Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Washim444505

वाशिम नगरपालिका चुनाव: उमेदवारी वापस लेने की अंतिम तारीख पर 550 उम्मीदवार मैदान में

GMGANESH MOHALE
Nov 22, 2025 04:01:35
Washim, Maharashtra
अँकर: वाशिम जिल्ह्यातील कारंजा,वाशिम, रिसोड, मंगरुळपीर या 04 नगरपरिषद आणि मालेगांव या 01 नगर पंचायत अशा 05 नगराध्यक्ष तसेच 124 नगर सेवकांच्या जागांसाठी दाखल करण्यात आलेले उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा काल शेवटचा दिवस होता. त्यात कारंजा,वाशिम,रिसोड,मंगरुळपीर नगरपरिषदेच्या आणि मालेगांव नगर पंचायत च्या नगराध्यक्ष पदाच्या 05 जागांसाठी एकूण 54 तर नगर सेवकांच्या 124 जागांसाठी एकूण 670 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले होते.त्यापैकी 05 नगराध्यक्ष पदाच्या 54 अर्जा पैकी तब्बल 25 उमेदवारांनी आज माघार घेतल्याने निवडणूक रिंगणात 29 उमेदवार आहेत तर 124 नगर सेवकांच्या जागांसाठी एकूण 670 उमेदवार निवडणूक रिंगणात होते त्या पैकी 120 उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने निवडणूक रिंगणात एकूण 550 उमेदवार आहेत.वाशिम नगर परिषदे च्या नगराध्यक्ष पदासाठीचा आक्षेप न्यायालयिन प्रक्रियेत असल्याने नगराध्यक्ष पदाचे उमेदवारी अर्ज 25 नोव्हेंबर पर्यंत मागे घेता येणार आहेत. वाशिम जिल्ह्यातील 04 नगर परिषद आणि 01 नगर पंचायत च्या नगराध्यक्ष आणि नगर सेवक पदांसाठी निवडणूक रिंगणात उभे असलेले उमेदवार.... 1 ) कारंजा नगर परिषद : नगराध्यक्ष पदासाठी एकूण दाखल 13 उमेदवारी अर्जा पैकी आज 01 उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आल्याने एकूण 12 उमेदवार निवडणूक रिंगणात तर नगर सेवकांच्या 31 जागांसाठी एकूण दाखल 151 अर्जा पैकी 24 उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने एकूण 127 उमेदवार निवडणूक रिंगणात... 2 ) वाशिम नगर परिषद : 01 नगराध्यक्ष पदासाठी एकूण दाखल 17 उमेदवारी अर्जा पैकी आज 03 उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आल्याने एकूण 14 उमेदवार निवडणूक रिंगणात तर नगर सेवकांच्या 32 जागांसाठी एकूण दाखल 222 उमेदवारी अर्जा पैकी 50 उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने एकूण 172 उमेदवार निवडणूक रिंगणात... 03 ) रिसोड नगर परिषद : 01 नगराध्यक्ष पदासाठी एकूण दाखल 10 उमेदवारी अर्जा पैकी आज 05 उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आल्याने एकूण 05 उमेदवार निवडणूक रिंगणात तर नगर सेवकांच्या 23 जागांसाठी एकूण 122 दाखल अर्जा पैकी 25 उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने एकूण 97 उमेदवार निवडणूक रिंगणात... 4 ) मंगरूळपीर नगर परिषद : 01 नगराध्यक्ष पदासाठी एकूण दाखल 06 उमेदवारी अर्जा पैकी आज 01 उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आल्याने एकूण 05 उमेदवार निवडणूक रिंगणात तर नगर सेवकांच्या 21 जागांसाठी एकूण दाखल 103 अर्जा पैकी 17 उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने एकूण 86 उमेदवार निवडणूक रिंगणात... 05 ) मालेगांव नगर पंचायत : 01 नगराध्यक्ष पदासाठी एकूण दाखल 08 उमेदवारी अर्जा पैकी आज 03 उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आल्याने 05 उमेदवार निवडणूक रिंगणात तर 17 नगर सेवकांच्या जागांसाठी दाखल एकूण 72 उमेदवारी अर्जा पैकी 04 उमेदवारी अर्ज आज मागे घेण्यात आल्याने एकूण 68 उमेदवार निवडणुक रिंगणात...
