Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Latur413531

लातूर जिल्हा परिषद़ चुनाव: कांग्रेस बनाम भाजपा के बीच सत्ता संघर्ष, ग्रामीण मुद्दे मुख्य

VBVAIBHAV BALKUNDE
Jan 26, 2026 11:32:03
Latur, Maharashtra
AC ::- लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून ही निवडणूक ‘मिनी विधानसभा’ म्हणून ओळखली जाते. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती वर सत्तेवर वर्चस्व मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष मैदानात उतरले आहेत.ग्रामीण भागातील सत्ता कोणाच्या हाती जाणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे. काँग्रेस, भाजप आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी हे पक्ष ताकदीने मैदानात उतरले असलेतरी दोन्ही पक्षांसमोर मोठं आव्हाने असणार आहेत. जिल्हा परिषदेवर यंदा कोणाचा झेंडा फडकणार, याकडे संपूर्ण लातूर जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे. लातूर महानगरपालिका निवडणुकीतील यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस संघटितपणे प्रचार करताना दिसत आहे. सहकार क्षेत्रातील प्रभाव आणि ग्रामीण भागातील पारंपरिक मतदारांवर असलेली पकड काँग्रेससाठी जमेची बाजू मानली जात आहे. भाजपाकडे केंद्र आणि राज्यातील सत्ता असल्याने विकासकामे, सरकारी योजना आणि संघटनात्मक ताकद हे मोठे मुद्दे आहेत. शेतकरी सन्मान निधी, लाडकी बहीण योजना, पायाभूत सुविधा आणि रस्ते विकास या मुद्द्यांवर भाजप मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. तर भाजप आणि काँग्रेसमध्ये काहीजणांचं तिकीट कापल्याने कार्यकर्त्यात नाराजीचा सूर आहे त्यामुळे दोन्ही पक्षांना काही ठिकाणी अंतर्गत समन्वयाचं आव्हान असलं तरी पक्षनेतृत्व ते दूर करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं सांगण्यात येत आहे. लातूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची राजकीय रणधुमाळी वेगवान झाली असली तरी सध्या जिल्हा परिषद निवडणुकीत स्थानिक प्रश्न केंद्रस्थानी आले आहेत. ग्रामीण भागातील पाणीटंचाई, रस्त्यांची अवस्था, आरोग्य सुविधा, शाळा दुरुस्ती आणि रोजगार हे प्रमुख मुद्दे ठरत आहेत. मागील काळात काही ठिकाणी रस्ते, पाणीपुरवठा योजना आणि आरोग्य सुविधांची कामे झाली असली, तरी अनेक भागात अद्याप मूलभूत समस्यांवर नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. हाच मुद्दा विरोधकांकडून प्रचाराचा मुख्य आधार बनवला जात आहे. एकंदर पाहता, लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक ही काँग्रेस आणि भाजप यांच्यातील प्रतिष्ठेची लढत ठरणार आहे. दोन्ही पक्ष ताकदीच्या आणि आव्हानांच्या मुद्द्यांवर मैदानात उतरले असून अंतिम निर्णय ग्रामीण भागातील मतदारच घेणार आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सत्तेवर ताबा मिळवण्यासाठीची ही लढत अत्यंत चुरशीची ठरणार आहे...
