Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Washim444505

मेडशी सिंचन प्रकल्प में मध्यरात्रि चोरी: किसानों के पंप लाइन कटे, नुकसान बढ़ा

GMGANESH MOHALE
Feb 20, 2026 04:33:42
Washim, Maharashtra
मेडशी सिंचन प्रकल्प परिसरात मध्यरात्र्री अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केली. दहा ते पंधरा शेतकऱ्यांच्या मोटार पंपांच्या लाईन केबल चोरून नेण्यात आल्या असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे. केबल चोरीमुळे सिंचन व्यवस्था विस्कळीत झाली असून पिकांना पाणी देण्याचे मोठे संकट निर्माण झाले आहे. शेती साहित्यच्या चोरीच्या वाढत्या घटनामुळं शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती व संतापाचे वातावरण असून चोरट्यांना तातडीने अटक करण्याची मागणी होत आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
NMNITESH MAHAJAN
Feb 20, 2026 06:17:09
Jalna, Maharashtra:जालना :आजपासून दहावीची परीक्षा जालना जिल्ह्यातल्या 102 परीक्षा केंद्रावर होणार परीक्षा 4 संवेदनशील केंद्रावर ड्रोनची नजर अँकर- आजपासून दहावीची परीक्षा सुरु झाली असून जालना जिल्ह्यात 102 परीक्षा केंद्रांवर परीक्षा पार पडत आहे.. काॅपीमुक्त परीक्षा व्हावी यासाठी प्रशासनाचे प्रयत्न आहेत. त्यासाठी संवेदनशीलसह सर्वच केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत. तर जिल्ह्यातल्या चार संवेदनशील केंद्रावर ड्रोनची नजर असणार आहे. याशिवार बैठे पथकांसह फिरते पथकही तैनात करण्यात आले आहेत.. विद्यार्थ्यांनाही परीक्षा केंद्रात जाण्याआधी तपासणी करून सोडलं जात आहे. दरम्यान विद्यार्थ्याजवळ काॅपी आढळल्यास विद्यार्थ्यासह पर्यवेक्षक आणि केंद्रचालक जबाबदार असणार असल्याचा इशारा जिल्हाधिकार्यांनी दिला आहे..
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Feb 20, 2026 06:16:53
Washim, Maharashtra:वाशीम: अँकर:राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे.वाशीम जिल्ह्यातील ८८ परीक्षा केंद्रांवरील ८३५ वर्ग खोल्यांमधून एकूण २० हजार ५६ विद्यार्थी परीक्षा देत आहेत.परीक्षा कॉपीमुक्त आणि सुरळीत वातावरणात पार पडावी यासाठी शिक्षण विभागाने व्यापक नियोजन केले आहे.परीक्षा कॉपीमध्ये कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी परीक्षाकेंद्रावर CCTV ची नजर असणार असून प्रत्येक केंद्रावर केंद्रप्रमुख,पर्यवेक्षक आणि भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली.परीक्षा केंद्र परिसरात अनधिकृत व्यक्तींना प्रवेशबंदी घालण्यात आली असून नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.८८ पैकी १९ संवेदनशील परीक्षा केंद्रांवर प्रशासनाचे विशेष लक्ष असणार आहे.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Feb 20, 2026 05:17:05
0
comment0
Report
AKAMAR KANE
Feb 20, 2026 05:16:40
Nagpur, Maharashtra:नागपूर - शस्त्रतस्करीचा मोठा भंडाफोड करण्यात नागपूर शहर गुन्हे शाखाच्या घरफोडी विरोधी पथकाला यश आलं आहे. उत्तर प्रदेशातून देशी बनावटीची पिस्तुले आणून त्यांची विक्री करण्याचा डाव पोलिसांनी उधळून लावला. या प्रकरणात शुभम जंगले, सागर चौधरी, श्रेयस यादव आणि वंश सिन्हा या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून दोन देशी पिस्तुले, चार मॅगझिन आणि तब्बल ३४ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. शिवशंभूनगर परिसरातील सराईत गुन्हेगाराकडे शस्त्र असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी धाड टाकली आणि तपासाची साखळी पुढे नेत संपूर्ण टोळीचा पर्दाफाश केला. मुख्य आरोपीने प्रत्येकी ३५ हजार रुपयांना पिस्तुले खरेदी करून नफ्यासाठी विक्रीचा प्रयत्न केल्याचे तपासात उघड झाले आहे. चारही आरोपींविरुद्ध अर्म्स अॅक्ट आणि महाराष्ट्र पोलिस अॅक्टन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Feb 20, 2026 04:45:37
