Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Washim444505

वाशीम में शिक्षक महासंघ के नेता शेखर भोयर ने बोगस मतदान के आरोप लगाए

GMGANESH MOHALE
Oct 04, 2025 13:31:43
Washim, Maharashtra
वाशीम: अँकर, रिपोर्टर आदि हटाकर मुख्य खबर: आज वाशीम येथे भाजप शिक्षक महासंघ और भाजप शिक्षक सेल यांची आढ़ावा बैठक पार पडली.बैठकीसाठी भाजप शिक्षक महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शेखर भोयर यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.बैठकीदरम्यान शिक्षक मतदारांची नोंदणी व्यापक प्रमाणात राबविण्याचे आवाहन करण्यात आले.यावेळी शेखर भोयर यांनी अमरावती शिक्षक मतदारसंघाचे विद्यमान आमदार किरण सरनाईक यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यांनी सांगितले की, मागील निवडणुकीत सरनाईक यांनी पैठण्या वाटप करून तब्बल १४ हजार बोगस मतदारांचे मतदान करून घेतले, ज्यामध्ये अस्तित्वात नसलेल्या शाळांचे नाव तसेच ऑटोचालक, लिपिक आणि इतर कर्मचाऱ्यांना शिक्षक मतदार म्हणून दाखवण्यात आले होते.या गैरप्रकारांमुळेच ते निवडून आले.तसेच, भोयर यांनी पुढे म्हटले की, सरनाईक यांच्या शाळेची लीज संपल्याने त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला,असा आरोपही त्यांनी केला.आगामी निवडणुकीत बोगस मतदानाला आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलली जाणार असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले. बाईट : शेखर भोयर,अध्यक्ष शिक्षक महासंघ
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SNSWATI NAIK
Oct 04, 2025 16:01:09
Navi Mumbai, Maharashtra:रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 8 ऑक्टोबर रोजी होणार आहे. दुपारी 2.40 वाजता प्रधानमंत्री प्रकल्पाच्या ठिकाणी येणार असून त्यानंतर ते टर्मिनल बिल्डिंगची पाहणी करतील त्यानंतर हा पहिला टप्पा राष्ट्राला समर्पित करतील त्यानंतर जाहीर सभेत मार्गदर्शन करतील. जवळपास दोन तासांचा हा कार्यक्रम असणार आहे. विमानतळ प्रकल्पाचं उद्घाटन ऑक्टोबर महिन्यापेक्षा आवेगात असल्यास प्रत्यक्ष विमान वाहतूक डिसेंबर महिन्यापासून सुरू होणार आहे. प्रकल्पाच्या उद्घाटनानंतर हे विमानतळ सुरक्षेच्या दृष्टीने सीआयएसएफच्या ताब्यात दिल्यानंतरच तिथून विमानउड्डाण सुरू होणार असल्याची माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांन सिडको भवन इथे पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सिंघल यांनी विमानतळ प्रकल्पाची माहिती दिली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे महामुंबईचे दुसरे विमानतळ असून सध्या अस्तित्वात असलेले मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमीनतळापेक्षा दुप्पट आहे. लंडन इथल्या हिथ्रो विमानतळाशी या विमानतळाची तुलना केली जात आहे. हे ग्रीन फिल्ड विमानतळ असून संपूर्ण विमानतळ अकराशे साठ हेक्टर जमीनवर आहे. त्या ठिकाणी चार टर्मिनल असून त्यापैकी पहिल्या टर्मिनलचे काम पूर्ण झालं आहे. सार्वजनिक-खाजगी भागीदारी मॉडेलवर हे विमानतळ उभारण्यात आलं असून सिडकोकडे २६ टक्के आणि एनएमआयएएल कडे ७४ टक्के हिस्सा आहे. पहिला टप्पा दरवर्षी २० दशलक्ष प्रवासी हाताळण्याची क्षमता असून अंतिम टप्प्यात विमानतळाची प्रवासी क्षमता ९० दशलक्षांपर्यंत वाढवली जाणार असून त्याच वेळी तब्बल साडेतीन्‌ळ दशलक्ष टन मालवाहतूक येथे होऊ शकेल. या पहिल्या टप्प्यासाठी सुमारे १९६४६ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. या विमानतळाच्या धावपट्टीवर कोणतेही विमान उतरू शकणार नाही. सर्वात मोठे वैशिष्ट्य असं आहे की त्यामध्ये एपीएम म्हणजे ऑटोमेटेड पीपल मुव्हर्स आहे याचा अर्थ असाच आहे की सर्व टर्मिनल एकमेकांनी जमिनीखालील बोगद्यांनी ओढलेले आहेत. प्रवासी कोणत्याही टर्मिनलवर चेक इन करू शकतात आणि त्याचं सामान त्यांच्या टर्मिनल वर पोहोचणार आहे. विमानतळाला चारही बाजूंनी रस्ते, जलवाहतूक आणि रेल्वे वाहतूक मार्गांनी जोडण्यात आलं आहे. जवळच्या तरघर इथे वॉटर टॅक्सी सुविधा उपलब्ध असणार आहे तर अटल सेतू मार्गे मुंबईशा जोडला जाणार आहे. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ जोडण्यासाठी गोल्ड लाईन मेट्रो लाईन प्रस्तावित करण्यात आली असल्याचंही सिंघल यांनी सांगितलं.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Oct 04, 2025 16:00:37