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SMSarfaraj Musa
Jan 26, 2026 13:18:42
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - जिल्हा परिषद निवडणूकीतील अर्ज माघार घ्या,पैसे वाया घालवू नका - मंत्री चंद्रकांत पाटलांचा विरोधकांना खोचक सल्ला.. अँकर - राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या योजनामूळे सगळेच खुश आहेत,याचे परिणाम महानगरपालिका निवडणुकांमध्ये पाहायला मिळाले, त्यामुळे आता जिल्हा परिषद निवडणूकांमध्ये विरोधकांनी आपले अर्ज माघार घेऊन पैसे वाचवावेत,असा खोचक सल्ला भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटलांनी विरोधकांना दिला आहे,ते सांगलीमध्ये भाजपाच्या उमेदवारांच्या प्रचारसभेते बोलत होते.हरिपूर येथे समडोळी जिल्हा परिषद गटातील भाजपा उमेदवारांच्या प्रचार शुभारंभ पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या सह आमदारांच्या उपस्थितीत पार पडला.या सभेच्या निमित्ताने पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या योजनांमुळे शेतकरी,लाडकी बहीण आणि सर्वच घटक खुश आहेत,त्याचा परिणाम महानगरपालिका निवडणुकांमध्ये दिसलाेला आहे,आता जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये देखील तो दिसेल, त्यामुळे विरोधकांनी आपले पैसे वाया घालवू नये,अर्ज माघारी घ्यावेत,असा खोचक सल्ला मंत्री चंद्रकांत पाटलांनी यावेळी दिला. साऊंड बाईट - चंद्रकांत पाटील,पालकमंत्री, सांगली。
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Jan 26, 2026 12:49:02
Kalyan, Maharashtra:कल्याण एक्साईज विभागाच्या भरारी पथकाची मोठी कारवाई डुप्लिकेट दारू ब्रँडेड बाटल्यांमध्ये भरून विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ,दोघांना अटक मांडा टिटवाळा परिसरात सुरू होता कारखाना कारखान्यावर छापा बनावट मध्ये साठासह बारा लाखाचा मुद्देमाल जप्त (एखाद्या ठिकाणी) टिटवाळा मांडा परिसरात मुंबई बडोदा प्रस्तावित हायवेवर बनावट मद्याचा साठा घेऊन एक गाडी येणार असल्याची माहिती मिळाली होती या माहितीनुसार भरारी पथकाचे दीपक परब यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह सापळा रचला . एक संशयित गाडी येताच या पथकाला संशय आला त्यांनी ही गाडी थांबून चौकशी केली असता गाडीमध्ये विदेशी मदय साठा आढळून आला . एक्साईज विभागाच्या भरारी पथकाने तत्काळ चालक रोहन केने याला ताब्यात घेत चौकशी केली असता बनावट दारू टिटवाळा मांडा परिसरात बनवत असल्याचे सांगितले. त्यानुसार एक्साईजच्या पथकाने मांडा टिटवाळा परिसरातील जयेश केने यांच्या घरात छापा टाकला असता त्याच्या घरात बनावट बुच, प्लास्टिक जार बनावट विदेशी मध्य विविध ब्रँडच्या रिकाम्या काचेच्या बाटल्या असं साहित्य आढळून आलं . एक्साईजच्या पथकाने तत्काळ हे सगळं साहित्य जप्त केले .या दोघांनाही अटक केली असून हे दोघं कधीपासून हा धंदा करतात, ते कुणाला ही दारू विकतात याचा तपास एक्साईज विभागाचे पथक करत आहे. दरम्यान ही बनावट दारू शहरातील ढाब्यांवर जात असल्याचा दाट संशय एक्सेस विभागाला असून एक्साईज विभाग त्या दृष्टीने पुढील तपास करत आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Jan 26, 2026 12:30:24