170
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
JJJAYESH JAGAD
Nov 22, 2025 04:49:23
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील पाच नगरपरिषद व एक नगरपंचायत निवडणुकीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदाचे 14 आणि नगरसेवक पदाचे 95 उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता 6 नगराध्यक्ष पदासाठी 38 तर 142 नगरसेवक पदासाठी तब्बल 711 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.यंदाच्या निवडणुकीत ‘थेट नगराध्यक्ष’ जनतेतून निवडले जाणार असल्याने स्पर्धा अधिक चुरशीची होणार आहे. निवडणूक रिंगणातील उमेदवारांची संख्या नगरपरिषद / नगरपंचायत नगरसेवक (सदस्य) , नगराध्यक्ष. १) अकोट - 187 नगरसेवक, 8 नगराध्यक्ष . २) मूर्तिजापूर - नगरसेवक 157 नगराध्यक्ष 8. ३) बाळापूर - नगरसेवक 89 नगराध्यक्ष 5. ४) तेल्हारा - नगरसेवक 92 , नगराध्यक्ष 5. ५) हिवरखेड - नगरसेवक 99, नगराध्यक्ष 7. ६) बार्शिटाकळी - नगरसेवक 87, नगराध्यक्ष 5. अर्ज मागे घेतल्यानंतरही सर्वच ठिकाणी उमेदवारांची संख्या लक्षणीय असल्याने प्रचाराला आता वेग येणार आहे. नागरिकांसमोर विकासाचे मुद्दे, स्थानिक प्रश्न आणि उमेदवारांचे व्यक्तिमत्त्व महत्त्वाचे ठरणार आहे.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 22, 2025 04:48:40
Solapur, Maharashtra:सोलापूर अक्कलकोट ने काँग्रेसच्या आजी-माजी नेत्यांचा एकमेकावर भाजपशी हात मिळवणी केल्याचा आरोप काँग्रेसच्या आजी-माजी नेत्यांचा एकमेकावर भाजपशी हात मिळवणी केल्याचा आरोप अक्कलकोट नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेसच्या आजी माजी नेत्यांची एकमेकांवर गंभीर आरोप ‘काँग्रेसचे माजी आमदार आणि सध्या शिवसेना शिंदे गटात असलेले सिद्धाराम म्हेत्रे यांनी भाजपशी हात मिळवणी केली’ ‘काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव व्हावा आणि मुख्यमंत्र्यांना खुश करता यावं यासाठी म्हेत्रे यांनी भाजपशी पडद्यामागे डिलिंग केलं’ असा आरोप अक्कलकोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अशपाक बळोरगी यांनी केलाय तर मागील अनेक निवडणुकात भाजपला कोणी मदत केली हे स्वतःच्या आतमध्ये झाकून बघावं असा टोला माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी बळोरगी याना लागवला आहे. बाईट : अशपाक बळोरगी, काँग्रेस उमेदवार, अक्कलकोट बाईट : सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार
0
comment0
Report
MKManoj Kulkarni
Nov 22, 2025 04:34:48
Navi Mumbai, Maharashtra:अँकर -- मुंबई भाजपाच्या वतीने शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर सद्बुद्धि दे प्रार्थना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांच्या नेतृत्वात हा आंदोलन करण्यात येत आहे. कल्याण मध्ये लोकल ट्रेनमध्ये एका युवकाला मराठी न बोलल्याने मारहाण झाली होती, त्यामुळे अरुण खैरे नावाच्या युवकाने त्याच्या घरी आत्महत्या केली होती. काही पक्ष जाणूनबुजून भाषावाद प्रांतवाद पसरवत आहेत त्यांना सद्बुद्धी मिळो यासाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर हे आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलन स्थळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते विरोध करण्याची शक्यता असल्याने पोलिसांचा या ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आमचे प्रतिनिधी मनोज कुळकर्णी यांनी विचारले.
41
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 22, 2025 04:18:46
Washim, Maharashtra:अँकर:वाशीमच्या नगरपंचायत मालेगाव येथे जिल्हा स्वीप अभियानांतर्गत एनसीसी विद्यार्थ्यांनी पथनाट्य आणि फ्लॅश मॉबच्या माध्यमातून प्रभावी मतदान जनजागृती केली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.या अभियानांतर्गत मालेगाव शहरातील जूने बसस्थानक,शिव चौक, तहसील कार्यालय परिसर आणि नाना मुंदडा विद्यालय अशा चार ठिकाणी विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले.‘माझे मत, माझा अधिकार’ या घोषणेसह विद्यार्थ्यांनी मतदानाचा अधिकार,जबाबदारी आणि लोकशाहीची कडी म्हणून त्याचे महत्त्व यांची प्रभावी मांडणी केली.पथनाट्य व फ्लॅश मॉब दरम्यान नागरिकांची मोठी गर्दी जमून विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.सामाजिक समस्या, उदासीनता आणि मतदारांच्या जागृतीची गरज यावर आधारित प्रसंगांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.तर जलद लयीत सादर झालेल्या फ्लॅश मॉबने वातावरणात उत्साह निर्माण केला.