Kalyan, Maharashtra:केडीएमसीची अंतिम प्रभाग रचना करताना सरकारच्या नियमांची पायमल्ली सत्ताधारी आणि प्रशासनाची मनमानी...मनसेचा गंभीर आरोप कल्याण-कल्याण डोंबिवली महापालикेच्या निवडणूकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहिर करताना राज्य सरकारच्या नगरविकास खात्याने दिलेल्या नियमावलीचे उल्लंघन केले असल्याचे आरोप मनसे चे जिल्हाअध्यक्ष प्रकाश भोईर यांनी केलं आहे. नियमांची पायमल्ली करुन सत्ताधारी आणि प्रशासनाने मनमानी करीत सत्ताधाऱ्यांना सोयीस्कर होईल अशी प्रभाग रचना केली आहे. त्याचा मनसे जाहिर निषेध करीत आहे.हरकती सूचनांच्या सुनावणीची केवळ फास्र केला आहे Asa आरोप मनसेचे भोईर यांनी केला आहे.मनसेच्या डाेंबिवली शहर शाखेत मनसेच्या वतीने प्रभाग रचने संदर्भात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केला आहे. भोईर यांनी सांगितले की, अंतिम प्रभाग रचना करताना सेटिंग करण्यात आली आहे. सत्ताधारी नगरसेवकांना सोयीस्कर होईल अशी प्रभाग रचना केली आहे. २ हजार पेक्षा जास्त हरकती सूचना घेतलेल्या आल्या होत्या. प्रशासनाने केवळ २६४ हरकती प्राप्त झाल्याचे दाखविले आहे प्रभाग रचना करताना सुरुवातीला ४ चे नंतर ३ चे आणि त्यानंतर ५ सदस्य असलेले प’नल तयार करणे अपेक्षित होते. त्याचेही उल्लंघन झाले आहे. प्रभाग रचना करताना उत्तर दिशेनुसार सुरुवात झाली पाहिजे. उत्तर दिशेनुसार टिटवाळ्यातून सुरुवात होणे अपेक्षित होते. ती सुरुवात उंबर्डे येथून करण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात २७ गावांपैकी १८ गावे वगळून स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचा जीआर काढण्यात आला होता. त्यावेळी तत्कालीन आयुक्तांनी सरकारच्या आदेशानुसार १८ गावांमधील १३ नगरसेवकांचे सदस्य पद रद्द केले होते. २७ गावे वगळण्याचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असताना प्रभाग रचना २७ गावांना धरुन कशी काय आणि कशाच्या आधारे केली जात आहे ? असा संतप्त सवाल भोईर यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणी पुन्हा न्यायालयात दाद मागू असा इशारा भोईर यांनी दिला आहे. Byte... प्रकाश भोईर जिल्हाअध्यक्ष
0
comment0
Report
PNPratap Naik1
Oct 04, 2025 16:00:20
Kolhapur, Maharashtra:कोल्हापुरात आज अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ यांना संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री उदय सामंत आणि आमदार सतेज पाटील यांच्या शुभहस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आलं. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कोल्हापूर शाखेच्या वतीने कोल्हापूरातील गायन समाज देवल क्लब या संस्थेच्या नाट्यगृहात हा दिमाखदार सोहळा पार पडला. 50 हजार रोख रक्कम, शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप होतं.यावेळी बोलताना अशोक सराफ यांनी कोल्हापूरशी आपले जुने ऋणानुबंध असल्याचे सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाला राजकीय रंग न देता अगदी हसत खेळत हा कार्यक्रम संपन्न केल्याचं देखील अशोक सराफ यांनी म्हटलं आहे. यावेळी निवेदक विघ्नेश जोशी यांनी अशोक सराफ आणि अभिनेत्री निवेदता सराफ यांची प्रकट घेतली. यावेळी मोठ्या संख्येने रसिक प्रेक्षक आणि कोल्हापूरकर उपस्थित होते.
