Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chhatrapati Sambhajinagar431001
दानवे की वाय प्लस सुरक्षा हटाई गई; गृह विभाग का निर्णय राजनीतिक हलचल तेज
VKVISHAL KAROLE
Feb 21, 2026 03:03:21
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची वाय प्लस पोलिस सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय राज्य शासनाच्या गृह विभागाने घेतला आहे. यानुसार शुक्रवारी दानवे यांना देण्यात आलेली 'वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा मागे घेण्यात आली. विषेश म्हणजे त्यांचा विधानपरिषद सदस्यत्वाचा कालावधी ४ महिन्यांपूर्वीच संपला आहे. राज्य शासनाच्या गृह विभागाकडून याबाबत आदेश शुक्रवारी जारी करण्यात आले. त्या आदेशानुसार छत्रपती संभाजीनगर पोलिस आयुक्तालयाने पुढील कार्यवाही सुरू केली. दानवे यांच्याकडे आता विरोधी पक्षनेतेपद राहिले नाही. असे असताना त्यांच्याकडे सरकारी वाहन व पोलिस कर्मचारी सुरक्षा कायम होती. मात्र, शुक्रवारी अचानक त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात पोलिसांना तत्काळ परत बोलावण्यात आले. गृह विभागाच्या आढाव्यानुसार व सुरक्षा पुनरावलोकन समितीच्या शिफारशीनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. सुरक्षा धोका मूल्यांकनात बदल झाल्याने ही कार्यवाही करण्यात आल्याचेही समजते. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PNPratap Naik1
Feb 21, 2026 04:17:45
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Feb 21, 2026 04:15:55
Ambernath, Maharashtra:गोरगरीब महिलांना पैशांचं आमिष दाखवून अंडाशयाची तस्करी बदलापुरमध्ये धक्कादायक प्रकार पोलिसांकडून तीन महिलांना अटक मुख्य सूत्रधार महिलेच्या घरात सापडले संशयास्पद इंजेक्शन बदलापूरमधील एका पीडित महिलेनं उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱयांशी संपर्क साधल्यानंतर हा प्रकार उघडकीस आलाय. त्यानंतर रुग्णालयातील डॉक्टरांनी बदलापूर पूर्व आणि पश्चिम या दोन्ही पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवल्यानंतर ज्युवेली गावात राहणाऱया सुलक्षणा गाडेकर आणि तिची उल्हासनगरातील साथीदार अश्विनी चाबूकस्वार, मंजुषा वानखेडे अशा तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. या सर्वांना 25 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. बदलापुराच्या ज्युवेली गावातील नॅनो सिटी इथं सुलक्षणा गाडेकर ही महिला राहते. तिने गर्भाशयात स्त्री बीजाची वाढ होण्यासाठी लागणारे इंजेक्शन्स घरातच साठवले होते. गरजू महिलांना पैशांचं आमिष दाखवून ती हे इंजेक्शन्स देत होती. तसंच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बेकायदेशीरपणे सोनोग्राफी देखील करवून घ्यायची. गर्भाशयात स्त्री बिजाची वाढ झाल्यानंतर अशा महिलांना गाडेकर ही आयव्हीएफ सेंटरमध्ये पाठवायची. तिथं ऑपरेशन थिएटरमध्ये नेऊन गर्भाशयातील अंडाशय काढलं जायचं. त्यानंतर त्याची सर्रासपणे विक्री करण्यात येत होती.पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावून सुलक्षणा गाडेकर हिच्यासह तिचे साथीदार अश्विनी चाबूकस्वार, मंजुषा वानखेडे यांना ताब्यात घेतलय. पोलिसांनी गाडेकर यांच्या घरी छापा मारून गर्भाशयासाठी वापरण्यात येणाऱ्या इंजेक्शनचे फोटो, सोनोग्राफीचे फोटो, खोटी प्रतिज्ञापत्रं, महिलांचे फोटो आणि इतर संशयास्पद कागदपत्रे जप्त केली आहेत.
