Back
इंदापुर में अजित पवार के साथ हर्षवर्धन पाटील, भाजपा के खिलाफ नया समीकरण
JMJAVED MULANI
Jan 26, 2026 11:32:34
Baramati, Maharashtra
इंदापुरात हर्षवर्धन पाटील दत्तात्रय भरणे एकत्र आले तर बिघडलं कुठं ? ....*आम्ही वेगवेगळे लढलो की काही लोकांचं फावत : अजित पवार*.....तुम्हाला किंमत येण्यासाठी आम्ही एकमेकांच्या उरावर बसायचं का ? अजितदादांचा विरोधकांना सवाल..... इंदापूरच्या निवडणुकीत दोन राष्ट्रवादी एकत्र..... राष्ट्रवादी विरुद्ध भाजप इंदापुरात सामना.....
इंदापुरचं राजकारण सध्या कोणत्या वळणावर चाललंय याचा कोणाला थांग पत्ता लागत नाही, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी विरोधात भाजप असा सामना होईल असं चित्र असताना अचानक शरद पवारांची राष्ट्रवादी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जाऊन मिळाली ज्यामुळे इंदापुरात दादांचा पारडं जड झालंय. तीन निवडणुकीत दत्ता भरणेंकडून पराभव झाल्यानंतर ही हर्षवर्धन पाटील त्यांच्याच सोबत गेल्याने विरोधकांनी मात्र आग पाकड केलीय. पाहूयात या वरचा हा एक स्पेशल रिपोर्ट.....
पुण्याच्या इंदापूर नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पडत आहेत. नगरपरिषद निवडणुकीत भाजपचे नेते प्रवीण माने तत्कालीन जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर आणि शरद पवार गटाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी कृष्णा भीमा विकास आघाडी केली होती. मात्र नगरपरिषद निवडणुकीत आघाडीचा दारुण पराभव झाला. यानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी आणि भाजप स्वतंत्र लढतील असा कयास बांधला जात होता. अशातच राज्यातील महानगरपालिका निवडणुकीत वापरलेला आघाडीचा फॉर्मुला दोन्ही राष्ट्रवादीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही वापरण्याचा निर्णय घेतला आणि इंदापुरात 1995 पासून अजित पवारांच्या विरोधात असलेले आणि सलग तीन वेळा दत्ता भरणे kडून पराभव झालेले हर्षवर्धन पाटील आता अजित दादांसोबतच गेले.
बाईट _ प्रवीण माने, भाजपा नेते
हर्षवर्धन पाटील आणि आमचं काही बांधाच भांडण नव्हतं. आमचे राजकीय मतभेद होते दोन्ही नेत्यांनी ठरवले एकत्र यायचं आणि त्याच्यामुळे आम्ही एकत्र निवडणूक लढतो आहोत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून येतील असा विश्वास दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केलेय.
बाईट_ दत्तात्रय भरणे, कृषिमंत्री
दोन्ही पवारांनी राज्यातील महानगरपालिकांची निवडणूक एकत्र लढली मात्र दोन्ही पवारांना मतदारांनी सपशेल नाकारलं. यानंतरही पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका शक्य तिथे एकत्र येऊन लढण्यावर शिक्कामोर्तब झालं आणि त्याची अंमलबजावणी इंदापुरातून झाली. मात्र राष्ट्रवादीच्या याच एकत्र येण्यावर विरोधकांकडून आरोप प्रत्यारोप सुरू झाले. या आरोप प्रत्यारोपांना आता अजित पवारांनीही आपल्या खास शैलीत उत्तर दिलेय.
इंदापुरात जर हर्षवर्धन पाटील दत्तात्रय भरणे एकत्र आले आप्पासाहेब जगदाळे यांनी इतर लोकांनी साथ दिली तर बिघडलं कुठं असं म्हणत आम्ही वेगवेगळे लढलो की काही लोकांचं फावत त्यांना वाटतं आपल्याला कशी किंमत येणार मग तुम्हाला किंमत येण्यासाठी आम्ही एकमेकांच्या उरावर बसायचं का ? असं अजित पवारांनी म्हडलंय....
बाईट _ अजित पवार उपमुख्यमंत्री
P2C REPORTER
जावेद मुलाणी
झी 24 तास
इंदापूर
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowJan 26, 2026 13:18:420
Report
ABATISH BHOIR
FollowJan 26, 2026 12:49:020
Report
AKAMAR KANE
FollowJan 26, 2026 12:30:240
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowJan 26, 2026 11:49:580
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowJan 26, 2026 11:49:160
Report
JJJAYESH JAGAD
FollowJan 26, 2026 11:34:160
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowJan 26, 2026 11:32:030
Report
SNSWATI NAIK
FollowJan 26, 2026 11:21:130
Report
AAASHISH AMBADE
FollowJan 26, 2026 10:48:590
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowJan 26, 2026 10:32:380
Report
VKVISHAL KAROLE
FollowJan 26, 2026 10:30:370
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowJan 26, 2026 10:01:290
Report
JMJAVED MULANI
FollowJan 26, 2026 10:01:090
Report
JMJAVED MULANI
FollowJan 26, 2026 09:52:280
Report