Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Wardha442001

वर्धा पुलिस ने MD विक्रेता गिरफ्तार किया, 1.56 लाख के माल-जप्त

MAMILIND ANDE
Feb 20, 2026 04:17:39
Wardha, Maharashtra
रामनगर पोलिसांची धडक कारवाई; एमडी विक्री करणारा युवक अटकेत, १.५६ लाखांचा मुद्देमाल जप्त रामनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मँथेडॉन (एमडी) या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या युवकावर धडक कारवाई करत त्याला अटक केली आहे. या कारवाईत एकूण 1 लाख 56 हजार 720 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 19 फेब्रुवारी रोजी गुन्हे शोध पथकाला विश्वसनीय गुप्त माहिती मिळाली होती की, अंदाजे 23 ते 25 वर्षांचा एक युवक कारला चौक परिसरात अंमली पदार्थ विक्रीसाठी फिरत आहे. या माहितीच्या आधारे प्रभारी ठाणेदार श्री. अजय भुसारी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
GMGANESH MOHALE
Feb 20, 2026 05:17:05
0
comment0
Report
AKAMAR KANE
Feb 20, 2026 05:16:40
Nagpur, Maharashtra:नागपूर - शस्त्रतस्करीचा मोठा भंडाफोड करण्यात नागपूर शहर गुन्हे शाखाच्या घरफोडी विरोधी पथकाला यश आलं आहे. उत्तर प्रदेशातून देशी बनावटीची पिस्तुले आणून त्यांची विक्री करण्याचा डाव पोलिसांनी उधळून लावला. या प्रकरणात शुभम जंगले, सागर चौधरी, श्रेयस यादव आणि वंश सिन्हा या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून दोन देशी पिस्तुले, चार मॅगझिन आणि तब्बल ३४ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. शिवशंभूनगर परिसरातील सराईत गुन्हेगाराकडे शस्त्र असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी धाड टाकली आणि तपासाची साखळी पुढे नेत संपूर्ण टोळीचा पर्दाफाश केला. मुख्य आरोपीने प्रत्येकी ३५ हजार रुपयांना पिस्तुले खरेदी करून नफ्यासाठी विक्रीचा प्रयत्न केल्याचे तपासात उघड झाले आहे. चारही आरोपींविरुद्ध अर्म्स अॅक्ट आणि महाराष्ट्र पोलिस अॅक्टन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Feb 20, 2026 04:45:37
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Feb 20, 2026 04:33:42
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Feb 20, 2026 04:33:14
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Feb 20, 2026 03:50:29
Bhandara, Maharashtra:रानडुकरांच्या तस्करीप्रकरणी १२ आरोपींना हत्यार, जाळे व वाहनांसह ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई गस्ती दरम्यान तुमसर वनविभागाने १९ फेब्रुवारी रोजी झंझेरिया बिटात केली. तुमसर वनपरिक्षेत्र अधिकारी पहाटे ५ वाजता शासकीय वाहनाने गस्त घालत असताना त्यांना झंझेरिया बिटातील वाघसांध्या तलाव परिसरात संशयास्पद हालचाली दिसल्या. राखीव वनाजवळील तलावकाठावर महिंद्रा बोलेरो पिकअप (एमएच ४९ बीझेड ७१०४) आढळून आले. पाहणीत वाहनात एक रानडुक्कर सापडले, तर आजूबाजूला १० ते १२ संशयित दिसून आले. चौकशीअंती संशयितांनी कबूल केले की, ते जंगल व शेतात रानडुक्कर पकडतात आणि ते नागपूर किंवा छत्तीसगढ राज्यात विकतात. वन्यजीव कायद्याचे उल्लंघनप्रकरणी १२ जणांना ताब्यात घेण्यात आले.