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Feb 21, 2026 03:46:20
Chendhare, Maharashtra:भाजप राष्ट्रवादीचे वनवनिर्वाचित सदस्य एकत्र गोव्यात. भाजप आणि राष्ट्रवादीची नवी खेळी: खासदार सुनील तटकरे, धर्यशील पाटील, आमदार रवी पाटील, जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, सतीश धारप यांच्यासह अन्य नेत्यांचा उमेदवारांसोबत व्हायरल फोटो समोर. शिंदे सेनेला एकाकी पाडण्यासाठी राजकीय खेळी. अँकर - रायगड जिल्हा परिषदमध्ये सत्ता स्थापनेसाठी वेगवान हालचाली सुरू आहेत. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार हे जवळजवळ निश्चित मानले जात आहे. दोन्ही पक्षाचे नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य सध्या गोव्यात असल्याची माहिती समोर आलीय. या व्हायरल फोटोत सुनील तटकरे, आमदार रवींद्र पाटील, खासदार धैर्यशील पाटील यांच्यासह दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते असल्याचं दिसून येतंय. मात्र सर्वाधिक जागा जिंकून सत्तेपासून दूर राहिलेल्या शिंदे शिवसेनेला मित्र पक्षाकडून एकाकी पाडण्यासाठी ही खेळी असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागलीय. शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी आम्हाला सोबत न घेतल्यास पुढील निवडणुकीत वेगळा विचार करू असा इशारा भाजप आणि राष्ट्रवादीला दिलाय त्यामुळे रायगड जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापन समीकरणात अध्यक्षपदावर कोण बसतोय याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलंय.
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Feb 21, 2026 03:46:02
Satara, Maharashtra:स Qatar: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या दरे गावी अचानक आल्याने सातारा जिल्हा परिषदेचा तिढा सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकी मध्ये महायुतीतच त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे सत्तेमध्ये कोण येणार ही उत्सुकता सातारकरांना लागून राहिली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला 27 राष्ट्रवादीला 20 तर शिवसेनेला 15 अशा जागा मिळाल्याने सत्तेसाठी असणारा 33 आकडा जुळवण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेना एकवटल्याचे चित्र पाहायला मिळत आहे दरम्यान भाजपाकडूनही जिल्हा परिषदेवर अध्यक्ष पदाचा दावा केला जात असल्याने अजूनही तीनही पक्षांच्या भूमिका गुलदस्तात आहेत. मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर भाजपच्या मंत्र्यांनी केलेल्या टिके मुळे दोन्ही पक्षांमध्ये नाराजी आहे. याबाबत रात्री अचानक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा जिल्ह्यात दरेगावी मुक्कामी आले आहेत त्यामुळे सत्ता स्थापनेचा पेच संपणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे…
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 21, 2026 03:45:45
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत छत्रपती संभाजी नगर महापालिकेच्या वतीने शहरात उभारल्या जाणाऱ्या ११,५०० घरांसाठी पात्र ठरलेल्या ५,१६२ नागरिकांची प्रतीक्षा आता संपणार आहे. या घरांसाठीचा 'लकी ड्रॉ' फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात काढला जाण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकां mouरे रेंगाळलेली ही प्रक्रिया आता अंतिम टप्यात आली आहे. सॉफ्टवेअरच्या तांत्रिक तपासणीचा अहवाल येताच लाभार्थींची निवड केली जाणार आहे. महानगरपालिकेने तिसगाव, पडेगाव, सुंदरवाडी आणि हर्सल या four ठिकाणी गृहप्रकल्प सुरू केले आहेत. या प्रकल्पांतर्गत बेघर नागरिकांना ९.५० ते १२ लाखांदरम्यान वन बीएचके घरं मिळणार आहेत.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 21, 2026 03:34:02
