Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

काँग्रेस नेते ठाकरे: मोदींचा भाषण बंजारा समाजाचा अपमान!

Oct 07, 2024 07:22:21
Yavatmal, Maharashtra

काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी पोहरादेवी येथे केलेले राजकीय भाषण दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. मोदींचा काँग्रेसवर आरोप आणि बंजारा बांधवांचा अपमान सहन केला जाणार नाही, असे ते म्हणाले. काँग्रेसने वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक यांना मुख्यमंत्री पदाची संधी दिली होती, ज्यामुळे बंजारा समाजाची प्रगती झाली. मोदींनी त्यांच्या कुटुंबियांना निमंत्रण न देता त्यांचा अपमान केला, यावरून मोदींना बंजारा समाजाबद्दल आस्था नसल्याचे दिसते, असे ठाकरे यांनी म्हटले.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PNPratap Naik1
Dec 19, 2025 03:20:59
Kolhapur, Maharashtra:मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट बेंच नियमानुसार स्थापन झाल्याचा निर्वाळा देत सर्वोच्च न्यायालयाने या विरोधातील आव्हान याचिका फेटाळली आहे. न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि न्यायमूर्ती एन व्ही अंजारिया या खंडपीठाने कोल्हापूर सर्किट बँक विरोधात दाखल केलेली याचिका फेटाळली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे कोल्हापूर खंडपीठाचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बँक कोल्हापुरात होण्यासाठी एक ऑगस्टला अध्यादेश निघाला होता. त्यानंतर देशाचे तात्कालीन सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते कोल्हापूर सर्किट बँकेचे उद्घाटन झाले होते. त्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका पुण्यातील रणजीत निंबाळकर यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Dec 19, 2025 03:15:38
Akola, Maharashtra:राज्य शासनाच्या आंतरजातीय विवाह प्रोत्साहनपर अनुदान योजनेअंतर्गत मिळणाऱ्या ५० हजार रुपयांचे अर्थसाहाय्य मंजूर करून देण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच मागून त्यातील ३ हजार रुपये स्वीकारल्याप्रकरणी अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अकोला जिल्हा परिषद समाजकल्याण विभागात रंगेहाथ पकडलेल्या खासगी शिक्षक व एजंट शैलेंद्र बगाटे प्रकरणाला अखेर न्यायालयाचा पूर्णविराम मिळाला आहे.अकोला जिल्हा व सत्र न्यायालयातील विशेष प्रथम न्यायालयात या प्रकरणी दोन्ही बाजूंनी सविस्तर युक्तिवाद झाला. यानंतर न्यायालयाने आरोपी शैलेंद्र बगाटे यांची निर्दोष मुक्तता करत नस्ती बंद करण्याचा आदेश दिला. ही कारवाई जिल्ह्यातील तसेच राज्यातील पहिली अशी ठरू शकते, असा दावा ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. पी. डी. हातेकर यांनी केला आहे. तसेच लाच स्वीकारणाऱ्या संबंधित व्यक्तीबाबत सविस्तर माहिती घेऊन त्या व्यक्तीवर कारवाई करावी, असा सल्लाही न्यायालयाने अमरावती एसीबीला दिला आहे.
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Dec 19, 2025 03:15:22
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस च्या ऍड. सीमा तेलंगे यांनी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्यावर विविध आरोप करीत त्यांनी कुटुंबीयांना धमकविल्याचा आरोप केला आहे. उईके यांनी सूतगिरणीसाठी आदिवासी शेतकऱ्याची जमीन हडपली, नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढविणाऱ्या त्यांच्या कन्येला मंत्रीपदाचा वापर करून मुंबई उच्च न्यायालयात ब वर्ग समुपदेशक पदी नियुक्ती करून घेतली याबाबत पत्र परिषद घेतल्याने मंत्री यांनी कुटुंबीयांना धमकाविले आणि सोशल मीडियावर देखील धमकी वजा पोस्ट केल्या असा आरोप सीमा तेलंगे यांनी केला. तर तेलंगे यांचे आरोप खोटे व बिनबुडाचे आहे, काँग्रेस अस्तित्वहीन झाल्याने व नेत्यांना जनाधार न उरल्याने हे बेमालुम आरोप केल्या जात असल्याची टीका भाजप जिल्हाध्यक्ष ॲड. प्रफुल चौहान यांनी केली.