Nagpur, Maharashtra:नागपूर संरक्षण क्षेत्रातील अग्रणी उद्योजक सत्यनारायण नुवाल यांना यंदाचा पद्मभूषण जाहीर झालाय. सोलार समूहाचे अध्यक्ष असलेले सत्यनारायण नुवाल यांनी शाईनिर्मिती व्यवसायापासून सुरुवात केली; पण आज त्यांनी संरक्षणक्षेत्रात शस्त्रास्त्र निर्मितीमध्ये जागतिक स्तरावर मान्यता मिळवली. नागपुरात आल्यावर सुरुवातीचे दिवस त्यांनी रेल्वे स्टेशनवर काढले. पद्म पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांनी हा पुरस्कार सोलार कुटुंबाला समर्पित केलाय आणि केंद्र सरकारचे आभार मानले. 2022 मध्ये त्यांचा फोर्सद्वारे अब्जाधीशांच्या यादीत समावेश झाला होता. ऑपरेशन सिंदूरमधील नागास्त्र असो वा पिनाकामिसाईल सोलार समूहाद्वारे निर्मित करण्यात आले आहे. लवकरच जगातील पहिली काउंटर ड्रोन सिस्टीम भार्गवस्त्र सज्ज करण्यात येत असल्याचा दावा नुवाल यांनी ZEETV शी बोलताना व्यक्त केला. सत्यनारायण नुवाल यांच्या संपर्कात आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी चर्चा केली.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Jan 26, 2026 11:49:58
Dhule, Maharashtra:राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी नंदूरबार जिल्ह्यातील शिवसैनिकांची आढावा बैठक घेतली. या आढावा बैठकीत शिंदे गटाच्या आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी भाजपाच्या खासदार डॉ. हिना गावित यांच्या पराभव केला असल्याचं विधान केलं असल्यामुळे भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. जिल्ह्यात डॉ. गावित परिवाराकडून तीन खिडकी योजना होती. कुठलंही काम करण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष माजी खासदार आणि डॉ. गावित यांना भेटल्याशिवाय कुठलाही काम होत नाही होतं, जिल्ह्यात आमचं फक्त गावित परिवाराशीच भांडण आहे मात्र जिल्ह्यात सर्वाधिक स्थानिक स्वराज्य संस्थेवर शिवसेनाच्या वर्चस्व राहिला आहे.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Jan 26, 2026 11:49:16
Dhule, Maharashtra:माजी आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी यांनी माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिला जाणार पद्मभूषण याचा निषेध केला पाहीजेल, असं वक्तव्य केले आहे. कोश्यारी हे RSS च्या कार्यकर्ते आहेत. म्हणून पद्मभूषण पुरस्कार दिला आहे. भाजपचा सरकार हे देशाला घातक आहे. कोश्यारीला पद्माभूषण देण्याची गरज नाही होती, ऍड पाडवी यांनी सांगत, भाजप आणि कोषारी दोघांवर टीका केली आहे. सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल ज्यांनी विधान केला आहे. त्यांचा निषेध केला पाहीजेल, कोश्यारी हे राज्यघटनेला मनात नाही. कोश्यारी यांनी आमचा सत्ता घालवली, कोर्टने निकाल देखील चुकीचा दिला. असं सांगत पाडवी यांनी भाजपचा अजेडा असा आहे की मनुस्मृतीला म्हणणाऱ्यांना पुरस्कार देतात, असं गंभीर आरोप पाडवी यांनी केला आहे.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Jan 26, 2026 11:34:16
Akola, Maharashtra:Anchor :अकोला महानगरपालिकेत महापौर आणि उपमहापौर पदासाठीची निवडणूक चांगलीच रंगतदार झाली आहे. भाजपप्रणीत आघाडी आणि भाजपविरोधी पक्षांनी एकत्र बांधलेली एकजूट यांच्यात चुरस वाढताना दिसत आहे. भाजपतर्फे महापौर पदासाठी दोन, तर उपमहापौर पदासाठी एका उमेदवाराने आपला नामांकन अर्ज दाखल केले आहे. त्यांच्या विरोधात उबाठातर्फे महापौर पदासाठी, तर काँग्रेसतर्फे उपमहापौर पदासाठी एका उमेदवाराने नामांकन अर्ज भरला आहे. दरम्यान, उपमहापौर पदाच्या निवडणुकीत आता एक नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. अपक्ष उमेदवार आशिष पवित्रकार यांनी देखील उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.विशेष म्हणजे, त्यांच्या उमेदवारी अर्जाचे सूचक आणि अनुमोदक हे उबाठाचे नगरसेवक आहेत.आता या घडामोडींमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.अपक्ष उमेदवार उबाठासोबत गेला तर काँग्रेस आपला नामांकन अर्ज मागे घेणार का ? की अपक्ष उमेदवारच माघार घेणार ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Jan 26, 2026 11:32:34
