Back
नवी मुंबई अंतरराष्ट्रीय विमानतळ शुरू: पहला यात्री विमान कल उतरेगा; कार्गो सेवा भी शुरू
SNSWATI NAIK
Dec 24, 2025 13:38:44
Navi Mumbai, Maharashtra
अत्याधुनिक ग्रीनफिल্ড विमानतळ म्हणून नावजले गेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या धावपट्टीवर उद्या 25 डिसेंबर रोजी पहिलं प्रवासी विमान उतरणार आहे. सकाळी 8 वाजता इंडिगोचे 6 E 460 हे विमान बंगळूरू येथून दाखल होणार आहे. यानंतर सकाळी 8.40 वाजता इंडिगोचेच 6 E 882 हे विमान हैदराबादकडे रवाना होणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करणारं हे पहिलं विमान असणार आहे. यासोबतच मालवाहतूक सेवा (कार्गो) ही सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी आज सिडको भवन इथं आयोजित पत्रकार परिषदेत दिली. पहिल्या दिवशी 30 विमानं ची आवाक जावक होणार आहे। दिवसभरात 4 हजार प्रवासी वाहतूक राहणार आहे. तर 15 जानेवारी पर्यंत हा आकडा वाढत दररोज 48 विमान उड्डाण करणार आहेत. या विमानतळावरून दरवर्षी अंदाजे 9 कोटी प्रवासी प्रवास करतील. सध्या केवळ देशांतर्गत असलेली ही विमानसेवा मार्च महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय विमानसेवेपर्यंत विस्तारली जाणार आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात या विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानं उड्डाण करणार आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित झाल्यामुळे मुंबई महानगर प्रदेशातील हवाई वाहतुकीवरील ताण कमी होणार आहे. हे विमानतळ कार्यान्वित झाल्याने नागरिकांनाही देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासासाठी मोठा लाभ मिळणार आहे. या प्रकल्पामुळे रोजगारनिर्मिती, पर्यटनवृद्धी आणि औद्योगिक व व्यापारी गुंतवणुकीला देखील चालना मिळणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी ही या प्रकल्पाचं वैशिष्ट्य आह. महामार्ग, द्रुतगती मार्ग, उपनगरीय रेल्वे, मेट्रो मार्गिका यामुळे विमानतळाकडे विविध दिशांनी सहज व सुरळीत पोहोचणे शक्य होणार आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल)सारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांमुळे विमानतळ सर्व मार्गांनी जोडले जाणार आहे. हा मार्ग चिरले इथं पोहोचून विमानतळाकडे जाण्यासाठी मार्ग तयार करण्यात आला आहे. गुगल मॅपमध्येही याबाबत माहिती देण्यात आली असल्याचंही सिंघल यांनी सांगितलं.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSATISH MOHITE
FollowDec 24, 2025 13:40:550
Report
PNPratap Naik1
FollowDec 24, 2025 13:39:040
Report
PNPratap Naik1
FollowDec 24, 2025 13:18:100
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowDec 24, 2025 12:53:170
Report
SKShubham Koli
FollowDec 24, 2025 12:50:210
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 24, 2025 12:31:380
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowDec 24, 2025 11:49:440
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 24, 2025 11:49:090
Report
DPdnyaneshwar patange
FollowDec 24, 2025 11:48:410
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 24, 2025 11:35:300
Report
PPPRANAV POLEKAR
FollowDec 24, 2025 11:35:220
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 24, 2025 11:09:120
Report
SKShubham Koli
FollowDec 24, 2025 10:27:060
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowDec 24, 2025 10:26:000
Report