86
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Nov 22, 2025 04:04:38
Ratnagiri, Maharashtra:कोकणातील ग्रामीण भागात देवदिवाळीचा सण परंपरेनुसार व श्रध्देने मोठ्या उत्साहात साजरा झाला. यादिवशी सम्राट बळीराजाचे स्मरण करत घरात विडे भरणे तसेच ग्रामदेवालयातही देवांना रुपे लावून विडे भरण्याचा कार्यकम उत्साहात पार पडला. देवदिवाळीला कोकणात सम्राट बळीराजाचं स्मरण केलं जातं. सम्राट बळी हा कृषीप्रधान राजा होता. गोरगऱिबांचे कल्याण करणारा राजा होता. केरळमध्ये ओणम सण बळीराजाच्या स्मृृतीप्रित्यर्थ साजरा केला जातो. तेथे बळीराजा ओणममध्ये घरोघरी येणार, अशी कल्पना मांडून त्याच्या स्वागताची तयारी केली जाते. तर कोकणात थेट बळीच्या राज्याची मुर्त संकल्पनाच मांडून ‘इडा-पीडा टळो..’अशी करूणा भाकली जाते. रत्नागिरीतल्या मिरजोळे गावातही विडे भरण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
110
comment0
Report
SGSagar Gaikwad
Nov 22, 2025 04:02:36
Nashik, Maharashtra:शालार्थ आय डी अपहार प्रकरण, शिक्षण संस्था संचालक, शिक्षक अटकेत,6 दिवस कोठडी.... बोगस शालार्थ आयडी तयार करू शासनाची फसवणूक प्रकरणी मोठा रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.. अँकर शालार्थ आयडी घोटाळ्यातील आरोपींचे अटकसत्र सुरू असताना नाशिकच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुरुवारी मध्यरात्रीनंतर अंमळनेर येथून मनोज रामचंद्र पाटील व नीलेश निंबा पाटील अशा दोघांना अटक केलीये... तर इतर संशयितांच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत.या प्रकरणात फरार असलेल्या अमळनेर येथील अविनाश पाटील याला अटक करण्यात आली असून स्वतंत्र एसआयटीमार्फत या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. एसआयटीचे पथक नाशिकमध्ये तळ ठोकून आहे. या दरम्यान जिल्ह्यातील विविध शिक्षण संस्थांच्या ऑन द स्पॉट भेटी देत संस्थाचालकांची चौकशी आणि कागदपत्रांची तपासणी सुरू ठेवली आहे. बोगस शालार्थ आयडीच्या आधारे शेकडो तरुणांना नोकऱ्या देऊन अनेक संस्थाचालकांनी कोट्यवधी रुपये उकळले. प्रकार उघडकीस आल्यानंतर शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब चव्हाण यांनी नाशिक रोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला. याच प्रकरणात दि. १९ रोजी न्यायालयात सुनावणी करण्यात आली आहेत. चौकशीदरम्यान पो. नि. अशोक गिरी यांनी शरद शिंदे, किरण पाटील आणि अविनाश पाटील आवक-जावक रजिस्टरमध्ये हेराफेरी केल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तिन्ही आरोपी हस्तक्षेप करताना दिसून आल्यानंतर गिरी यांना तातडीने निलंबित करण्यात आले. त्यानंतर इतर दोन आरोपींनाही अटक करण्यात आली. फरार आरोपी अमळनेरात दिसत असल्याची माहिती मिळताच आर्थिक गुन्हे शाखेचे पो. नि. यांच्यासह पथकाने अमळनेर येथे जात या प्रकरणातील मोठा मासा असलेल्या दोघांना ताब्यात घेतले आहे. १० कोटी ५० लाख रुपयांची शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हা दाखल असून त्यांना न्यायालयाने ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे...