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Feb 20, 2026 03:48:54
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Feb 20, 2026 03:48:38
Chendhare, Maharashtra:चवदार तळे सुशोभिकरण कामासाठी 56 कोटींचा निधी. मंत्री भरत गोगावले यांची माहिती. 2027 चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष. विविध कामे हाती घेणार. अँकर - महाडच्या ऐतिहासिक चवदार तळ्याच्या सुशोभीकरण कामासाठी राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने तब्बल 56 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय. चवदार तळे सत्याग्रहाला 2027 मध्ये 100 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने चवदार तळे सुशोभीकरण, संरक्षक भिंत तसेच जल शुद्धीकरण अशी कामं लवकरच हाती घेतली जाणार आहेत. यासंदर्भात मंत्री भरत गोगावले यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष सुरू होण्यापूर्वी ही सर्व कामे पूर्ण होतील असं मंत्री गोगावले यांनी सांगितलं. बाइट - भरत गोगावले, मंत्री
0
comment0
Report
UJUmesh Jadhav
Feb 20, 2026 03:48:22
Thane, Maharashtra:काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी समाजवादी पक्षाच्या आमदारांना हाताशी धरून काँग्रेस पक्ष भाजपला विकला असल्याचा आरोप काँग्रेसचे भिवंडी शहराध्यक्ष रशीद ताहीर मोमीन यांनी केला आहे. त्यांच्या पत्राची माहिती राहुल गांधी यांना दिली गेली. यासंदर्भातील चर्चा काँग्रेसमध्ये उफाळून आली आहे. भिवंडी महापालिकेत 90 नगरसेवक आहेत; काँग्रेस 30 आणि राष्ट्रवादी 12, एकूण 42, महापौर पदासाठी चार सदस्यांची आवश्यकता आहे. वाटाघाटीची कोणतीही सूचना मला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी दिली नाहीत. या स्थितीत समाजवादी आमदार रईस शेख यांना हाताशी धरून निवडणुकी आधी काँग्रेसचे एबी फॉर्म वाटले आणि आता शेख यांना हाताशी धरून काँग्रेस पक्ष भाजपला विकला असल्याचा आरोप भिवंडी शहराध्यक्षांनी राहुल गांधी यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. भिवंडी मध्ये महापौर पदाच्या निवडणुकीत येणाऱ्या घटना पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Feb 20, 2026 03:47:44
Bhandara, Maharashtra:गोंदिया से जुड़े डॉक्टर नितेश वाजपेयी ने अडतीच लाखों में नवजात बाळ की विक्री के मामले में भंडारा पुलिस ने मुख्य आरोपी को हिरासत में लिया। लक्ष हॉस्पिटल, भंडारा से छुट्टी मिलते ही पुलिस ने तुरंत कार्रवाई कर गिरफ्तारी की। बालकल्याण विभाग ने इस मामले का पर्दाफाश किया था। पहले दो आरोपी गिरफ्तार हो चुके हैं और चार लोग अब भी फरार हैं। मुख्य आरोपी की गिरफ्त से जांच में तेजी आई है और बाळ विक्री रैकेट के मूल तक पहुंचने का प्रयास हो रहा है। अभी तीन आरोपी पुलिस कस्टडी में हैं। वहीं विधायक नरेंद्र भोंडेकर ने आरोप लगाया है कि अधिकारी मुख्य आरोपी को न पकड़ने के लिए 5 करोड़ की मांग कर रहे थे।
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Feb 20, 2026 03:45:47
Yeola, Maharashtra:महाराष्ट्राचे आराध्य दैवत व युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396 व्या जयंतीनिमित्त येवला येथील शिवसृष्टी प्रकल्पात विविध सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. या वेळी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते शिवसृष्टी प्रकल्पातील नयनरम्य कारंजाचे लोकार्पण करण्यात आले. या सोहळ्याला माजी खासदार समीर भुजबळ, डॉ. शेफाली भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती होती. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे युवा शाहीर रामानंद उगले व त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या दमदार पोवाड्यांमधून शिवरायांचा जाज्वल्य इतिहास, अद्वितीय शौर्य, रणनिती, पराक्रम आणि हिंदवी स्वराज्य स्थापनेचा प्रेरणादायी प्रवास अत्यंत प्रभावीपणे उलगडून दाखवला.
0
comment0
Report
Advertisement
Back to top