Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Washim444505

कारंजा नगर परिषद में पहली बार AIMIM ने सत्ता संभाली; नगराध्यक्ष पदग्रहण समारोह

GMGANESH MOHALE
Dec 25, 2025 05:47:49
Washim, Maharashtra
वाशिम: कारंजा नगरपरिषदेवर अध्यक्ष पदासह 16 नगरसेवक या निवडणुकीत विजयी होत पहिल्यांदाच एमआयएम पक्षाने कारंजा नगरपरिषदवर एक हाती सत्ता स्थापन केली आहे, त्या पार्श्वभूमीवर कारंजा नगर परिषद नगराध्यक्ष पदग्रहण सोहळा पार पडला. यावेळी नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा फरीदाबानू मोहम्मद शफी पुंजाणी यांचा पदग्रहण सोहळा तसेच नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार समारंभ कारंजा नगर परिषदेच्या कार्यालयात उत्साहात पार पडला. यावेळी शहरातील प्रतिष्ठित नागरिक या सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.उपाध्यक्ष आणि विविध सभापती नियुक्त केले जाणार असून,कारंजा नगरपालिका वर प्रथमच एम आय एम ने आपला झेंडा रोवल्याने राज्यभरात चर्चेचा विषय ठरला आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PNPratap Naik1
Dec 25, 2025 07:15:40
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे यांनी तयारीला सुरुवात केली आहे. शहराच्या राजकारणात स्वतंत्र ताकद म्हणून उभं राहण्याच्या दृष्टीने पक्षाकडून हालचालींना वेग आला आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनसुराज्य शक्ती पक्षाकडून तब्बल 70 इच्छुक उमेदवारांच्या आमदार विनय कोरे यांनी मुलाखती घेतल्या आहेत. प्रभागनिहाय तयारी, स्थानिक पातळीवरील जनाधार आणि संघटनात्मक ताकद याची चाचपणी यावेळी करण्यात आली. दरम्यान, महायुतीमध्ये सन्मानपूर्वक जागा मिळाल्यास जनसुराज्य शक्ती पक्ष महायुतीतून निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे संकेत आमदार विनय कोरे यांनी दिले आहेत. मात्र, त्याचवेळी पक्षाकडून स्वबळावर निवडणूक लढवण्याचीही तयारी सुरू असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. महायुतीसोबत युती झाली नाही, तर जनसुराज्य शक्ती पक्ष स्वबळावर मैदानात उतरण्याची पूर्ण तयारी करत आहे. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्रिकोणी किंवा बहुकोणी लढती पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Dec 25, 2025 07:03:00
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपूर महापालिका निवडणुकीच्या संदर्भातील भाजपच्या निवडणूक प्रमुख पदावरून स्थानिक भाजप आमदार किशोर जोरगेवार यांना हटविल्याच्या मुद्द्यावर स्वतः किशोर जोरगेवार यांनी दिली माहिती, अशा पद्धतीची कुठलीही सूचना पक्षाने दिली नसल्याची केला खुलासा अँकर:--चंद्रपूर महापालिका निवडणुकीच्या संदर्भातील भाजपच्या निवडणूक प्रमुख पदावरून स्थानिक भाजप आमदार किशोर जोरगेवार यांना हटविल्याच्या मुद्द्यावर स्वतः किशोर जोरगेवार यांनी माहिती दिली आहे. अशा पद्धतीची कुठलीही सूचना पक्षांने दिली नसल्याचा खुलासा केलाय. माजी राज्यसभा खासदार अजय संचेती यांची जोरगेवार यांच्या जागी नियुक्ती केल्याची चर्चा पक्ष वर्तुळात आहे. नगर परिषद निवडणुकीत झालेली हार बघता बाहेरून शक्तीची गरज असल्याने अशा पद्धतीने नेमणूक झाली असेल असा टोला जोरगेवार यांनी लगावला आहे. पक्ष जी जबाबदारी देईल त्याच्याशी समरस होऊन महापालिका निवडणूक जिंकू असा विश्वास मात्र जोरगेवार यांनी व्यक्त केला. दिग्गज भाजप नेते आ. सुधीर मुनगंटीवार आणि आपल्यात वाद नव्हे तर भूमिकात वेगळेपणा असल्याचीही सारवासारव आ. जोरगेवार यांनी केली. बाईट १) किशोर जोरगेवार, आमदार, चंद्रपूर विधानसभा
