Back
पैठण दशक्रिया घाट पर नदी में सोना-चांदी खोजने वालों की भीड़ तेज़
VKVISHAL KAROLE
Feb 24, 2026 09:52:34
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Anchor गोदावरी नदी काठी वसलेल्या पैठण शहरालगतच्या दशक्रिया घाट परिसरात सध्या गोरगरीब नागरिकांची मोठी झुंबड उडाली आहे. भाविकांनी गोदामाईला अर्पण केलेले सोन्याचांदीचे दागिने आणि नाणी शोधण्यासाठी शेकडो महिला-पुरुष तळपत्या उन्हात नदीपात्रात उतरलेले दिसत आहेत. सोन चांदीच्या शोधत ही मंडळी पूर्ण दिवस नदीपात्रात घालवत आहेत पाहुयात काय आहे प्रकार... सोन चांदी शोधण्यासाठी अनेकांच्या नदीत उड्या! पूर्ण दिवस नदी पात्रात चालते शोध मोहीम.. दिवसाला 700 ते 800 रुपयासाठी जीव धोक्यात... धार्मिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पैठण ला ‘दक्षिण काशी’ असेही म्हटले जाते. इथेच गोदावरीच्या पात्रात सध्या अशी झुंबड उडालेली आहे, नाथ षष्ठी निमित्त पात्रात पाणी कमी करण्यात आले आहे, त्यामुळं पाणी कमी झाले आणि त्यातील मौल्यवान वस्तू शोधण्यासाठी ही चढाओढ सुरू आहे... येथे मृत व्यक्तीच्या अस्थी गोदावरी नदी पात्रात विसर्जित केल्यास मोक्षप्राप्ती होते, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे दशक्रिया घाटावर दररोज शंभराहून अधिक विधी पार पडतात. राख विसर्जन करताना राखे सोबत मृतांच्या अंगावरील सोने चांदी ही विसर्जित होते तर विधीनंतर मोक्ष प्राप्ती साठी नातेवाईकही पवित्र नदीत सोन्या-चांदीचे दागिने व नाणी अर्पण करतात. आणि ते शोधण्यासाठी ही सगळी धडपड सुरू आहे.. अनेक कुटुंबांचा उपजीविकेचा हे साधन बनले आहे. एरव्ही वर्षभर सुमारे पाच पन्नास जण ही शोधमोहीम राबवतात. मात्र दरवर्षी मार्च महिन्यात भरत असलेल्या नाथषष्ठी यात्रा निमित्ताने नदीतील पाणी कमी केले जाते. यावेळी उघड्या पडलेल्या नदीपात्रातील वाळूत दडलेले दागिने आणि नाणी शोधण्यासाठी मोठी गर्दी होते, लोखंडी चाळणीच्या साहाय्याने पाण्यात डुबक्या मारून शोध घेतला जातो. काहींच्या हाती दान लागते, तर काहीजण रिकाम्या हाताने परततात. या माध्यमातून मिळालेले दागिने शहरातील केवळ दोन सोनार दुकानदार खरेदी करतात. मिळालेल्या पैशावर शहरातील शंभर ते दोनशेहून अधिक कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. शेकडो वर्षांपासून ही परंपरा सुरू असल्याचे स्थानिक सांगतात. शोधमोहीम करणारे तळपत्या उन्हात हा प्रकार सध्या सुरू आहे, यातून एकाला दिवसातून हजारावर रुपये मिळतात, मात्र त्यासाठी जीव धोक्यात घालून नदीच्या पात्रात दिवस घालवावा लागतो, आता यात कुणाला भरपूर सापडले तर नाथ पावतो तर इतर जण किमान उद्या नाथ आपल्याला पावेल या आशेने पुन्हा दुसऱ्या दिवशी ही शोध मोहीम सुरू करतात...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VKVISHAL KAROLE
FollowFeb 24, 2026 11:48:39Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:दरम्यान विभागीय आयुक्त यांनी haiद्राबाद गॅजेट समिती बाबत सारवासारव केली आहे. काम करण्याबाबत अनेक तक्रारी होत्या, त्यासाठी एकूण कार्यपद्धती ठरवण्यासाठी समिती असल्याचं आयुक्तांनी सांगितले.
0
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 24, 2026 11:47:000
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowFeb 24, 2026 11:46:440
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowFeb 24, 2026 11:31:510
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 24, 2026 11:23:470
Report
NMNITESH MAHAJAN
FollowFeb 24, 2026 11:02:350
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 24, 2026 10:48:360
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowFeb 24, 2026 10:45:590
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 24, 2026 10:37:510
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 24, 2026 10:31:450
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 24, 2026 10:30:400
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 24, 2026 10:27:310
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 24, 2026 10:24:350
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowFeb 24, 2026 10:19:520
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowFeb 24, 2026 10:03:290
Report