Back
कल्याण-डोंबिवली में शिवसेना गुट के आंतरिक संघर्ष का वीडियो वायरल
ABATISH BHOIR
Jan 26, 2026 16:04:48
Kalyan, Maharashtra
कल्याण-डोंबिवलीत शिवसेनाचा वाद मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल एकमेकांवर गंभीर आरोप..मतदानाचा हक्क बजावून दिलं नाही. कल्याण-डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत संघर्ष उघडपणे समोर आला असून, एका व्यक्तीला मारहाणी करून पाया पडायला लावल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओनंतर शिवसेनेतील अंतर्गत वाद अधिकच चिघळल्याचं दिसून येत आहे. हा मारहाणीचा व्हिडिओ शिवसेनेच्या गटप्रमुखाचा असल्याचा आरोप करत शाखाप्रमुख प्रवीण लहू म्हात्रे यांनी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गटप्रमुख कामगारांना मारहाण करतो, लोकांची आर्थिक फसवणूक करतो तसेच महिलांकडून पैसे उकळल्याचा आरोप करत त्यांनी पोलिसांत धाव घेतली आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपांवर मारहाण करणारा म्हणून उल्लेख करण्यात आलेले गटप्रमुख सुनील जयस्वाल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओशी आपला कोणताही संबंध नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच मतदानाच्या दिवशी शाखाप्रमुख प्रवीण लहू म्हात्रे आणि त्यांच्या साथीदारांनी आपल्याला शाखेत बोलावून घेतलं, मोबाईल हिसकावून घेतला, मारहाण केली आणि मतदानाचा हक्क बजावू दिला नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकाराबाबत बोलताना सुनील जयस्वाल म्हणाले की, “मला जबरदस्तीने बसून ठेवण्यात आलं, मतदान करू दिलं नाही आणि धमकी दिली. त्यामुळे संबंधितांवर ॲट्रॉसिटी आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासाठी मी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे.” हे संपूर्ण प्रकरण कल्याण पूर्व परिसरातील नगरसेवक मल्लेश शेट्टी यांच्या मतदारसंघात घडलं असून, दोन्ही पदाधिकारी एकमेकांवर गंभीर आरोप करत आहेत. दरम्यान, कोळशेवाडी पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या तक्रारी दाखल करून चौकशी सुरू केली असून, पुढील कारवाई तपासानंतर केली जाणार आहे. या घटनेमुळे कल्याण-डोंबिवलीतील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून, पुढे या प्रकरणात कोणावर कारवाई होते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
TTTUSHAR TAPASE
FollowJan 26, 2026 17:16:420
Report
SNSWATI NAIK
FollowJan 26, 2026 16:30:490
Report
UPUmesh Parab
FollowJan 26, 2026 14:04:270
Report
VNVishal Nagesh More
FollowJan 26, 2026 14:04:060
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowJan 26, 2026 14:00:150
Report
SMSarfaraj Musa
FollowJan 26, 2026 13:18:420
Report
ABATISH BHOIR
FollowJan 26, 2026 12:49:020
Report
AKAMAR KANE
FollowJan 26, 2026 12:30:240
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowJan 26, 2026 11:49:580
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowJan 26, 2026 11:49:160
Report
JJJAYESH JAGAD
FollowJan 26, 2026 11:34:160
Report
JMJAVED MULANI
FollowJan 26, 2026 11:32:340
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowJan 26, 2026 11:32:030
Report
SNSWATI NAIK
FollowJan 26, 2026 11:21:130
Report