Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाल में 1200 ग्राम पंचायतें जुड़ने का दावा, सच में 80 में इंटरनेट सेवा

SRSHRIKANT RAUT
Feb 21, 2026 01:16:32
Yavatmal, Maharashtra
यवतमाळ जिल्ह्यातील १२०० हून अधिक ग्रामपंचायती डिजिटल नेटवर्कने जोडण्याचे दावे केले जात असले तरी महानेटमार्फत पुरविली जाणारी इंटरनेट सुविधा प्रत्यक्षात ८० ग्रामपंचायतींमध्येच आहे. त्यातही फक्त ६५ ग्रामपंचायतींमध्ये सेवा सुरळीत सुरू आहे. चार वर्षांपूर्वी ग्रामपंचायत मध्ये साहित्य उपलब्ध करून देण्यात आले होते, मात्र काही दिवसानंतर सेवा पूर्णपणे ठप्प झाली. परिणामी ग्रामपंचायचे कामकाज विस्कळीत झाले व इंटरनेट सुविधेचे साहित्य हे सध्या धूळ खात असून, स्वखर्चाने इंटरनेट चालवावे लागत असल्याचा आरोप सरपंच प्रमोद नाटकर यांनी केला.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VKVISHAL KAROLE
Feb 21, 2026 03:17:37
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर विभागासह जिल्ह्यातील महसूल प्रशासन प्रमुखांनी आठवड्यातून एकदा तरी ग्राऊंड रिअॅलिटी चेक करून प्रशासकीय सेवा-सुविधांमध्ये उपाययोजना करण्याचा सल्ला अतिरिक्त मुख्य महसूल सचिव विकास खारगे यांनी शुक्रवारी दिला. त्यांनी आठवड्यातून एका जिल्ह्यातील महसूल प्रशासनाच्या सेवांची झाडाझडती घेण्यासाठी थेट जिल्हा कचेरीत जाण्याचा उपक्रम सुरू केला आहे. त्या अंतर्गत शुक्रवारी खारगे हे छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. त्यांनी नगर भूमापन विभाग, भूमी अभिलेख, मुद्रांक विभाग, सेतूसुविधा केंद्रात जाऊन तेथील नागरिकांशी सुविधांबाबत चर्चा केली. भूममापन कार्यालय, सेतूसुविधा केंद्र पाहून खारगे यांनी नाराजी व्यक्त केली. तेथील सुविधा, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अस्वचछतेवरही त्यांनी बोट ठेवले. सेतूमध्ये विविध प्रमाणपत्रे काढण्यासाठी आलेल्या नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. त्याचप्रमाणे नगर भूमापन कार्यालयातील कामाचा त्यांनी आढावा घेतला.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 21, 2026 03:03:21
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची वाय प्लस पोलिस सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय राज्य शासनाच्या गृह विभागाने घेतला आहे. यानुसार शुक्रवारी दानवे यांना देण्यात आलेली 'वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा मागे घेण्यात आली. विषेश म्हणजे त्यांचा विधानपरिषद सदस्यत्वाचा कालावधी ४ महिन्यांपूर्वीच संपला आहे. राज्य शासनाच्या गृह विभागाकडून याबाबत आदेश शुक्रवारी जारी करण्यात आले. त्या आदेशानुसार छत्रपती संभाजीनगर पोलिस आयुक्तालयाने पुढील कार्यवाही सुरू केली. दानवे यांच्याकडे आता विरोधी पक्षनेतेपद राहिले नाही. असे असताना त्यांच्याकडे सरकारी वाहन व पोलिस कर्मचारी सुरक्षा कायम होती. मात्र, शुक्रवारी अचानक त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात पोलिसांना तत्काळ परत बोलावण्यात आले. गृह विभागाच्या आढाव्यानुसार व सुरक्षा पुनरावलोकन समितीच्या शिफारशीनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. सुरक्षा धोका मूल्यांकनात बदल झाल्याने ही कार्यवाही करण्यात आल्याचेही समजते. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Feb 21, 2026 03:02:50
Kalyan, Maharashtra:ठाकरे गटाचे बेपत्ता नगरसेवक मधुर म्हात्रे अचानक खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पाहणी दौऱ्यात. ठाकरे पक्षाचे नगरसेवक शिंदेंच्या दौऱ्यात. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे 11 नगरसेवक निवडून आले होते. त्यापैकी मधुर म्हात्रे, कीर्ती ढोणे, राहुल कोट आणि स्वप्नाली केणे हे चार नगरसेवक अचानक बेपत्ता झाले होते. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने सात नगरसेवकांची नोंद करून स्वतंत्र गट स्थापन केला. तसेच बेपत्ता चार नगरसेवकांच्या घरी ‘कारणे द्या’ नोटीस लावून त्यांच्या नगरसेवक पद रद्द करण्याचा इशाराही देण्यात आला होता. यानंतर या बेपत्ता नगरसेविकांपैकी कीर्ती ढोणे यांनी देवदर्शनासाठी गेल्याचे सांगत पुन्हा ठाकरे गटात प्रवेश करत गटात सहभागी झाले . मात्र उर्वरित तीन नगरसेवकांनी कोकण भवन येथे स्वतंत्र नगरसेवक म्हणून नोंदणी केली. ते अद्याप कोणत्याही गटात औपचारिक सहभागी नसल्याने राजकीय समीकरणांबाबत चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे, ठाकरे गटातून निवडून आल्यानंतर सर्वप्रथम मधुर म्हात्रे बेपत्ता झाले होते. निवडून आल्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या भेटीला गेल्याचा त्यांचा फोटोही व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांनी ठाकरे गटाशी संपर्क साधला नसल्याने चर्चांना अधिक उधाण आले होते. आज तब्बल 34 दिवसांनंतर ते पुन्हा श्रीकांत शिंदे यांच्या विकास कामांच्या पाहणी दौऱ्यात दिसून आले. यावेळी प्रतिक्रिया देताना मधुर म्हात्रे म्हणाले, “मी या ठिकाणचा नगरसेवक आहे, त्यामुळे दौऱ्यानिमित्त उपस्थित राहिलो. काही दिवसांपासून जी चर्चा सुरू आहे त्याबाबत सांगायचं तर मी विपासनासाठी बाहेर गेलो होतो. नगरसेवक झाल्यानंतर देवाकडे जे साकडं घातलं होतं ते पूर्ण करण्यासाठी गेलो होतो. आता परतलो आहे.” तसेच त्यांनी पुढे सांगितले, “आमच्या पक्षश्रेष्ठींशी चर्चा सुरू आहे. जी नोटीस बजावली आहे त्याबाबत आम्ही योग्य उत्तर देत आहोत. आम्ही तीन नगरसेवक आहोत, वरिष्ठ पातळीवर बोलणं सुरू आहे. पुढील भूमिका लवकरच स्पष्ट करू.” महत्त्वाचं म्हणजे, “हा महानगरपालिकेचा अधिकृत कार्यक्रम आहे, कुठल्याही पक्षाचा कार्यक्रम नाही,” असे स्पष्ट करत त्यांनी उपस्थितीचे स्पष्टीकरण दिले. दरम्यान, मधुर म्हात्रे यांच्या या पुनरागमनाने कल्याण-डोंबिवलीच्या राजकारणात नवी चर्चा सुरू झाली असून पुढील राजकीय भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बाइट... मधुर म्हात्रे नगरसेवक
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Feb 21, 2026 03:02:23
Nashik, Maharashtra: नाशिक पालखेड एमआयडीसीत स्टील सळई चोरीचा पर्दाफाश २.७८ कोटींचा मुद्देमाल जप्त.... दिंडोरीच्या पालखेड एमआयडीसी परिसरात स्टीलच्या सळया चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण यांनी मोठी कारवाई करत तब्बल ₹२ कोटी ७८ लाख १७ हजार ५७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.पालखेड एमआयडीसीमधील एम.आय.टी.सी. रोलिंग मिल प्रा. लि. कंपनी परिसरात काही इसम ट्रेलर चालकांशी संगनमत करून एका ट्रेलरमधील स्टील (आसरी) सळया दुसऱ्या ट्रेलरमध्ये टाकून काळ्या बाजारात विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी कंपनीबाहेरील पार्किंग परिसरात छापा टाकून कारवाई केली. या वेळी सात आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून दोन जण फरार आहेत.आरोपींकडून ०६ ट्रेलर (८ ते ३२ मिमी लोखंडी सळईंसह) ,१ मारुती ८०० कार व ७ मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आले असून या प्रकरणी दिंडोरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात झाला आहे
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Feb 21, 2026 03:02:03
Nashik, Maharashtra:नाशिक • तपोवनतील वृक्षतोडीचा मुद्दा पुन्हा गाजण्याची शक्यता • आज नाशिकच्या तपोवन मध्ये वृत्तप्रेमींकडून आंदोलन करण्यात येणार • सकाळी दहा वाजेपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत लाक्षणिक उपोषण करण्यात येणार • नाशिक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सुनावणीनंतर मते मागवण्यात आली होती • मात्र वृत्तप्रेमींकडून मते मागवल्यावर कोणताही प्रकारचे स्पष्टीकरण वृत्तप्रेमींना देण्यात आलेले नाही • त्यामुळे वृत्तप्रेमींकडून आंदोलन करण्यात येणार आहे • तर दुसरीकडे तपोवनातील वृक्षतोडी संदर्भात हरित लवादाकडे याचिका प्रलंबित असून 24 फेब्रुवारीला त्यावर सुनावणी होणार आहे
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Feb 21, 2026 03:01:31
