Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane400601

समृद्धी महामार्ग पर ट्रक में आग, नागपुर की ओर यातायात प्रभावित

UJUmesh Jadhav
Oct 17, 2025 11:35:42
Thane, Maharashtra
समृद्धी महामार्गावर बर्निग ट्रकची घटना. समृद्धी महामार्गावर नागपूरकडे जाणाऱ्या मार्गिकेवर चालत्या ट्रकला लागली आग. शहापूर तालुक्यातील समृद्धीच्या शिरोळ बोगद्याजवळ घटली घटना. समृद्धी महामार्गावरील चॅनल नंबर ६५० वर ट्रकला लागली आग. घटनास्थळी समृद्धी महामार्गाची व शहापूर नगरपंचायत अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू. नागपूरच्या दिशेने जाणारी समृद्धी महामार्गावरील वाहतूक विस्कळीत.
11
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAABHISHEK ADEPPA
Oct 18, 2025 05:50:13
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटलांचे राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटलांना खुलं आव्हान. जिल्हा परिषदेला मैं माझा नरखेड गट सोडून लढतो, तुम्ही अनगर सोडून माझ्या विरोधात लढा. जर माझा पराभव झाला तर मी माझं राजकारण सोडून देतो. मी अनगर गावात गेल्यावर माझ्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला पण अपने गली मे कुत्ता भी शेर होता है. मोहोळचे माजी आमदार राजन पाटील भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चानंतर जिल्हाध्यक्ष उमेश पाटलांचे ओपन चॅलेंज. राजन पाटील हे अजित पवार गटाचे माजी आमदार तसेच राज्यमंत्री दर्जा असलेले सहकार परिषदेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. माझं राजन पाटळांना आव्हान आहे की माझ्याविरोधात लढा. माझा बाप कुठला आमदार, खासदार, मंत्री नाही परंतु आमच्यात हिंमत आहे. परंमंट आमदार म्हणून तुम्ही म्हणवता मग हिम्मत असेल तर माझ्याविरोधात लढून दाखवा. जर माझा पराभव झाला तर मी माझं राजकारण सोडून देतो. मोहोळ तालुक्याला स्वातंत्र्य देण्यासाठी, दहशतमुक्त करण्यासाठी आम्ही लढत होतो. आम्हाला शहीद होण्याची भीती नाही. ऑन गेली मे कुत्ता शेर बनता है. मी यांच्या गावात एकटा गेलो तेव्हा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला परंतु याबाबत मी वाच्यता केली नाही कारण आपल्याला ठोकशाहीच्या मार्गाने नव्हे तर लोकशाहीच्या मार्गाने जाऊन याचा पराभव करायचा आहे. एक म्हण आहे की अपने गली मे कुत्ता भी शेर होता है. हे पण कारखान्यापर्यंत आले आणि हद्द संपली की माघारी गेले. पाण लक्षात ठेवा तुम्हाला पण नरखेड, मोहोळ मध्ये यायचे आहे. कोण कोणाला कमी नसते. तुम्ही फक्त बारावाड्यांचं पानी पिऊत आलाय हे लक्षात ठेवा. त्यामुळे 4 वर्षाच्या काळात तुमचं 50 वर्षाचा साम्राज्य उध्वस्त करू शकला हे लक्षात ठेवा. SOUND BYTE: उमेश पाटील (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी अजित दादा गट).
