Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Wardha442001

प्रदूषण-रहित प्रचार से वर्धा के अपक्ष उम्मीदवार ने चर्चा बनाई

MAMILIND ANDE
Nov 28, 2025 01:19:02
Wardha, Maharashtra
वर्ध्यात अपक्ष उमेदवाराचा अनोखा प्रचार - वर्ध्यात अपक्ष उमेदवाराचा अनोखा आणि पर्यावरणपूरक प्रचार चर्चेत - भ्रष्टाचार मुक्त कारभारासाठी अपक्ष उमेदवारी - प्लास्टिक आणि ध्वनी प्रदूषण न व्हावे म्हणून करताहेत पर्यावरण पूरक प्रचार? - पायात चप्पल न घालता अपक्ष उमदेवाराचा प्रचार अँकर - वर्ध्यातील नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून, नगराध्यक्ष पदाचे एक अपक्ष उमेदवार आपल्या अनोख्या शैलीमुळे शहरात चर्चेचा विषय ठरले आहेत. पारंपरिक बॅनर, पोस्टर्स, भोंगे आणि मोठ्या रॅलींपासून दूर राहत त्यांनी शांत, साधा आणि प्रदूषणमुक्त प्रचाराचा मार्ग स्वीकारला आहे.विशेष म्हणजे हे उमेदवार पायात चप्पल न घालता संपूर्ण शहरात प्रचार करत आहेत. भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाची प्रतिज्ञा ते या प्रतीकातून जनतेसमोर मांडत आहेत. त्यांच्या जॅकेटवरच स्वतःचे पाम्पलेट चिकटवून ते घराघरांत मतदारांशी थेट संवाद साधत आहेत. कोणताही आवाज नाही, कोणतेही मोठे बोर्ड नाहीस... फक्त उमेदवार आणि त्यांच्या कामाची भूमिका..या प्रचाराची सर्वात मोठी वैशिष्ट्ये म्हणजे प्लास्टिक आणि ध्वनीप्रदूषणाला पूर्णविराम. उमेदवार स्पष्ट सांगतात, “निवडणूक जिंकायची आहे, पण त्यासाठी शहरात प्रदूषण वाढवायचं नाही.” त्यामुळे त्यांनी बॅनर, पोस्टर्स आणि भोंग्यांचा वापर पूर्णपणे टाळला आहे..त्यांच्या या पर्यावरणपूरक आणि साधेपणाच्या शैलीला शहरातील नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, सोशल मीडियावरही हा प्रचार मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. वर्ध्यातील या अपक्ष उमेदवाराचा शांत आणि स्वच्छ प्रचार सध्या नगरपरिषद निवडणुकीत चांगलीच शहरात चर्चा होत आहेय..त्यांच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी मिलिंद आंडे यांनी...
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
ABATISH BHOIR
Nov 28, 2025 01:17:20
Kalyan, Maharashtra: एसी लोकलचा बनावट पास बनविणारी पती-पत्नीला रेल्वे पोलिसांनी ठोकल्या बेड्या... दोघेही उच्चशिक्षित.. ANC -आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करून रेल्वे पास बनविण्याचा प्रयत्न एका उच्चशिक्षित दाम्पत्याला चांगलाच महागात पडला आहे. तंत्रज्ञानाचच्या मदतीने बनावट एसी लोकल पास तयार करून प्रवास करणाऱ्या अंबरनाथमधील पती-पत्नीला कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. घटना कल्याण स्थानकातील एसी लोकलमधील तपासणीदरम्यान समोर आली. एका महिला प्रवाशाला तिकीट तपासणीदरम्यान विशाल नवले टीसीने पास दाखविण्यास सांगितले. तिने रेल्वेच्या यूटीएस अॅपमधील स्क्रीन दाखवली; मात्र तो पास संशयास्पद वाटल्याने टीसीने तत्काळ रेल्वे हेल्पलाईनवर कॉल करून त्या पासची पडताळणी केली. तपासात धक्कादायक बाब समोर आली पास ओम शर्मा या व्यक्तीचा असून, तो जानेवारी महिन्यात जारी केलेला आणि फेब्रुवारीमध्येच कालबाह्य झालेला होता.महिलेने स्वतःचे नाव गुडिया शर्मा असल्याचे सांगितल्याने टीसीचा संशय अधिक गडद झाला. डोंबिवली स्थानकात तिला उतरवून आरपीएफ कार्यालयात चौकशी करण्यात आली. तेव्हा खरा खुलासा झाला तिच्या पतीने स्वतःच्या एसी लोकल पासवर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने एडिट करून त्यावर पत्नीचे नाव व तपशील टाकत बनावट पास तयार केल्याचे मान्य केले. दोघांवर रेल्वे पोलीस स्थानकात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास कल्याण रेल्वे लोहमार्ग पोलीस करत आहेत.
