Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane400601

ठाणे में दोनों राष्ट्रवादी एक साथ आ सकते हैं: गठबंधन पर उठे सवाल

SKShubham Koli
Dec 25, 2025 11:06:08
Thane, Maharashtra
Anchor ठाणे शहरात जर राष्ट्रवादी वाढवायची असेल तर त्यांनी आता विचार करावा, शेवटी आपल्या कार्यकर्त्यांना निवडून आणायचं आहे असं वक्तव्य नजीब मुल्ला यांनी केलं. एकीकडे पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार हे जवळपास निश्चित झालं असताना ठाण्यातही तशीच हालचाल सुरू झाल्याचं चित्र आहे. जितेंद्र आव्हाड हे आमचे दुश्मन नाहीत, आम्हाला जर कुणाचा प्रस्ताव आला तर आम्ही तो पक्षश्रेष्ठींकडे पाठवून आणि त्यावर विचार करू असं मोठं वक्तव्य दादांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला (Najeeb Mulla) यांनी केलं. अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड हे कट्टर विरोधक मानले जातात. मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातून नजीब मुल्ला यांनी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात महायुतीतून निवडणूक लढवली होती. आता त्या ठाण्यात दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्यासाठी हालचाली सुरू आहेत. ठाण्यात देखील दोन्ही राष्ट्रवादी एकत्र? जितेंद्र आव्हाड आमचे दुश्मन नाहीत. 30 तारखेपर्यंत जर आम्हाला कोणाचा प्रस्ताव आला तर आम्ही तो पक्षश्रेष्ठींकडे पाठवणार आणि विचार करणार. शेवटी कार्यकर्त्यांना निवडून आणायचे आहे असे राष्ट्रवादी ठाणे जिल्हा अध्यक्ष नजीब मुल्ला म्हणाले. ठाणे शहरात जर पक्ष वाढवायचा असेल तर त्यांनी आता विचार करावा, असं सूचक वक्तव्य नजीब मुल्ला यांनी केलं. त्यामुळे ठाण्यातील शरद पवार गट देखील आता एक पाऊल पुढे टाकून अजित पवार गटासोबत युतीचा विचार करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SNSWATI NAIK
Dec 25, 2025 12:07:14
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईत शिवसेना आणि भाजप युती शक्यता ही धूसर असून,दोन्ही पक्षांनी स्थानिक पातळीवर 111 जागा लढवण्याची तयारी सुरू केली आहे , यात शिंदे गटाचा बैठकांचा धडाका सुरू आहे , शिवसेना उपनेते विजय चौगुले आणि संपर्क प्रमुख अंकुश कदम यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेण्यात येत आहे,मनपा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर प्रत्येक विभागातील इच्छुकांसह बैठक घेण्यात येत असून, प्रत्येक प्रभागातून 10 ते 20 इच्छुक असल्याने. आम्ही सर्व 111 जागांवर तयारी करत आहोत, युतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल.युती झाली तर युती अन्यथा एकला चलो रे ची आमची तयारी असल्याची माहिती शिवसेना पदाधिकारी यांनी दिली।
0
comment0
Report
SKShubham Koli
Dec 25, 2025 12:06:18
Thane, Maharashtra:Thane flash *शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे byte pointer* *ऑन ठाणे शिवसेना मनसे एकत्र* कालच महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात होतं हे खऱ्या अर्थाने कालचा दिवस हा महत्त्वाचा दिवस होता. आज आम्ही शिवसेना आणि मनसे पदाधिकाऱ्यांसोबत आमचे ठाण्याचे दैवत धर्मवीर आनंद दिघे साहेब तसेच महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही एकत्र आलो होतो. मी निवडणूक महाराष्ट्रातला महानगरपालिकेत होत आहे. २३ जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांचा १०० जन्म जयंती आहे. शतक महोत्सव संपूर्ण महाराष्ट्र मध्ये साजरा होत आहे. जे बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं. 