Back
नवी मुंबई अंतरराष्ट्रीय विमानतळ का उद्घाटन पीएम मोदी के हाथों 8 अक्टूबर को
SNSWATI NAIK
Oct 04, 2025 16:01:09
Navi Mumbai, Maharashtra
रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 8 ऑक्टोबर रोजी होणार आहे. दुपारी 2.40 वाजता प्रधानमंत्री प्रकल्पाच्या ठिकाणी येणार असून त्यानंतर ते टर्मिनल बिल्डिंगची पाहणी करतील त्यानंतर हा पहिला टप्पा राष्ट्राला समर्पित करतील त्यानंतर जाहीर सभेत मार्गदर्शन करतील. जवळपास दोन तासांचा हा कार्यक्रम असणार आहे. विमानतळ प्रकल्पाचं उद्घाटन ऑक्टोबर महिन्यापेक्षा आवेगात असल्यास प्रत्यक्ष विमान वाहतूक डिसेंबर महिन्यापासून सुरू होणार आहे. प्रकल्पाच्या उद्घाटनानंतर हे विमानतळ सुरक्षेच्या दृष्टीने सीआयएसएफच्या ताब्यात दिल्यानंतरच तिथून विमानउड्डाण सुरू होणार असल्याची माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांन सिडको भवन इथे पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सिंघल यांनी विमानतळ प्रकल्पाची माहिती दिली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे महामुंबईचे दुसरे विमानतळ असून सध्या अस्तित्वात असलेले मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमीनतळापेक्षा दुप्पट आहे. लंडन इथल्या हिथ्रो विमानतळाशी या विमानतळाची तुलना केली जात आहे. हे ग्रीन फिल्ड विमानतळ असून संपूर्ण विमानतळ अकराशे साठ हेक्टर जमीनवर आहे. त्या ठिकाणी चार टर्मिनल असून त्यापैकी पहिल्या टर्मिनलचे काम पूर्ण झालं आहे. सार्वजनिक-खाजगी भागीदारी मॉडेलवर हे विमानतळ उभारण्यात आलं असून सिडकोकडे २६ टक्के आणि एनएमआयएएल कडे ७४ टक्के हिस्सा आहे. पहिला टप्पा दरवर्षी २० दशलक्ष प्रवासी हाताळण्याची क्षमता असून अंतिम टप्प्यात विमानतळाची प्रवासी क्षमता ९० दशलक्षांपर्यंत वाढवली जाणार असून त्याच वेळी तब्बल साडेतीन्ळ दशलक्ष टन मालवाहतूक येथे होऊ शकेल. या पहिल्या टप्प्यासाठी सुमारे १९६४६ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. या विमानतळाच्या धावपट्टीवर कोणतेही विमान उतरू शकणार नाही. सर्वात मोठे वैशिष्ट्य असं आहे की त्यामध्ये एपीएम म्हणजे ऑटोमेटेड पीपल मुव्हर्स आहे याचा अर्थ असाच आहे की सर्व टर्मिनल एकमेकांनी जमिनीखालील बोगद्यांनी ओढलेले आहेत. प्रवासी कोणत्याही टर्मिनलवर चेक इन करू शकतात आणि त्याचं सामान त्यांच्या टर्मिनल वर पोहोचणार आहे. विमानतळाला चारही बाजूंनी रस्ते, जलवाहतूक आणि रेल्वे वाहतूक मार्गांनी जोडण्यात आलं आहे. जवळच्या तरघर इथे वॉटर टॅक्सी सुविधा उपलब्ध असणार आहे तर अटल सेतू मार्गे मुंबईशा जोडला जाणार आहे. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ जोडण्यासाठी गोल्ड लाईन मेट्रो लाईन प्रस्तावित करण्यात आली असल्याचंही सिंघल यांनी सांगितलं.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KJKunal Jamdade
FollowOct 04, 2025 18:30:120
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowOct 04, 2025 17:31:050
Report
KJKunal Jamdade
FollowOct 04, 2025 17:16:140
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowOct 04, 2025 17:15:503
Report
ABATISH BHOIR
FollowOct 04, 2025 17:02:360
Report
ABATISH BHOIR
FollowOct 04, 2025 16:00:370
Report
PNPratap Naik1
FollowOct 04, 2025 16:00:200
Report
KJKunal Jamdade
FollowOct 04, 2025 15:20:340
Report
HPHARSHAD PATIL
FollowOct 04, 2025 14:38:260
Report
HPHARSHAD PATIL
FollowOct 04, 2025 14:38:110
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowOct 04, 2025 13:35:461
Report
SMSarfaraj Musa
FollowOct 04, 2025 13:35:370
Report
PNPratap Naik1
FollowOct 04, 2025 13:32:070
Report
GMGANESH MOHALE
FollowOct 04, 2025 13:31:430
Report