112
comment0
Report
MAMILIND ANDE
Nov 28, 2025 01:17:01
198
comment0
Report
MAMILIND ANDE
Nov 27, 2025 14:45:55
Wardha, Maharashtra:वर्धा ब्रेकिंग - हिंगणघाट जळीतकांडातील पीडित कुटुंबाला शासकीय नोकरी दिली - गृहराज्यमंत्री भोयर - महाविकास आघाडी सरकारच आश्वासन महायुतीने पूर्ण केलं - अंकिताच्या भावालागृहविभागात नोकरी देण्याचा शासन निर्णय काढला अँकर - वर्ध्यात 2020 मध्ये बहूचर्चेत असलेल्या हिंगणघाट जळीतकांड अंकिता पिसूूडे कुटुंबातील तिच्या भावाला शासकीय नोकरीं दिली मात्र तेव्हा राज्यात महाविकास आघाडीचे सरकार त्यांनी फक्त आश्वासन दिले ते महायुती सरकारने ते पूर्ण केले..आणि गृहविभागात नोकरी देण्याचा शासन निर्णय काढला आहेय... आणि लवकरच रुजू देखील होणार आहेय..महाविकास आघाडीच सरकार हे पोकळ आश्वासन देणार होत अशी प्रतिक्रिया गृहाराज्य मंत्री पंकज भोयर यांनी दिली आहेय.. त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी मिलिंद आंडे यांनी.. बाईट- 121,पंकज भोयर, गृहराज्यमंत्री
98
comment0
Report
SKSudarshan Khillare
Nov 27, 2025 14:06:30
Yeola, Maharashtra:येवल्या नगरपरिषद निवडणूक 2025 चा प्रचार वेग घेत आहे. मंत्री छगन भुजबळ उपचारासाठी मुंबईत असताना त्यांच्या गैरहजेरीत भुजबळ कुटुंबातील सदस्यांनी येवल्यात तळ ठोकला आहे. संपूर्ण भुजबळ कुटुंबीय पायपीট करून राष्ट्रवादी व भाजप महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत पाहूया आमचा हा विशेष रिपोर्ट… विजवल्स स्टार्ट P2C : प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे नाशिक माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ, विशाखा भुजबळ आणि शेफाली भुजबळ — हे सर्वजण गेल्या काही दिवसांपासून येवल्यात राहून कार्यकर्त्यांशी सुसंवाद साधत आहेत, घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत आणि मतदारांचा कौल मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. या निवडणुकीत येवला राजकारणात उल्लेखनीय बदल दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भारतीय जनता पार्टीने येथे युती केली असून सत्ता मिळवण्यासाठी दोन्ही पक्षांनी संयुक्त प्रचार मोहीम सुरू केली आहे. परंतु राज्यात भाजप आणि शिवसेना सत्ता सांभाळत असताना येवला नगरपरिषदेची निवडणूक मात्र या दोन्ही पक्षांमध्ये विरोधी आघाडीत लढली जात आहे. त्यामुळे स्थानिक राजकारणात नवी समीकरणे आणि नवे तणाव निर्माण झाले आहेत. मंत्री छगन भुजबळ यांच्या गैरहजरीचा विरोधक फायदा उचलण्याच्या तयारीत आहेत बाईट :- 1 माजी खासदार समीर भुजबळ, 2 आमदार पंकज भुजबळ, 3 शेफाली भुजबळ, 4 विशाखा भुजबळ.
