Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

नवरात्री उत्सवानिमित्त यवतमाळ मध्ये श्रद्धा आणि भक्तीचा उदंड उत्साह

Oct 11, 2024 06:50:24
Yavatmal, Maharashtra

नवरात्री उत्सवानिमित्त यवतमाळ मध्ये श्रद्धा आणि भक्तीचा उदंड उत्साह अनुभवाला येत आहे. देवीच्या दर्शनासाठी गावोगावचे आणि इतर जिल्ह्यातूनही भक्त दाखल होत असल्याने यवतमाळचे रस्ते रात्रभर गर्दीने फुलून जात आहे, जगराता, भंडारा, डोबरी, गोंधळ, जत्रा यामुळे पहाटेपर्यंत देवींभक्तांची रेलचेल आहे. भव्य देखावे आणि मूर्तिकारांच्या देखण्या हातांनी साकारलेल्या जीवंत मूर्तींसाठी यवतमाळचा दुर्गोत्सव राज्यात प्रसिद्ध आहे.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VNVishal Nagesh More
Dec 17, 2025 03:37:22
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Dec 17, 2025 03:37:01
Pimpri-Chinchwad, Maharashtra:पिंपरी चिंचवड मध्ये भाजप विरुद्ध अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस ही सरळ लढत होणार हे स्पष्ट झाल्यानंतर शहरात प्रचंड राजकीय उलथापालत होत असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महत्त्वपूर्ण मानले जाणारे नेते राहुल कलाटे पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झालीय. त्यामुळे शहरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसण्याची चिन्ह आहेत. तलाठी यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून संपर्क साधला जात असल्याची चर्चा सुरू आहे. राहुल कलाटे भाजपमध्येही जाणार अशी चर्चा शहरात सुरू आहे. पण राहुल कलाटे यांनी मात्र सध्या तरी वेट अँड वॉच ची भूमिका घेतली आहे...! नेमकं राहुल कलाटे यांच्या मनात काय चाललं आहे जाणून घेतले आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी....!
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 17, 2025 03:36:37
0
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 17, 2025 03:35:03
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Dec 17, 2025 03:32:29
Dhule, Maharashtra:राज्यात नगरपालिकांच्या निवडणुकीमुळे घराणेशाहीचा मुद्दा चांगला गाजला. आमदारांनी आपल्या कुटुंबातीलच सदस्यांना नगराध्यक्ष पदाचा उमेदवार केल्यामुळे चांगलीच चर्चा झाली होती. याच पार्श्वभूमीवर धुळे महानगरपालिकेमध्ये धर्मपत्नीला नगरपालिकेमध्ये निवडणुकीत उभं करण्यात नसल्याच भाजप आमदार अनुप अग्रवाल यांनी जाहीर केले आहे. पक्षातील कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल असं त्यांनी स्पष्ट केले आहे. गेल्या काही दिवसांपासून आमदार अनुप अग्रवाल हे आपल्या धर्मपत्नीला निवडणूक रिंगणात उतरवतील आणि महापौर बनवतील अशी चर्च रंगलेली होती. या चर्चेला अनुप अग्रवाल यांनी स्वतःच पूर्णविराम दिलेला आहे. पत्नीला निवडणुकीच्या रिंगणात उभा करणार नसल्याचा त्यांनी जाहीर केलेला आहे. अल्फा अग्रवाल या समाजकारणातच सक्रिय राहतील, राजकारणात सक्रिय होणार नाहीत असं त्यांनी स्पष्ट केले आहे.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Dec 17, 2025 03:31:09
Akola, Maharashtra:अकोला महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजताच सर्वच राजकीय पक्षांसह इच्छुक उमेदवार वेगाने कामाला लागले आहेत. मात्र, अकोल्यात या निवडणुकीआधी भाजपसमोर अंतर्गत नाराजी आणि बंडखोरीचे मोठे आव्हान उभे ठाकल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. मागील विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी नाकारल्याने नाराज असलेले, तब्बल ३० वर्षे नगरसेवक राहिलेले भाजपचे ज्येष्ठ नेते हरीश अलीमचंदानी यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करून विधानसभा निवडणूक लढवली होती. त्याचप्रमाणे भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते अशोक ओळंबे यांनाही उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाकडून भाजपविरोधात निवडणूक लढवली. या दोन्ही उमेदवारांमुळे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात मतांचे विभाजन झाले आणि त्याचा फटका भाजपला बसत पराभव स्वीकारावा लागला.