Back
हेदूचापाडा वाडी में पहली बार बिजली का उजाला
UJUmesh Jadhav
Sept 30, 2025 01:15:48
Thane, Maharashtra
शहापुरातील हेदूचापाड्यात प्रथमच विजेच्या दिव्यांचा उजेड...
ग्रामस्थांच्या डोळ्यांत आनंदाश्रू...
श्रमजीवी संघटनेच्या अथक प्रयत्नांना यश...
ॲंकर...
शहापूर तालुक्यातील ग्रामपंचायत पिवळी अंतर्गत असलेला छोटासा हेदूचापाडा वाडी देशाच्या स्वातंत्र्या नंतर काल विजेच्या दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाली. मागील तीन पिढ्यांपासून अंधारात जीवन जगणाऱ्या आदिवासी व वारली बांधवांच्या डोळ्यांत काल आनंदाश्रू दाटले. कारण या वाडीत प्रथमच वीज पुरवठा सुरू झाला आहे. श्रमजीवी संघटनेच्या सातत्यपूर्ण आणि निष्ठावान पाठपुराव्यामुळे हा ऐतिहासिक क्षण साकारला गेला. 29 सप्टेंबर 2024 हा दिवस या वाडीच्या इतिहासात सुवर्णक्षण ठरला. वीस घरे आणि सुमारे शंभर लोकसंख्या असलेल्या या वाडीत आज पहिल्यांदाच वीजेचा दिवा पेटला. लहान मुले आनंदाने उड्या मारत होती तर वयोवृद्धांच्या चेहऱ्यावर समाधानाची स्मितरेषा दिसून येत होती. वर्षानुवर्षे अंधारात जीवन जगल्यानंतर आज त्यांना उजेडात जगण्याचा आनंद लाभला.
2022 पासून श्रमजीवी संघटनेने विद्युत महावितरण विभाग आणि आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. वन विभागाच्या परवानगीसाठी अनेक अडथळे आले, पण संघटनेच्या अथक प्रयत्नांमुळे हे स्वप्न अखेर पूर्णत्वास आले. या यशामध्ये किरण भोईर, संजय गुरुडे आणि संजीवनी गुरुडे या स्थानिक कार्यकर्त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या परिश्रमामुळे आज वस्तीमध्ये वीज पोहोचली. ग्रामस्थांनी श्रमजीवी संघटनेचे, ग्रामपंचायत पिवळीचे सरपंच, ग्रामसेवक, आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय तसेच विद्युत महावितरण विभागाचे मनःपूर्वक आभार मानले. मात्र अजूनही या वाडीत पूर्णपणे वीज पोहोचवण्यासाठी सुमारे वीस पोलांची आवश्यकता आहे. हे पोल उभारल्याशिवाय प्रत्येक घराजवळ वीज पोहोचू शकणार नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी मागणी केली आहे की, लवकरात लवकर या पोलांची पूर्तता करून प्रत्येक घराला स्वतंत्र विद्युत मीटर बसवावा आणि संपूर्ण गावात सुरळीत वीजपुरवठा सुरू करावा. गावातील एका वयोवृद्ध ग्रामस्थाने आनंदाश्रू ढाळत सांगितले, “आम्ही आमचं आयुष्य अंधारात घालवलं, पण आता आमच्या लेकरांना उजेडात शिक्षण घ्यायला आणि भविष्य घडवायला मिळणार आहे. ही आमच्या आयुष्यातील सर्वात मोठी भेट आहे.” गावात वीज आल्यानंतर आता शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि दैनंदिन जीवनात मोठा बदल घडून येईल, अशी आशा ग्रामस्थांनी व्यक्त केली. आजचा दिवस हेदूचापाडा वाडीच्या इतिहासात “अंधारातून प्रकाशाकडे” या प्रवासाचे प्रतीक ठरला आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 30, 2025 04:47:200
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 30, 2025 04:47:060
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 30, 2025 04:46:490
Report
KPKAILAS PURI
FollowSept 30, 2025 04:46:340
Report
KPKAILAS PURI
FollowSept 30, 2025 04:45:380
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 30, 2025 04:45:240
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 30, 2025 04:32:090
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 30, 2025 04:31:390
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 30, 2025 04:17:430
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 30, 2025 04:17:330
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 30, 2025 04:17:200
Report
KJKunal Jamdade
FollowSept 30, 2025 04:16:510
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowSept 30, 2025 04:05:290
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowSept 30, 2025 04:02:240
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowSept 30, 2025 04:02:120
Report