102
comment0
Report
MKManoj Kulkarni
Nov 27, 2025 14:04:17
Navi Mumbai, Maharashtra:मंत्रिमंडळाने महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांमध्ये मल्टीट्रॅकिंग प्रकल्पांना मान्यता दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने २६.११.२०२५ रोजी रेल्वे मंत्रालयाच्या दोन प्रकल्पांना मान्यता दिली, ज्यांचा एकूण खर्च अंदाजे ₹२,७८१ कोटी आहे. मंजूर प्रकल्पांमध्ये बदलापूर-कर्जत तिसरा आणि चौथा मार्ग प्रकल्प समाविष्ट आहे. हा मुंबई-चेन्नई हाई डेन्सिटी नेटवर्कचा भाग आहे आणि पश्चिम आणि दक्षिण भारताला जोडणारा एक महत्त्वाचा मार्ग आहे. कल्याण-कर्जत मार्गावर वाहतूक सुलभ करणाऱ्या मुंबई उपनगरीय नेटवर्कसाठी हा एक महत्त्वाचा दुवा देखील आहे. ३२ किलोमीटरच्या या मार्गावर ८ मोठे पूल, १०६ छोटे पूल, १ रोड अंडरब्रिज आणि ६ स्थानके आहेत. या प्रकल्पाचा एकूण खर्च ₹१,३२४ कोटी आहे, जो रेल्वे आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात ५०:५० वाटला जाईल. याचा फायदा मुंबई उपनगरीय नेटवर्कवरील दैनंदिन प्रवाशांना होईल. तसेच मुंबई आणि पुणे दरम्यानच्या प्रवाशांना देखील फायदा होणार आहे. यामुळे अधिक प्रवासी आणि मालवाहतूक गाड्या चालविण्याते येणार आहे. त्यामुळे या प्रदेशात औद्योगिक विस्तारामुळे क्षमतेच्या अडचणी दूर होतील. दरवर्षी ७.२ दशलक्ष टन अतिरिक्त मालवाहतूक निर्माण होण्याची अपेक्षा आहे. तसेच ४.१ दशलक्ष लिटर डिझेलची बचत होईल आणि लॉजिस्टिक्स खर्चात दरवर्षी ४६२ कोटी रुपयांची बचत होईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे दरवर्षी २० दशलक्ष किलोग्रॅम कार्बन डायऑक्साइडची बचत होईल, जे अंदाजे ८००,००० झाडे लावण्यात येणार आहेत. अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्यजनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी दिली आहे.
164
comment0
Report
UPUmesh Parab
Nov 27, 2025 14:03:43
Oros, Maharashtra:सिंधुदुर्ग आमदार दिपक केसरकर की बात: रविंद्र चव्हाण के संबंध में 2 तारीख तक युति स्पष्ट है; दो तारीख तक चुनाव संभव माना जा रहा है। युति बननी चाहिए जैसी राज्य में महायुती सरकार है, वैसे पूरे राज्य में भी होनी चाहिए यह मेरी अपेक्षा है. नितेश राणे के बारे में राजघराण्याशी संबंध बताये गये पर प्रत्यक्ष निर्णय पालकमंत्र्याच्या नेतृत्वाखाली लेने आवश्यक होते; जनहित के लिए तडजोड करनी पड़ती है पर वह नहीं हो पाई. उदय सामंत की टिप्पणी पर मिती-के-लिए पैसे के इस्तेमाल को मैं स्वीकार नहीं करता; मैं उनसे पूर्ण अलिप्त हूँ. मालवण में पैसे वितरण के बारे में कुछ लोग राजकीय करियर खत्म करने की साजिश कर सकते हैं; जनता को सावधान रहने की सलाह दी जाती है; यदि किसी ने गलती से राशि स्वीकार की हो तो भी मत शिवसेना को दें, आमदार दिपक केसरकर जनता से यही अपील करते हैं.
