Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane410210

नवी मुंबई उद्यान विभाग के भ्रष्टाचार पर मनसे का बड़ा आरोप—जांच की मांग

SNSWATI NAIK
Dec 13, 2025 07:24:04
Navi Mumbai, Maharashtra
Anchor - नवी मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागातील भ्रष्टाचार मनसेने समोर आणलाय. उद्यानामधील खेळणी, खुली व्यायामशाळा, बेंच हे साहित्य बाजारभावा पेक्षा चढ्या दराने खरेदी करत 100 ते 150 कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आल्याचा आरोप मनसेने केलाय. प्रशासन काळात मागील 5 वर्षांपासून अवास्तव खर्च करुन भ्रष्टाचार करण्यात येतं असून शासनाने उद्यान विभागातील भ्रष्ट कारभाराची सखोल चौकशी करुन मागील 5 वर्षातील उद्यान विभागातील कामाची श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी केलेय.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
HCHEMANT CHAPUDE
Mar 12, 2026 10:22:41
Shirur, Maharashtra:चाकण औद्योगिक क्षेत्रात घरगुती गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांना कडाक्याच्या उन्हात मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. चाकणमध्ये घरगुती गॅस सिलेंडरसाठी नागरिकांना भल्या पहाटेपासूनच रांगे लावाव्या लागत असून अनेक ठिकाणी तब्बल एक किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे. मात्र एवढ्या वेळ प्रतीक्षा करूनही अनेकांना दुपारपर्यंत सिलेंडर मिळत नसल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे.दरम्यान, वाढत्या तापमानामुळे कडाक्याच्या उन्हात तासन्तास उभे राहावे लागत असल्याने नागरिकांना उष्णतेचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे चाकण औद्योगिक क्षेत्रात एचपीसीएल आणि भारत गॅसचे मोठे प्लँट असतानाही स्थानिक पातळीवर गॅसचा तुटवडा जाणवत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे राज्यातील गॅस पुरवठ्याच्या परिस्थितीबाबतही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 12, 2026 10:19:26
Akola, Maharashtra:अकोला शहरातील महात्मा गांधी मार्गावर असलेल्या बिंदिघर या कॉस्मेटिक दुकानाशी संबंधित गंभीर प्रकरण उघडकीस आल्यानंतर परिसरातील अवैध बांधकामांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला होता. एका महिलेचा व्हिडिओ काढून ब्लॅकमेलिंग करत तिच्यावर जबरदस्ती केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर महापालिका प्रशासनाने याठिकाणी अवैधरित्या उभारण्यात आलेल्या दुकानांवर कारवाई केली होती.मात्र काही दिवस उलटताच पुन्हा त्याच ठिकाणी अवैध दुकाने उभारण्यात आल्याचे दिसून आले. या प्रकाराविरोधात हिंदू संघटनांनी तीव्र आक्षेप घेत आवाज उठवला. त्यानंतर आज महापालिका प्रशासनाने पोलिस बंदोबस्तात पुन्हा एकदा या अतिक्रमणांवर कारवाई करत अवैध दुकाने हटवली.मात्र अतिक्रमण हटवल्यानंतरही पुन्हा राजरोसपणे दुकाने उभारली जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे का, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 12, 2026 09:56:16
Akola, Maharashtra:मध्य-पूर्व भागात सुरू असलेल्या युद्ध परिस्थितीचा परिणाम आता इंधन बाजारावरही दिसून येत आहे. यामुळे एलपीजी गॅसच्या पुरवठ्यावर परिणाम झाला असून अकोला शहरातील काही पेट्रोल पंपांवर एलपीजी गॅसची तात्पुरती कमतरता निर्माण झाली आहे. अकोला शहरातील एलपीजी गॅस पंप गॅस पुवठा अभावी बंद आहे. शहरातील काही एलपीजी पंपांवर व्यवस्थापनाकडून याबाबत सूचना फलक लावण्यात आले आहेत. या फलकांवर सध्याच्या परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा पुरवठा प्रभावित होत असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच एलपीजीच्या दरांमध्येही बदल करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. याशिवाय पेट्रोल पंपांवर सुरू असलेले विशेष ऑफर सध्या तात्पुरते बंद करण्यात आले आहेत. परिस्थिती सामान्य झाल्यानंतर गॅसचा पुरवठा आणि दर पुन्हा पूर्ववत केले जातील, असेही व्यवस्थापनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, ग्राहकांनी या परिस्थितीची जाणीव ठेवून सहकार्य करावे, असे आवाहन पंप व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे तसेच ग्राहकांच्या संयम आणि सहकार्याबद्दल आभारही व्यक्त करण्यात आले आहेत.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Mar 12, 2026 09:47:26