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Oct 04, 2025 15:20:34
Shirdi, Maharashtra: केंद्रीय गृह आणी सहकार मंत्री अमित शहा यांचे काही वेळात शिर्डीत आगमन होत असून त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे.. आज अमित शहा शिर्डीत मुक्काम करणार असून मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री देखील त्यांच्यासोबत असणार आहे.. उद्या साईदर्शनाने त्यांच्या दौऱ्याला सुरूवात होणार असून विविध कार्यक्रमाला अमित शहा उपस्थित असणार आहे.. मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री आजच अमित शहा यांच्यासोबत असणार असल्याने पावसाने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसंदर्भात आज काही चर्चा होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.. अमित शहा ज्या हाॅटेलमध्ये मुक्काम करणार आहेत तेथून अधिक माहीती आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी...
0
comment0
Report
HPHARSHAD PATIL
Oct 04, 2025 14:38:26
Palghar, Maharashtra:पालघर -\n\nमागील आठवड्यात पालघर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे भात शेतीसह काही भागातील घरांचा मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून राज्याचे वनमंत्री तथा पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी आज प्रत्यक्ष भेट घेऊन पाहणी केली . पालघरच्या ग्रामीण भागासह सरावली , जामशेत , बाडापोखरण या भागात पालकमंत्री गणेश नाईक यांनी पाहणी केली असून नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना तातडीने मदत दिली जाणार असल्याचा आश्वासन यावेळी गणेश नाईक यांच्याकडून देण्यात आलं . पालघर जिल्ह्यात आलेल्या प्रकल्पांमुळे या भागातील नैसर्गिक नाले बुजवले असल्याने पूर्व परिस्थिती निर्माण झाल्याचा निदर्शनास आल्यानंतर गणेश नाईक यांनी याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Oct 04, 2025 13:35:46
1
comment0
Report
SMSarfaraj Musa
Oct 04, 2025 13:35:37
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - जिल्हा बँक नोकर भरती प्रकरणी सदाभाऊ खोत आक्रमक - थेट सहकार मंत्र्यांच्या बंगल्यासमोर उपोषणाचा इशारा. अँकर - सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या होणारया नोकर भरती प्रकरणी आमदार सदाभाऊ खोत आक्रमक झाले आहेत, थेट सहकार मंत्र्यांच्या दारात उपोषण करण्याचा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला आहे. जिल्हा बँकेची चौकशी सुरू असताना कोट्यावधींचा मलिदा लाटण्यासाठी नोकर भरतीची परवानगी दिली असून यामध्ये सहकार मंत्री देखील सामील असल्याचा गंभीर आरोप सदाभाऊ खोत यांनी केला आहे.तसेच होणारया नोकर भरतीमध्ये आरक्षण नुसार आणि पारदर्शक नोकर भरती झाली पाहिजे,जर नोकर भरतीचा घोडं असंच दामटण्याचा प्रयत्न झाला्यास सहकार मंत्र्यांच्या मुंबईतल्या बंगल्यासमोर आपण उपोषण करू, असा इशारा अंधार सदाभाऊ खोत यांनी दिला आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेला सहकार विभागाकडून 559 पदांची नोकर भरती करण्याची परवानगी देण्यात आली आहे,यावरून आमदार सदाभाऊ खोत हे आक्रमक झाले आहेत.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Oct 04, 2025 13:32:07
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Oct 04, 2025 13:19:29
Dhule, Maharashtra:नंदुरबार जिल्ह्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा बांधावर मंत्री माणिकराव कोकाटे पोहचले. मंत्री माणिकराव कोकाटे आणि आणि भाजप आमदार राजेश पाडवी यांनी पाऊसामुळे नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे आणि भाजप आमदार राजेश पाडवी यांनी आज अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नंदुरबार तालुक्यातील चौपाळे पंचक्रोशीतील भागांचा दौरा करून प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि शासनाकडून तातडीने दिवाळीपूर्वूी मदत मिळावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. नंदুরबार जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत 65 मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्याने जिल्हा अतिवृष्टीग्रस्त म्हणून घोषित करण्यात आला आहे. या अतिवृष्टीत पपई, केळी, कापूस तसेच इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून सुमारे दोन हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. पंचनामे पूर्ण करून अहवाल शासनाकडे पाठविण्याची प्रक्रिया सुरू असून, शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मदत मिळावी यासाठी शासन प्रयत्नशील आहे. ॲड. कोकाटे यांनी स्पष्ट केले की कुठल्याही विमा कंपनीचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. ज्या शेतकऱ्यांनी पिकविमा उतरवला आहे, त्या सर्वांना शासनाकडून मदत मिळणार आहे. त्यांनी पुढे सांगितले की, नंदंबार तालुक्यात सुमारे 20 किलोमीटर परिसरात मोठे नुकसान झाले असून प्रशासन युद्धपातळीवर कार्यरत आहे.
