Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Bhandara441904

भंडारा के साकोली में आवारा कुत्तों ने 14 लोगों पर हमला कर घायल किया

PTPRAVIN TANDEKAR
Feb 24, 2026 10:19:52
Bhandara, Maharashtra
भंडाराच्या साकोली मध्ये भटक्या कुत्र्यांचा हैदोस...तब्बल चौदा जणांचा घेतला चावा ...नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.. भंडारा जिल्ह्यातील साकोली व जांभळी येथे सकाळी भटक्या कुत्र्यांनी चक्क 14 जणांवर जीव घेणा हल्ला करत जखमी केले आहे. या हल्ल्यामध्ये वयोवृद्ध नागरिक व तरुणांचाही समावेश आहे. आज सकाळी भटक्या कुत्र्यांच्या चाव्याने जखमी झालेल्या नागरिकांना उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण साकोली परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत नागरिकांमध्ये निर्माण झाली असून नागरिक घराबाहेर निघायला घाबरत आहेत सकाळी घडलेल्या घटनेमुळे शाळेकरी विद्यार्थी व वयोवृद्ध नागरिक यांना जास्त धोका निर्माण झालेला असून. नगरपरिषद साकोली प्रशासनाने या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांडून होत आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SNSWATI NAIK
Feb 24, 2026 11:47:00
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Feb 24, 2026 11:46:44
Ambernath, Maharashtra:बदलापुरातील स्त्रीबीज तस्करी प्रकरणी चौथी अटक अटक करण्यात आलेल्या महिलेचं नाव सोनल गरीवाल स्त्रीबीज प्रकरणात महिलांची बेकायदेशीर सोनोग्राफी केल्याचा आरोप Anchor - बदलाپورातील स्त्रीबीज तस्करी प्रकरणात चौथ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सोनल गरीवाल या महिलेला अटक केली. त्या प्रकरणात अवैधरित्या सोनोग्राफीसाठी मदत केल्याचा तिच्यावर आरोप आहे. बदलापुरातील स्त्रीबीज तस्करी प्रकरणात याआधी पोलिसांनी तीन महिलांना अटक केली होती. यातील सुलक्षणा गाडेकर, अश्विनी चाबुकस्वार आणि मंजुषा वानखेडे या आरोपींना 25 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. या प्रकरणी पोलिसांनी सोनल गरेवाल या आणखी एका महिलेला अटक केलीय. या चौघींच्या घरातून संशयास्पद इंजेक्शन तसंच इतर साहित्य जप्त करण्यात आलय. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत. Byte - सचिन गोरे, पोलीस उपायुक्त चंद्रशेखर भुयार ,बदलापूर
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Feb 24, 2026 11:31:51
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Feb 24, 2026 11:23:47
Akola, Maharashtra:Anchor : अकोल्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बिश्नोई गॅंगशी संबंधित असल्याचा आरोप असलेला शुभम लोणकर आणि अकोला पश्चिमचे काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांच्यातील संभाषणाची एक ऑडिओ क्लिप समोर आल्याने खळबळ उडाली आहे. ही ऑडिओ क्लिप झी 24 तासच्या हाती लागली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी शुभम लोणकर याने विदेशातून आमदार साजिद खान पठाण यांना फोन केला होता.या फोन कॉलमध्ये तब्बल १० कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. संबंधित ऑडिओ क्लिपमध्ये दोघांमधील संभाषण ऐकू येत असून, पैशांची मागणी पूर्ण न केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी देण्यात आल्याचेही समोर आले आहे.या प्रकरणामुळे अकोला जिल्ह्यात राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.या ऑडिओ क्लिपची सत्यता आणि तपासाबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नसली, तरी पोलिस यंत्रणा या प्रकरणाची चौकशी करणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.दरम्यान, या घटनेमुळे लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. पुढील तपासानंतर या प्रकरणात आणखी कोणती माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Feb 24, 2026 10:24:35
Akola, Maharashtra:भारताचे कृषी भविष्य, लवचिकता, शाश्वतता आणि सर्वसमावेशक विकासाचे मार्ग या महत्त्वपूर्ण विषयावर अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र सोसायटी ऑफ एग्रीकल्चर इकॉनॉमिक्स आणि कृषी अर्थशास्त्र व सांख्यिकी विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे.कृषीप्रधान असलेल्या भारतातील मोठ्या लोकसंख्येचा उदरनिर्वाह शेती क्षेत्रावर अवलंबून आहे. मात्र हवामान बदल, तंत्रज्ञानातील वेगवान प्रगती, जागतिक बाजारपेठेतील स्पर्धा आणि सामाजिक बदल यांच्या पार्श्वभूमीवर कृषी क्षेत्रासमोर नवी आव्हाने उभी ठाकली आहेत. या पार्श्वभूमीवर कृषी क्षेत्र अधिक सक्षम, टिकाऊ आणि लवचिक कसे बनविता येईल, यावर या परिसंवादात सखोल चर्चा करण्यात येत आहे.राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतील तज्ञ, देशातील नामवंत कृषी अर्थतज्ञ तसेच महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोग चे अध्यक्ष पाशा पटेल हे या परिषदेत प्रमुख उपस्थित होते.दोन दिवसीय या चर्चासत्रातून शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध शिफारशी तयार करून त्या राज्य व केंद्र सरकारकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Feb 24, 2026 10:03:29
Chendhare, Maharashtra:स्‍लग – रायगड जिल्‍हा परीषदेतील सत्‍तेसाठी हालचाली शिवसेनेला डावलून भाजप – राष्‍ट्रवादीची सत्‍ता अॅड. आस्वाद पाटील यांचे स्‍पष्‍ट संकेत वरिष्‍ठांचा आदेश आल्‍यास शिवसेनेचाही सहभाग अँकर – रायगड जिल्‍हा परीषदेतील सत्‍तेत सहभागी होण्याची शिवसेनेची स्‍वप्न हवेत विरण्‍याची शक्‍यता आहे. भाजप आणि राष्‍ट्रवादी कॉंग्रेस एकत्र येवून सत्‍ता स्‍थापन करतील त्‍याचवेळी शिवसेना शिंदे गटाला सहभागी करून घेतले जाणार नसल्‍याचे संकेत भाजप नेते अॅड. आस्‍वाद पाटील यांनी दिले आहेत. अलिबाग येथे भाजप पक्षप्रवेश कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. भाजप आणि राष्‍ट्रवादी कॉंग्रेसची निवडणूक पूर्व युती होती. आणि आम्‍ही बहुमताचा आकडा गाठला असल्‍याने आम्‍ही सत्‍तेत बसू अशी सध्‍या तरी परीस्थिती आहे. मात्र वरिष्‍ठांकडून आदेश आल्‍यास शिवसेनेलाही सत्‍तेत सहभागी करून घेतले जाईल, असं आस्‍वाद पाटील यांनी स्‍पष्‍ट केलं.
0
comment0
Report
Advertisement
Back to top