Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane410210

नवी मुंबई में ड्रग्स तस्करी रोकथाम के लिए पुलिस ने रातभर चेकिंग की

SNSWATI NAIK
Mar 28, 2026 07:18:47
Navi Mumbai, Maharashtra
नवी मुंबईतील परिमंडळ एकाच्या सात पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी रात्रीच्या वेळी अचानक नाकाबंदी लावत वाहनांची तपासणी केली. पोलीसांना शहरात ड्रग्स किंवा इतर अमली पदार्थांची आवक-जावक होत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर ड्रग्स तस्करी रोखण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदी करत वाहनांची झडती घेतली. नागरिकांनी पोलिसांना मदत करून याबाबत सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SMSarfaraj Musa
Mar 28, 2026 08:21:57
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शताब्दी वर्षाचा मोठ्या उत्साहात शुभारंभ... अँकर - सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचा शताब्दी वर्ष पार पडत आहेत.शताब्दी वर्ष महोत्सव निमित्ताने जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून विविध कार्यक्रमांचे वर्षभर आयोजन करण्यात आले आहे.शताब्दी वर्षाच्या शुभारंभ निमित्ताने बोध चिन्हाचे उद्घाटन करत केक कापत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 100 सोसायटींच्या संचालकांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरव करण्यात आला. तसेच शताब्दी वर्षाचा प्रारंभ म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्यावतीने सांगली शहरातून बाईक रॅली काढून करण्यात आला. ज्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांच्यासह आजी-माजी आमदार ,माजी मंत्री व बँकेचे संचालक अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. साऊंड बाईट - मानसिंगराव नाईक - ,अध्यक्ष ,जिल्हा मध्यवर्ती बँक,सांगली.
1061
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Mar 28, 2026 08:20:47
Buldhana, Maharashtra:बुलढाणा.. माहितीच्या अधिकाराचे मी हिजडे धंदे करत नाही, तुम्ही तुमच्या घरात चौकशी करा, हे कोण करत आहे म्हणून.. आमदार संजय गायकवाड यांची पुन्हा एकदा आमदार श्वेता महालेवर टीका.. आमचे सरळ काम आहे, छातीला छाती भिडवायचे आणि विषय खातम करायचा , मागून पाठीत खंजीर खुपसायचे आम्हाला जमत नाही .. तर आम्ही पण पाहणार , कोणाला धमकी देणार, कोणाला जेलमध्ये घालणार, आमच्या पण कानावर आहे आमदार काय करतात, मी काही घरातला आमदार नाही.. एकप्रकारे आमदार महाले यांना आव्हान दिले. Anchor - मी पण एक आमदार आहे, महाराष्ट्रात देशांत माझे नाव आहे, पण एक माणूस सांगणार नाही की आमदार गायकवाड यांचा त्रास आहे म्हणून . चिखलीच्या आमदार म्हणतात की आमदार गायकआड यांनी माहितीच्या अधिकार टाकून सरपंचावर दबाव आणून प्रवेश घेतला . मात्र माहितीच्या अधिकारासारखे मी हिजडे धंदे कधीच करत नाही. हे मी नाही करत, तुम्ही तुमच्या घरात चौकशी करा ,कोण करता आहे ते, आमचे सरळ सरळ काम आहे , छातीला छाती भिडवायची आणि विषय खातम करायचा, मागून पाठीत खंजीर