Baramati, Maharashtra:इंदापुरात हर्षवर्धन पाटील दत्तात्रय भरणे एकत्र आले तर बिघडलं कुठं ? ....*आम्ही वेगवेगळे लढलो की काही लोकांचं फावत : अजित पवार*.....तुम्हाला किंमत येण्यासाठी आम्ही एकमेकांच्या उरावर बसायचं का ? अजितदादांचा विरोधकांना सवाल..... इंदापूरच्या निवडणुकीत दोन राष्ट्रवादी एकत्र..... राष्ट्रवादी विरुद्ध भाजप इंदापुरात सामना..... इंदापुरचं राजकारण सध्या कोणत्या वळणावर चाललंय याचा कोणाला थांग पत्ता लागत नाही, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी विरोधात भाजप असा सामना होईल असं चित्र असताना अचानक शरद पवारांची राष्ट्रवादी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जाऊन मिळाली ज्यामुळे इंदापुरात दादांचा पारडं जड झालंय. तीन निवडणुकीत दत्ता भरणेंकडून पराभव झाल्यानंतर ही हर्षवर्धन पाटील त्यांच्याच सोबत गेल्याने विरोधकांनी मात्र आग पाकड केलीय. पाहूयात या वरचा हा एक स्पेशल रिपोर्ट..... पुण्याच्या इंदापूर नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पडत आहेत. नगरपरिषद निवडणुकीत भाजपचे नेते प्रवीण माने तत्कालीन जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर आणि शरद पवार गटाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी कृष्णा भीमा विकास आघाडी केली होती. मात्र नगरपरिषद निवडणुकीत आघाडीचा दारुण पराभव झाला. यानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी आणि भाजप स्वतंत्र लढतील असा कयास बांधला जात होता. अशातच राज्यातील महानगरपालिका निवडणुकीत वापरलेला आघाडीचा फॉर्मुला दोन्ही राष्ट्रवादीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही वापरण्याचा निर्णय घेतला आणि इंदापुरात 1995 पासून अजित पवारांच्या विरोधात असलेले आणि सलग तीन वेळा दत्ता भरणे kडून पराभव झालेले हर्षवर्धन पाटील आता अजित दादांसोबतच गेले. बाईट _ प्रवीण माने, भाजपा नेते हर्षवर्धन पाटील आणि आमचं काही बांधाच भांडण नव्हतं. आमचे राजकीय मतभेद होते दोन्ही नेत्यांनी ठरवले एकत्र यायचं आणि त्याच्यामुळे आम्ही एकत्र निवडणूक लढतो आहोत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून येतील असा विश्वास दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केलेय. बाईट_ दत्तात्रय भरणे, कृषिमंत्री दोन्ही पवारांनी राज्यातील महानगरपालिकांची निवडणूक एकत्र लढली मात्र दोन्ही पवारांना मतदारांनी सपशेल नाकारलं. यानंतरही पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका शक्य तिथे एकत्र येऊन लढण्यावर शिक्कामोर्तब झालं आणि त्याची अंमलबजावणी इंदापुरातून झाली. मात्र राष्ट्रवादीच्या याच एकत्र येण्यावर विरोधकांकडून आरोप प्रत्यारोप सुरू झाले. या आरोप प्रत्यारोपांना आता अजित पवारांनीही आपल्या खास शैलीत उत्तर दिलेय. इंदापुरात जर हर्षवर्धन पाटील दत्तात्रय भरणे एकत्र आले आप्पासाहेब जगदाळे यांनी इतर लोकांनी साथ दिली तर बिघडलं कुठं असं म्हणत आम्ही वेगवेगळे लढलो की काही लोकांचं फावत त्यांना वाटतं आपल्याला कशी किंमत येणार मग तुम्हाला किंमत येण्यासाठी आम्ही एकमेकांच्या उरावर बसायचं का ? असं अजित पवारांनी म्हडलंय.... बाईट _ अजित पवार उपमुख्यमंत्री P2C REPORTER जावेद मुलाणी झी 24 तास इंदापूर
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Jan 26, 2026 10:48:59
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपुरात प्रजासत्ताक दिनी चार वर्षांच्या अधीरचा अनोखा उपक्रम, इनलाईन स्केटिंग करत अवघ्या 7 मिनिटांत पूर्ण केला ऐतिहासिक प्रवास, नागरिकांनी मार्गभर केला वंदे मातरम चा जयघोष प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने चार वर्षांच्या अधीर सुबोध जुन्नावार या चिमुकल्याने आपल्या देशभक्तीपूर्ण कृतीने चंद्रपूर शहराचे लक्ष वेधून घेतले. शहरातील गांधी चौक ते जटपुरा गेट या 2 किमी मार्गावर हातात तिरंगा घेत इनलाईन स्केटिंग करत अवघ्या 7 मिनिटांत त्याने हे अंतर पूर्ण करत नागरिकांमध्ये देशप्रेमाची भावना जागृत केली. त्याने अगदी कमी वयात दाखवलेला आत्मविश्वास, शिस्त आणि शारीरिक तंदुरुस्ती सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या नागरिकांनी अधीरच्या या अनोख्या देशभक्तीपर पराक्रमाचे टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. “वंदे मातरम्” आणि “भारत माता की जय”च्या घोषणांमध्ये हा क्षण अविस्मरणीय ठरला。
