445001
आर्णी रोडवर स्पीड ब्रेकरच व खड्डे बुजविण्याची मागणी
Waghapur, Maharashtra:यवतमाळ बस स्टँडपासून आर्णी रोडवरील वनवासी मारुती मंदिरापर्यंतच्या मार्गावर वारंवार अपघात होत असून नागरिकांनी स्पीड ब्रेकर बसवण्याची मागणी केली आहे. जिल्हा परिषद कार्यालय, शाळा आणि रुग्णालये या परिसरात असल्याने धोका वाढला आहे. तक्रारी असूनही नगरपरिषदेकडून दुर्लक्ष झाल्याचा आरोप आहे. तसेच विद्युत भवनसमोरील मोठ्या खड्ड्यामुळेही अपघात वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
धैर्यशील मोहिते पाटील ने क्रॉस वोटिंग पर तंज, मंत्री-मतदाताओं पर दबाव का आरोप
Pandharpur, Maharashtra:विधान परिषद निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग केले असते समजून येत अशी भीती पालकमंत्री मतदारांना घालत आहेत मात्र अशा पद्धतीचे काहीही समजून येत नाही, पालकमंत्री आहेत की मिस्टर इंडिया आहेत असा टोला धैर्यशील मोहिते पाटील यांनी जयकुमार गोरे यांना लगावला आहे सोलापूर विधान परिषदेच्या मतदानामध्ये क्रॉस वोटिंग झाल्यास ते समजून येतं असं पालकमंत्र्यांनी भाजप नगरसेवकांच्या मेळाव्यामध्ये सांगितलं होतं. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे आक्षेप नोंदवणार आहे असं मत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केल आहे. ही लोकशाही आहे आणि तो मतदानाचा अधिकार आहे त्यांना धमकावल जातंय. कधी ते मंत्री आहेत कधी पोस्टमन आहेत कधी मिस्टर इंडिया आहेत कधी ज्योतिष नक्की काय चालू आहे हेच कळत नाहीये. काँग्रेस मध्ये विलीनीकरण करण्याबाबत आमच्या पक्ष पातळीवर कोणतीही चर्चा नाही कोअर कमिटीच्या बैठकीत पक्षाने स्पष्ट केला आहे कोणतंही विलीनीकरण होणार नाही महाराष्ट्रातल्या जनतेसमोर त्यांचे प्रश्न घेऊन तुम्हाला लढावं लागेल आणि ती लढाई करा असा आम्हाला सांगितलं आहे असं खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी स्पष्ट करत विलीनीकरण बाबत चर्चा फेटाळल्या आहेत0
0
Report
मानसून पूर्व तैयारी: कोकण रेलवे 700 कर्मियों के साथ 24x7 निगरानी
Navi Mumbai, Maharashtra:आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कोकण रेल्वेने सर्वसमावेशक तयारी पूर्ण केली असून दरवर्षीप्रमाणे यंदाही १५ जून ते २० ऑक्टोबर या कालावधीत विशेष मान्सून वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे. मान्सून काळात रेल्वे वाहतुकीत अतिरिक्त खबरदारी घेत वीर-कणकवली विभागात गाड्यांचा कमाल वेग ताशी ७५ किलोमीटर ठेवण्यात आला आहे. सामान्य परिस्थितीत याच विभागात गाड्या ताशी १२० किलोमीटर वेगाने धावतात. तसेच कणकवली ते उडुपी विभागात रेल्वेगाड्या ताशी ९० किलोमीटर वेगाने चालविण्यात येणार आहेत. प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मान्सूनदरम्यान रेल्वेमार्गांची सातत्याने पाहणी करण्यासाठी सुमारे ७०० कर्मचाऱ्यांची चोवीस तास नियुक्ती करण्यात आली आहे. संभाव्य धोके टाळण्यासाठी रुळांवर नियमित देखरेख ठेवली जाणार असून, प्रत्येक एक ते दोन किलोमीटर अंतरावर आपत्कालीन दूरध्वनी व्यवस्था उभारण्यात आली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना नियंत्रण कक्ष आणि जवळच्या स्थानकाशी तत्काळ संपर्क साधता येणार आहे. कोकण रेल्वेचे संचालक संतोष कुमार झा यांनी आयोजित पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली.0
0
Report
शिर्डी लॉज में पांच वर्षीय बच्चे पर अमानवीय मारहाण: आरोपी अनिस शेख गिरफ्तार