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 25, 2025 07:00:54
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:ऑन संजय राऊत काल ठाकरे बंधू युती झाली, त्यांनी असे म्हटले की पोरं पळवणारी टोळी अली आहे, त्यांना भीती वाटतेय की त्यांची पोर पळवणार आहे, संजय राऊत म्हणतात शिवसेनेचे पोरं पळवणार, एक दिवसात एकमत नसल्याचे दिसत आहे. आमच्याकडे मनसे जिल्हाध्यक्ष आमच्या पक्षात आला, त्याच्या डोळ्यावर पट्टी नव्हती, युती झाल्याने महाराष्ट्र राजकारण बदल होणार असे नाही....30 वर्ष सत्ता कुणाची होती, म्हणतात मराठी माणसासाठी एकत्र आले... तेव्हा मराठी माणूस कुठे गेला, तुम्ही आता स्वतःच हित पहा आम्ही मराठी माणसासाठी सक्षमा आहे ऑन संजय राऊत याला काय माहित आहे, खरडे घाशी करण्यात यांचा आयुष्य गेले, कुणाचे पाय पाय चाटून तुम्ही थकले सांगायला लावू नका, काश्मीरला चालले, आता सोनियाकडे दुसरी अम्मा पाहायला चालले, आता काय दुसऱ्या अपत्य होणार आहे का? महानगरपालिका कोंबडी सोन्याचे अंडी घेण्यासाठी आले कबूल करा, टक्केवारी शिवाय काय झाले, ठेकेदार कोण होते, त्यांना अभय कुणी दिले, सत्ता पाहिजे त्यासाठी युती झाली आहे. ऑन आदित्य ठाकरे महाराष्ट्र अन्याय होत आहे, यांना आता जेवण जात नाही, बाळा घरात अन्याय होणार नाही लक्ष दे ओन महापौर काही होणार नाही, मुंबई महापौर महायुतीचा होईल... कोस्टल रोड, अतुल सेतू एकनाथ शिंदे, फडणवीस करत आहे, मुंबई चिंता सोडा ओन m फॅक्टर चांगले आहेत, तुम्ही मुसा, दाउदला घ्या, आमचा विरोध नाही, जे पाकिस्तान घोषणा देतील त्याच्याकडे जा... बाळासाहेब यांची देखील अशीच भूमिका होती हे जाहीर करा.. ऑन शरद पवार संजय राऊत नाराज नाराज राहून काही नाही, संजय राऊत मालक बदलला की सेवा करत असतो, आता शरद पवार यांना कमी लेखत आहे, ऑन भाजा मुंबई 100 जागा मागणी मुम्बई महानगरपालिका निवडणूक शिवसेना-भाजप गंभीर घेतली आहे, काहीही झाले तरीही युती होणार आणि भगवा फडकणार... आम्हाला सन्मानकजनक जागा मिळतील, युती असल्यास विजय होईल... ठाकरे बंधू युतीमुळे बदल झाले असे नाही.. ठाकरे गटात मुलांना उमेदवारी त्यांच्याकडे पध्दत तशी आहे, कार्यकर्ते सतरंजी उचलायची आहे, नातेवाईकाना उमेदवारी याला एक मर्यादा आहे, ऑन बाळा नांदगावकर दोन दिवसांत पाह काय काय होते, 28 तारखेला पहा काय होते... ऑन राजकीय घराणेशाही राजकरणमध्ये नेत्यांच्या मुलांना तिकीट देणे चुकीचे नाही, पण पूर्ण सत्ताच घशात घालणे योग्य नाही... बाळासाहेब म्हणाले होते माझ्या घरातील कुणी निवडणूक लढवनार नाही, पण लढवली ना... ऑन शिंदे भाजप संभाजीनगर जागावाटप मी स्वतः काल आणि परवा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटलो... कदाचित आज आमची बैठक होईल आणि युती व्हावी यावर निर्णय होऊ शकते... ऑन अजित पवार नाराज राष्ट्रवादी मंत्री त्यांच्या पक्षात काय घडत आहे, त्यांना माहीत आहे.. संदीप देशपांडे पोस्टर असे काही होत नाही, मुंबईत उत्तर भारतीय, मराठी माणूस, पाकिस्तानी असे सर्व बाहेर येईल, पोस्टर लावल्याने काही होत नाही...