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Jan 26, 2026 10:32:38
Shirur, Maharashtra:गेली अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एक निष्ठेने प्रामाणिकपणे काम केलं सर्वसामान्य शेतकऱ्यांंसाठी स्व:खर्चाने पाणी योजना सुरू केली मात्र राष्ट्रवादीने डावलं पण भाजपने साथ दिली,राष्ट्रवादी कॉग्रेस कडून वर्षांनुवर्ष एकाच घरातील व्यक्तीला त्याच्या नातेवाईकांना उमेदवारी देण्यात आली सर्वसामान्य कार्यकर्त्यांवरती कायम अन्याय झाला असं म्हणत पाबळ जिल्हा परिषद गटाचे भाजपचे उमेदवार विकास नाना गायकवाड आणि पंचायत समिती गणाचे उमेदवार दिपक खैरे यांनी राष्ट्रवादी कॉग्रेस वरती निशाणा साधलाय, त्यामुळे पाबळ केंदूर जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळतोय.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Jan 26, 2026 10:30:37
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Jan 26, 2026 10:01:29
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Jan 26, 2026 10:01:09
Baramati, Maharashtra:लाखेवाडी गटात राष्ट्रवादीच्या प्रचाराचा शुभारंभ... लाखेवाडी गटात राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा मोठी फाईट... राष्ट्रवादीकडून झेडपीसाठी श्रीमंत ढोले आखाड्यात.... ढोलेंच्या पाठीशी दत्ता भरणे हर्षवर्धन पाटील आणि आप्पासाहेब जगदाळेंची ताकद.... राष्ट्रवादीच्या आव्हानाला भाजप फाईट देणार ka ? पुण्याच्या इंदापूर मध्ये लाखेवाडी जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीच्या प्रचाराचा शुभारंभ झालाय. लाखेवाडी जिल्हा परिषदेसाठी राष्ट्रवादी कडून श्रीमंत ढोले तर पंचायत समितीसाठी बापूराव शिंदे आणि विमल काळे यांना आखाड्यात उतरवण्यात आले आहे. या जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे. इंदापुरात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याने श्रीमंत ढोले यांच्या पाठीशी अजित पवार दत्तात्रय भरणे हर्षवर्धन पाटील आणि आप्पासाहेब जगदाळे यांची ताकद असणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या आव्हानाला आला भाजपा तगडी फाईट देणार का हे पहावं लागणार आहे.
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Jan 26, 2026 09:52:28
Baramati, Maharashtra:आप्पासाहेब जगदाळे यांचा विरोधकांवर हल्लाबोल. दादा मामा भाऊ झिरो होणाऱ्यातील नाहीत. या माणसांनी तालुक्यासाठी रक्त ओकलेय : जगदाळे. पुण्याच्या इंदापूर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पार्टी असा थेट सामना पाहायला मिळत असून जिल्हा परिषद गटांमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. नगरपरिषद निवडणुकीमध्ये म्हणत होते झिरो करू पण उपमुख्यमंत्री अजित पवार कृषिमंत्री दत्ता भरणे सुप्रिया सुळे हर्षवर्धन पाटील यांसारखी माणसे झिरो होणाऱ्यातील नाहीत, या माणसांनी या तालुक्यासाठी रक्त ओकले आहे. असा म्हणत जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय. आप्पासाहेब जगदाळे यांच्या उपस्थितीत इंदापूरच्या महादेवनगर मध्ये कल्पना पाटील आणि यशराज जगदाळेंच्या प्रचारार्थ जाहीर सभा पार पडली या सभेत जगदाळे बोलत होते.....
0
comment0
Report
Advertisement
Back to top