80 टक्के समाजकारण 20% राजकारण त्याला अनुसरून दोन्ही पक्ष पुढे चालले आहेत. आमचे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील मनसे अध्यक्ष राज ठाकरे असतील. दोन्ही बंधू एकत्र आल्याने महाराष्ट्र मध्ये चैतन्य वातावरण झालेला आहे. आमच्या दैवत आनंद दिघे साहेब यांच्या देखील 27 तारखेला जन्मदिवसाच्या आहेत. मुंबई महानगरपालिका असेल ठाणे महानगरपालिका असेल त्यांचं जे काही स्वप्न आहेत. ते स्वप्न साकार करण्यासाठी मी ठाणेकर जनतेला आवाहन करेल. त्यासोबत महाराष्ट्राच्या जनतेला आव्हान करीन. या शतक महोत्सव साजरा होतोय. त्यानिमित्ताने मुंबई महानगरपालिका ठाणे महानगरपालिका सह इतर जे महानगरपालिका आहेत. जनतेने भरगोस मताने. त्या ठिकाणी असलेल्या जे कोणी लोकप्रतिनिधी आहे. त्यांना निवडून द्यायचं आहे. हा शतक महोत्सव आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा करणार आहोत. महाराष्ट्राचे दोन पुरुष यांनी या संबंध जी वाटचाल केली त्या वरती त्यांच्या आदर्श घेऊन आम्ही पुढे जात आहोत. *ऑन इंजिन आणि मशाल अशा प्रकारे पुढे वाटचाल असेल* मशाल आणि इंजिन सोबत असल्याने ते लोक कामाला लागले आहेत. महाराष्ट्र जनता दोन्ही ठाकरे बंधूंच्या मागे राहील. *ऑन संजय राऊत* दिघे साहेब व त्यांचे एकटाचे आहेत का ? ते कुठले विचार घेऊन चालले. दिघे साहेब शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेनेच्या चार अक्षरावर होते. दिघे साहेबांनी कार्यकर्ते घडवले. दिघे साहेब कोणी एकाचे नव्हते त्यांनी कोणाच्या पाठीत खंजीर खुपसला नव्हता.या लोकांनी केला आहे. दिघे साहेब कार्यकर्त्यांबरोबर होते या लोकांनी कार्यकर्ते फोडण्याचे काम केलं आहे. पण जनता सुदने आहे. महाराष्ट्र मध्ये ड्रग्सचा वापर वापर जोराने सुरू आहेत. ड्रग्स केंद्रबिंदू हे ठाण्यामध्ये आहे. सगळे व्यसनाधीन असेल. भ्रष्टाचार करून ठाणे महानगरपालिका लुटली आहे. मी ठाणेकरांना आवाहन करीन. यावेळी बाळासाहेब ठाकरे असताना तुम्ही ठाण्यामध्ये एक हाती सत्ता दिली. त्याच पद्धतीने ठाणेची जनता आणि मुंबईची जनता सत्ता देईल. *ऑन जागावाटप फॉर्मुला* आमच्या सगळ्या वाटाघाटी झालेले आहेत. आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन चाललेलो आहोत. महाविकास आघाडी असेल मनसे आमच्या सोबत आहे. जे आमच्या सोबत येतील त्यांन आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Dec 25, 2025 12:05:31
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपूर मनपाच्या भाजप निवडणूक रचनेत नाट्यमय घडामोडी, आ. किशोर जोरगेवार पुन्हा एकदा निवडणूक प्रमुख, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी काढले स्पष्ट पत्र, संपूर्ण निवडणूक दिग्गज भाजप नेते आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात व्हावी असा आहे उल्लेख अँकर:--चंद्रपूर मनपाच्या भाजप निवडणूक रचनेत पुन्हा एक नाट्यमय घडामोड पुढे आली आहे. स्थानिक भाजप आमदार किशोर जोरगेवार यांची पुन्हा एकदा निवडणूक प्रमुख नियुक्ती करण्यात आली आहे. नागपुरात चंद्रपूर मनपातील तिकीतवाटपासंदर्भात चंद्रपूरच्या भाजप नेत्यांची बैठक पुढ्यात असताना प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी हे स्पष्ट पत्र काढले आहे.  