Shirdi, Maharashtra:पैशांसाठी पाच वर्षाच्या चिमुकल्याचे हातपाय बांधून अमानुष मारहाण केल्याचा संतापजनक व्हिडिओ सोशल माध्यमांमध्ये व्हायरल झाला आहे.. जालना पोलिसांनी चिमुकल्याची सुटका करत मुलाचा सावत्र बाप अनिस वजीर शेख याला बेड्या ठोकल्या आहेत.. मात्र गुन्हा शिर्डीत घडला असल्याने हा गुन्हा जालना पोलिसांनी शिर्डी पोलिसांकडे वर्ग केला आहे.. अवघ्या पंधराशे रुपयांसाठी आरोपीने हे अमानुष कृत्य केल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलंय.. आरोपी अनिस शेख हा पत्नी आणि सावत्र मुलासह शिर्डीतील एका लॉजमध्ये थांबलेला होता.. तेथील रूममध्ये पाच वर्षीय चिमुकल्याचे हातपाय बांधून अमानुष मारहाण केली.. मोबाईलमध्ये मारहाणीचा व्हिडिओ चित्रित करून त्याने तो समाज माध्यमांमध्ये व्हायरल केला.. त्यानंतर जालना येथील चिम़ुकल्याच्या आजोबांना फोन करून पैशांची मागणी केली.. पंधराशे रुपये न दिल्यास नातवाला मरेपर्यंत मारहाण करण्याची धमकी देत आजोबांकडून ऑनलाईन पैसे उकळले.. आजोबांच्या फिर्यादीवरून आरोपी अनिस वजीर शेख, राहणार सारवाडी, जिल्हा जालना याच्या विरोधात पॉक्सोसह खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. जालना पोलिसांनी हा गुन्हा शिर्डी पोलिसांकडे वर्ग केल्यानंतर आरोपीचा ताबा घेत त्याला राहाता न्यायालयात हजर करण्यात आले.. न्यायालयाने आरोपी अनिस शेख याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून, शिर्डी पोलिस गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत..0
0
Report
Advertisement
गोपीचंद पडळकर ने रोहित पवार के अन्नत्याग आंदोलन पर तीखी टिप्पणी की
Sangli, Maharashtra:स्लग - केवळ नाटक करण्यापूरता,रोहित पवारांचे आंदोलन - गोपीचंद पडळकर यांची रोहित पवारांवर टीका अँकर - केवळ नाटक करण्यापूरता,रोहित पवारांचे आंदोलन आहे,एक्टिंग करायचे रोहित पवारांना माहिती आहे,अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी केली आहे.तसेच नाटक कश्याला करताय,हे चित्रपटाचे शूटिंग आहे का ? नटरंग चित्रपटाचे शूटिंगची एक्टिंग करायला गेला आहे ,का ? अशा शब्दात पडळकर यांनी रोहित पवारांच्या पंढरपूर येथील अन्नत्याग आंदोलनावावर टीका केली आहे,तसेच रोहित पवारांना आपले आवाहन आहे,जोपर्यंत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना साखर कारखानादार एफआरपी देत नाहीत,तोपर्यंत त्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरूच ठेवावं, सोलापूर जिल्हा पोलीस प्रमखांना आपली मागणी आहे,रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या बाजूने पूर्ण सुरक्षा लावून,रोहित पवार याला अन्नाचा एक घास देखील खाऊ देऊ नका,रोहित पवारांना एक दोन महिने आंदोलनला बसू द्या,असे देखील आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत,त्याच बरोबर रोहित पवार आणि त्यांच्या आजोबांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे खळ सगळ्यात जास्त लुटलय,अशी टीका देखील पडळकर यांनी केली आहे,ते सांगलीमध्ये बोलत होते.0
0
Report
भांडूप ड्रीम्स कॉम्प्लेक्स में बुजुर्ग को फेरीवालों ने पीटा, पुलिस ने कार्रवाई शुरू की
Mumbai, Maharashtra:भांडुपमधील ड्रीम्स कॉम्प्लेक्स परिसरात एका ज्येष्ठ नागरिकाला फेरीवाल्यांकडून मारहाण झाल्याच्या धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ड्रीम्स कॉम्प्लेक्समध्ये राहणारे 60 वर्षीय राजेंद्रप्रसाद हनुमान सिंग यांनी भांडुप पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, शक्तीधाम मंदिरासमोरील रस्त्याने भांडुप स्टेशनकडे जात असताना त्यावेळी तेथे बसलेल्या काही भाजी विक्रेत्यांनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. सिंह यांनी याबाबत जाब विचारताच वाद वाढला आणि त्यावेळी फेरीवाल्यांनी त्यांना थेट मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच लाकडी वस्तूने हल्ला करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही दावा तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणात अब्बास मुर्तजा शेख, मोहसीन शेख आणि शमशुद्दीन शेख यांची नावे तक्रारीत नमूद करण्यात आली असून आरोपींविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी घटनास्थळी भेट देत संबंधित फेरीवाल्यांच्या दुकानांवर तोडक कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या उपस्थितीत ड्रीम्स कॉम्प्लेक्समधील रहिवासीही मोठ्या संख्येने एकत्र आले होते. रहिवाशांनी फेरीवाल्यांविरोधात विविध तक्रारी मांडत परिसरातील अतिक्रमण, वाहतुकीचा खोळंबा आणि सुरक्षेचे प्रश्न उपस्थित केले. तसेच मारहाणीच्या घटनेतील संबंधितांवर कठोर कारवाई करण्याबरोबरच परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली.0
0
Report
रत्नागिरी के चिपळूण में कार दुर्घटना, तीन घायल, जान बची
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. चिपळूण वालोंपे येथे कारचा भीषण अपघात.. मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण वालोपे येथे कारचा भीषण अपघात झाला आहे.. मुंबई गोवा महामार्गावरून जाणारी भरधाव वेगाने जाणारी कार महामार्गाच्या रुंदी करणाच्या कामासाठी महामार्गाच्याच बाजूला ठेवण्यात आलेल्या काँक्रिटीकरणाच्या पोला जोरदार धडक दिली.. ही धडक एवढी जोरदार होती की कारचा पुढचा भाग चक्काचूर झाला आहे.. या कारमध्ये तिघेजण प्रवास करत होते.. तिन्ही जणांना गंभीररित्या दुखापत झाल्याने जवळच्याच रुग्णालयात अधिक उपचारांसाठी नेण्यात आले आहे.. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही..0
0
Report
Advertisement
केडीएमसी महापौर दफ्तर के बाहर हंगामा, सिद्धार्थ जाधव की बैठक को लेकर ड्रामा
Kalyan, Maharashtra:महापौर दालनाबाहेर काँग्रेस गटनेत्या कांचन कुलकर्णींचा गोंधळ; सिद्धार्थ जाधवांच्या भेटीवरून केडीएमसीत रंगला हायव्होल्टेज ड्रामा केडीएमसी मुख्यालयातील महापौर दालनाबाहेर महापौरांची भेट घेण्यासाठी दोन तास प्रतीक्षा करूनही भेट न मिळाल्याने नगरसेविका नाराज. याचदरम्यान अभिनेते सिद्धार्थ जाधव थेट महापौर आणि आयुक्तांच्या बैठकीत दाखल झाल्याने वादाला तोंड फुटले. लोकप्रतिनिधींना वेळ नाही आणि कलाकारांना थेट प्रवेश कसा?’ असा सवाल करत कांचन कुलकर्णी आक्रमक. सिद्धार्थ जाधव यांचे पालिकेसाठी नेमके योगदान काय, असा प्रश्न उपस्थित करत संताप व्यक्त महापौर आणि आयुक्त लोकप्रतिनिधींना जुमानत नसल्याचा आरोप करत दालनाबाहेर जोरदार गोंधळ घातला सुमारे वीस मिनिटे महापौर कार्यालयाबाहेर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. गोंधळ वाढताच महापौर स्वतः बाहेर येऊन कांचन कुलकर्णी यांची समजूत काढली. महापौरांनी चर्चेसाठी कांचन कुलकर्णी यांना दालनात बोलावल्याने वादावर पडदा. वादावर प्रतिक्रिया देताना सिद्धार्थ जाधव यांनी ‘प्रयोगाच्या निमित्ताने भेटायला आलो होतो’ इथे कोणालाही आग घेतल्या नसेल तरी प्रयोगाला या त्या ठिकाणी सर्वांना आत घेतले जाईल असे सांगत अधिक बोलणे टाळले.0
0
Report
नाशिक ब्रेकिंग: बीएसएनएल-महावितरण केबल चोरी आरोपी गिरफ्तार, करोड़ों का माल बरामद
Nashik, Maharashtra:नाशिक ब्रेकिंग बीएसएनएल व महावितरणच्या महागड्या यूजी केबल चोरी करणाऱ्या आरोपींना अटक... मुंबईतील भांडुप परिसरातून 17.5 टन अॅल्युमिनियम केबल, 14.5 टन कॉपर वायर जप्त एकूण 2 कोटी 88 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात.. गुन्हेशाखा युनिट-1, गुंडा पथक आणि अंबड गुन्हेशाखेची संयुक्त मोठी कारवाई मुंबई व बिहार येथील 6 आरोपींना अटक; चोरीचा माल गोडाऊनमधून घेतला ताब्यात नाशिकरोड येथील बीएसएनएलच्या भूमिगत केबल चोरी प्रकरणाच्या तपासातून मोठा खुलासा सरकारवाडा, मुंबईनाका, इंदिरानगर आणि म्हसरूळ पोलीस ठाण्यातील 5 केबल चोरीचे गुन्हे उघडकीस0
