Back
गडचिरोली में आई पर अत्याचार और बच्चे की हत्या: संजू सरकार को फांसी
AAASHISH AMBADE
Dec 25, 2025 09:47:08
Gadchiroli, Maharashtra
गडचिरोली जिल्ह्यात आईवर अत्याचार आणि चिमुरड्याची हत्या करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा, अहेरी सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
अँकर: विवाहितेवर अत्याचार करताना मध्ये आलेल्या तीन वर्षांच्या चिमुरड्याची तोंड दाबून निर्घृण हत्या करणाऱ्या संजू विश्वनाथ सरकार या आरोपीला अहेरी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने बुधवारी मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. तब्बल सात वर्षांनंतर लागलेल्या या निकालाने समाजातील विकृत प्रवृत्तींना जरब बसली असून, पीडित मातेला उशिरा का होईना पण न्याय मिळाला आहे. मुलचेरा तालुक्यातील कांचनपूर येथे १९ जून २०१७ च्या मध्यरात्री ही काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली होती. पीडित महिला आपल्या तीन वर्षांच्या मुलासह घरात असताना, तिचा पती रोजगारासाठी आंध्र प्रदेशात गेला होता. हीच संधी साधून शेजारी राहणाऱ्या संजू सरकार याने मध्यरात्री दोनच्या sुमारास घरात घुसून महिलेवर अत्याचार केला. यावेळी कुशीत झोपलेल्या निष्पाप बालकाला जाग आली आणि तो रडू लागला. या आवाजामुळे आपले पाप उघड होईल या भीतीने नराधम संजूने त्या चिमुरड्याचे नाक आणि तोंड दाबून त्याचा जागीच जीव घेतला. आईने आपल्या पोटच्या गोळ्याला वाचवण्यासाठी प्रतिकार केला असता, आरोपीने तिच्या गळ्यावर चाकूने वार करून तिला मरणासन्न अवस्थेत सोडून पळ काढला होता. शुद्धीवर आल्यानंतर पीडितेने घडलेला घटनाक्रम सांगितला आणि पोलिसांनी तत्काळ तपासचक्रे फिरवून आरोपीला जेरबंद केले. अहेरी अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश प्रकाश आर. कदम यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. तत्कालीन तपास अधिकारी गजानन टोम्पे यांनी सादर केलेले ठोस पुरावे, वैद्यकीय अहवाल आणि पीडितेची साक्ष या खटल्यात अत्यंत कळीची ठरली. हत्या प्रकरणी फाशी, बलात्कार आणि खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल जन्मठेप, तर घरफोडीसाठी १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. यासोबतच पीडित महिलेला विधी सेवा प्राधिकरणाकडून आर्थिक मदत देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowDec 25, 2025 11:21:570
Report
PNPratap Naik1
FollowDec 25, 2025 11:21:420
Report
PNPratap Naik1
FollowDec 25, 2025 11:21:260
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowDec 25, 2025 11:06:340
Report
SKShubham Koli
FollowDec 25, 2025 11:06:080
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 25, 2025 10:35:300
Report
ABATISH BHOIR
FollowDec 25, 2025 10:32:250
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 25, 2025 10:16:120
Report
NMNITESH MAHAJAN
FollowDec 25, 2025 09:47:240
Report
PNPratap Naik1
FollowDec 25, 2025 09:32:190
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 25, 2025 09:32:080
Report
KPKAILAS PURI
FollowDec 25, 2025 09:22:530
Report
AKAMAR KANE
FollowDec 25, 2025 09:20:590
Report
SMSATISH MOHITE
FollowDec 25, 2025 08:46:220
Report