चैनसुख संचेती यांची चंद्रपूर जिल्ह्याचे निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. चैनसुख संचेती हे भाजपचे बुलढाणा जिल्ह्यातील ज्येष्ठ आमदार आहेत, तर माजी खासदार अशोक नेते यांना जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी म्हणून कायम ठेवण्यात आले आहे. मात्र विशेष म्हणजे  संपूर्ण निवडणूक दिग्गज भाजप नेते आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात व्हावी असा पत्रात उल्लेख आहे. आ. जोरगेवार यांना याविषयी बोलते केले असता माझी नियुक्ती कायम होती. माध्यमांनीच चुकीच्या बातम्या पेरल्या अशी प्रतिक्रिया. बाईट १) किशोर जोरगेवार, आमदार, चंद्रपूर विधानसभा आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 25, 2025 11:21:42
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या राजकारणात नव्या पिढीचा प्रवेश ठळकपणे दिसू लागला आहे. आमदार आणि खासदारांच्या पुत्रांनी थेट मैदानात उतरत प्रचाराला सुरुवात केली आहे. पाहूया कोण कोणत्या आमदाराने खासदारांचे पुत्र कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकांच्या रिंगणात आहेत ते. 1) आमदार राजेश क्षीरसागर यांचे पुत्र ऋतुराज क्षीरसागर यांनी महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रचाराला सुरुवात केली आहे. प्रभागांमध्ये भेटीगाठी, कार्यकर्त्यांच्या बैठका आणि स्थानिक प्रश्नांवर थेट संवाद साधत ऋतुराज क्षीरसागर यांनी आपली उपस्थिती दाखवायला सुरुवात केली आहे. युवकांशी थेट संपर्क साधण्यावर त्यांचा भर असल्याचं दिसून येत आहे. 2) तर दुसरीकडे, माजी आमदार जयश्री जाधव यांचे पुत्र सत्यजित जाधव यांनीही प्रचारात सक्रिय सहभाग घेतला आहे. प्रभागनिहाय संघटन बांधणी, मतदारांशी संवाद आणि स्थानिक पातळीवर कामाचा आढावा घेत सत्यजित जाधव यांनी निवडणुकीच्या तयारीला गती दिली आहे. 3) या दोघांनंतर , खासदार धनंजय महाडिक यांचे पुत्र कृष्णराज महाडिक यांच्या नावाचीही कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जोरदार चर्चा सुरू आहे. कृष्णराज महाडिक यांनी अधिकृत निर्णय जाहीर केला नसला, तरी ते शंभर टक्के कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणूक रिंगणात असतील असं बोललं जात आहे.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 25, 2025 11:21:26
Kolhapur, Maharashtra:कोल्हापुर की राजनीति में महाडीक घराण्याची चर्चा केंद्रस्थानी आली आहे. खासदार धनंजय महाडीक यांच्या चिरंजीव कृष्णराज महाडीक हे आगामी कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत उतरवण्याची जोरदार शक्यता व्यक्त केली जात आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपा कडून उमेदवारी न मिळवू शकणारे कृष्णराज महाडीक आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून सक्रिय राजकीय प्रवेश करण्याची शक्यता आहे. कृष्णराज महाडीक यांची तरुणांमध्ये क्रेझ आहे. सोशल मीडियावर त्यांच्या लाखो फॉलोअर्स असून युवक वर्गात त्यांची ओळख राजकीय वारस म्हणून नव्हे तर एक युवा चेहऱ्याच्या रूपात आहे. महाडीक कुटुंबाचा राजकीय वारसा, खासदार धनंजय महाडीक यांचा अनुभव, आणि त्यांना मिळणारी कृष्णराज महाडीक यांच्या रूपाने युवा ऊर्जा. कोलहापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात न मिळालेल्या संधीचा अनुभव, त्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत कर्तृत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न कृष्णराज महाडीकांचा आहे.
