Back
पंतप्रधान मोदी हाथों अयोध्या राम मंदिर पर भगवा ध्वज फहराने के साथ ठाणे में घंटानाद
SKShubham Koli
Nov 25, 2025 09:51:47
Thane, Maharashtra
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येतील श्रीराम मंदिरावर भगवा ध्वज फडकवताच ठाण्यात घंटानाद सुरू झाला. अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामाच्या पूर्णत्वाचं प्रतीक म्हणून मोदी यांच्या हस्ते आज ११:५५ मिनिटांनी अयोध्येतील श्रीराम मंदिरावर भगवा ध्वज फडकवण्यात आला. मोदींच्या हस्ते अयोध्येतील श्रीराम मंदिरावर भगवा ध्वज फडकवताच ठाण्यातील मंदिरांमध्ये तसेच काही घराघरात घंटानाद झाला. हा घंटानाद ११:५५ ते १२:१० असा २० मिनिटांचा होता. ठाण्यातील घंटाळी परिसरात असलेल्या प्राचीन आणि ऐतिहासिक घंटाळी मंदिरात घंटानाद करण्यात आला. ठाण्यातील श्रीकौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास यांच्यावतीने ठाण्यातील मंदिर, मठ व्यवस्थापकांना तसेच नागरिकांना आवाहन करण्यात आले होते की मोदी यांच्या हस्ते आयोध्येतील श्रीराम मंदिरावर भगवा ध्वज फडकताच घराघरात तसेच मंदिरांमध्ये घंटानाद करावे. या आवाहनाला प्रतिसाद देत ठाण्यातील मंदिर, मठ तसेच काही घराघरांमध्ये घंटानाद होताना दिसून आले. या ठिकाणी प्राचीन घंटाळी मंदिरात हा कार्यक्रम झाला. यावेळी श्रीकौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य, घंटाळी मंदिराचे व्यवस्थापक सदस्य आणि परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
MAMILIND ANDE
FollowNov 25, 2025 11:31:360
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 25, 2025 11:19:3084
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 25, 2025 11:06:52113
Report
ABATISH BHOIR
FollowNov 25, 2025 10:50:23113
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 25, 2025 10:35:15111
Report
KJKunal Jamdade
FollowNov 25, 2025 10:02:3698
Report
ABATISH BHOIR
FollowNov 25, 2025 09:42:52125
Report
SMSATISH MOHITE
FollowNov 25, 2025 09:41:56131
Report
KPKAILAS PURI
FollowNov 25, 2025 09:36:03129
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 25, 2025 09:35:37151
Report
UPUmesh Parab
FollowNov 25, 2025 08:45:3066
Report
UPUmesh Parab
FollowNov 25, 2025 08:45:15160
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 25, 2025 08:20:06154
Report
PNPratap Naik1
FollowNov 25, 2025 08:06:36167
Report