152
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Nov 22, 2025 03:50:06
Virar, Maharashtra:विरार पश्चिम म्हाडा परिसरातील घटना हत्या की अपघात पोलिसांचा तपास सुरू अँकर : विरारच्या म्हाडा परिसरातील गटाराच्या नाल्यामध्ये तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. सकाळच्या सुमारास प्रभातफेरी मारण्यासाठी आलेलेल्या नागरिकांना गटाराच्या पाण्यावर मृतदेह तरंगत आल्याचे दिसून आले होते आकाश पगरे असे २८ वर्षीय तरुणाचे नाव आहे. तो त्याच म्हाडा परिसरातील इमारत क्रमांक ११ मध्ये राहत होता. बोळींज पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि त्याची काहीवेळातच ओळख पटवून त्याचा मुतदेह त्याच्या परिवाराकडे स्वाधीन करण्यात आला. आकाश पगारे हा १७ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री घरातून कोणालाही न सांगता निघून गेला होता, त्याच्या कुटुंबीयांनी १८ नोव्हेंबर रोजी तो मिसिंग असल्याची तक्रार बोळींज पोलीस ठाण्यात दिली होती. मात्र त्याचा मृतदेह त्याच्याच घराच्या बाजूच्या गटामध्ये सापडल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे..
212
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 22, 2025 03:46:25
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर शहरालगत असणाऱ्या शिरोली पुलाची परिसरात पूर्व वैमनस्यातून दांपत्यासह मुलावर हाथियाराने हल्ला करणाऱ्या चौघा आरोपींची पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी या आरोपींना अटक केल्यानंतर ज्या भागात गावगुंडानी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला, त्या भागातून त्याची धिंड काढण्यात आली. या चार आरोपींना येथे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी समोर हजर केलं असता त्यांना पाच दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. घटनेदिवशी या वैभव राजू बेडेकर, आर्यन अनिल शिंदे, साहिल अरुण बनगे, साहिल उर्फ गणेश चंद्रकांत शिद्रुक या चौघांनी हातात धारदार एडके घेवून दहशतवाद माजवत कांबळे कुटुंबावर प्राणघातक हल्ला केला होता. त्यामुळे शिरोली पुलाची गावात या गावगुंडांच्या बद्दल संताप व्यक्त करण्यात येत होता..
109
comment0
Report
SGSagar Gaikwad
Nov 22, 2025 03:46:13
Nashik, Maharashtra:संदेश काजळे खून प्रकरणातील मास्टरमाइंडला अटक अँकर आर्थिक देवाणघेवाण कारणावरून नाशिकच्या नवीन सिडकोतील सराईत गुन्हेगार संदेश काजळे याचे अपहरण व खून केल्याप्रकरणी मुख्य संशयित आरोपी रणजीत आहेर यास येवला येथील अंदरसूल येथे वेशांतर करून गेलेल्या गुंडाविरोधी पथकातील पोलिसांनी अटक केलीये.... मोखाडा येथील जंगलात संदेशचा मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न संशयित आरोपींनी केला होता.आहेर गेल्या दीड वर्षापासून फरार होता. तो पोल्ट्री फार्ममध्ये आपले अस्तित्व लपवून काम करीत होता. गेल्या एक वर्षापासून तो पोलिसांना चकवा देत होता. दिंडोरी, पिंपळगाव बसवंत, चांदवड, निफाड, येवला या भागात तो राहिला. गुंडा विरोधी पथकाचे पोलिस यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सहायक पोलिस निरीक्षक यांच्या पथकाने कारवाई केली. संशयित आरोपी स्वप्निल उन्हवणे, पवन भालेराव, नितीन ऊर्फ पप्पू चौगुले, करण ढंगले यांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली होती. ९ फेब्रुवारीला निमाणी बसस्थानकाजवळ खुनाची घटना घडली होती....