या पराभаванंतर भाजपने पक्षविरोधी कारवायांचा आरोप करत अनेक आजी-माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करत त्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला.आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप या निष्कासित कार्यकर्त्यांचा विचार करणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे या सर्व नाराज आजी-माजी नगरसेवकांनी एकत्र येत ‘नागरिक संवाद मंच’ची स्थापना केली आहे.या मंचाच्या माध्यमातून आयोजित संवाद कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहिले तर या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या सूचना भेटीत नागरिकांनी लिखित स्वरूपात आपल्या सूचनाही मांडल्या.आगामी महापालिका निवडणुकीत नगरसेवक कसा असावा, नागरिकांच्या नेमक्या अपेक्षा काय आहेत, तसेच शहराच्या विकासाबाबत कोणत्या मुद्द्यांना प्राधान्य द्यावे, यावर नागरिकांनी आपली मते मोकळेपणाने मांडली. या संवाद मंचातून अप्रत्यक्षपणे भाजपला थेट आव्हान देण्यात आल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले.या शक्तिप्रदर्शनानंतर ‘विकास आघाडी’च्या नावाने भाजपविरोधात एकत्रित मोर्चेबांधणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. “नाराजांची एक मूठ” जर प्रत्यक्षात आकाराला आली, तर भाजपची डोकेदुखी निश्चितच वाढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.दरम्यान, भाजप या नव्या आव्हानाकडे कशा प्रकारे पाहते आणि पक्षापासून नाराज झालेल्या या कार्यकर्त्यांना थांबवण्यासाठी कोणती रणनीती आखते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.आगामी महापालिका निवडणुकीत अकोल्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची नांदी या घडामोडींमधून दिसून येत आहे.
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Dec 17, 2025 03:30:18
Parbhani, Maharashtra:परभणी मनपाच्या राजकारणात आता गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी एंट्री केली असून त्यांनी तुरुंगातून निवडणूक लढवीत गंगाखेड विधानसभा जिंकली होती. आता आमदार गुट्टे यांनी यशवंत सेना परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून आपलं पॅनेल उभं करणार असल्याची घोषणा केली. आपण युती आघाडी कुणाशी ही करणार नसून स्वबळावर मनपा निवडणूक लढविणार आहोत. सत्ताधारी महागडी नळयोजना परभणी करांच्या माथी मारण्याचा प्रयत्न करीत असतांना सत्ताधारी असलेले नगरसेवक सचिन देशमुख यांनी स्वपक्षाला विरोध करून नागरिकांची खिशातील जाणारे हजारो रुपये वाचवले होते. महा पालिकेतील भ्रष्टाचारा विरोधात मोहीम उभे करणारे सचिन देशमुख यांना रत्नाकर गुट्टे यांनी यशवंत सेनेचा पॅनल प्रमुख केलाय,अनेक दिग्गज नगरसेवक गुट्टे यांच्या सोबत दिसून आले. नागरिकांचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी यशवंत सेना व परभणी परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून मनपाची निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची घोषणा रासपाचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी येथे केली. परभणीतील सेटलमेंटच्या राजकारणाच्या विरोधात आपण नवा पर्याय देत असल्याच ही आमदार गुट्टी म्हणाले,यामुळे आता परभणी महापालिकेच्या निवडणुकीत चुरस निर्माण होणार आहे. महानगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन जनतेसमोर जाणार आहोत. गंगाखेड मध्ये अकराशे कोटी रुपयांची कामे करून गंगाखेडचा चेहरा मोहरा आम्ही बदललाय,आता परभणीकरांच्या समस्यां सोडवायच्या आहेत,त्यासाठी आम्ही परभणी मनपा लढवणार असल्याचे गुट्टे यांनी स्पष्ट केले...
