Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Wardha442001

वर्धा के प्राथमिक स्वास्थ्य केंद्र पर बीजेपी नेताओं ने डॉक्टर और स्टाफ की पिटाई

MAMILIND ANDE
Mar 05, 2026 06:16:33
Wardha, Maharashtra
वर्ध्यात भाजप पदाधिकाऱ्यांकडून डॉक्टर आणि आरोग्य सेवाकाला लाथाबुक्क्यानी जोरदार मारहाण वर्ध्याच्या तळेगावं येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथील धक्कादायक घटना - रुग्णाला बरोबर उपचार न केल्याने मारहाण केल्याची माहिती - मध्यरात्री 12 वाजता रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे मोबाईल हिसकावून आणि दार बंद करून मारहाण केल्याची DHO बेले यांची माहिती भाजप तालुकाद्यक्ष,अल्पसंख्यांक पदाधिकारी यांचा समावेश असल्याची माहिती राहुल बुले,अंकीता होले,सचिन होले,नवाज शेख मारहाण करणाऱ्यांची नावे डाँ. संकेत चंद्रशेखर रावेकर असे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे नाव - अश्लिल शब्दात शिवीगाळ करुन हाताबुक्यानी मारहाण केल्याची माहिती - वैद्यकीय अधिकाऱ्याला जिवे मारण्याची दिली धमकी - मारहाण करणाऱ्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
GMGANESH MOHALE
Mar 05, 2026 08:03:51
Washim, Maharashtra:अँकर:वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातील येडशी कुंड येथे बिबट्याने गाईवर हल्ला केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. महादेवराव बारड यांच्या मालकीच्या गाईवर मध्यरात्री हा हल्ला झाला असून या घटनेत गाईचा मृत्यू झाला आहे.मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला.सकाळी गावकऱ्यांना गाईचा मृतदेह आढळून आला.गाईच्या शरीरावरील जखमांवरून बिबट्याने हल्ला केल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.घटना गावाच्या परिसरातच घडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.तसेच शेतकरी वर्गातही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागात बिबट्याचा वावर असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू असून वन विभागाने तातडीने दखल घेऊन तपास करावा,अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Mar 05, 2026 07:52:08
Satara, Maharashtra:सातारा - ई-चलनातील अन्यायकारक दंड आणि मनमानी कारवाईच्या विरोधात महाराष्ट्र राज्य मालवाहतूक संघटनेने आज 5 मार्चपासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला आहे. या संपाला साताऱ्यातही मोठा प्रतिसाद मिळाला. कालिदास पेट्रोल पंप ते पोलीस कवायत मैदान दरम्यान ट्रक, टेम्पो, टॅक्सी आणि खाजगी बस एका ओळीत उभ्या करून वाहतूकदारांनी निषेध नोंदवला. वाहनांवर काळे झेंडे लावून शासनाच्या धोरणाविरोधात आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र ट्रान्सप्शन ॲक्शन कमिटी (M-TAC) च्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या संपामुळे मालवाहतूक ठप्प झाली असून जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शासनाने ई-चलन धोरण रद्द करेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा वाहतूकदारांनी दिला आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 05, 2026 07:51:48