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 21, 2026 03:32:09
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज परिसरातील तिसगाव खवड्या डोंगर वसाहतीत एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. ७ ते ९ वर्षे वयोगटातील एका चिमुरडीवर तिच्या सावत्र पित्याने अत्याचार केल्याचा आरोप आहे. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मुलीच्या आरडाओरडीनंतर हा प्रकार शेजाऱ्यांच्या लक्षात आला. मुलीचा जोरात रडण्याचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी तातडीने घराकडे धाव घेतली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी अत्यंत दयनीय अवस्थेत आढळून आली. तिच्या पाठीवर, हातावर आणि पायांवर चटक्यांचे ८ ते १० वण दिसून आले. हा अत्याचार गेल्या काही दिवसांपासून सुरू असल्याचा संशय शेजाऱ्यांनी व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मुलीला सुरक्षित ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. संबंधित सावत्र पित्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तो सध्या फरार आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 21, 2026 03:17:37
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर विभागासह जिल्ह्यातील महसूल प्रशासन प्रमुखांनी आठवड्यातून एकदा तरी ग्राऊंड रिअॅलिटी चेक करून प्रशासकीय सेवा-सुविधांमध्ये उपाययोजना करण्याचा सल्ला अतिरिक्त मुख्य महसूल सचिव विकास खारगे यांनी शुक्रवारी दिला. त्यांनी आठवड्यातून एका जिल्ह्यातील महसूल प्रशासनाच्या सेवांची झाडाझडती घेण्यासाठी थेट जिल्हा कचेरीत जाण्याचा उपक्रम सुरू केला आहे. त्या अंतर्गत शुक्रवारी खारगे हे छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. त्यांनी नगर भूमापन विभाग, भूमी अभिलेख, मुद्रांक विभाग, सेतूसुविधा केंद्रात जाऊन तेथील नागरिकांशी सुविधांबाबत चर्चा केली. भूममापन कार्यालय, सेतूसुविधा केंद्र पाहून खारगे यांनी नाराजी व्यक्त केली. तेथील सुविधा, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अस्वचछतेवरही त्यांनी बोट ठेवले. सेतूमध्ये विविध प्रमाणपत्रे काढण्यासाठी आलेल्या नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. त्याचप्रमाणे नगर भूमापन कार्यालयातील कामाचा त्यांनी आढावा घेतला.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Feb 21, 2026 03:02:50
Kalyan, Maharashtra:ठाकरे गटाचे बेपत्ता नगरसेवक मधुर म्हात्रे अचानक खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पाहणी दौऱ्यात. ठाकरे पक्षाचे नगरसेवक शिंदेंच्या दौऱ्यात. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे 11 नगरसेवक निवडून आले होते. त्यापैकी मधुर म्हात्रे, कीर्ती ढोणे, राहुल कोट आणि स्वप्नाली केणे हे चार नगरसेवक अचानक बेपत्ता झाले होते. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने सात नगरसेवकांची नोंद करून स्वतंत्र गट स्थापन केला. तसेच बेपत्ता चार नगरसेवकांच्या घरी ‘कारणे द्या’ नोटीस लावून त्यांच्या नगरसेवक पद रद्द करण्याचा इशाराही देण्यात आला होता. यानंतर या बेपत्ता नगरसेविकांपैकी कीर्ती ढोणे यांनी देवदर्शनासाठी गेल्याचे सांगत पुन्हा ठाकरे गटात प्रवेश करत गटात सहभागी झाले . मात्र उर्वरित तीन नगरसेवकांनी कोकण भवन येथे स्वतंत्र नगरसेवक म्हणून नोंदणी केली. ते अद्याप कोणत्याही गटात औपचारिक सहभागी