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Dec 17, 2025 03:15:59
Nashik, Maharashtra:anchor आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना-शिंदे गट यांच्या 'महायुती'मध्ये जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. राज्यात महायुती एकत्रितपणे निवडणूक लढवणार असल्याचे म्हटले असले तरी, महायुती होईल की नाही, याबाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे. भाजप 'स्वबळावर' १०० हून अधिक जागा लढण्याची तयारी करत असून, दुसरीकडे युतीमधील समन्वय साधून जागावाटप करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे उर्वरित जागांवर शिंदे सेना आणि अजित पवार राष्ट्रवादी कशी निवडणूक लढवणार याबाबत तर्क वितर्क सुरू आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अंतिम निर्णयाकडे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Dec 17, 2025 03:15:46
Akola, Maharashtra:अकोला बसस्थानकावर चोरीचा प्रयत्न खदान पोलिसांच्या सतर्कतेमुळे वेळेत उधळून लावण्यात आला. वाशिम येथील अमीता राठोड या नाशिकहून आपल्या गावी परतत असताना अकोला बसस्थानकावर अज्ञात व्यक्तीने त्यांच्या बॅगमधील पर्स चोरली. सदर पर्समध्ये साडेसात ग्रॅम सोन्याची चैन व काही रोकड होती. घटनेची माहिती मिळताच संबंधित एसटी बस खदान पोलीस ठाण्यासमोर थांबवण्यात आली. खदान पोलिसांनी तत्काळ कारवाई करत बसची झाडाझडती घेतली. तपासादरम्यान चोरीस गेलेली पर्स व त्यातील मौल्यवान ऐवज पोलिसांना सापडला. त्यामुळे प्रवाशाचे नुकसान टळले. ऐवज सुरक्षितपणे परत मिळाल्याने अमीता राठोड यांनी खदान पोलिसांचे मनापासून आभार मानले आहे. मात्र चोरट्याने एसटी बसची तपासणी सुरू असल्याचा पाहता येथून पळ काढला.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Dec 17, 2025 03:01:47
Dhule, Maharashtra:दर और योग्य बाजारपेठ अभावी आदिवासी भागातील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी अडचणीत سापडला आहे. वाहतूक खर्च जास्त असल्याने दर पडत नसल्याने स्थानिक पातळीवर बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सातपुड्यातील तोरणमाळ डाब, वालंबा परिसरात 100 हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावर स्ट्रॉबेरी लागवड केली जाते. नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागात आदिवासी शेतकरी ने शेतीमध्ये क्रांती केले असून आदिवासी शेतकरी स्ट्रॉबेरी उत्पादनाकडे उडायला हे सातपुडा जवळपास 100 हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावर स्ट्रॉबेरीची लागवड केली जात असते मात्र स्थानिक भागात स्ट्रॉबेरीला बाजारपेठ नसल्याने आणि बाजारपेठ असलेल्या ठिकाणी घेऊन येण्यासाठी खर्च जास्त असल्याने तसेच बाहेरील बाजारपेठेतही योग्य दर मिळत नसल्याने नंदुरबार जिल्ह्यातील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी अडचणीत sапडला असून सरकारने स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देत मोठ्या शहरांमध्ये आदिवासी भागातील नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या स्ट्रॉबेरीला योग्य दर देण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Dec 17, 2025 03:01:26
Jalna, Maharashtra:जालना :रब्बी पिकविम्याला शेतकऱ्यांकडुन अल्प प्रतिसाद,73 हजार शेतकऱ्यांनी भरला पीकविमा(पीकपाणी, जनरल) अँकर : जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामातील पीकविमा योजनेबाबत शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील केवळ 73 हजार 726 शेतकऱ्यांनी रब्बी पिकांसाठी पीक विमा भरा आहे. त्यासाठी राज्य शासनाने 15 डिसेंबरपर्यंत विमा भरण्याची शेवटची तारीख निश्चित केली होती. या मुदतीपर्यंत केवळ 73 हजार 726 शेतकऱ्यांनी विमा भरण्यासाठी पसंती दिली आहे. राज्य शासनाने एक रुपयात पीकविमा योजना बंद केली आहे. त्यामुळे यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत अंदाजे 50 टक्के शेतकऱ्यांनी विमा भरण्याकडे दुर्लक्ष केले आहे.
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Dec 17, 2025 03:01:08
Malegaon, Maharashtra:विशाख मोरे, मालेगाव - दि मालेगाव मर्चंट को. ऑफ बँकेला नाशिक जिल्हा उपनिबंधकांकडून दंड... नाशिक जिल्ह्यात नावाजलेली मालेगाव येथील दि मालेगाव मर्चंट को. ऑफ बँकेला नाशिक जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था फैयाज मुलाणी यांनी एका प्रकरणात दंड ठोठावला. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम (79)3 च्या अधिकारानुसार तसेच दि मालेगाव मर्चंट को. ऑफ बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एका प्रकरणात माहिती सादर करण्यात कसूर केला म्हणून आदेशापासून तर अर्जदारास माहिती देण्यापर्यंत 100 रुपये रोज बँकेत जमा करावे असा आदेश दिल्याने 'नेमकं या माहितीच्या कागदपत्रांमध्ये दडलं तरी काय' अशी चर्चा शहरात सुरू आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top