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात रेल्वे प्रशासनाच्या निर्णयाविरोधात नागरिकांनी तीव्र आंदोलन छेडल्याचे पाहायला मिळाले. प्रभाग क्रमांक १ मधील रवीदास नगर परिसरातील नागरिकांनी रेल्वेद्वारे रस्ता बंद करण्याच्या निर्णयाचा निषेध करत थेट रस्त्यावर उतरून आंदोलनाचा पवित्रा स्वीकारला. मूर्तिजापूर येथील रवीदास नगर परिसराला जोडणारा मुख्य रस्ता रेल्वे प्रशासनाकडून अचानक बंद करण्याचे काम सुरू करण्यात आले. नागपूर–मुंबई या प्रमुख लोहमार्गावरील मध्य रेल्वे अंतर्गत येणाऱ्या मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर सध्या चौपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र या कामादरम्यान रवीदास नगरला ये-जा करणारा एकमेव महत्त्वाचा मार्ग बंद करण्यात येत असल्याने शेकडो नागरिक संतप्त झाले. रस्ता बंद झाल्यास शाळकरी मुलांना, रुग्णवाहिकांना तसेच दैनंदिन कामासाठी जाणाऱ्या नागरिकांना मोठा फटका बसणार असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. या निर्णयाविरोधात नागरिकांनी घोषणाबाजी करत रेल्वे प्रशासनाचा निषेध केला. दरम्यान, आंदोलन चिघळू नये यासाठी रेल्वे सुरक्षा बल आणि शहर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात झाला होता. काही काळ परिसरात तणावपूर्ण शांतता पाहायला मिळाली. यावेळी नगरसेवक संदीप सरनाईक आणि नगरसेविका शुभांगी सरनाईक यांनी मध्यस्थी करत रेल्वे प्रशासनाशी चर्चा केली. नागरिकांच्या मागणीची दखल घेत पर्यायी रस्ता उपलब्ध होईपर्यंत सध्या रस्ता बंद करण्याचे काम तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Feb 21, 2026 02:47:04
Bhandara, Maharashtra:जिल्हा सामान्य रुग्णालय व महाविद्यालय येथे स्वयंपाकासाठी घरगुती गॅस सिलेंडरचा वापर... अन्न पुरवठा अधिकारीांची कारवाई .... सहा सिलेंडर जप्त केले गेले. रुग्णालयात जेवण तयार करताना राज्यश्री शाहू नागरी सेवा सहकारी संस्था पालघर ठाणे या संस्थेची टेंडर निवड केली गेली असून रुग्णालयातील रुग्णांना या संस्थेमार्फत जेवण दिले जात आहे. जेवण तयार करताना व्यवसायिक गॅस सिलेंडर न वापरता घरगुती गॅस सिलेंडर वापरल्याचे आढळले. जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी रुग्णालयात जाऊन कारवाई केली; चार भरलेले सिलेंडर आणि दोन सिलेंडर जप्त करण्यात आले. असे एकूण सहा सिलेंडरवर कारवाई केली गेली आणि जप्ती झाली आहे... तसेच संबंधित कंत्राटदारावर अन्नपुरवठा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Feb 21, 2026 02:32:26
Nagpur, Maharashtra:नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यांतर्गत येणाऱ्या देवलापार परिसर पुन्हा एकदा वाघाच्या हल्ल्यामुळे हादरला आहे. सावरा गावाजवळ शेतात काम करत असलेल्या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचि घटना घडली. मुक्ता जोगड्या मरसकोल्हे या काल दुपारी अंदाजे शेतात काम करत असताना अचानक वाघाने त्यांच्यावर झडप घातल्याची माहिती समोर आली आहे. हल्ला इतका भीषण होता की त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेनंतर गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने शेताकडे धाव घेतली. देवलापार आणि आसपासच्या भागात मागील काही दिवसांपासून वाघाच्या हालचाली वाढल्या असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये आधीच भीतीचे वातावरण होते. या ताज्या घटनेनंतर परिसरात दहशतीचे सावट आणखी गडद झाले आहे. माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह पंचनामा करून पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. संबंधित वाघाचा शोध घेण्यासाठी पथक तयार करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.दरम्यान, नागरिकांनी तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली असून, शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Feb 21, 2026 01:16:07
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Feb 21, 2026 01:00:47