खुपसायचा आम्हाला जमत नाही.. अशाप्रकारची टीका पुन्हा एकदा आमदार संजय गायकवाड यांनी श्वेता महालेवर केली .. दोन दिवसांपूर्वााही आमदार गायकवाड यांनी आमदार महालेवर वादग्रस्त वक्तव्य केले होते.. त्याला उत्तर देत आमदार महाले यांनी सुद्धा आमदार गायकवाड हे दबाव टाकून प्रवेश करून घेत असल्याचे म्हटले होते. (1. ते 1.10 पर्यंत.. ) आम्ही चिखली मध्ये आलो ते आमचा पक्ष वाढवण्यासाठी, खासदार यांना कमी पडलेली मात्र वाढवण्यासाठी, जिल्हा परिषद चे जागा जिंकण्यासाठी. चिखली तालुक्यात माझे असंख्य नातेवाईक , पण माझ्याविषयी त्यांनी काही चागले पोस्ट केले त्याला धमकी देतात. आमच्या शिवसैनिकाला धमकी देतात. आतापर्यंत पाच सहा वेळा आमच्या शिवसैनिकांनी भाजपा आमदार निवडून आणला, आताही आणला, आणि त्याने काही काम सांगितले की त्याला म्हणताय आमच्या पक्षात प्रवेश घ्या, कोणत्याही कार्यकर्त्याने काम सांगितले की त्याला पक्ष सोडा म्हणतात. आमची बाळासाहेबांची शिवसेना आहे . शिवसेना चिरडायला निघत असेल तर आम्ही तो त्रास दूर करायला आलो आहे, विधानसभा लढायला नाही. आता आम्ही पण पाहणार , कोणाला धमकी देणार, कोणाला जेलमध्ये घालणार, आमच्या पण कानावर आहे आमदार काय करतात, मी काही घरातला आमदार नाही.. (१.१० ते ८.१० पर्यंत.) साउंड बाई ट संजय गायकवाड, आमदार .
926
comment0
Report
SNSWATI NAIK
Mar 28, 2026 08:04:54
Navi Mumbai, Maharashtra:तालुक्यातील वर्चस्व्याला धक्का बसल्याने डीडीएसआर ग्रुप वर गोपीचंद पडळकरांचे बिनबुडाचे आरोप. आमदार गोपीचंद पडळकर यांनी नवी मुंबईतील डीडीएसआर ग्रुप बाबत केलेल्या गैरकारभाराच्या आरोपांचे डीडीएसआर ग्रुप तर्फे खंडन करण्यात आलेय. आम्ही आता पर्यंत सर्व काम नियमात केले असून अनेक इमारती उभ्या करुन नागरिकांना घरे दिली आहेत. गोपीचंद पडळकर यांचे आटपाडी तालुक्यातील वर्चस्व धोक्यात आल्याने त्यांनी हे बिनबुडाचे आरोप केले असून याआरोपात कोणतेही तथ्य नसल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. आमच्या विरोधात कोणते पुरावे असल्यास त्यांनी समोर आणावे अन्यथा चौकशी अंती क्लीनचिट मिळाल्यावर मानहानीचा दावा दाखल करू असा इशारा यावेळी डीडीएसआर ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक राहूल हजारे यांनी दिलाय.
1056
comment0
Report
SKSACHIN KASABE
Mar 28, 2026 07:46:45
Pandharpur, Maharashtra:चैत्र वारीसाठी आलेल्या वारकऱ्यांना गॅस सिलेंडर टंचाई, वारकऱ्यांनी तीन दगड गोळा करून स्वयंपाकासाठी पेटवल्या चुली मध्य पूर्व मधील युद्ध परिस्थिती कायम असल्याने गॅस सिलेंडर टंचाई सुरू आहे. याचा फटका आता चैत्र वारीसाठी आलेल्या वारकऱ्यांना बसला आहे. चैत्र वारी साठी अनेक दिंड्या आज पंढरपूर मधील भक्ती सागर परिसरात दाखल झाल्या आहेत. या ठिकाणी एक दृश्य दिसत आहे. दिंड्या मधील महिलांनी स्वयंपाकासाठी चुली मांडल्या आहेत. याच चुलीवर त्यांनाच स्वयंपाक सुरू आहे. गॅस टंचाई मुळे सिलेंडर उपलब्ध झाले नाही. त्यामुळे स्वयंपाक करण्यासाठी सरपण विकत घेऊन, गोळा करून चुली पेटवण्याची आणि स्वयंपाक करण्याची वेळ वारकऱ्यावर आली आहे.