0
Report
मनमाड-लासलगाव मार्ग पर टैंकर पलट, डीजल गळती से भारी हड़कंप, यातायात बाधित
Chandvad, Maharashtra:मनमाड-लासलगाव मार्गावर रायपूर जवळ इंधन घेऊन जाणारा टँकरने ॲपे रिक्षाला धडक दिल्यानंतर टँकर पलटी होऊन त्यातून मोठया प्रमाणात डिझेल गळती सुरु झाली. टँकर मधून डिझेल गळती होतं असल्याचे पाहून परिसरातील नागरिकांनी डिझेल घेण्यासाठी गर्दी केली होती. अपघातात टँकर, रिक्षा चालकासह 4 प्रवासी गंभीर जखमी झाले असू न त्यांना मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन टँकर आणि त्यातून गळणाऱ्या डिझेलवर पाण्याचा मारा सुरु केला. डिझेल गळतीमुळे आग लागण्याची शक्यता असल्याने दोन्ही बाजूची वाहतूक रोखून धरण्यात आली त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला.0
0
Report
Advertisement
नाशिक में पनीर आउट ऑफ स्टॉक, दामों में भारी बढ़त; होटल-ढाबे परेशान
Nashik, Maharashtra:नाशिकमध्ये पनीरचा तुटवडा पनीर बटर मसाला गायब! नाशिकच्या हॉटेल्समधून पनीर आउट ऑफ स्टॉक पनीर बटर मसाला गायब! नाशिकच्या हॉटेल्समधून पनीर आउट ऑफ स्टॉक! नाशिककरांच्या जिभेचे चोचले पुरवणाऱ्या हॉटेल्स आणि ढाब्यांवर सध्या एका वेगळ्याच संकटाने थैमान घातलंय. हॉटेलमध्ये जाऊन पनीरच्या पदार्थांवर ताव मारणाऱ्या खवय्यांची निराशा होत आहे. कारण नाशिकमधील हॉटेल्समधून पनीर गायब झालंय. गेल्या तीन दिवसांपासून शहरात पनीरचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून, यामुळे हॉटेल व्यावसायिक आणि ग्राहक दोघेही हवालदिल झाले आहेत. या संपूर्ण प्रकारामुळे आता बाजारात शुद्ध पनीरची मागणी प्रचंड वाढली आहे. मात्र, मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने शुद्ध पनीरच्या दरात किलोमागे ८० ते ९० रुपयांची थेट वाढ झाली आहे. यामुळे घाऊक बाजारात पनीरचे दर प्रति किलो ६५० रुपयांच्या आसपास पोहोचले आहेत. १ किलो शुद्ध पनीर तयार करण्यासाठी तब्बल ५ लिटर दूध लागतं. दुधाच्या वाढलेल्या दर, वाहतूक खर्च आणि तपासणीची कडक प्रक्रिया यामुळे पनीरचे उत्पादन महागल्याचं स्थानिक दूध उत्पादकांचे म्हणणे आहे. एकीकडे भेसळयुक्त पनीर विकणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत, तर दुसरीकडे शुद्ध पनीर महागल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला कात्री लागते आहे. तूर्तास, नाशिककरांना पनीरच्या चमचमीत चवीसाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे.0
0
Report
7.25 क्विंटल आंब्यांचा नैवेद्य: संत गजानन महाराज संस्थानात भाविकांची गर्दी
Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यातील करंजा लाड येथील ममता नगरमधील संत गजानन महाराज संस्थानात अधिक महिन्यानिमित्त गजानन महाराजांना तब्बल ७.२५ क्विंटल आंब्यांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. आंब्यांच्या आकर्षक आरासीत सजलेल्या महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. नैवेद्यासाठी वापरलेल्या आंब्यांचा रस तयार करून भाविकांना प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले. या उपक्रमात तालुक्यातील ३० गावांतील महिला सेवेकऱ्यांनी सहभाग घेतला. तसेच संस्थेशी जोडलेल्या ३ हजारांहून अधिक महिलांचा ब्लाऊज पीस देऊन सन्मान करण्यात आला. महिलांसाठी हे संस्थान माहेरघर असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली.0
0
Report
रत्नागिरी-कोकण में मृग नक्षत्र के साथ मॉनसून की बारिश की उम्मीद, 15 जून से सक्रिय