Nagpur, Maharashtra:स्फोटाच्या प्रत्यक्षदर्शी महिलेचा दोन्ही दिवसांनी मृत्यू... दुर्घटनेनंतर खालावली होती प्रकृती... रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच झाले मृत्यू.. नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील राऊळगावमधील एसबीएल एनर्जी लिमिटेड या दारूगोळा व स्फोटके तयार करणाऱ्या कारखान्यात 1 मार्च रोजी झालेल्या भीषण स्फोटात 19 कामगारांचा मृत्यू झाला. हा स्फोट प्रत्यक्ष पाहिलेल्या मात्र त्या वेळेस घटनास्थळापासून काही अंतरावरील प्लांट मध्ये कार्यरत एका महिला कामगाराचा दोन दिवसांनी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संगीता भोयर असे मृत महिलेचे नाव आहे. स्फोटानंतर परिसरात पाहिलेली परिस्थिती बघितल्यानंतर संगीता भोयर यांना जबर मानसिक धक्का बसला होता. घाबरलेल्या अवस्थेत त्या तातडीने घरी परतल्या. 2 मार्च रोजी त्यांच्या प्रकृती अचानक बिघडली. छातीत वेदना जाणवू लागल्या आणि अस्वस्थता वाढत गेली. 3 मार्चला प्रकृती अधिकच खालावल्याने कुटुंबीयांनी त्यांना नागपूर येथील मेडिकल रुग्णालयात नेले पण तिथे वैद्यकीय तपासणीत त्यांच्या मृत्यू आधीच झाल्याचे स्पष्ट झाले.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 05, 2026 07:34:58
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:पुरुषांची येथेच्छ् धुलाई करत गोसावी समाजातील महिलांची अनोखी होळी सांगलीच्या मिरजेत साजरी झाली आहे. धुळवड नंतर तिसऱ्या दिवशी होळीचा सण साजरा करण्याची गोसावी समाजामध्ये परंपरा आहे,दरवर्षी गोसावी समाजातील महिला आणि पुरुष हे दोघेही एकत्रित होळीचा सण साजरे करतात, या वेळी झेंड्याचा खेळ खेळला जातो,ज्यामध्ये महिलांच्या हातातील झेंड्याची काठी काढून घेण्याचा प्रयत्न, पुरुषांकडुन केला जातो,या दरम्यान महिला पुरुषांना बदडुण काढतात.यावेळी पुरुष कोणताही प्रतिकार न करता महिलांच्या हातून मार खातात, कृष्णानगर मध्ये दरवर्षी महिलांच्या हातून मार खाऊन होळी साजरी करण्याचे अनोखी परंपरा गोसावी समाजाकडून जोपासली जाते.
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Mar 05, 2026 07:16:47
Nashik, Maharashtra:आज महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने राज्यभर इ चलन विरोधात आंदोलन करण्यात येत असून नाशिक मध्ये देखील ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे खोटे व कोणत्याही पुराव्या शिवाय टाकलेले इ चलन त्वरित सरकारने मागे घ्यावेत 2017 पासून फक्त सरकार आश्वासन देते मात्र त्यांचे ई चलन द्वारे जे तिजोरी भरण्याचे काम चालू आहे ते चालू आहे असा देखील आरोप ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने करण्यात आला आहे र आमची मागणी मान्य नाही झाली तर आम्ही आमच्या या पेक्ष्या ही मोठ्या स्वरूपाच आंदोलन करण्याचा इशारा दिलाय...याचाच आढावा घेतलाय आमचे नाशिकचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी....