नसल्याने राजकीय समीकरणांबाबत चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे, ठाकरे गटातून निवडून आल्यानंतर सर्वप्रथम मधुर म्हात्रे बेपत्ता झाले होते. निवडून आल्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या भेटीला गेल्याचा त्यांचा फोटोही व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांनी ठाकरे गटाशी संपर्क साधला नसल्याने चर्चांना अधिक उधाण आले होते. आज तब्बल 34 दिवसांनंतर ते पुन्हा श्रीकांत शिंदे यांच्या विकास कामांच्या पाहणी दौऱ्यात दिसून आले. यावेळी प्रतिक्रिया देताना मधुर म्हात्रे म्हणाले, “मी या ठिकाणचा नगरसेवक आहे, त्यामुळे दौऱ्यानिमित्त उपस्थित राहिलो. काही दिवसांपासून जी चर्चा सुरू आहे त्याबाबत सांगायचं तर मी विपासनासाठी बाहेर गेलो होतो. नगरसेवक झाल्यानंतर देवाकडे जे साकडं घातलं होतं ते पूर्ण करण्यासाठी गेलो होतो. आता परतलो आहे.” तसेच त्यांनी पुढे सांगितले, “आमच्या पक्षश्रेष्ठींशी चर्चा सुरू आहे. जी नोटीस बजावली आहे त्याबाबत आम्ही योग्य उत्तर देत आहोत. आम्ही तीन नगरसेवक आहोत, वरिष्ठ पातळीवर बोलणं सुरू आहे. पुढील भूमिका लवकरच स्पष्ट करू.” महत्त्वाचं म्हणजे, “हा महानगरपालिकेचा अधिकृत कार्यक्रम आहे, कुठल्याही पक्षाचा कार्यक्रम नाही,” असे स्पष्ट करत त्यांनी उपस्थितीचे स्पष्टीकरण दिले. दरम्यान, मधुर म्हात्रे यांच्या या पुनरागमनाने कल्याण-डोंबिवलीच्या राजकारणात नवी चर्चा सुरू झाली असून पुढील राजकीय भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बाइट... मधुर म्हात्रे नगरसेवक
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Feb 21, 2026 03:02:23
Nashik, Maharashtra: नाशिक पालखेड एमआयडीसीत स्टील सळई चोरीचा पर्दाफाश २.७८ कोटींचा मुद्देमाल जप्त.... दिंडोरीच्या पालखेड एमआयडीसी परिसरात स्टीलच्या सळया चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण यांनी मोठी कारवाई करत तब्बल ₹२ कोटी ७८ लाख १७ हजार ५७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.पालखेड एमआयडीसीमधील एम.आय.टी.सी. रोलिंग मिल प्रा. लि. कंपनी परिसरात काही इसम ट्रेलर चालकांशी संगनमत करून एका ट्रेलरमधील स्टील (आसरी) सळया दुसऱ्या ट्रेलरमध्ये टाकून काळ्या बाजारात विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी कंपनीबाहेरील पार्किंग परिसरात छापा टाकून कारवाई केली. या वेळी सात आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून दोन जण फरार आहेत.आरोपींकडून ०६ ट्रेलर (८ ते ३२ मिमी लोखंडी सळईंसह) ,१ मारुती ८०० कार व ७ मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आले असून या प्रकरणी दिंडोरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात झाला आहे
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Feb 21, 2026 03:02:03
Nashik, Maharashtra:नाशिक • तपोवनतील वृक्षतोडीचा मुद्दा पुन्हा गाजण्याची शक्यता • आज नाशिकच्या तपोवन मध्ये वृत्तप्रेमींकडून आंदोलन करण्यात येणार • सकाळी दहा वाजेपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत लाक्षणिक उपोषण करण्यात येणार • नाशिक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सुनावणीनंतर मते मागवण्यात आली होती • मात्र वृत्तप्रेमींकडून मते मागवल्यावर कोणताही प्रकारचे स्पष्टीकरण वृत्तप्रेमींना देण्यात आलेले नाही • त्यामुळे वृत्तप्रेमींकडून आंदोलन करण्यात येणार आहे • तर दुसरीकडे तपोवनातील वृक्षतोडी संदर्भात हरित लवादाकडे याचिका प्रलंबित असून 24 फेब्रुवारीला त्यावर सुनावणी होणार आहे
0
comment0
Report
Advertisement
Back to top