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Dec 25, 2025 06:49:38
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून एकत्रित इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत. सांगलीतल्या आमराई क्लब या ठिकाणी आमदार जयंत पाटील, आमदार कदम आणि खासदार विशाल पाटलांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दोन्ही पक्षातल्या इच्छुक उमेदवारांच्या एकत्रित मुलाखती घेण्यात येत आहेत. महापालिका निवडणुक्यांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून एकत्रित करून लढण्याचा निर्धार करण्यात आला आहे. त्या दृष्टीने आता इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती देखील एकत्रित पार पडत आहेत ज्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षातल्या इच्छुक उमेदवारांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे.
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Dec 25, 2025 06:45:58
Amravati, Maharashtra:अमरावती भाजपचे तुषार भारतीय यांच्या वतीने अटल दौड हाफ मॅरेथॉनचे आयोजन; पुरुष व महिला गटातून ३ हजार ६०० स्पर्धकांचा सहभाग अमरावतीत भाजपचे तुषार भारतीय यांच्या वतीने राज्यस्तरीय अटल दौड हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून भारतरत्न स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त या अटल दौड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अमरावतीच्या दसरा मैदानापासून या मॅरेथॉनला उत्साहात प्रारंभ झाला असून पुरुष व महिला गटातून ३ हजार ६०० स्पर्धकांचा सहभाग घेतला आहे. राज्यभरातून धावपटूंनी अमरावतीत हजेरी लावली असून या स्पर्धेसाठी ५ लाख रुपयांची रोख बक्षिसे देण्यात येणार आहे. पुरुष विजेत्यास बाईक तर महिला विजेत्यास स्कुटी मिळणार आहे.
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Dec 25, 2025 06:05:53
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Dec 25, 2025 06:05:34
Nala Sopara, Maharashtra:नालासोपारा येथील रेल्वे पुलावर गर्दुल्ल्यांचा खुलेआम नशेचा प्रकार समोर आला असून, याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार वायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रेल्वे पुलावर, नागरिकांचा वर्दळीचा मार्ग असतानाच काही गर्दुल्ले बेधडकपणे नशा करताना स्पष्ट दिसत आहेत. विशेष म्हणजे या पुलावरून विद्यार्थी, महिला, नोकरदार वर्गासह अनेक प्रवासी दररोज ये-जा करतात. मात्र अशा प्रकारांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांनी यापूर्वीही या ठिकाणी नशेखोरांचा सुळसुळाट वाढल्याच्या तक्रारी केल्या होत्या. मात्र प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत. या गर्दुल्ल्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, एखादी अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. वायरल व्हिडिओनंतर आता पोलीस आणि रेल्वे प्रशासन यावर काय कारवाई करणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. नालासोपाऱ्यातील रेल्वे पुलावरील ही गंभीर बाब प्रशासनासाठी इशारा मानली जात आहे.
