Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421301

डोंबिवली के पूर्व महापौर विश्वनाथ राणे से यशगाथा कार्यक्रम में संवाद

ABATISH BHOIR
Dec 25, 2025 10:32:25
Kalyan, Maharashtra
राज्यात महापालिका निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. विविध ठिकाणी आघाडी-बिघाडी, स्वबळाचा नारा अशी समीकरणं मांडत राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. महापालिकेत आपली सत्ता यावी यासाठी सर्वच पक्षांनी मोठी फिल्डिंग लावली आहे. डोंबिवलीच्या नागरिकांचा अखंड पाठिंबा आणि वर्षानुवर्षांची विश्वासार्ह कामगिरी यांच्या बळावर विश्वनाथ राणे जनतेच्या हितासाठी, प्रामाणिक प्रशासनासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी तत्पर आणि सज्ज असल्याचं दिसून येतंय. डोंबिवलीच्या प्रगतीचा वेग कायम ठेवण्याचा त्यांचा निर्धार अधिक मजबूत होताना दिसून येतोय..आज यशोगाथा या कार्यक्रमात कल्याण-डोंबिवलीचे माजी महापौर विश्वनाथ राणे यांच्याशी संवाद साधणार आहोत... विश्वनाथ राणे १) राजकारणात कसे आलात.. तुमची राजकीय पार्श्वभूमी होती का... काय सांगाल याबाबत २) तुमचा प्रभाग अविकसित होता.. आत मात्र सुंदर केलंय त्यांचा कमग काय? ३) प्रभागात अनेक विकासाभिमुख काम केलंत.. काय सांगाल... ४) तुमच्या प्रभागात पाण्याची समस्या मोठी होती... मात्र तुम्ही योग्य नियोजन केलंय काय सांगाल... 5) २००५ च्या पुरात आणि कोरोना काळात तुम्ही अनेक काम केलंय.. काय सांगाल... 6) तुम्हाला विविध जाती-धर्माच्या लोकांचा तुम्हाला कसा पाठिंबा मिळतो.. 7) २५ वर्ष राजकारणात टिकून आहे हे कसं शक्य झालं... 8) तुम्हाला या राजकीय कामात कोणाचं पाठबळ आहे....
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PNPratap Naik1
Dec 25, 2025 11:21:42
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या राजकारणात नव्या पिढीचा प्रवेश ठळकपणे दिसू लागला आहे. आमदार आणि खासदारांच्या पुत्रांनी थेट मैदानात उतरत प्रचाराला सुरुवात केली आहे. पाहूया कोण कोणत्या आमदाराने खासदारांचे पुत्र कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकांच्या रिंगणात आहेत ते. 1) आमदार राजेश क्षीरसागर यांचे पुत्र ऋतुराज क्षीरसागर यांनी महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रचाराला सुरुवात केली आहे. प्रभागांमध्ये भेटीगाठी, कार्यकर्त्यांच्या बैठका आणि स्थानिक प्रश्नांवर थेट संवाद साधत ऋतुराज क्षीरसागर यांनी आपली उपस्थिती दाखवायला सुरुवात केली आहे. युवकांशी थेट संपर्क साधण्यावर त्यांचा भर असल्याचं दिसून येत आहे. 2) तर दुसरीकडे, माजी आमदार जयश्री जाधव यांचे पुत्र सत्यजित जाधव यांनीही प्रचारात सक्रिय सहभाग घेतला आहे. प्रभागनिहाय संघटन बांधणी, मतदारांशी संवाद आणि स्थानिक पातळीवर कामाचा आढावा घेत सत्यजित जाधव यांनी निवडणुकीच्या तयारीला गती दिली आहे. 3) या दोघांनंतर , खासदार धनंजय महाडिक यांचे पुत्र कृष्णराज महाडिक यांच्या नावाचीही कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जोरदार चर्चा सुरू आहे. कृष्णराज महाडिक यांनी अधिकृत निर्णय जाहीर केला नसला, तरी ते शंभर टक्के कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणूक रिंगणात असतील असं बोललं जात आहे.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 25, 2025 11:21:26
Kolhapur, Maharashtra:कोल्हापुर की राजनीति में महाडीक घराण्याची चर्चा केंद्रस्थानी आली आहे. खासदार धनंजय महाडीक यांच्या चिरंजीव कृष्णराज महाडीक हे आगामी कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत उतरवण्याची जोरदार शक्यता व्यक्त केली जात आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपा कडून उमेदवारी न मिळवू शकणारे कृष्णराज महाडीक आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून सक्रिय राजकीय प्रवेश करण्याची शक्यता आहे. कृष्णराज महाडीक यांची तरुणांमध्ये क्रेझ आहे. सोशल मीडियावर त्यांच्या लाखो फॉलोअर्स असून युवक वर्गात त्यांची ओळख राजकीय वारस म्हणून नव्हे तर एक युवा चेहऱ्याच्या रूपात आहे. महाडीक कुटुंबाचा राजकीय वारसा, खासदार धनंजय महाडीक यांचा अनुभव, आणि त्यांना मिळणारी कृष्णराज महाडीक यांच्या रूपाने युवा ऊर्जा. कोलहापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात न मिळालेल्या संधीचा अनुभव, त्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत कर्तृत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न कृष्णराज महाडीकांचा आहे.