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Dec 25, 2025 11:06:34
Ambernath, Maharashtra:बदलापूरात आगरी महोत्सवाच आयोजन. 26 ते 28 डिसेंबर रंगणार आगरी महोत्सव. तीन दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल. बदलापूरातील क्रीडा संकुलाच्या मैदानावर तीन दिवस भव्य आगरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. वामन म्हात्रे फाउंडेशन आणि आगरी उन्नती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचा आयोजन करण्यात आल आहे, 26 ते 28 डिसेंबर असा तीन दिवस आगरी महोत्सव आनंद बदलापूरकरांना घेता येणार आहे, या महोत्सवात आगरी पद्धतीचे झणझणीत खाद्यपदार्थ आणि आगरी संस्कृतीचे दर्शन बदलापूरकरांना घडणार आहे, अस्सल आगरी पद्धतीचा जेवणा सोबत सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल एकाच ठिकाणी अनुभवास मिळणार आहे. 28 डिसेंबर पासून हा आगरी महोत्सव सुरू राहणार आहे.
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Dec 25, 2025 10:35:30
Pandharpur, Maharashtra:Anchor-माढ्यातील भुमिअभिलेख कार्यालयात शेतकरी पिता पुत्राचा संताप अनावर झाल्याची घटना घडली आहे. मागील चार वर्षांपासून मोजणीसाठी हेलपाटे मारत असल्यामुळे वैतागलेल्या शेतकरी पिता पुत्राने अंगावर पेट्रोल ओतून घेतले. या घटनेत मुलाच्या डोळ्यात पेट्रोल गेल्याने तो जिवाच्या आंकाताने ओक्सा बोक्सी रडत आरडा ओरड करीत होता. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. कार्यालयातील सीसीटीव्हीमध्ये घटना कैद झाली आहे. माढा तालुक्यातील आकुंभे येथील दोघा शेतकरी पिता पुत्र शेत जमीन मोजणीच्या कामासाठी चार वर्षांपासून कार्यालयात हेलपाटे मारत आहेत. मात्र कर्मचारी आर्थिक लाभापोटी काम करत नाहीत, असा आक्षेप नोंदवत ढिसाळ कारभारा विषयी संताप व्यक्त केला. यावेळी भुमि अभिलेखचे उप अधीक्षक जे.सी.साळवे गैरहजर होते.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Dec 25, 2025 10:32:25
Kalyan, Maharashtra:राज्यात महापालिका निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. विविध ठिकाणी आघाडी-बिघाडी, स्वबळाचा नारा अशी समीकरणं मांडत राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. महापालिकेत आपली सत्ता यावी यासाठी सर्वच पक्षांनी मोठी फिल्डिंग लावली आहे. डोंबिवलीच्या नागरिकांचा अखंड पाठिंबा आणि वर्षानुवर्षांची विश्वासार्ह कामगिरी यांच्या बळावर विश्वनाथ राणे जनतेच्या हितासाठी, प्रामाणिक प्रशासनासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी तत्पर आणि सज्ज असल्याचं दिसून येतंय. डोंबिवलीच्या प्रगतीचा वेग कायम ठेवण्याचा त्यांचा निर्धार अधिक मजबूत होताना दिसून येतोय..आज यशोगाथा या कार्यक्रमात कल्याण-डोंबिवलीचे माजी महापौर विश्वनाथ राणे यांच्याशी संवाद साधणार आहोत... विश्वनाथ राणे १) राजकारणात कसे आलात.. तुमची राजकीय पार्श्वभूमी होती का... काय सांगाल याबाबत २) तुमचा प्रभाग अविकसित होता.. आत मात्र सुंदर केलंय त्यांचा कमग काय? ३) प्रभागात अनेक विकासाभिमुख काम केलंत.. काय सांगाल... ४) तुमच्या प्रभागात पाण्याची समस्या मोठी होती... मात्र तुम्ही योग्य नियोजन केलंय काय सांगाल... 5) २००५ च्या पुरात आणि कोरोना काळात तुम्ही अनेक काम केलंय.. काय सांगाल... 6) तुम्हाला विविध जाती-धर्माच्या लोकांचा तुम्हाला कसा पाठिंबा मिळतो.. 7) २५ वर्ष राजकारणात टिकून आहे हे कसं शक्य झालं... 8) तुम्हाला या राजकीय कामात कोणाचं पाठबळ आहे....
