Back
डोंबिवली ब्लिंकिट राइडर्स का कामबंद, 500 से अधिक ऑर्डर प्रभावित
ABATISH BHOIR
Oct 04, 2025 13:04:01
Kalyan, Maharashtra
डोंबिवलीत ब्लिंकीट रायडर्सचा कामबंद आंदोलन! अतिरिक्त रायडर्स कमी करणे आणि लांब पल्ल्याच्या डिलिव्हरीसाठी योग्य मोबदला मिळावा अशा विविध मागण्या घेऊन रायडर्स आता रस्त्यावर उतरले आहेत. काल संध्याकाळपासून तब्बल 170 रायडर्सनी एकत्र येऊन कामबंद आंदोलन सुरू केलं आहे.
या आंदोलनामुळे कंपनीच्या ऑर्डर्सवर मोठा परिणाम झाला असून, मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याची आंदोलनकर्त्यांची भूमिका क्विक डिलिव्हरी सेवा देणाऱ्या 'ब्लिंकिट' कंपनीच्या रायडर्सनी आपल्या विविध मागण्यांसाठी डोंबिवली शहरात मोठे कामबंद आंदोलन सुरू केले आहे. कंपनीच्या सुमारे १७० रायडर्सनी एकत्र येत काल, संध्याकाळपासून सायकली आणि बाईकची चाके थांबवली आहेत. रायडर्सच्या मते, कंपनीने आपल्या कामाच्या धोरणात बदल केले आहेत, ज्यामुळे त्यांच्या उत्पन्नावर थेट परिणाम झाला आहे. प्रामुख्याने कंपनीने गरजेपेक्षा अधिक रायडर्सची भरती केली आहे. यामुळे प्रत्येक रायडरच्या वाट्याला येणाऱ्या ऑर्डर्सची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली आहे, परिणामी त्यांचे दैनंदिन उत्पन्न घटले आहे त्याच बरोबर रायडर्सना लांब पल्ल्याच्या डिलिव्हरीसाठी जुन्या दराप्रमाणे मोबदला दिला जात नाहीये. लांब पल्ल्यासाठी लागणारा वेळ, इंधन खर्च आणि शारीरिक कष्ट याचा विचार करून योग्य मोबदला मिळावा, अशी त्यांची मागणी आहे. सर्वात महत्त्वाची म्हणजे शनिवार आणि रविवारी कंपनी जादा रायडर्स भरती करते, ज्यामुळे त्यांचा रोजीवर परिणाम होतो. तसंच, डोंबिवलीहून माणकोलीसारख्या लांब भागात ऑर्डर देण्यासाठी लागणाऱ्या प्रवासाचा दर अत्यल्प आहे, तो वाढवावा, अशी मागणीही रायडर्सनी केली आहे. सध्या तब्बल 170 रायडर्सनी काम बंद ठेवलं असून, कंपनीच्या तब्बल 500 हून अधिक ऑर्डर्स थांबल्या आहेत. ‘जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही.’ अशी रायडर्सनी स्पष्ट भूमिका घेतली आहे की, या आंदोलनामुळे डोंबिवली पश्चिमेतील ग्राहकांना सेवा ठप्प झाली असून, कंपनीलाही मोठा आर्थिक फटका बसला आहे
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KJKunal Jamdade
FollowOct 04, 2025 15:20:340
Report
HPHARSHAD PATIL
FollowOct 04, 2025 14:38:260
Report
HPHARSHAD PATIL
FollowOct 04, 2025 14:38:110
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowOct 04, 2025 13:35:461
Report
SMSarfaraj Musa
FollowOct 04, 2025 13:35:370
Report
PNPratap Naik1
FollowOct 04, 2025 13:32:070
Report
GMGANESH MOHALE
FollowOct 04, 2025 13:31:430
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowOct 04, 2025 13:19:292
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowOct 04, 2025 13:19:150
Report
GMGANESH MOHALE
FollowOct 04, 2025 13:03:430
Report
SRSHRIKANT RAUT
FollowOct 04, 2025 13:03:270
Report
JMJAVED MULANI
FollowOct 04, 2025 13:03:040
Report
नितिन गडकरी के नेतृत्त्व में नागपुर एयरपोर्ट प्रोजेक्ट पर घोटाले के आरोप, 50 करोड़ के नुकसान का दावा
AKAMAR KANE
FollowOct 04, 2025 13:00:560
Report
ABATISH BHOIR
FollowOct 04, 2025 12:35:050
Report