Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Akola444001

मध्य-पूर्व युद्ध से ईंधन बाजार प्रभावित, आकोला में एलपीजी गैस की कमी शुरू

JJJAYESH JAGAD
Mar 12, 2026 09:56:16
Akola, Maharashtra
मध्य-पूर्व भागात सुरू असलेल्या युद्ध परिस्थितीचा परिणाम आता इंधन बाजारावरही दिसून येत आहे. यामुळे एलपीजी गॅसच्या पुरवठ्यावर परिणाम झाला असून अकोला शहरातील काही पेट्रोल पंपांवर एलपीजी गॅसची तात्पुरती कमतरता निर्माण झाली आहे. अकोला शहरातील एलपीजी गॅस पंप गॅस पुवठा अभावी बंद आहे. शहरातील काही एलपीजी पंपांवर व्यवस्थापनाकडून याबाबत सूचना फलक लावण्यात आले आहेत. या फलकांवर सध्याच्या परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा पुरवठा प्रभावित होत असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच एलपीजीच्या दरांमध्येही बदल करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. याशिवाय पेट्रोल पंपांवर सुरू असलेले विशेष ऑफर सध्या तात्पुरते बंद करण्यात आले आहेत. परिस्थिती सामान्य झाल्यानंतर गॅसचा पुरवठा आणि दर पुन्हा पूर्ववत केले जातील, असेही व्यवस्थापनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, ग्राहकांनी या परिस्थितीची जाणीव ठेवून सहकार्य करावे, असे आवाहन पंप व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे तसेच ग्राहकांच्या संयम आणि सहकार्याबद्दल आभारही व्यक्त करण्यात आले आहेत.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRASHANT PARDESHI
Mar 12, 2026 13:15:19
Dhule, Maharashtra:धुळे शहरातील बहुचर्चित पिता पुत्र दुहेरी हत्याकांड प्रकरण. निकाल आला आहे. एकूण 13 आरोपीपैकी अकरा आरोपींना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर एका आरोपीला पाच वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठवण्यात आली असून, पूर्ववैमनस्य व खुन्नस देण्यावरून हे दोन खून झाले होते. 8 जून 2018 रोजी रावसाहेब पाटील व त्यांचा मुलगा वैभव पाटील यांची हत्या करण्यात आली होती. तलवार तसेच धारधार शस्त्रांनी हे दुहेरी निर्घृण हत्याकांड झाले होते. यां हत्याकांड प्रकरणी माजी नगरअध्यक्ष बाजीराव पवार सह 13 जनावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. एकूण 13 आरोपींपैकी 11 जणांना दुहेरी जन्मठेप तर एका आरोपीला पाच वर्ष सत्ता मजुरीचे शिक्षा ठोठावली आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीमती जयश्री पुलाटे यांनी ही शिक्षा ठोठावली असून, मायाताच्या नातेवाईकांनी यां निकालाबाबत समाधान व्यक्त केले आहे.
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Mar 12, 2026 13:09:12
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Mar 12, 2026 13:07:17
Ambernath, Maharashtra:महापौरांनी उल्हासनगर मधील उद्यानांना भेट दिली. उद्यानांमध्ये दारू पिण्याचे आढळले. उल्हासनगर कॅम्प ५ येथील राजीव गांधी उद्यानात महापौर अश्विनी निकम यांनी अचानक पाहणी दौरा केला. या पाहणीदरम्यान उद्यानामध्ये काही गर्दुल्ले बसून दारू पित असल्याचे आढळून आले. महापौर गार्डनमध्ये पोहोचताच संबंधित व्यक्तींमध्ये खळबळ उडाली. महापौर आल्याचे लक्षात येताच ते दारूच्या बाटल्या आणि साहित्य तिथेच टाकून धूम ठोकून पळाले. राजीव गांधी उद्यान नागरिक, महिलाआणि लहान मुलांसाठी विरंगुळ्याचे ठिकाण असताना अशा प्रकारे उद्यानात दारू पिण्याच्या घटना घडत असल्याने स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या वेळी महापौर अश्विनी निकम यांनी उद्यानाच्या सुरक्षेबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देत अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. तसेच उद्यान स्वच्छ आणि सुरक्षित ठेवण्यासाठी लवकरच आवश्यक पावले उचलली जातील, असे त्यांनी सांगितले. चंद्रशेखर भुयार ,उल्हासनगर