2
comment0
Report
ABATISH BHOIR
Oct 04, 2025 13:04:01
Kalyan, Maharashtra:डोंबिवलीत ब्लिंकीट रायडर्सचा कामबंद आंदोलन! अतिरिक्त रायडर्स कमी करणे आणि लांब पल्ल्याच्या डिलिव्हरीसाठी योग्य मोबदला मिळावा अशा विविध मागण्या घेऊन रायडर्स आता रस्त्यावर उतरले आहेत. काल संध्याकाळपासून तब्बल 170 रायडर्सनी एकत्र येऊन कामबंद आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनामुळे कंपनीच्या ऑर्डर्सवर मोठा परिणाम झाला असून, मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याची आंदोलनकर्त्यांची भूमिका क्विक डिलिव्हरी सेवा देणाऱ्या 'ब्लिंकिट' कंपनीच्या रायडर्सनी आपल्या विविध मागण्यांसाठी डोंबिवली शहरात मोठे कामबंद आंदोलन सुरू केले आहे. कंपनीच्या सुमारे १७० रायडर्सनी एकत्र येत काल, संध्याकाळपासून सायकली आणि बाईकची चाके थांबवली आहेत. रायडर्सच्या मते, कंपनीने आपल्या कामाच्या धोरणात बदल केले आहेत, ज्यामुळे त्यांच्या उत्पन्नावर थेट परिणाम झाला आहे. प्रामुख्याने कंपनीने गरजेपेक्षा अधिक रायडर्सची भरती केली आहे. यामुळे प्रत्येक रायडरच्या वाट्याला येणाऱ्या ऑर्डर्सची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली आहे, परिणामी त्यांचे दैनंदिन उत्पन्न घटले आहे त्याच बरोबर रायडर्सना लांब पल्ल्याच्या डिलिव्हरीसाठी जुन्या दराप्रमाणे मोबदला दिला जात नाहीये. लांब पल्ल्यासाठी लागणारा वेळ, इंधन खर्च आणि शारीरिक कष्ट याचा विचार करून योग्य मोबदला मिळावा, अशी त्यांची मागणी आहे. सर्वात महत्त्वाची म्हणजे शनिवार आणि रविवारी कंपनी जादा रायडर्स भरती करते, ज्यामुळे त्यांचा रोजीवर परिणाम होतो. तसंच, डोंबिवलीहून माणकोलीसारख्या लांब भागात ऑर्डर देण्यासाठी लागणाऱ्या प्रवासाचा दर अत्यल्प आहे, तो वाढवावा, अशी मागणीही रायडर्सनी केली आहे. सध्या तब्बल 170 रायडर्सनी काम बंद ठेवलं असून, कंपनीच्या तब्बल 500 हून अधिक ऑर्डर्स थांबल्या आहेत. ‘जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही.’ अशी रायडर्सनी स्पष्ट भूमिका घेतली आहे की, या आंदोलनामुळे डोंबिवली पश्चिमेतील ग्राहकांना सेवा ठप्प झाली असून, कंपनीलाही मोठा आर्थिक फटका बसला आहे
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Oct 04, 2025 13:03:43
Washim, Maharashtra:वाशीम: महाराष्ट्र राज्य अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सच्या आदेशानुसार वाशीम जिल्हा पोलिसांनी विशेष मोहिम राबवून २८६ किलो ३५० ग्रॅम गांजाचा नाश केला आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक, अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्स, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी दिनांक १६ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत NDPS कायद्याअंतर्गत नोंद असलेल्या गुन्ह्यांतील अंमली पदार्थांचा नाश करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली वाशीम जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये नोंद असलेल्या १९ NDPS गुन्ह्यांतील एकूण २८६ किलो ३५० ग्रॅम गांजाचा नाश करण्यात आला.
0
comment0
Report
Dussera 2025
Advertisement
Back to top