Niphad, Maharashtra:नाशिकच्या निफाड तालुक्यातील लासलगाव जवळील विंचूर येथील शासकीय मका खरेदी केंद्रावर बारदान (गोण्या) उपलब्ध नसल्यामुळे गेल्या चार दिवसांपासून मका खरेदी पूर्णपणे ठप्प झाली आहे त्यामुळे मक्याने भरलेले सुमारे 30 ट्रॅक्टर खरेदी केंद्रावर उभे असून शेतकऱ्यांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे बाजारभावापेक्षा प्रतिक्विंटल मक्याला 700 ते 800 रुपये अधिक दर मिळत असल्याने शेतकरी शासकीय मका खरेदी केंद्रावर मका विक्रीला प्राधान्य देत आहेत सध्या शासकीय खरेदी केंद्रावर मक्याला प्रतिक्विंटलाला सुमारे 2400 रुपये दर मिळत आहे, तर बाजार समितीत याच मक्याला 1500 ते 1700 रुपयांदरम्यान दर आहे विंचूर येथील शासकीय मका खरेदी केंद्रावर मका विक्रीसाठी एकूण 788 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे त्यापैकी 198 शेतकऱ्यांकडून गेल्या दीड महिन्यात 9 हजार 780 क्विंटल मक्याची खरेदी करण्यात आली आहे मात्र अद्याप सुमारे 600 मका उत्पादक शेतकरी मका विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत दरम्यान, बारदानाच्या कमतरतेमुळे खरेद‌ी प्रक्रिया थांबल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन विस्कळीत होत आहे प्रशासनाने तातडीने बारदान उपलब्ध करून खरेदी प्रक्रिया सुरळीत सुरू करावी तसेच वाढती गर्दी लक्षात घेता अतिरिक्त मक्का खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरू लागली आहे
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Feb 20, 2026 15:35:40
Shirdi, Maharashtra:शिर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा सातत्याने पाठलाग करून लग्नासाठी दबाव टाकत असल्याप्रकरणी पोलिसांनी इरफान शेख नामक तरुणाला अटक केली आहे. यासह आरोपीला मदत करणारा त्याचा भाऊ अरबाज शेख आणि भावजई आयेशा शेख यांच्यावर देखील पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.. शिर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात राहणाऱ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीने इरफान शेख नामक युवकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तिने दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, आरोपी इरफान हा सातत्याने पाठलाग करायचा आणि इन्स्टाग्रामवर मेसेज करून लग्नासाठी दबाव टाकत होता.. इरफान याला त्याचा भाऊ अरबाज आणि भावजई आयेशा शेख यांची देखील साथ होती , त्यामुळे ते देखील माझ्यावर लग्नासाठी आणि धर्मांतरासाठी दबाव टाकत होते. पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत इरफान शेख याला ताब्यात घेतले असून त्याचे भाऊ आणि भावजई फरार झाले आहेत..
0
comment0
Report
PNPratap Naik1
Feb 20, 2026 14:00:36
Kolhapur, Maharashtra:गेल्या अनेक महिन्यांपासून सरकारकडून दुर्लक्षित राहिलेल्या कोल्हापुरातील शाहू जन्मस्थळ संग्रहालयाचे लोकार्पण 21 फेब्रुवारीला दुपारी 4 वाजता होणार आहे. राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते या संग्रहालयाचे लोकार्पण होणार आहे. या संग्रहालयाच्या माध्यमातून राजर्षी शाहू महाराज यांचे आजवर प्रकाशात न आलेले जीवन चरित्र उलगडणार आहे.. त्यामुळे इतिहास संशोधक आणि त्याचबरोबर जे शाहू जन्मस्थळ विकासासाठी कित्येक वर्ष संघर्ष करत होते त्यानी समाधान व्यक्त केले आहे. कसबा बावडा येथे शाहू महाराजांचे जन्मस्थान असणार्या लक्ष्मी विलास पॅलेस या ठिकाणी साकारण्यात आलेल्या वस्तुनिष्ठ संग्रहालयात नेमकं काय काय आहे ? यावर एक नजर टाकूया. शाहू महाराजांनी इटालियन बी नावाची मधमाशी परदेशातून आणून मधुमक्ष पालन उद्योगाला दिलेली चालना. हत्तीची जोपासना करणारे शिवारान्य राखीव जंगल शाहू महाराजांनी उभारले. शाहू महाराजांनी तोफांचे केले नांगर. शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी शाहू महाराज यांनी शेतकऱ्याच्या उन्नतीसाठी तोफांचे नागर केले. शाहू महाराजांनी त्या काळात विमानातून केलेली सफर, आणि सी प्लेनचे पाहिलेले स्वप्न. शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात उभारलेले कॉफी आणि चहाची मळे. शाहू महाराजांनी स्वतः कोल्हापूर टी 1 नावाचा ब्रँड विकसीत केला. मराठा लष्करी परंपरेचे पुनर्जीवन. शाहू महाराजांनी सुरू केलेली पहिली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था.
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Feb 20, 2026 13:51:02
0
comment0
Report
Advertisement
Back to top