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 12, 2026 09:33:58
0
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 12, 2026 09:23:49
Nagpur, Maharashtra:बाईट – डॉ. विपीन इटनकर,जिल्हाधिकारी, नागपूर नागपूर - - नागपुरात सध्या एलपीजी गॅसचा कोणताही तुटवडा नसल्याची माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली असून, याबाबत प्रशासनाकडून परिपत्रकही जारी करण्यात आले आहे. - गॅसची अवैध साठवणूक करून काळाबाजार карданиाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. - गरजेनुसार व्यावसायिक आणि घरगुती गॅस सिलेंडर मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. - गॅसचा तुटवडा होणार नसल्याने घाबरून जाऊन कोणीही गॅस खरेदीसाठी गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. - सध्या नागपुरात एकही हॉटेल बंद नसल्याची माहितीही अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. - शाळा, आरोग्य विभाग आणि इतर अत्यावश्यक सेवांना गॅस पुरवठ्यात प्राधान्य द्यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 12, 2026 09:18:56
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली जिल्ह्यातील अनेक हॉटेल्स मध्ये कोळशाच्या शेगडीवर स्वयंपाक, हॉटेलमध्ये मिळणारे 60 टक्के पदार्थ बंद. आखाती देशांमध्ये सुरू असणाऱ्या युद्धाचा परिणाम आता सांगली जिल्ह्यातील हॉटले व्यवसायावर देखील होऊ लागलाय. जिल्ह्यातील हॉटेलला पुरवठा करण्यात येणाऱ्या व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा जवळपास ठप्प होत आला आहे. त्यामुळे अनेक हॉटेल्स मध्ये सध्या कोळशाच्या शेगडीवर स्वयंपाक करण्याचे काम सुरू आहे. तसेच मोठया हॉटेल मध्ये नाष्टासह ,चायनीज पदार्थ व चहा बंद करण्यात आला आहे.यामुळे सांगलीतील हॉटेल व्यवसाय आता 40 टक्क्यावर आला आहे,तुळे हॉटेल व्यवसाय अडचणीत येत असल्याचे हॉटेल मालक सांगत आहेत.
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Mar 12, 2026 08:50:53
Beed, Maharashtra:बीड: जर आपल्यावर कोणी हल्ला करत असेल तर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी हातातील कुऱ्हाडीचा वापर करा, लक्ष्मण हाके यांचे चितावणीखोर आवाहन.... ANC -महाराष्ट्रात मेंढपाळांवर वारंवार होत असलेल्या हल्ल्यांबाबत संताप व्यक्त करत ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी धनगर समाज बांधवांना आवाहन केले आहे. “राज्यात कायद्याचे राज्य आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. मेंढपाळांवर हल्ल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. कोणी जर आपल्यावर हल्ला करत असेल तर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी हातातील कुऱ्हाडीचा वापर करा. मी चिथावणी देत नाही, तर जबाबदारीने बोलत आहे,” असेही ते म्हणाले. माजलगाव तालुक्यात मेंढपाळांना मारहाण झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रा. हाके यांनी माजलगाव पोलीस ठाण्यात भेट देत पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी त्यांनी केली. आरोपींवर पोलिसांचा धाक राहिलेला नाही, असा आरोपही त्यांनी केला. या मारहाण प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात आली नाही, तर धनगर समाजाच्या वतीने पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, प्रा. हाके यांनी मारहाण झालेल्या बीटे बंधूंच्या आई-वडिलांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी बीटे बंधूंचे आजोबा यांनीही आपल्या भावना व्यक्त करत “आमच्यावर अन्याय झाला तर आम्ही तो सहन करणार नाही,” असे सांगितले. बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले. बाईट: लक्ष्मण हाके ओबीसी आंदोलक.. बाईट: पीडित कुटुंब