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 12, 2026 13:04:03
Jalna, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर : कमर्शियल गैस पुरवठा बंद,हॉटेल व्यवसाय संकटात,रिअँलिटी चेक(पॅकेज) युद्धामुळे आखाती देशातून होणारा गैस और क्रूड ऑइल पुरवठा बंद झाला. त्यामुळे केंद्र सरकारने कमर्शियल गैस पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दोन दिवसांत सुमारे २८०० उद्योग आणि सुमारे ९२० हॉटेल्स बंद पडणार असल्याची माहिती सीएमआयएने मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे येणाऱ्या दोन दिवसांमध्ये हॉटेल आणि उद्योग व्यवसायावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.याच पार्श्वभूमीवर झी-२४ तास छत्रपती संभाजीनगर शहरातील हॉटेल व्यवसायाचा रिलँनलिटी चेक करत वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. व्हिओ:१:युध्दामुळे कंपन्या आणि हॉटेल व्यवसायाला होणारा कमर्शियल गॅसपुरवठा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय.याचा परिणाम छत्रपती संभाजीनगरमध्ये दिसून येतोय.छत्रपती संभाजीनगर मधील ज्योती नगर भागात ग्राहकांची सतत वर्दळ असणाऱ्या बालाजी रेस्टॉरंटला गॅसचा साठा संपल्यानं थेट कुलूप ठोकावं लागलंय.हॉटेलचं शटर बंद करून मालक घरी गेलेत. व्हाक थ्रू+121 विथ हॉटेल मालक संदीप कांबळे व्हिओ:२:अशीच अवस्था याच ज्योतीनगर भागातील दुसऱ्या साऊथ इंडियन नाश्ता सेंटरची झालीय.या नाश्ता सेंटरमध्ये कधीही ग्राहकांची वर्दळच पाहायला मिळते.पण हॉटेलमध्ये असलेला गॅसचा साठा संपला आणि मालकावर रिकाम्या हाताने नाष्ता सेंटरमध्ये उभं राहण्याची वेळ आलीय.एकही गॅसची टाकी उपलब्ध बसल्यानं या मालकाला दररोज थेट ४० हजारांच्या नुकसानीला सामोरं जावं लागतंय. वाक थ्रू +121 विथ हॉटेल मालक संदीप कांबळे व्हिओ:३:छत्रपती संभाजीनगर भागातील एमजीएम कॅम्पस परीसरात असलेल्या कैलाशा हॉटेलमध्ये आम्ही गॅसचा साठा किती उरलाय हे चेक करण्यासाठी हॉटेलमध्ये पोहचलो. सध्या हॉटेल सुरू आहे मात्र दोन दिवस पुरेल इतकाच गॅसचा साठा शिल्लक असल्यानं सरकारनं शक्य तेवढी मदत करावी अशी मागणी हॉटेल मालकांनी केलीय.जास्तीचा गॅस लागू नये म्हणून हॉटेलच्या मेनूत बदल करण्यात आलाय.जे पदार्थ शिजण्यासाठी जास्त वेळ लागतो ते पदार्थ मेनूतून वगळण्यात आल्या‍ची माहिती हॉटेल मालकांनी दिलीय.गॅसचा साठा संपल्यास हॉटेल सुरू ठेवण्यासाठी बाकी उपाययोजना काय करता येईल याची पडताळणी करत असल्याचं या हॉटेलच्या मालकांनी सांगितलं. वाक थ्रू +121 विथ किशोर शेट्टी,मालक हॉटेल कैलाशा (किचनमध्ये केलेला वाक थ्रू--या वाक थ्रू मधील सुरळीत सुरू आहे हे माझ्याकडून आलेलं वाक्य काढून टाकण्यात यावे ही विनंती) व्हिओ:४: दरम्यान शहरातील हॉटेल आणि कंपन्या कमर्शिअल गैस पुरवठा बंद झाल्यानं अडचणीत आल्यानं आज उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत उद्योजक, हॉटेल मालक यांची बैठक होणार असून या बैठकीत काही तोडगा निघेल अशी अपेक्षा हॉटेल व्यावसायिक आणि उद्योजक बाळगून आहेत. चौपाल विथ सीएमआयए उत्सव मछार,अध्यक्ष मिहीर सौंदलगीकर,पदाधिकारी,सीएमआयए अर्थर्वेश नंदावत,उपाध्यक्ष,सीएमआयए व्हिओ: कमर्शिल गैस अभावी शहरातील उद्योग संकटात सापडलेत.सीएमआयएने दावा केलेले 2900 उद्योग आणि 920 हॉटेल बंद झाल्यास लाखो कामगारांच्या रोजी रोटीचा प्रश्न उभा राहण्याची शक्यता आहे
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Mar 12, 2026 13:02:44