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Oct 18, 2025 04:45:55
Solapur, Maharashtra:अक्कलकोट स्वामी समर्थाचे मूळस्थान असलेले वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे दिवाळी सुट्ट्यांमधील भाविकांच्या गर्दीमुळे २० तास खुले ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. तर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त" श्रीक्षेत्र गाणगापूर येथे दिवाळीनिमित्त विविध अभिषेक,पालखी,मंगलस्नान असे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले आहेत.दिवाळी उत्सवानिमित्त पहाटे ३ ते रात्री ९ असे १८ तास गाणगापूर दत्तात्रय मंदिर भाविकांसाठी मंदिर खुला राहणार आहे.पहाटेपासून दुपारी १२ पर्यंत विधिवत पूजा, अभिषेक असणार आहे. दु.१ वाजता निर्गुण पादुका मूळस्थान दर्शन बंद करण्यात येणार आहे. दिवाळी सुट्टयांचा कालावधी म्हणजे आजच्या धावपळीत कुटुंब एकत्र येण्याचा काळ आहे.हा काळ सत्कर्णी लागावा आणि भविष्यातील जीवन सदाचाराने जगता यावा यासाठी या दिवाळी सुट्ट्यांच्या काळात पुणे,मुंबईसारख्या महानगरासह देशभरातून अपार श्रद्धेने स्वामी भक्त स्वामी समर्थांच्या दर्शनाकरिता येत असतात.भक्तांना दर्शन सुलभरीत्या मिळावे याकरिता दिवाळी सुट्ट्यांमधील भाविकांच्या गर्दीमुळे १६ ऑक्टोबरपासून त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत या कालावधीत वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे पहाटे ३ ते रात्री ११ असे नियमितपणे २० तास खुले राहणार आहे.
0
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Oct 18, 2025 04:39:09
Pune, Maharashtra:लोणावळ्यात नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या मतदारांच्या प्रारूप यादीत मोठा घोळ झाल्याने शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. या संतापाचं रूपांतर अखेर आंदोलनात झालं आणि राष्ट्रवादीकडून या मतदार यादीची प्रतीकात्मक होळी करून लोणावळा नगरपरिषदेच्या ढिसाळ कारभाराचा जोरदार धिक्कार करण्यात आला. या आंदोलनावेळी लोणावळ्यातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. राष्ट्रवादी (एसपी) चे शहराध्यक्ष नासीर शेख यांनी या गोंधळाची बाब प्रशासनाच्या निर्दशनास आणून दिली होती. मात्र, प्रशासनाकडून योग्य ती दखल न घेतल्याने अखेर कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आपला रोष व्यक्त केला. आता या मतदार यादीतील गोंधळाचा फटका आगामी निवडणुकीत कोणत्या उमेदवारांना बसतो, हे पाहणं महत्वाच ठरणार आहे.
4
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Oct 18, 2025 04:36:59
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:लोकनाट्य कला केंद्रांवर जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई धाराशिव — उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणानंतर जिल्ह्यातील लोकनाट्य कला केंद्रांवर प्रशासनाचा कारवाईचा धडाका जिल्हाधिकारी कीर्ति किरण पुजार यांनी कालिका आणि गौरी लोकनाट्य कला केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द केले आहेत. आतापर्यंत धाराशिव जिल्ह्यातील पाच लोकनाट्य कला केंद्रांवर कारवाई करण्यात आली असून तुळजाई, पिंजरा, साई, गौरी आणि कालिका या केंद्रांचे परवाने रद्द झाले आहेत. सोलापूर-धुळे महामार्गालगत असलेल्या या केंद्रांनी प्रशासनाने घालून दिलेल्या अटींचा भंग केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. वाढती गुन्हेगारी आणि नियमभंगाविरोधात प्रशासनाचा कडक संदेश — धाराशिव जिल्ह्यात सुरू आहे कारवाईचा सिलसिला.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Oct 18, 2025 04:36:38
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर न्यायालयाने नर्तिका पूजा गायकवाडचा जामीन अर्ज फेटाळला अँकर - प्रेमाच्या जाळ्यात ओढून नंतर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याने बीड येथील लुखामसला गावचे उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे यांनी आत्महत्या केली होती. याप्रकरणातील आरोपी नर्तिका पूजा गायकवाड Hिचा जामिनाचा अर्ज जिल्हासत्र न्यायाधीश व्ही.एस.मलकलपत्ते-रेड्डी यांनी फेटाळून लावला. गायकवाड हिने बंगला आणि ५ एकर जमीन नावावर कर म्हणून मानसिक त्रास दिल्याने बर्गे यांनी सप्टेंबरमध्ये आत्महत्या केली होती. तिला जामीन मिळाल्यास समाजात चुकीचा संदेश जाईल, शिवाय अशा महिलांकडून इतर पुरुषांची आर्थिक, मानसिक आणि शारीरिक छळ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असा युक्तिवाद जिल्हा सरकारी वकील डॉ. प्रदीपसिंग रजपूत यांनी केला. या युक्तिवादावरून न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला. याप्रकरणी सरकारपक्षातर्फे डॉ. रजपूत तर आरोपीतर्फे अॅड. आर. डी. तारके यांनी काम पाहिले.