0
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Mar 12, 2026 08:50:34
Pune, Maharashtra:मावळच्या इंद्रायणी तांदळाचा सुगंध सात समुद्रापार आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दरवळतो. मात्र आखाती देशांतील युद्धाच्या काळ्या ढगांमुळे या सुगंधी तांदळाच्या निर्यातीवर संकट ओढावू लागलं आहे. मावळ तालुक्यात पिकणारा इंद्रायणी तांदूळ आपल्या उत्कृष्ट चव, नैसर्गिक सुगंध आणि पौष्टिक गुणधर्मांमुळे देशासह परदेशातही प्रसिद्ध आहे. विशेषतः युनायटेड किंगडम आणि युनायटेड अरब अमिराती या देशांमध्ये या तांदळाची मोठ्या प्रमाणावर निर्यात केली जाते. मात्र युद्धामुळे मावळच्या इंद्रायाणी तांदळाच्या निर्यातीवर देखील परिणाम झाल्याचे चित्र आहे. मावळ तालुक्यातील इंद्रायणी तांदळाच्या एकूण निर्यातीपैकी सुमारे ७७ टक्के तांदूळ युनायटेड किंगडमला तर जवळपास २३ टक्के तांदूळ युनायटेड अरब अमिरातीमध्ये निर्यात केला जातो. यामुळे मावळातील राईस मिल मधील काम देखील ठप्प पडल्याचे चित्र आहे. या राईस मिल चालकांशी संवाद साधला आहे आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी. मात्र सध्या आखाती भागातील युद्ध परिस्थितीचा फटका भात उत्पादक शेतकऱ्यांना बसू लागला आहे. निर्यात केलेला इंद्रायणी तांदूळ जेएनपीटी बंदरावर अडकून पडल्याने भात गिरण्या, व्यापारी आणि शेतकरी सगळेच चिंतेत आहेत. परिणामी पुणे मार्केट यार्ड आणि नवी मुंबईतील एफएमसी मार्केट यार्डमध्येही व्यवहार मंदावले असून बाजारपेठेत एक प्रकारची शांतता पाहायला मिळत आहे. स्थानिक बाजारात या तांदळाची किंमत साधारण ५० ते ६० रुपये प्रति किलो असून, गुणवत्ता आणि पॉलिशिंगनुसार निर्यात बाजारात ती तब्बल १२५ रुपयांपर्यंत पोहोचते. मात्र सध्या निर्यात बंद असल्याने याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. End Vo: मावळ भागातील हवामान आणि जमीन इंद्रायणी तांदळाच्या लागवडीसाठी अत्यंत अनुकूल मानली जाते. त्यामुळे येथील शेतकरी सुमारे साडे बारा हजार हेक्टर क्षेत्रात हा सुगंधी, मध्यम आकाराचा आणि चिकट पोत असलेला तांदूळ पिकवतात. नैसर्गिक सुगंध, पौष्टिकता आणि फायबरयुक्त गुणधर्मांमुळे या तांदळाची मागणी देशासह परदेशात सातत्याने वाढत आहे. मात्र मावळच्या सुगंधी इंद्रायणी तांदळावर आता आंतरराष्ट्रीय घडामोडींची सावली पडल्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यांची चिंता वाढली आहे.
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Mar 12, 2026 08:47:47
Amravati, Maharashtra:Vo१: अमरावतीच्या वलगाव पोलीस स्टेशन हद्दीतील खारतळेगाव येथे ही घटना घडली. मंगेश देविदास गोटे, वय 45 वर्षे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगेश गोटे यांना दारू पिण्याचे व्यसन होते. यामुळे घरामध्ये पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान पुन्हा एकदा दारूच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादातून संतापलेल्या पत्नीने पतीला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचे समोर आले आहे. या मारहाणीमुळे मंगेश गोटे यांची प्रकृती गंभीर बिघडली आणि त्यांची मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वलगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. दरम्यान, पत्नीने पतीला मारहाणीची कबुली दिल्याची माहितीही पोलिसांकडून देण्यात आली आहे. या प्रकरणी वलगाव पोलीस अधिक तपास करत असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. Vo२: घरगुती वाद आणि दारूच्या व्यसनातून घडलेल्या या घटनेमुळे खारतळेगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. वलगाव पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top