Back
34 दिन बाद मधुर म्हात्रे फिर शिंदे के दौरे में, ठाकरे गट में फिर से प्रवेश
ABATISH BHOIR
Feb 21, 2026 03:02:50
Kalyan, Maharashtra
ठाकरे गटाचे बेपत्ता नगरसेवक मधुर म्हात्रे अचानक खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पाहणी दौऱ्यात. ठाकरे पक्षाचे नगरसेवक शिंदेंच्या दौऱ्यात. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे 11 नगरसेवक निवडून आले होते. त्यापैकी मधुर म्हात्रे, कीर्ती ढोणे, राहुल कोट आणि स्वप्नाली केणे हे चार नगरसेवक अचानक बेपत्ता झाले होते. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने सात नगरसेवकांची नोंद करून स्वतंत्र गट स्थापन केला. तसेच बेपत्ता चार नगरसेवकांच्या घरी ‘कारणे द्या’ नोटीस लावून त्यांच्या नगरसेवक पद रद्द करण्याचा इशाराही देण्यात आला होता. यानंतर या बेपत्ता नगरसेविकांपैकी कीर्ती ढोणे यांनी देवदर्शनासाठी गेल्याचे सांगत पुन्हा ठाकरे गटात प्रवेश करत गटात सहभागी झाले . मात्र उर्वरित तीन नगरसेवकांनी कोकण भवन येथे स्वतंत्र नगरसेवक म्हणून नोंदणी केली. ते अद्याप कोणत्याही गटात औपचारिक सहभागी नसल्याने राजकीय समीकरणांबाबत चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे, ठाकरे गटातून निवडून आल्यानंतर सर्वप्रथम मधुर म्हात्रे बेपत्ता झाले होते. निवडून आल्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या भेटीला गेल्याचा त्यांचा फोटोही व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांनी ठाकरे गटाशी संपर्क साधला नसल्याने चर्चांना अधिक उधाण आले होते. आज तब्बल 34 दिवसांनंतर ते पुन्हा श्रीकांत शिंदे यांच्या विकास कामांच्या पाहणी दौऱ्यात दिसून आले. यावेळी प्रतिक्रिया देताना मधुर म्हात्रे म्हणाले, “मी या ठिकाणचा नगरसेवक आहे, त्यामुळे दौऱ्यानिमित्त उपस्थित राहिलो. काही दिवसांपासून जी चर्चा सुरू आहे त्याबाबत सांगायचं तर मी विपासनासाठी बाहेर गेलो होतो. नगरसेवक झाल्यानंतर देवाकडे जे साकडं घातलं होतं ते पूर्ण करण्यासाठी गेलो होतो. आता परतलो आहे.” तसेच त्यांनी पुढे सांगितले, “आमच्या पक्षश्रेष्ठींशी चर्चा सुरू आहे. जी नोटीस बजावली आहे त्याबाबत आम्ही योग्य उत्तर देत आहोत. आम्ही तीन नगरसेवक आहोत, वरिष्ठ पातळीवर बोलणं सुरू आहे. पुढील भूमिका लवकरच स्पष्ट करू.” महत्त्वाचं म्हणजे, “हा महानगरपालिकेचा अधिकृत कार्यक्रम आहे, कुठल्याही पक्षाचा कार्यक्रम नाही,” असे स्पष्ट करत त्यांनी उपस्थितीचे स्पष्टीकरण दिले. दरम्यान, मधुर म्हात्रे यांच्या या पुनरागमनाने कल्याण-डोंबिवलीच्या राजकारणात नवी चर्चा सुरू झाली असून पुढील राजकीय भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बाइट... मधुर म्हात्रे नगरसेवक
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 21, 2026 04:47:030
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 21, 2026 04:33:550
Report
PNPratap Naik1
FollowFeb 21, 2026 04:17:450
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowFeb 21, 2026 04:15:550
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowFeb 21, 2026 03:46:200
Report
TTTUSHAR TAPASE
FollowFeb 21, 2026 03:46:020
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 21, 2026 03:45:450
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 21, 2026 03:34:020
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 21, 2026 03:32:090
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 21, 2026 03:17:370
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 21, 2026 03:03:210
Report
SGSagar Gaikwad
FollowFeb 21, 2026 03:02:230
Report
SGSagar Gaikwad
FollowFeb 21, 2026 03:02:030
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowFeb 21, 2026 03:01:50Bhandara, Maharashtra:किडंगीपारवासीयों ने शराब दुकान बंदी धरणे आंदोलन; 23 तक बन्द नहीं तो रास्ता रोको
0
Report