181
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 27, 2025 13:34:29
Solapur, Maharashtra:इतक्या मोठ्या बलाढ्य शक्तीसोबत आमचा गेल्या अडीच वर्षांपासून संघर्ष सुरू आहे - विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान तसेच उपोषणादरम्यान आमच्या व्यथा आम्ही सांगितल्या - दरोडाच्या प्रकरणी प्रत्येक पोलिसांना हाताशी धरल आहे, मुलाच्या शिक्षणाच्या बाबतीत एज्युकेशन डिपार्टमेंटला हाताशी धरला आहे - मतदार यादीतून नाव गायब करताना तहसील प्रशासनाला हाताशी धरला आहे - ऊस बिलाच्या बाबतीत सर्व सहकार खात्यातील मंडळींना हाताशी धरला आहे - कुठेही न्यायाची भूमिका नाही त्यामुळे जनतेसमोर प्रश्न मांडले होते - खूप वेळा धमकी येतात, मुलाच्या कामा वेळेस पाठलाग केला जातो - माझ्या मुलाचा पुण्यमध्ये अपहरण करण्याचा प्रयत्न केला - एकदा गावामध्ये गेल्यानंतर पाच पाचशे लोकांचा जमाव अंगावरती आला - निवडणुकीच्या दरम्यान महाराष्ट्र 15 दिवस झालं पाहतोय यांनी अडचणी कशा निर्माण کےल्या त्यानंतर त्यांनी कोर्टासमोर आम्ही हे केलं नाही म्हणून सबमिशन सादर केलं - प्रशासकीय अधिकारी कागदपत्रांमध्ये घोळ केला, अर्ज बाद केला न्यायालयाने फेटाळला - एका महिलेसाठी त्यांना एवढं करावं लागलं जर पत्ताच कट करण हे त्यांचा हाताच मळ आहे, आधी खून प्रकरण पचवलेले आहेत - पंडित देशमुख यांचा प्रकरण गेले वीस वर्षे झाले गाजत आहे - संतोष देशमुख यांच्यासारखे होईल... वैभवी देशमुख जशी फिरतेय... तिच्या मागे चुलता तरी आहे माझ्या मुलाच्या मागे चुलता नाही - जर काही घातपात झाला तर इतिहास तरी सर्वांनी पाहिला आहे - मी सुरुवात तरी केली आहे जनतेच प्रेम माझ्या पाठीशी आहे - सर्व पुरावे मिटवले गेले आहेत... - या सगळ्यातून वाचले तर 2029 ची कुठलीही लढाई असू दे राजकीय, कायदेशीर, किंवा रणांगणात शेतकरीन आहे मी - कमरेला कोयता बांधला आहे पोराच्या हातात नांगर दिलाय.. कोणत्याही लढाईमध्ये लढणारच आहोत - 2029 अनगर नगरपंचायतीबाबत ताकतीने उभी राहून 17 च्या 17 पॅनल लढवणार... देवाने पाच वर्षांचा अवधी दिला आहे.. भरपूर काही करू शकते...
169
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Nov 27, 2025 13:22:48
Nala Sopara, Maharashtra:नालासोपारा - वसई रेल्वे स्थानक दरम्यान घटना नालासोपारा - वसई दरम्यान लोकलमध्ये लटकून प्रवास करण्याच्या धोक्याची पुन्हा एकदा प्रचिती देणारी गंभीर घटना घडली आहे. आज सकाळी ९:१० वाजता नालासोपाराहून चर्चगेटकडे जाणाऱ्या अप लोकलमध्ये दोन प्रवासी खाली पडल्याची दुर्घटना घडली. या अपघातात प्रतीश बाळाराम भोले, वय ३५, रा. म्हसळा जिल्हा रायगड यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर नानासाहेब बंधने, वय ३२, हे गंभीर जखमी असून त्यांना तात्काळ नालासोपाऱ्यातील रिद्धी-विनायक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाल्यानंतर घटनास्थळी पोहोचून त्यांनी दोघांना ट्रेन मध्ये टाकून रेल्वे स्थानकात आणले, दररोजची वाढती गर्दी, आणि त्यातून वाढणारे धोकादायक लटकून प्रवासाचे प्रकार—या समस्येकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले जात आहे. प्रवासी संघटनांनी सुरक्षित प्रवासासाठी तत्काळ उपाययोजना आणि गाड्यांची संख्या वाढवण्याची मागणी केली आहे.