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Mar 05, 2026 07:06:49
0
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 05, 2026 06:49:19
Kolhapur, Maharashtra:महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाकडून आधीच बसेसवर विविध प्रकारचे कर लावले जातात. यात भरीस भर म्हणून ई चलनाद्वारे अन्यायी व जुल्मी अशा प्रकारची दंड आकारणी केली जात असल्याचा आरोप करत या विरोधात कोल्हापूर जिल्हा बस वाहतूक संघटनेच्या वतीने देखील आंदोलन केलं जात आहे. कोल्हापुरातील दाभोळकर कॉर्नर येथून प्रादेशिक परिवहन कार्यालयापर्यंत बससह मोर्चा काढला जाणार आहे. या आंदोलकांच्या नेमक्या मागण्या काय आहेत यावर एक नजर टाकूया.. 1) ई चलनाद्वारे आकारणेत आलेले आतापर्यंतचे सर्व दंड तात्काळ रदद् करणेत यावेत व नव्याने नियमावली तयार करावी. 2) जागोजागी फोटो काढून दंड आकारणे ताबडतोब बंद करावे. 3) 50 % आगाऊ दंड भरणेची सक्ती तात्काळ रदद् करावी. 4 ) दंड वसुलीचा महसुल केंद्रीत दृष्टीकोन तात्कálne थांबवावा. 5) रोड टॅक्स व टोल अशाप्रकारे एकाच रस्त्यासाठी दुहेरी कर आकारणी बंद करणेत यावी. GRF Out Play Byte:- 1) सतीशचंद्र कांबळे, वाहनधारक 2) प्रदीप राठोड , वाहनधारक 3 अशोक शिंदे, वाहनधारक
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 05, 2026 06:47:50
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 05, 2026 06:47:15
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरमधील एमआयएमच्या नगरसेवकांनी हातगाड्या उचलण्याच्या कारवाईला विरोध करून अडथळा निर्माण केला होता. त्यावरून १० नगरसेवक आणि ४ नातेवाइकांवर गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, उपलब्ध पुराव्यावरून या नगरसेवकांविरोधात मनपा अधिनियम १० नुसार सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस करण्यात येणार असून त्याबाबतच्या नोटिस काढण्यात येणार असल्याचे बोलले जात होते. मात्र आता खुद्द मनपा आयुक्तांनी यावर भाष्य करत, कायदेशीर नोटीस पाठवली जाणार असल्याची माहिती स्वतः आयुक्त जी श्रीकांत यांनी दिली आहे. त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या एमआयएमच्या नगरसेवकांच्या अडचणीत मोठी वाढ होणार आहे.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Mar 05, 2026 06:45:48
Kalyan, Maharashtra:टिटवाळ्यात होळीचा राडा! ‘दारू पिऊन येऊ नका’ म्हटल्याचा बदला; सेक्रेटरी कुटुंबाला बेदम मारहाण. घटना सीसीटीव्हीत कैद,टिटवाळा पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल टिटवळ्यातील नेप्च्यून स्वराज सोसायटी येथे ही घटना घडली. काही महिन्यांपूर्वी सोसायटीचे सेक्रेटरी सुरेश उपाध्याय यांनी काही तरुणांना दारू पिऊन सोसायटीत येऊ नका, अशी समज दिली होती. त्यावेळी दोन्ही बाजूंमध्ये वाद झाला होता. या वादानंतर संकेत जाधव याने उपाध्याय यांच्या गाडीची काच फोडल्याची घटना घडली होती. होळीच्या दिवशी जुन्या वादाचा राग काढत संकेत जाधव, सुशांत जाधव आणि राहूल पाटील या तिघांनी उपाध्याय यांचा मुलगा अमन याला बोलावून घेतले आणि त्याच्यावर मारहाण सुरू केली यावेळी उपाध्याय आणि मित्र गुप्ताला देखील मारहाण केली या घटनेत गुप्ता यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्या डोक्याला सहा टाके पडले आहेत. संपूर्ण प्रकार सोसायटीतील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. प्रकरणी महाराष्ट्र पोलीस अंतर्गत टिटवाळा पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल केला असून तिघांचा शोध सुरु आहे.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Mar 05, 2026 06:18:21
Kalyan, Maharashtra:सालाबाद प्रमाणे यंदा देखील कल्याण शहरात शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून तिथीनुसार शिवजयंती साजरी होणार अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रचंड पोलीस बंदोबस्त दरवर्षीप्रमाणे यंदा देखील कल्याण मध्ये तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. शिवजयंतीनिमित्त शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. शिवसेना उबाठा आणि शिवसेना शिंदे गटाला शिवजयंती निमित्त मिरवणुकांची परवानगी देण्यात आली आहे मात्र दोन्ही मिरवणुकांच्या वेळा आणि मार्ग हे वेगवेगळे आहेत . हे दोन्ही गट समोरासमोर येऊ नये यासाठी पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त देखील ठेवला आहे शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर आज डीसीपी अतुल झेंडे यांनी शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या बैठका घेत अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं
0
comment0
Report
Advertisement
Back to top