1036
comment0
Report
MAMILIND ANDE
Mar 28, 2026 07:45:59
Wardha, Maharashtra:तरुणाने शकल लढवत ऑइल शेगडीतून केली गॅस टंचाईवर मात गॅस तुटवड्यावर ऑइल शेगडीचे ग्रामीण जुगाड कारंजा घाडगे येथे तरुणाने केले जुन्या वापरलेल्या ऑइल शेगडीचे जुगाड पर्याय असलेली  शेगडी ठरली वरदान अँकर : गॅस तुटवड्यामुळे नागरिक हैराण झाले आहे. गॅस एजन्सीपुढे रांगा लागत असताना वर्ध्याच्या कारंजा घाडगे येथे एका एकोणवीस वर्षाच्या तुरुणाने आपली व्यवसायिक चूल पेटविण्यासाठी वेगळीच शक्कल लढवलीय. जुन्या वापरलेल्या ऑइलवर चालणारी शेगडी तयार करणारे जुगाडू तंत्र या ग्रामीण भागातील तरुणाने वापरून गॅस तुटवड्यामुळे बंद झालेली आपली चहाची टपरी पुन्हा सुरु केलीय. विवो : अमरावती नागपूर मार्गावर कारंजा घाडगे येथील पुलाच्या खाली चहा शिजवीणारा हा आहे रामेश्वर ठाकूर.. नववी पर्यंत गावातच शिक्षण झालेल्या रामेश्वरने एक वर्षापासून येथे चहाचा व्यवसाय सुरु केला. टपरीतून रोजगार मिळवत दोन पैसे हाती येत असताना अचानक गॅस संपली. तुटवड्यामुळे सिलेंडर देखील उपलब्ध झाले नाही. अखेर त्याच्या मित्राच्या साहाय्याने जुन्या जळालेल्या ऑइलपासून इंधन उपलब्ध होऊ शकते ही कल्पना त्याला आली. त्याने लागलीच बॅटरी, मोटारीचा फॅन, फिल्टर , पाईप, नळ आणि एक छोटी टॅंक याचे जुगाड तयार करून ऑइलवर चालणारी शेगडी तयार केली आहे. बाईट : रामेश्वर ठाकूर, कँटीन चालक विवो : या शेगडीवर आता चहा शिजवीला जातोय. एक लिटर जुन्या ऑइलमध्ये दीड तास शेगडी चालते. दिवसभऱ्यात रामेश्वरला तीन लिटर ऑइल लागतं. सर्वत्र हॉटेलं बंद व्हायची वेळ आली असताना रामेश्वरच्या या जुगाडू तंत्राने व्यवसायिक सिलेंडरला पर्याय उपलब्ध करून दिलाय. बाईट :  भैरव कुहीके,कॅन्टीन मालक फायनल विवो : गॅसचा तुटवडा असताना ग्रामीण भागात टाकाऊ ऑइल पासून बेरोजगारीवर मात करणारी ही चूल या चहावाल्याला वरदान ठरलीय.. मिलिंद आंडे, झी 24 तास,वर्धा
1090
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 28, 2026 07:02:13
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर : रूपाली चाकणकर यांनी दिलेल्या राजीनाम्यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिक्रिया... # जेव्हा अशा प्रकारचे आरोप होतात तेव्हा राजीनामा दिलाच पाहिजे, पण मी जेव्हा टीव्हीच्या माध्यमातून खरात वरचे सर्व आरोप पाहतो तेव्हा असं वाटतं की त्याला चौकात उभं करून सर्वांनी सुया टोचल्या पाहिजे आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला पाहिजे, अशा प्रकारचे भोंदू बाबा फक्त समाजाला त्रास देत नाहीत तर आमच्या धर्माला देखील बदनाम करतात, ज्या प्रकारे एक दिवसाचा मुख्यमंत्री करता येतं, त्याप्रमाणे एक दिवसाचा कायदा बदला आणि खरातला भर चौकात सुया टोचा, खरात ने छत्रपतींच्या महाराष्ट्राचा अपमान केला आहे, त्याला शिक्षा दिल्यामुळे देशभरातील भोंदू बाबांना कळेल की तुमचा मृत्यू निश्चित आहे
980
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 28, 2026 06:33:16
Kolhapur, Maharashtra:बेळगाव महानगरपालिकेत मराठी भाषिकांच्या भूमिकेविरोधात नवा ठराव येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कन्नड संघटनांकडून महाजन आयोगाची अंमलबजावणी करून सीमा प्रश्न संपल्याचा ठराव करावा, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर बेळगावच्या महापौरांची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या बेळगाव महानगरपालिकेत भाजपची सत्ता असून महापौर आणि उपमहापौर हे कन्नड भाषिक आहेत. दरम्यान, 2005 साली बेळगाव महानगरपालिकेत सीमाभाग महाराष्ट्रात विलीन करण्यात यावा, असा ठराव मंजूर करण्यात आला होता. त्या ठरावाला विरोध म्हणून आत्ता कन्नड संघटनांनी तीव्र भूमिका घेतली आहे. दरम्यान कन्नड संघटनांच्या या भूमिकेला महाराष्ट्र एकीकरण समिती त्याचबरोबर ठाकरे शिवसेनेनं तीव्र विरोध केला है. अशा प्रकारचा ठराव महापौरांनी करू नये अन्यथा उद्रेक होईल असं शिवसेना ठाकरे गटाचे नेते विजय देवणे यांच्या म्हटले आहे.
