिडिओ व्हायरल झालाय. ज्यामध्ये दिसत आहे की एका दुचाकीच्या हेडलाईटच्या प्रकाशात अंत्यविधी केला जात आहे. या स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ता नाही. स्वच्छतेसाठी पाणी नाही. त्या ठिकाणी लाईट नाही. दुचाकीच्या हेडलाईटच्या प्रकाशात अंत्यविधी करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका ही स्मार्ट सिटी मध्ये समावेश आहे किती ही पालिका गाजा वाजा करत असली तरी आज च्या दृशा मधून समोर येत आहे गावकर्यांनी केडीएमसी कडे वारंवार पाठपुरावा करून देखील. ही दुरावस्था असल्याची बाब उघड झाली आहे नागरिकांन मध्ये प्रचंड नाराजगी आहे.
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Oct 12, 2025 13:20:26
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Oct 12, 2025 13:17:43
Pune, Maharashtra:दोन दिवसांपूर्वी अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी करमाळा येथे बोलताना दिवाळीचे खरेदी करताना हिंदू व्यवसाय करून खरेदी करावी असे आवाहन भाषणात बोलताना झाले होते... यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार संग्राम जगताप यांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार असल्याचं सांगितलं होते... तर आज आमदार गोपीचंद पडळकर यांनी आम्ही आमदार संग्राम जगताप यांच्या पाठीशी असून संग्राम जगताप यांच्यासोबत आम्ही कालही होतो आजही राहणार आणि पुढेही राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.... त्यामुळे भाजपकडून आमदार संग्राम जगताप यांना क्लीन चीट दिल्याचे दिसून येत आहे... संग्राम जगताप जी भूमिका घेत आहेत ती योग्य असल्याचे पडळकर यांनी म्हंटले आहे तर त्यांना मिळणाऱ्या नोटिशीला उत्तर द्यायला ते सक्षम आहेत त्यांचा तो पक्षाचा विशेष आहे त्यामुळे त्यात मी जास्त बोलणार नाही. कुख्यात गुंड निलेश घायवळ प्रकरणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवारांवर सडकून टीका केली आहे. रोहित पवार यांना नेता बनायची घाई झाली असल्याचं म्हंटल आहे. रोहित पवार धुतल्या तांदळासारखे वागत असून त्यांच्या आजूबाजूला शेकडो गुन्हेगार आहेत. 2019 ला रोहित पवार घायवळच्या मदतीने आमदार झाले असून त्यावेळेस घायवळ गुंड नव्हता का असा प्रश्न गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. सहा वर्षात काय बदल झाला रोहित पवार यांची भूमिका बदलली. रोहित पवारांना अक्कल कमी असून त्यांना नेता बनायची घाई झाली आहे पण त्यांच्या स्वप्न पूर्ण होणार नसल्याचे देखील पडळकर यांनी म्हटल आहे.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Oct 12, 2025 13:11:00
Jalna, Maharashtra:जालन्यात मैत्रीपूर्ण लढत होईल-गोरंटयाल पहिला महापौर आमचाच होणार जालना महापालिका निवडणूकीत 35 पेक्षा अधिक उमेदवार निवडून आणण्याची आमची तयारी चेहरे फक्त भाजपकडे आहेत,दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे चेहरे नाहीत जाती पातीपेक्षा विकासाच्या मुद्द्यांवर आम्ही निवडणूक लढवणार अतिवृष्टीत नेते स्वतःच्या घराला वाचवू शकले नाहीत तुम्हाला काय वाचवणार? अँकर महापालिका निवडणुकीत युती करायची की नाही याचे अधिकार मुख्यमंत्र्यांनी जिल्हाध्यक्षासह समन्वय समितीला दिलेत,त्यामुळे निवडणूकीबाबत युती करायची की नाही याबाबत निर्णय स्थानिक पातळीवर होईल असं जालन्यातील भाजपचे नेते कैलास गोरंटयाल यांनी म्हटलंय.जालन्यात मैत्रीपूर्ण लढत होईल आणि पहिला महापौर आमचाच होणार असल्याचा दावा गोरंटयाल यांनी केलाय.जालना महापालिका निवडणुकीत भाजपचे 35 पेक्षा अधिक उमेदवार निवडून आणण्याची आमची तयारी असल्याचं गोरंटयाल यांनी स्पष्ट केलं.चेहरे फक्त भाजपकडे आहेत,दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे चेहरे नाहीत अशी टीका देखील गोरंटयाल यांनी केली.जाती पातीपेक्षा विकासाच्या मुद्द्यांवर आम्ही निवडणूक लढवणार असूनअतिवृष्टीत नेते स्वतःच्या घराला वाचवू शकले नाहीत तुम्हाला काय वाचवणार? असा टोलाही गोरंटयाल यांनी आमदार अर्जुन खोतकर यांना हाणलाय. बाईट : कैलास गोरंटयाल,नेते,भाजप आणि மाजी आमदार