151
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Nov 27, 2025 13:21:16
Shirur, Maharashtra:सचिन आहेर- शिवसेना नेते शिरूर नगरपरिषदेच्या महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांसह प्रचार रॅलीची सुरुवात आमदार सचिन आहेर यांच्या हस्ते झाली. नगरपरिषदेच्या निवडणुका या स्थानिक प्रश्नांवर आधारित असायला हव्यात, असे आहेर यांचे मत. 'ही निवडणूक जिल्हा परिषदेपेक्षाही स्थानिक जनजीवनाशी निगडित आहे,' असे त्यांनी सांगितले. 'राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री स्वतः नगरपालिकेच्या निवडणुकीत उतरतात, याचा अर्थ स्थानिक नेतृत्वावर त्यांचा विश्वास उरलेला नाही,' असा सवाल उपस्थित. 'गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही म्हणत होतो ५० खोके एकदम ओके — आज BJP च्या आमदारांनीच त्यावर शिक्कामोर्तब केले.' 'मुख्यमंत्र्यांकडे नैतिकता उरली असेल तर आपल्या पक्षाच्या आमदारांच्या आरोपांची चौकशी व्हायला हवी,' अशी मागणी. 'एका बाजूला क्लिप, तर दुसऱ्या बाजूला फाशी — हे महायुतीतील विसंवादाचं लक्षण आहे.' 'महायुतीमध्ये काही आलबेल नाही; नेत्यांना महिन्यातून दोनदा दिल्ली स्वारी करावी लागते,' असा टोला. 'नगरपालिका निवडणुका संपल्यानंतर जिल्हा परिषद आणि महानगरपालिका पातळीवर राजकीय भूकंप होणारच,' असा दावा. '५० खोके प्रकरणी चौकशी करावी, कारण आता आरोप विरोधकांनी नव्हे तर स्वतः BJP आमदारांनी केले आहेत,' अशी मागणी. 'महाविकास आघाडी उत्साहाने मैदानात उतरली असून नागरिकांच्या प्रश्नांवर उपाय देण्यास वचनबद्ध आहे,' असे सचिन आहेर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
161
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Nov 27, 2025 13:15:45
Virar, Maharashtra:राजकीय नेते , सीने कलाकारांची उपस्थिती तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम अँकर - विरार पूर्वेतील शिरगाव येथे आज भक्तीभावाने न्हाऊन निघालेला सोहळा… श्री द्वारकाधीश मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा महोत्सवातील वचनामृत कार्यक्रम मोठ्या श्रद्धाभावाने संपन्न झाला. परमपूज्य जगदगुरू शंकराचार्य स्वामिश्री: अविमुक्तेश्वरानंद: सरस्वती ‘१००८’ यांनी सकाळी ९ ते १०.३० या वेळेत भाविकांना अध्यात्म, भक्ती आणि धर्मपरंपरेवर आधारित प्रेरणादायी मार्गदर्शन केले. या आधी, त्यांच्या शुभहस्ते मंदिराच्या द्वार उद्घाटनाचा सोहळा पार पडला होता. कार्यक्रमस्थळी सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली होती. स्वामिश्रींच्या उपस्थितीने संपूर्ण परिसरात भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले. समस्त ठाकुर परिवार यांच्या वतीने आयोजन करण्यात आलेल्या या महोत्सवात विविध धार्मिक विधी, कीर्तन आणि सत्संगाला भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिरगाव, विवा आर्किटेक्चरल महाविद्यालयाजवळ उभारण्यात आलेल्या मंदिर परिसरात आज दिवसभर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
98
comment0
Report
Advertisement
Back to top