0
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Dec 25, 2025 06:01:59
Buldhana, Maharashtra:सत्ता येताच मलकापूर के नवनिर्वाचित नगराध्यक्ष अतिक जवारीवाले द्वारा विजयी मिरवणुकीत हवेत नोटा उधळल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडिया वर व्हायरल होत असलेला व्हिडिओ चर्चेचा विषय ठरत आहे. काँग्रेस के नवनिर्वाचित नगराध्यक्ष अतिक जवारीवाले यांनी विजयी मिरवणुकीत हवेत नोटा उधळल्या. विजय मिरवणूक जल्लोषात अतिक यांनी नोटांची गड्डी काढून तीन-चार वेळा हवेत उधळल्याचा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. काही समर्थकांनी तो अभिमानाने व्हॉट्सअॅप स्टेटसवरही ठेवला. परंतु या दृश्यामुळे विजय साजरा करण्याची पद्धत आणि सार्वजनिक पदाची जबाबदारी यावर एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहिला.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 25, 2025 05:49:59
Washim, Maharashtra:कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदा नव्या सोयाबीनची आवक सुरू होताच बाजारात अपेक्षेपेक्षा कमी दर मिळाल्याने शेतकरी नाराज होते. १७ डिसेंबरपर्यंत सोयाबीनला प्रतिक्विंटल ३,९१५ ते ४,३७५ रुपये दर होता. मात्र शासनाचा हमी भाव बाजारभावापेक्षा सुमारे १,४०० रुपयांनी जास्त असल्याने शेतकऱ्यांनी नाफेड खरेदी केंद्रांकडे मोठ्या प्रमाणावर नोंदणी केली.यामुळे खासगी व्यापाऱ्यांनीही दर वाढवले असून गेल्या काही दिवसांत क्विंटलमागे २०० ते ३०० रुपयांची वाढ झाली आहे. सध्या बाजारात सोयाबीनला ४,७०० रुपयांपर्यंत दर मिळत असून नाफेडच्या हस्तक्षेपामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Dec 25, 2025 05:35:32
Satara, Maharashtra:सातारा: 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यातील शाहू स्टेडियम या ठिकाणी 1 जानेवारी ते 4 दिसेर यादरम्यान पार पडत आहे याची तयारी देखील सुरू आहे. या संमेलनाला देश, राज्यातील साहितिक, साहित्यप्रेमी यांची उपस्थिती राहणार असल्यामुळे सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी संमेलनाच्या कार्यक्रम स्थळाचा नियोजनाचा आढावा घेतला. पूर्ण परिसरात पोलीस बंदोबस्त याबरोबरच कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी साताऱ्याचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष अमोल मोहिते, संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Dec 25, 2025 05:03:02
Amravati, Maharashtra:अमरावती महापालिकेत भाजप शिवसेना आणि रवी राणांच्या युतीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेने भाजपला 35 ते 42 जागांचा प्रस्ताव दिल्याची सूत्रांची माहिती अमरावती महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेनेची जागावाटप संदर्भात महत्त्वाची बैठक संपली आहे. आम्ही जागावाटप संदर्भात चर्चा केली नाही तर प्रभाग निहाय चर्चा केल अशी माहिती शिवसेना नेते आनंदराव अडसुळ यांनी दिली आहे. अमरावती महानगरपालिकेत आम्हाला 50 जागा मिळाव्यात अस वाटते असे आनंदराव अडसूळ म्हणाले असून अमरावती महानगरपालिकेत शिवसेनेने भाजपला 35 ते 42 जागांचा प्रस्ताव दिल्याची सूत्रांची माहिती आहे. अमरावती मध्ये भाजप, शिंदेंची शिवसेना आणि आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानची युती पक्की झाली असून आम्ही सकारात्मक पद्धतीने समोरून जात आहोत. कोणाला किती जागा मिळणार हे आज सांगू शकत नाही मात्र जागा निवडून येण्यावर आमचा भर राहील मग ती जागा कोणत्याही पक्षाची असो त्या ठिकाणी आमची चर्चा सुरू आहे. शिवसेनेने आम्हाला जागांचा प्रभाग निहाय प्रस्ताव दिला आहे. अशी माहिती भाजप नेते अमरावतीचे प्रभारी संजय कुटे यांनी दिली असून अमरावतीच्या एका हॉटेलमध्ये दोन्ही पक्षातील नेत्यांची बैठक संपली आहे. भाजपकडून प्रभारी संजय कुटे तर शिवसेना कडून माजी खासदार आनंदराव अडसुळ चर्चेसाठ उपस्थित होते. भाजप आणि शिवसेनेच्या चर्चेपूर्वी शिवसेनेची स्वतंत्र बैठक पार पडली आहे.
0
comment0
Report
christmas
Advertisement
Back to top