1075
comment0
Report
SKSACHIN KASABE
Mar 28, 2026 06:31:46
1064
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Mar 28, 2026 06:31:26
Satara, Maharashtra:सातारा जिल्ह्यातील डोंगरी भागातील कला, संस्कृती आणि खेळांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी यावर्षी 'डोंगरी महोत्सवा'चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. गेल्यावर्षीच्या यशस्वी आयोजनानंतर यंदा हा महोत्सव 2 एप्रिल ते 6 एप्रिल असा पाच दिवसांचा असेल अशी माहिती साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आहे दिली. पाच दिवसांमध्ये दररोज सायंकाळी एका विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये पोवाडे, भजनी मंडळ, लावणी महोत्सव आणि मराठी-हिंदी गीतांचा ग्रांड फिनाले. पॅराग्लायडिंग, बोटिंग, हॉर्स रायडिंग आणि उंट सवारी.कृषी प्रदर्शन, पशु-पक्षी प्रदर्शन आणि महिला बचत गटांचा भव्य मेळावा.भव्य फन फेअर आणि खाद्य जत्रा हे सर्व कार्यक्रम या दिवसात होणार आहेत दुर्गम भागातून येणाऱ्या लोकांसाठी विशेष एसटी बसची सोय करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आहे
1014
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 28, 2026 06:01:32
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- इराण-अमेरिका- इजरायल युद्ध थांबावं यासाठी चंद्रपुरात तयार करण्यात आले विश्वविक्रमी विश्व शांती चिन्ह. चंद्रपूर येथील सोमय्या ग्रुपच्या विद्यार्थ्यांनी केला विक्रम, वर्ल्ड पीस सिम्बॉल तयार करून नोंदविला गेला नवीन गिनीज विश्वविक्रम . अँकर:-- इराण-अमेरिका- इजरायल युद्ध थांबावं यासाठी चंद्रपुरात विश्वविक्रमी विश्व शांती चिन्ह करण्यात आले. चंद्रपूर येथील सोमय्या ग्रुपच्या विद्यार्थ्यांनी हा विश्वविक्रमी केला. विद्यार्थ्यांनी "वर्ल्ड पीस सिम्बॉल" तयार करून नवीन गिनीज विश्वविक्रम नोंदवला. 2019 साली 1074 विद्यार्थ्यांनी वर्ल्ड पीस सिम्बॉल तयार करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद केली होती. चंद्रपुरात आज सोमय ग्रुपच्या वतीने हा रेकॉर्ड मोडला गेला. तब्बल 1381 विद्यार्थी यात सामील झाले. गिनीजच्या अधिकाऱ्यांनी हा विश्वविक्रम झाल्याचे जाहीर करत तसे प्रमाणपत्र आयोजकांना दिले. या विक्रमासह चंद्रपूरकरांच्या नावे चौथा विश्वविक्रम नोंदला गेलाय. आशीष अम्बाडे
1077
comment0
Report
Advertisement
Back to top