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Dec 25, 2025 11:06:34
Ambernath, Maharashtra:बदलापूरात आगरी महोत्सवाच आयोजन. 26 ते 28 डिसेंबर रंगणार आगरी महोत्सव. तीन दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल. बदलापूरातील क्रीडा संकुलाच्या मैदानावर तीन दिवस भव्य आगरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. वामन म्हात्रे फाउंडेशन आणि आगरी उन्नती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचा आयोजन करण्यात आल आहे, 26 ते 28 डिसेंबर असा तीन दिवस आगरी महोत्सव आनंद बदलापूरकरांना घेता येणार आहे, या महोत्सवात आगरी पद्धतीचे झणझणीत खाद्यपदार्थ आणि आगरी संस्कृतीचे दर्शन बदलापूरकरांना घडणार आहे, अस्सल आगरी पद्धतीचा जेवणा सोबत सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल एकाच ठिकाणी अनुभवास मिळणार आहे. 28 डिसेंबर पासून हा आगरी महोत्सव सुरू राहणार आहे.
0
comment0
Report
SKShubham Koli
Dec 25, 2025 11:06:08
Thane, Maharashtra:Anchor ठाणे शहरात जर राष्ट्रवादी वाढवायची असेल तर त्यांनी आता विचार करावा, शेवटी आपल्या कार्यकर्त्यांना निवडून आणायचं आहे असं वक्तव्य नजीब मुल्ला यांनी केलं. एकीकडे पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार हे जवळपास निश्चित झालं असताना ठाण्यातही तशीच हालचाल सुरू झाल्याचं चित्र आहे. जितेंद्र आव्हाड हे आमचे दुश्मन नाहीत, आम्हाला जर कुणाचा प्रस्ताव आला तर आम्ही तो पक्षश्रेष्ठींकडे पाठवून आणि त्यावर विचार करू असं मोठं वक्तव्य दादांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला (Najeeb Mulla) यांनी केलं. अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड हे कट्टर विरोधक मानले जातात. मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातून नजीब मुल्ला यांनी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात महायुतीतून निवडणूक लढवली होती. आता त्या ठाण्यात दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्यासाठी हालचाली सुरू आहेत. ठाण्यात देखील दोन्ही राष्ट्रवादी एकत्र? जितेंद्र आव्हाड आमचे दुश्मन नाहीत. 30 तारखेपर्यंत जर आम्हाला कोणाचा प्रस्ताव आला तर आम्ही तो पक्षश्रेष्ठींकडे पाठवणार आणि विचार करणार. शेवटी कार्यकर्त्यांना निवडून आणायचे आहे असे राष्ट्रवादी ठाणे जिल्हा अध्यक्ष नजीब मुल्ला म्हणाले. ठाणे शहरात जर पक्ष वाढवायचा असेल तर त्यांनी आता विचार करावा, असं सूचक वक्तव्य नजीब मुल्ला यांनी केलं. त्यामुळे ठाण्यातील शरद पवार गट देखील आता एक पाऊल पुढे टाकून अजित पवार गटासोबत युतीचा विचार करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Dec 25, 2025 10:35:30
Pandharpur, Maharashtra:Anchor-माढ्यातील भुमिअभिलेख कार्यालयात शेतकरी पिता पुत्राचा संताप अनावर झाल्याची घटना घडली आहे. मागील चार वर्षांपासून मोजणीसाठी हेलपाटे मारत असल्यामुळे वैतागलेल्या शेतकरी पिता पुत्राने अंगावर पेट्रोल ओतून घेतले. या घटनेत मुलाच्या डोळ्यात पेट्रोल गेल्याने तो जिवाच्या आंकाताने ओक्सा बोक्सी रडत आरडा ओरड करीत होता. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. कार्यालयातील सीसीटीव्हीमध्ये घटना कैद झाली आहे. माढा तालुक्यातील आकुंभे येथील दोघा शेतकरी पिता पुत्र शेत जमीन मोजणीच्या कामासाठी चार वर्षांपासून कार्यालयात हेलपाटे मारत आहेत. मात्र कर्मचारी आर्थिक लाभापोटी काम करत नाहीत, असा आक्षेप नोंदवत ढिसाळ कारभारा विषयी संताप व्यक्त केला. यावेळी भुमि अभिलेखचे उप अधीक्षक जे.सी.साळवे गैरहजर होते.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Dec 25, 2025 09:47:24