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी- मृग नक्षत्रात कोकणाला पावसाची प्रतिक्षा सुपर अल निनोच्या प्रभावामुळे १५ जूनपासून मान्सुन सक्रीय होणार कोकणात सध्या पावसाचा लंपडाव सुरु मान्सुन सक्रिय होऊन उलटले काही दिवस कडक उन, ढगाळ हवामान आणि सहस्य उकाडामुळे कोकणवासीय हैराण जून महिन्यात कोकण किनारपट्टी भागात हवेतील आर्द्रता वाढली त्यामुळे कोकणी माणूस घामाघुम उकाड्यातून सुटकेसाठी दमदार पावसाची प्रतिक्षा मान्सुन इलो पण मिरग कोरडेच गेलो..0
0
Report
Advertisement
मिरा भाईंदर में सी क्वीन बार पर छापा, 12 युवतियाँ मुक्त, 12 कर्मी गिरफ्तार
Mira Bhayandar, Maharashtra:मिरा भाईंदर ब्रेक मिरा भाईंदर मध्ये डीसीपी राहुल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी 'सी क्वीन बार'वर मोठी कारवाई करत छापा टाकला. या छाप्यादरम्यान बारमधून १२ तरुणींची सुटका करण्यात आली असून, व्यवस्थापक आणि कॅशियरसह १२ कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. पोलिसांनी बारमधील महत्वाचे दस्तऐवज आणि पुरावे जप्त केले असून पुढील तपास वेगाने सुरू आहे. बेकायदेशीर कृत्यांवरील या धडक पोलीस कारवाईचे स्थानिक नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे.0
0
Report
धाराशिव में ओमराजे निंबाळकर की गैरहाज़िरी ने सियासी घमासान मचा दिया
Dharashiv, Maharashtra:धाराशिवमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत झालेल्या महाविकास आघाडीच्या प्रचार बैठकीत खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या अनुपस्थितीची जोरदार चर्चा रंगली आहे. गेल्या काही दिवसांपासून ओमराजे निंबाळकर शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले असतानाच त्यांनी या महत्त्वाच्या बैठकीकडे पाठ फिरवल्याने राजकीय तर्कवितर्कांना आणखी बळ मिळालं आहे. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी धाराशिवमध्ये शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. मात्र या बैठकीला ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर गैरहजर राहिल्याने चर्चांना उधाण आलं. गेल्या आठ दिवसांपासून या बैठकीची तयारी सुरू होती. तरीही ओमराजे निंबाळकर उपस्थित न राहिल्याने त्यांच्या संभाव्य पक्षांतराच्या चर्चांना पुन्हा एकदा हवा मिळाली आहे. ठाकरे गटातील काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू असताना ओमराजे यांचे नावही चर्चेत आहे. याबाबत अंबादास दानवे यांना विचारले असता, ओमराजे निंबाळकर वैयक्तिक कारणामुळे बैठकीला उपस्थित राहू शकले नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पक्षांतराच्या चर्चा गेल्या दोन वर्षांपासून सुरू असून त्या केवळ अफवा असल्याचेही दानवे यांनी स्पष्ट केले. मात्र राजकीय वर्तुळात दानवे यांचा हा दौरा संभाव्य राजकीय पडझड रोखण्यासाठी आणि कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठीच असल्याची चर्चा रंगली आहे.0
0
Report
महाऑनलाईन पोर्टल छह दिन बंद, दाखले जारी करने की मांग तेज
Washim, Maharashtra:जात प्रमाणपत्र, नॉन-क्रीमीलेयरसह विविध दाखले महाऑनलाईन पोर्टल व सर्व्हर गेल्या सहा दिवसांपासून बंद असल्याने प्रलंबित आहेत. यामुळे जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी व पालक चिंतेत असून प्रवेश प्रक्रियेसह अन्य कामांवर परिणाम होत आहे. महाऑनलाईन पोर्टलवरील तांत्रिक अडचणी तातडीने दूर करून प्रलंबित दाखले वितरित करावेत, अशी मागणी विद्यार्थी व पालकाकडून राज्य सरकारकडे करण्यात येत आहे. मागील सहा दिवसापासून वेबसाईट बंद असल्याने सेतू संचालकाने सांगितले आहे.0
0
Report
Advertisement