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Oct 18, 2025 04:18:15
Beed, Maharashtra:बीड नगर परिषदेच्या निवडणुकीवरून क्षीरसागर कुटुंबातील दिर भावजाई मध्ये चांगलीच झुंपली आहे. नगर परिषदेच्या निवडणुकीत 50 नगरसेवकांसह नगराध्यक्ष निवडून आणण्याचा दावा आमदार संदीप क्षीरसागर यांनी बैठकीत व्यक्त केला. विरोधकांनी काहीही करू द्या आता माझही राजकारणात वय झालंय. असं संदीप क्षीरसागर यांनी म्हटलं. दहा हजारांच्या फरकाने नगराध्यक्ष निवडून आणण्याचा निर्धार आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला. मात्र यावरूनच संदीप क्षीरसागर यांच्या भावजई सारिका शिरसागर यांनी संदीप क्षीरसागर यांच्यावर टीका केली. आमदारांनी बीडचा विकास कशा पद्धतीने केला? हे जनतेला माहिती आहे. नगरपरिषदेवर दावा करत असताना निवडणुकीत एकूण किती नगरसेवक रिंगणात उभे आहेत. हे देखील आमदारांना ठाऊक नाही. असा मिश्किल टोला सारिका क्षीरसागर यांनी लगावला. त्यामुळे नगरपालिका निवडणूकीत भावजाई विरुद्ध दीर असा सामना रंगण्याची शक्यता आहे.
3
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Oct 18, 2025 04:17:50
Jalna, Maharashtra:जालना : दिवाळीपर्यत अतिवृष्टीची मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचं राज्य सरकारचं आश्वासन हवेतच, शेतकऱ्यांनी केली सरकारच्या जीआरची होळी जीआरची होळी करून शेतकऱ्यांनी साजरी केली काळी दिवाळी वाक थ्रू+ चौपाल विथ शेतकरी अँकर : अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना दिवाळीपर्यंत नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन राज्य सरकारने दिलं होतं. आजपासून खऱ्या अर्थाने दिवाळी सणाला सुरुवात झाली आहे. मात्र अजूनही अतिवृष्टी बाधितांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी जालन्यातील वडीगोद्री येथे राज्य सरकारनं मदती संदर्भात काढलेल्या जीआरची होळी करत काळी दिवाळी साजरी करत राज्य सरकारचा निषेध नोंदवला आहे तसेच सरकारने तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. और अतिवृष्टीमुळे झालेल्या कपाशीच्या नुकसानीचा आढावा घेऊन या शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांनी
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Oct 18, 2025 04:05:16
1
comment0
Report
GMGANESH MOHALE
Oct 18, 2025 04:04:11
Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यात जनावरांमध्ये लंपी त्वचारोगाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला असून काही गावे या संसर्गजन्य आजाराच्या विळख्यात सापडली आहेत. गायी आणि वासरांना ताप, त्वचेवर गाठी व सूज येणे अशी लक्षणे दिसत आहेत. पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरण मोहिमा सुरू करण्यात आल्या आहेत, मात्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने उपचार व नियंत्रण कार्यात अडचणी येत आहेत. या परिस्थितीमुळे शेतकरी वर्गात मोठी चिंता निर्माण झाली असून दूध उत्पादनात घट झाल्याने आर्थिक नुकसान होत आहे. जनावरांमध्ये लंपीची लक्षणे दिसताच त्वरित जवळच्या पशुवैद्यकीय केंद्राशी संपर्क साधावा आणि जनावरांच्या हालचाली मर्यादित ठेवाव्यात, जेणेकरून आजाराचा प्रसार रोखता येईल असं अहवान पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आलं आहे.
2
comment0
Report
Advertisement
Back to top