Jalna, Maharashtra:जालना : भाजप जालन्यात युतीसाठी सकारात्मक-दानवे युतीसाठी भाजप सेनेत चर्चा झाली,रिपाइंसोबत देखील चर्चा करणार युतीबाबत दोन दिवसांत निर्णय नक्की होईल केवळ पत्र देऊन युती करा म्हणणं योग्य नाही,खोतकरांना दानवेंकडून सल्ला युती होण्याआधी एकमेकांवर आरोप करणं योग्य नाही तसेच महापौर पदाचा उमेदवार युती होण्याआधी जाहीर करणं योग्य नाही युतीसाठी आम्ही प्रयत्न करणार अँकर : भाजप जालन्यात युतीसाठी सकारात्मक असल्याचं भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी म्हणटलं आहे.ते जालन्यात बोलत होते.युतीसाठी भाजप शिवसेनेत चर्चा झाली आहे.रिपाइंसोबत देखील चर्चा करणार असल्याचं दानवे म्हणालेत.युतीबाबत दोन दिवसांत निर्णय नक्की होईल असा दावा दानवे यांनी केला आहे.केवळ पत्र देऊन युती करा म्हणणं योग्य नाही असा सल्ला दानवेंनी खोतकरांना दिलाय.युती होण्याआधी एकमेकांवर आरोप करणं योग्य नाही तसेच महापौर पदाचा उमेदवार युती होण्याआधी जाहीर करणं योग्य नसल्याच सांगत युतीसाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचही रावसाहेब दानवे म्हणालेत.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Dec 25, 2025 09:47:08
Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिल्ह्यात आईवर अत्याचार आणि चिमुरड्याची हत्या करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा, अहेरी सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल अँकर: विवाहितेवर अत्याचार करताना मध्ये आलेल्या तीन वर्षांच्या चिमुरड्याची तोंड दाबून निर्घृण हत्या करणाऱ्या संजू विश्वनाथ सरकार या आरोपीला अहेरी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने बुधवारी मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. तब्बल सात वर्षांनंतर लागलेल्या या निकालाने समाजातील विकृत प्रवृत्तींना जरब बसली असून, पीडित मातेला उशिरा का होईना पण न्याय मिळाला आहे. मुलचेरा तालुक्यातील कांचनपूर येथे १९ जून २०१७ च्या मध्यरात्री ही काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली होती. पीडित महिला आपल्या तीन वर्षांच्या मुलासह घरात असताना, तिचा पती रोजगारासाठी आंध्र प्रदेशात गेला होता. हीच संधी साधून शेजारी राहणाऱ्या संजू सरकार याने मध्यरात्री दोनच्या sुमारास घरात घुसून महिलेवर अत्याचार केला. यावेळी कुशीत झोपलेल्या निष्पाप बालकाला जाग आली आणि तो रडू लागला. या आवाजामुळे आपले पाप उघड होईल या भीतीने नराधम संजूने त्या चिमुरड्याचे नाक आणि तोंड दाबून त्याचा जागीच जीव घेतला. आईने आपल्या पोटच्या गोळ्याला वाचवण्यासाठी प्रतिकार केला असता, आरोपीने तिच्या गळ्यावर चाकूने वार करून तिला मरणासन्न अवस्थेत सोडून पळ काढला होता. शुद्धीवर आल्यानंतर पीडितेने घडलेला घटनाक्रम सांगितला आणि पोलिसांनी तत्काळ तपासचक्रे फिरवून आरोपीला जेरबंद केले. अहेरी अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश प्रकाश आर. कदम यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. तत्कालीन तपास अधिकारी गजानन टोम्पे यांनी सादर केलेले ठोस पुरावे, वैद्यकीय अहवाल आणि पीडितेची साक्ष या खटल्यात अत्यंत कळीची ठरली. हत्या प्रकरणी फाशी, बलात्कार आणि खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल जन्मठेप, तर घरफोडीसाठी १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. यासोबतच पीडित महिलेला विधी सेवा प्राधिकरणाकडून आर्थिक मदत देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 25, 2025 09:32:08
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Dec 25, 2025 09:22:53