0
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Dec 19, 2025 03:07:00
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी शहराच्या अगदी मध्यवर्ती आणि रहिवासी भाग असलेल्या अभ्युदयनगर परिसरातील नरहार वसाहतीत बिबट्याचा वावर आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्या चक्क एका घराच्या आवारात शिरल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आलं आहे. शहरात भरवस्तीत बिबट्याने प्रवेश केल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे. या वसाहतीत राहणारे स्थानिक नागरिक संदेश कलंगुटकर यांचा पाळीव कुत्रा रात्री १ च्या सुमारास अचानक जोरजोराने भुंकू लागला. कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज नेहमीपेक्षा वेगळा आणि आक्रमक असल्याने कलंगुटकर यांना संशय आला. त्यांनी तत्काळ झोपेतून उठून खिडकीतून बाहेर पाहिलं असता रस्त्यावर इतर भटकी कुत्रीही जोरात भुंकत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. संशय बळावल्याने त्यांनी आपल्या घराच्या CCTV कॅमेऱ्याचे फुटेज तपासले. यामध्ये त्यांनी बिबट्या सदृश एका प्राण्याचा वावर स्पष्टपणे दिसून आला. कलंगुटकर यांनी या घटनेची माहिती तात्काळ वन विभागाला दिली आहे. नरहार वसाहत हा अत्यंत दाट लोकवस्तीचा परिसर असल्याने वन विभागाने तातडीने पावले उचलण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Dec 19, 2025 03:06:43
Akola, Maharashtra: Anchor : वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांच्यात आघाडी संदर्भात चर्चा सुरू असतानाच अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांनी तयारीला वेग दिला आहे. महापालिकेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचे सत्र काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने सुरू केले आहे.अकोला महानगरपालिकेच्या एकूण ८० जागांसाठी दोन्ही पक्षांकडून मोठ्या प्रमाणावर इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. वंचित बहुजन आघाडीकडे सध्या १५५ इच्छुक उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले असून, काँग्रेसकडे १४० इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत.आघाडीबाबत अंतिम निर्णय होण्यापूर्वीच दोन्ही पक्षांनी संघटनात्मक पातळीवर तयारी सुरू केल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीनंतर संभाव्य उमेदवारांची छाननी करण्यात येणार असून, त्यानंतर पुढील रणनीती जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Dec 19, 2025 02:46:58
Jalna, Maharashtra:जालना : महापालिका निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना निवडणूक खर्चाची मर्यादा 9 लाख रुपये निश्चित जालना महानगरपालिका ही ड वर्गात येत असल्याने येथील निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना निवडणूक खर्चाची मर्यादा 9 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे; तर अनामत रक्कम सर्वसाधारण उमेदवारांसाठी 5 हजार रुपये, तर अनुसूचित जाती, जमाती, नामाप्र आणि महिला राखीव उमेदवारांसाठी 2 हजार 500 रुपये निश्चित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली. बैठक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीला विविध पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Dec 19, 2025 02:46:25
Akola, Maharashtra:अकोला शहरातील रामदासपेठ पोलीस ठाण्यात दाखल गुन्हयातील चोरीला गेलेली बुलेट व एक मोटर सायकल असा एकुण ०१ लाख ९० हजार रूपयाचा मुददेमाल रामदासपेठ पोलीसानी अथक व शर्तीचे प्रयत्न करून राज्य-मध्यप्रदेश मधील इंदौर, भोपाळ व नर्मदापुरम (होशंगाबाद) येथुन हस्तगत केली आहे. सदर गुन्हयामध्ये तांत्रीक बाबी व गुप्त बातमीदार यांचे मदतीने सदर गुन्हयात नागपूर येथील आरोपी निलेश कडबेला अटक केली. या आरोपीने अकोला, मुर्तीजापुर, गोंदिया अशा विदर्भातील अनेक ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली आहे. आरोपी हा गाडी चोरून इतर राज्यात विकायचा. या आरोपीला रामदासपेठ पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास करीत आहे.