218
comment0
Report
SGSagar Gaikwad
Nov 22, 2025 03:33:42
Nashik, Maharashtra:बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांबाबत जिल्ह्यात पंचसूत्री नाशिक जिल्ह्यात बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर वनविभागासह जिल्हा प्रशासनाने पंचसूत्री तयार केली असून न्यायालयाच्या आदेशानुसार ज्या ठिकाणी बिबट्यांचा जास्त वावर अाढळला आहे, अथवा हल्ल्याच्या घटना घडलेल्या आहेत... अशा १२५ ठिकाणांचा आपत्तीग्रस्त ठिकाणांमध्ये समावेश होणार आहे. यासंदर्भात सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बिबट्याचा संचार नागरिकांसाठी डोकेदुखी ठरू लागला आहे. त्यावर उपाययोजनेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात काल वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. त्यात बिबट्याच्या समस्येपासून बचावासाठी पंचसूत्री ठरवण्यात आली. त्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांच्या आधारे मानव-प्राण्यांचा संपर्क व संघर्ष जास्त प्रमाणात आढळणाऱ्या सर्व भागांना आपत्तीग्रस्त घोषित करण्यात येणार आहे. मागील दहा वर्षातील उपलब्ध पॅटर्ननुसार सुमारे १२० ठिकाणी संघर्षाची प्राथमिक नोंद आहे...
169
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Nov 22, 2025 03:31:45
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या पुसद नगर परिषद नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची पत्नी मोहिनी ह्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार आहेत, तर मंत्री इंद्रनील यांचे बंधू माजी आमदार निलय नाईक यांच्या नेतृत्वात भाजपा स्वतंत्र लढत आहे. असे असतानाही मोहिनी नाईक यांना मत द्या असे संभाषण असलेली निलय नाईक यांची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल केल्या जात आहे. दरम्यान ही क्लिप म्हणजे खोडसाळपणाचा प्रकार असून राजकारण इतक्या खालच्या पातळीवर नेऊ नका असा इशारा निलय नाईक यांनी दिला आहे. ही क्लिप उमेदवारी न मिळालेल्या काही नाराजांनी तयार केल्याचंही त्यांनी म्हटले आहे. मी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा नातू व सुधाकरराव नाईक यांचा पुतण्या आहे. याआधीही काका मनोहर नाईक व भाऊ इंद्रनील यांच्याविरुद्ध मी निवडणूक लढवली आहे. नात्यात मोहिनी नाईक माझी मुलगी आहे, त्यांना माझे आशीर्वाद असले तरी भाजपाचा सच्चा सेवक म्हणून मी भाजपच्या उमेदवारालाच विजयी करून दाखवील असे निलय नाईक यांनी म्हटले आहे.
168
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 22, 2025 03:30:21
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - मोहोळ तालुक्यात सातत्याने वाजत असतात त्या पिपाणीत काही दम नाही, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या टीका उमेश पाटीलांचे नाव न घेता. मोहोळ येथील सभेतून पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांचे नाव न घेता जळजळीत टीका. मोहोळ तालुक्यात सातत्याने वाजत असतात, त्या पिपाणीत काही दम नाही. माध्यमांसमोर यायचं आणि बोलायचं, बोलून विकास होत नसतो. लोकांच्या सोबत घेऊन लोकांच्या अडचणी समजून घेऊन ते काम करावं लागतं. काम करण्यासाठी क्षमतेने मेहनत करावी लागते. सगळं सुंदर दिसतं ते सगळं चांगलं असतं असं नसतं. बराच वेळा जे पिवळे दिसते, ते सोनं नसतं, काही वेळ ते बेन्टेक्सपण असतं. पालकमंत्री गोरे यांनी उमेश पाटील यांचे नाव न घेता घेतला समाचार. माझ्याआधी मुख्यमंत्र्यांनी मोहोळची माहिती घेतली होती, मोहोळचचा नगराध्यक्ष भाजपचा होतंय.
217
comment0
Report
MAMILIND ANDE
Nov 22, 2025 03:17:45
Wardha, Maharashtra:वर्ध्यात शहर पोलिसांकडून देशी- विदेशी दारूच्या 150 पेट्या जप्त. 12 लाख 93 हजारांचा देशी-विदेशी दारू जप्त. वर्धा पोलिसांनी एकाच दिवशी 150 दारूच्या पेट्या पकडल्या. स्थानिक स्वराज्य संस्था च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई. पोलीस उपनिरीक्षक विशाल सवई यांच्या पथकाने केली कारवाई. अवैध दारू तस्करीचा पर्दापाश. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडून शहर पोलिसांचे कौतुक. पोलिसांच्या कारवाईने अवैध दारू तस्करी करणाऱ्या टोळीचे दाबे दणाणले. अवैध दारूची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना अटक. दोन मोबाईल,चारचाकी गाडी,150 पेट्या असा 13 लाखांचा मुद्देमाल जप्त. 15 दिवसातली दुसरी मोठी शहर पोलिसांची कारवाई
173
comment0
Report
Advertisement
Back to top