Pimpri-Chinchwad, Maharashtra:पुणे की बानेर, बालेवाड़ी और वाकड क्षेत्रों को जोड़ने वाले मुळा नदी पर बने पुल के लिए आवश्यक भूमि कुछ भू-स्वामियों द्वारा उपलब्ध न कराए जाने के कारण यह पुल अब तक उपयोग में नहीं आ पाया था। इसके चलते स्थानीय नागरिकों को भारी यातायात जाम का सामना करना पड़ रहा था। अब पुणे महानगरपालिका प्रशासन ने जबरन भूमि अधिग्रहण की प्रक्रिया शुरू कर संपर्क मार्ग के विकास कार्य को गति दी है। पुणे और पिंपरी-चिंचवड महानगरपालिकाओं ने संयुक्त रूप से वर्ष 2013 में बालेवाड़ी और वाकड को जोड़ने वाले मुळा नदी पुल को मंजूरी दी थी। विभिन्न कारणों से इस पुल का निर्माण कार्य देरी से वर्ष 2018-19 में पूरा हुआ। इस पुल के निर्माण पर लगभग 31 करोड़ रुपये का खर्च आया है। पुल का निर्माण पूरा होने के बावजूद पुणे महानगरपालिका क्षेत्र के बालेवाड़ी इलाके में संपर्क सड़क के लिए आवश्यक भूमि उपलब्ध न होने के कारण पुल का उपयोग नहीं हो पा रहा था। इससे बानेर, बालेवाड़ी और वाकड क्षेत्रों में यातायात समस्या और भी गंभीर हो गई थी। अब महानगरपालिका द्वारा भूमि अधिग्रहण कर संपर्क सड़क का कार्य शुरू किए जाने से यह पुल शीघ्र ही यातायात के लिए खुलने की संभावना है। पुल के शुरू होते ही क्षेत्र में यातायात जाम की समस्या काफी हद तक कम होने की उम्मीद जताई जा रही है.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 25, 2025 09:20:59
kolhapur, Maharashtra:नागपुर अकोला, अमरावती आणि चंद्रपूर महापालिका निवडणूकीच्या दृष्टीने आज नागपुरात महत्वाच्या बैठक सुरू आहे... भाजपच्या धंतोली परिसरातील विदर्भ कार्यालयात ह्या बैठका होत आहेत... सध्या अकोला कोअर कमिटीसोबत महसूलमंत्री मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची बैठक सुरू आहे.. दुपारनंतर अमरावती आणि संध्याकाळी चंद्रपूर महापालिकेसाठी बैठक होणार आहे.. महायुती करण्याबद्दल आणि तिकीट निश्चितीच्या दृष्टीने ह्या बैठका होत असून त्यामध्ये विद्यमान जिल्हाध्यक्ष माजी जिल्हाध्यक्ष आमदार माजी आमदार आणि महापालिका हद्दीतील पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.. अकोल्याच्या सध्या सुरू असलेल्या बैठकीत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार अनुप धोत्रे, अकोला शहराध्यक्ष जयंत म्हसणे, विजय अग्रवाल व इतर पदाधिकारी बैठकीत उपस्थित आहेत...
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Dec 25, 2025 08:46:22
Nanded, Maharashtra:नांदेड जिलेातील मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार या गावात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडालीये. दोन भावांनी रेल्वे खाली येऊन आत्महत्या केली , त्यांच्या आई-वडिलांचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आई-वडिलांनी आत्महत्या केली की घातपात झाला याचा तपास सुरु आहे . घटनेचे कारण अस्पष्ट असून आर्थिक विवंचनेतून हा प्रकार घडला असल्याचा नातेवाईक आणि ग्रामस्थ्यांचा प्राथमिक अंदाज आहे. 22 वर्षीय बजरंग रमेश लखे 25 वर्षीय उमेश रमेश लखे या दोन सख्ख्या भावाची मुगट रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे खाली आत्महत्या केली. त्यांचे वडील 51 वर्षीय रमेश होनाजी लखे आणि आई 44 वर्षीय राधाबाई रमеш लखे यांचे मृतदेह घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. लखे कुटुंबात हे चार जनच होते त्यामुळे संपूर्ण कुटुंब या घटनेमुळे समाप्त झाले. उमेश लखे हा मनसेचा मुदखेडचा माजी तालुका उपाध्यक्ष होता. सामाजिक कार्यातही उमेशचा होता सक्रिय सहभाग होता. दरम्यान रमेश लखे यांचे वीस वर्षांपूर्वी हृदयाचे ऑपरेशन झाले होते त्यांची प्रकृती ठीक नसायची. शिवाय कुटुबाची आर्थिक परिस्थिती ठीक नसल्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. श्वविच्छेदन अहवालानंतर मृत्युचे कारण अधिक स्पष्ट होईल. पोलीस सर्व बाजूने तपास करत असल्याचे पोलीस अधीक्षक nowabish कुमार यांनी सांगितले.
0
comment0
Report
christmas
Advertisement
Back to top