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Dec 25, 2025 09:47:24
Jalna, Maharashtra:जालना : भाजप जालन्यात युतीसाठी सकारात्मक-दानवे युतीसाठी भाजप सेनेत चर्चा झाली,रिपाइंसोबत देखील चर्चा करणार युतीबाबत दोन दिवसांत निर्णय नक्की होईल केवळ पत्र देऊन युती करा म्हणणं योग्य नाही,खोतकरांना दानवेंकडून सल्ला युती होण्याआधी एकमेकांवर आरोप करणं योग्य नाही तसेच महापौर पदाचा उमेदवार युती होण्याआधी जाहीर करणं योग्य नाही युतीसाठी आम्ही प्रयत्न करणार अँकर : भाजप जालन्यात युतीसाठी सकारात्मक असल्याचं भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी म्हणटलं आहे.ते जालन्यात बोलत होते.युतीसाठी भाजप शिवसेनेत चर्चा झाली आहे.रिपाइंसोबत देखील चर्चा करणार असल्याचं दानवे म्हणालेत.युतीबाबत दोन दिवसांत निर्णय नक्की होईल असा दावा दानवे यांनी केला आहे.केवळ पत्र देऊन युती करा म्हणणं योग्य नाही असा सल्ला दानवेंनी खोतकरांना दिलाय.युती होण्याआधी एकमेकांवर आरोप करणं योग्य नाही तसेच महापौर पदाचा उमेदवार युती होण्याआधी जाहीर करणं योग्य नसल्याच सांगत युतीसाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचही रावसाहेब दानवे म्हणालेत.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Dec 25, 2025 09:47:08
Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिल्ह्यात आईवर अत्याचार आणि चिमुरड्याची हत्या करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा, अहेरी सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल अँकर: विवाहितेवर अत्याचार करताना मध्ये आलेल्या तीन वर्षांच्या चिमुरड्याची तोंड दाबून निर्घृण हत्या करणाऱ्या संजू विश्वनाथ सरकार या आरोपीला अहेरी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने बुधवारी मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. तब्बल सात वर्षांनंतर लागलेल्या या निकालाने समाजातील विकृत प्रवृत्तींना जरब बसली असून, पीडित मातेला उशिरा का होईना पण न्याय मिळाला आहे. मुलचेरा तालुक्यातील कांचनपूर येथे १९ जून २०१७ च्या मध्यरात्री ही काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली होती. पीडित महिला आपल्या तीन वर्षांच्या मुलासह घरात असताना, तिचा पती रोजगारासाठी आंध्र प्रदेशात गेला होता. हीच संधी साधून शेजारी राहणाऱ्या संजू सरकार याने मध्यरात्री दोनच्या sुमारास घरात घुसून महिलेवर अत्याचार केला. यावेळी कुशीत झोपलेल्या निष्पाप बालकाला जाग आली आणि तो रडू लागला. या आवाजामुळे आपले पाप उघड होईल या भीतीने नराधम संजूने त्या चिमुरड्याचे नाक आणि तोंड दाबून त्याचा जागीच जीव घेतला. आईने आपल्या पोटच्या गोळ्याला वाचवण्यासाठी प्रतिकार केला असता, आरोपीने तिच्या गळ्यावर चाकूने वार करून तिला मरणासन्न अवस्थेत सोडून पळ काढला होता. शुद्धीवर आल्यानंतर पीडितेने घडलेला घटनाक्रम सांगितला आणि पोलिसांनी तत्काळ तपासचक्रे फिरवून आरोपीला जेरबंद केले. अहेरी अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश प्रकाश आर. कदम यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. तत्कालीन तपास अधिकारी गजानन टोम्पे यांनी सादर केलेले ठोस पुरावे, वैद्यकीय अहवाल आणि पीडितेची साक्ष या खटल्यात अत्यंत कळीची ठरली. हत्या प्रकरणी फाशी, बलात्कार आणि खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल जन्मठेप, तर घरफोडीसाठी १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. यासोबतच पीडित महिलेला विधी सेवा प्राधिकरणाकडून आर्थिक मदत देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
0
comment0
Report
christmas
Advertisement
Back to top