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Feb 20, 2026 04:33:14
0
comment0
Report
MAMILIND ANDE
Feb 20, 2026 04:17:39
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Feb 20, 2026 03:50:29
Bhandara, Maharashtra:रानडुकरांच्या तस्करीप्रकरणी १२ आरोपींना हत्यार, जाळे व वाहनांसह ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई गस्ती दरम्यान तुमसर वनविभागाने १९ फेब्रुवारी रोजी झंझेरिया बिटात केली. तुमसर वनपरिक्षेत्र अधिकारी पहाटे ५ वाजता शासकीय वाहनाने गस्त घालत असताना त्यांना झंझेरिया बिटातील वाघसांध्या तलाव परिसरात संशयास्पद हालचाली दिसल्या. राखीव वनाजवळील तलावकाठावर महिंद्रा बोलेरो पिकअप (एमएच ४९ बीझेड ७१०४) आढळून आले. पाहणीत वाहनात एक रानडुक्कर सापडले, तर आजूबाजूला १० ते १२ संशयित दिसून आले. चौकशीअंती संशयितांनी कबूल केले की, ते जंगल व शेतात रानडुक्कर पकडतात आणि ते नागपूर किंवा छत्तीसगढ राज्यात विकतात. वन्यजीव कायद्याचे उल्लंघनप्रकरणी १२ जणांना ताब्यात घेण्यात आले.
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Feb 20, 2026 03:48:54
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Feb 20, 2026 03:48:38
Chendhare, Maharashtra:चवदार तळे सुशोभिकरण कामासाठी 56 कोटींचा निधी. मंत्री भरत गोगावले यांची माहिती. 2027 चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष. विविध कामे हाती घेणार. अँकर - महाडच्या ऐतिहासिक चवदार तळ्याच्या सुशोभीकरण कामासाठी राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने तब्बल 56 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय. चवदार तळे सत्याग्रहाला 2027 मध्ये 100 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने चवदार तळे सुशोभीकरण, संरक्षक भिंत तसेच जल शुद्धीकरण अशी कामं लवकरच हाती घेतली जाणार आहेत. यासंदर्भात मंत्री भरत गोगावले यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष सुरू होण्यापूर्वी ही सर्व कामे पूर्ण होतील असं मंत्री गोगावले यांनी सांगितलं. बाइट - भरत गोगावले, मंत्री
0
comment0
Report
UJUmesh Jadhav
Feb 20, 2026 03:48:22
Thane, Maharashtra:काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी समाजवादी पक्षाच्या आमदारांना हाताशी धरून काँग्रेस पक्ष भाजपला विकला असल्याचा आरोप काँग्रेसचे भिवंडी शहराध्यक्ष रशीद ताहीर मोमीन यांनी केला आहे. त्यांच्या पत्राची माहिती राहुल गांधी यांना दिली गेली. यासंदर्भातील चर्चा काँग्रेसमध्ये उफाळून आली आहे. भिवंडी महापालिकेत 90 नगरसेवक आहेत; काँग्रेस 30 आणि राष्ट्रवादी 12, एकूण 42, महापौर पदासाठी चार सदस्यांची आवश्यकता आहे. वाटाघाटीची कोणतीही सूचना मला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी दिली नाहीत. या स्थितीत समाजवादी आमदार रईस शेख यांना हाताशी धरून निवडणुकी आधी काँग्रेसचे एबी फॉर्म वाटले आणि आता शेख यांना हाताशी धरून काँग्रेस पक्ष भाजपला विकला असल्याचा आरोप भिवंडी शहराध्यक्षांनी राहुल गांधी यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. भिवंडी मध्ये महापौर पदाच्या निवडणुकीत येणाऱ्या घटना पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top