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Dec 19, 2025 02:45:33
Nashik, Maharashtra:नाशिक : जिल्हा परिषद नाशिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणात कठोर कारवाईचा दणका दिला आहे. दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणी मोहीम तीव्र करत गुरुवारी बोगस प्रमाणपत्र सादर करून लाभ घेतल्याप्रकरणी तब्बल १८ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.या कारवाईत तीन ग्रामसेवक, १४ प्राथमिक शिक्षक आणि एका मुख्याध्यापकाचा समावेश आहे. संबंधित कर्मचाऱ्यांवर निलंबनासह शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी दोन ग्रामसेवक, दोन लिपिक आणि एका शिक्षकावर कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे जिल्हा परिषदेत बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणात निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या २३ वर पोहोचली आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेत कार्यरत सर्व दिव्यांग कर्मचाऱ्यांना सात दिवसांच्या आत यूडीआयडी कार्डचा पडताळणी अहवाल सादर करण्याचे स्पष्ट निर्देश सीईओ ओमकार पवार यांनी दिले आहेत. नियमबाह्य लाभ घेणाऱ्यांवर पुढील काळातही कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 19, 2025 02:37:00
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:भेटायला आलेल्या मित्रासोबत हॉटेलवर बिअर प्याल्यानंतर मित्राला झोप लागली. त्यानंतर खोलीबाहेर आलेल्या तरुणीला त्याच मजल्यावरील दुसऱ्या खोलीतील तरुणांनी आणखी बिअर पाजून सामूहिक अत्याचार केला. १७ डिसेंबरच्या पहाटे ३ वाजता रेल्वेस्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये ही धक्कादायक घटना घडली. घटनेनंतर शुद्धीवर आलेल्या तरुणीने थेट पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. पोलिसांनी दुपारपर्यंत तिन्ही आरोपींचा शोध घेत त्यांना अटक केली. पीडित तरुणी व तिचा मित्र खोली क्रमांक १०५ मध्ये थांबले होते. मित्र झोपल्यानंतर तरुणी थोडा वेळ खोलीबाहेर आली होती. परत खोलीत जाताना मात्र तिने १०५ ऐवजी चुकून खोली क्रमांक २०५ मध्ये प्रवेश केला. त्या खोलीत आरोपी दारूचे सेवन करत होते. आपण चुकीच्या खोलीत आल्याचे लक्षात आल्याने तरुणी तत्काळ खोलीबाहर गेली. मात्र, एकाने बाहेर येत पुन्हा तिला खोलीत नेत बळजबरीने बिअर पाजली. यात तरुणीची शुद्ध हरपत गेली आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार करून हॉटेलमधून पलायन केले.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 19, 2025 02:36:46
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Dec 19, 2025 02:36:26
Beed, Maharashtra:बीड : स्वतःला वाघ सिंह समजणारे गेवराईचे पार्सल 21 तारखेला डिझाईन बॉक्स मध्ये पॅक करून अजित पवारांना गिफ्ट करायचे... भाजपा नेते योगेश क्षीरसागर यांची आमदार विजयसिंह पंडित यांच्यावर टीका न्यायालयीन प्रक्रियेमुळे बीड येथे प्रभाग क्रमांक तीन मधील एका जागेची निवडणूक येत्या 20 डिसेंबर रोजी होणार आहे.. याच्या प्रचारासाठी आयोजित सभेमध्ये बोलताना भाजपाने ते डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी आमदार विजयसिंह पंडित यांच्यावर जोरदार टीका केली.. स्वतःला वाघ सिंह समजणारे पार्सल 21 तारखेला डिझाईन बॉक्समध्ये पॅक करून पालकमंत्री अजित पवार यांना गिफ्ट करणार असल्याची टीका डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी केली आहे.. प्रभाग क्रमांक तीन मध्ये भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अशी तिरंगी लढत होत आहे..
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Dec 19, 2025 02:36:07
Niphad, Maharashtra:नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेनुसार नाशिक जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यांमध्ये चोरी गेलेला मुद्देमाल, मोबाईल फोन, व इतर वस्तू या मूळ मालकांना सन्मानपूर्वक परत देण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक परिक्षेत्राचे महानिरीक्षक दत्तात्रय कराळे हे होते या कार्यक्रमात मूळ मालकांना त्यांच्या वस्तू व साहित्य ऐवज परत देण्यात आले दरम्यान पोलीस दलात कार्यालयात असलेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या पाल्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तसेच गुन्हा उत्कृष्ट पद्धतीने डिटेक्शन केल्याबद्दल काही पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला याप्रसंगी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर अधीक्षक आदित्य मिरखेलकर, आदींसह पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांनी केले.
0
comment0
Report
Advertisement
Back to top