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Oct 12, 2025 12:35:00
Vasai-Virar, Maharashtra:मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गांवर मोठी वाहतूक कोंडी मुंबई आणि गुजरात दोन्ही वाहिनीवर वाहनांच्या लांबच लांब रांगा ठाणे–घोडबंदर राज्यमार्गावरील गायमुख घाटभागात मिरा-भाईंदर महानगरपालिकेमार्फत रस्ताबदुरुस्ती आणि डांबरीकरण करण्यासाठी काल ११ ऑक्टोबर रात्री १० वाजेपासून १४ ऑक्टोबर रात्री १२ वाजेपर्यंत जड व अवजड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गांवर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली असून याचा सामान्य नागरिकांना मोठा फटका बसला आहे. मुंबई आणि गुजरात दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यामुळे वाहन चालक आणि प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. विशेष म्हणजे वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी विविध पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले असले तरी, वाहनांची मोठी संख्या आणि मीरा भाईंदर आयुक्तालायच्या वाहतूक शाखेच्या नियोजन आणि अंमलबजावणीच्या आभावमुळे वाहन चालक आणि प्रवाशांना मोठा फटका बसला आहे.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Oct 12, 2025 12:34:47
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Oct 12, 2025 12:30:58
Navi Mumbai, Maharashtra:Anchor- तुर्भे एपीएमसी परिसरात जुन्या वादातून झालेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या इसमाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आलेय. जुना वाद मिटविण्याच्या बहाण्याने किशोर वरड आणि त्याच्या सहकाऱ्यांना घरी बोलावून आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केला. या दरम्यान किशोर वरड याच्या डोक्यावर बॅट आणि फायबर रॉडने हल्ला केल्याने किशोर गंभीर जखमी झाला होता. किशोर सह अन्य जखमी सहकाऱ्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र आज किशोरचा मृत्यू झालाय. किशोर चा मृत्यू झाल्याने रुग्णालयाबाहेर तसेच तुर्भे परिसरात तणावाचे वातावरण असून पोलीस बल तैनात करण्यात आलेय. याप्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल करत चार आरोपीना अटक केली असून इतरांचा शोध सूरू आहे.
0
comment0
Report
HPHARSHAD PATIL
Oct 12, 2025 12:19:23
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Oct 12, 2025 12:10:08
Navi Mumbai, Maharashtra:भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) चे अध्यक्ष डॉ. वी. नारायणन यांनी आज वाशी पोलिस स्टेशन ला अचानक भेट दिली आणि तेथील पोलिस अधिकार्‍यांशी संवाद साधला. डॉ. नारायणन हे रॉकेट आणि अंतराळ यान प्रणोदन या क्षेत्रातील तज्ज्ञ असून देशाच्या अंतराळ मोहिमांमध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे. वाशी पोलिस स्टेशनमध्ये त्यांच्या स्वागतासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चादेकर तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या प्रसंगी डॉ. नारायणन यांनी पोलिस दलाच्या कार्याचे कौतुक केले आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या सदिच्छा भेटीमुळे पोलिस कर्मचार्‍यांमध्ये उत्साह आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले
0
comment0
Report
Advertisement
Back to top