Ambernath, Maharashtra:अंबरनाथ MIDC आग के प्रकरण पर पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन। विधायक ज्ञानेश्वर म्हात्रे ने सभा में आवाज उठाई। मंत्री उदय सामंत ने पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन का उत्तर दिया। अंबरनाथ के आनंदनगर MIDC में गणेश केमिकल से लगी आग के बारे में शिक्षक विधायक ज्ञानेश्वर म्हात्रे ने सभा में पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन के माध्यम से आवाज उठाई। आग और विस्फोट से नागरिकों में भय पैदा हुआ; बदलापुर के शिरगाव में कंपनियों से होने वाले प्रदूषण तथा गैस सिलेंडर के टूटने से होटल व्यवसायियों के सामने पैदा हुई गंभीर स्थिति पर भी ध्यान दिया गया। उद्योग मंत्री उदय सामंत ने अंबरनाथ MIDC में कंपनियों के सुरक्षा ऑडिट का हाल मांगा है और जो कंपनियाँ सुरक्षा के बारे में लापरवाही करेंगी उनके खिलाफ कार्रवाई का संकेत दिया गया है।
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 12, 2026 12:31:13
Jalna, Maharashtra:जालना |मस्टरवर सही करण्यासाठी गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकाऱ्यांनी सरपंचाकडून घेतले पैसे जालना जिल्ह्यातील जाफराबाद पंचायत समिती येथील प्रकार गटविकास अधिकारी देविदास मगर आणि विस्तार अधिकारी भारत चव्हाण यांचा भ्रष्टाचार कॅमेरात कैद पैसे घेतल्याशिवाय सही कशी करणार- विस्तार अधिकारी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल अँकर- जालन्यात मस्टरवर सही करण्यासाठी गटविकास अधिकारी व विस्तार अधिकाऱ्यांनी सरपंचाकडून पैसे घेतल्याचा प्रकार कॅमेरात कैद झालाय.. जाफराबाद पंचायत समितीतील हा सगळा प्रकार असून गटविकास अधिकारी देविदास मगर आणि विस्तार अधिकारी भारत चव्हाण अशी भ्रष्टाचार करणारांची नावं आहेत. मस्टरवर सही करण्यासाठी विस्तार अधिकारी भारत चव्हाण याने 9 हजार रुपयांत ठरवलं होतं. मात्र सरपंच केवळ चारच हजार रुपये देऊ लागले. त्यामुळं गटविकास अधिकारी समोर सांगत आहे. असं विस्तार अधिकारी बोलत असल्याचं कॅमेरात दिसून येत असून काय द्यायचे ते द्या असं गटविकास अधिकारी सांगत आहे. दरम्यान सरपंचाने चार हजार रुपये दिल्यानंतर विस्तार अधिकारी भारत चव्हाण आणि गटविकास अधिकारी देविदास मगर यांनी सह्या केल्या. त्यामुळं या प्रकारामुळं वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 12, 2026 12:07:08
Jalna, Maharashtra:जालना |जालन्यात गॅस एजन्सी धारकांची जिल्हा पुरवठा अधिका-यांसोबत बैठक जिल्ह्यात तीन दिवसांचा घरगुती गॅसचा सुरळीत साठा उपलब्ध व्यावसायिक सिलेंडर पुरवठा सध्या बंदच अँकर- जालन्यात गॅस एजन्सी धारकांची जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर यांनी बैठक घेतलीये.. मागच्या काही दिवसांत गॅस मिळत नसल्याने ग्राहकांनी गॅस खरेदीसाठी मोठी गर्दी केलीये. त्याचबरोबर बुकिंग होत नसल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत.. जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी गॅस एजन्सी धारकांची बैठक घेतली. यावेळी व्यावसायिक सिलेंडर पुरवठा बंद करण्यात आला असून रुग्णालय, वसतीगृह या ठिकाणी गॅस पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळं घरगुती गॅसचा तीन दिवसांचा सुरळित साठा उपलब्ध असून शहरासाठी 30 दिवसांचा तर ग्रामीणसाठी 45 दिवसांची बुकिंग निश्चित करण्यात आलं आहे. त्यामुळं नागरिकांनी गोंधळून जाऊ नये असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केलं आहे.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 12, 2026 12:02:32
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील लोहारडोंगरी लोहखाणी विरोधात चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयापुढे सुरू असलेल्या आंदोलनाला आज विद्यार्थ्यांनी देखील आपला पाठिंबा दर्शविला. चंद्रपूर शहरातल्या अनेक शाळा आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आज बंडू धोत्रे यांचं आंदोलन सुरू असलेल्या उपोषण मंडपाला आज भेट दिली. या विद्यार्थ्यांनी भजनांच्या माध्यमातून आंदोलनाला आपला सक्रिय पाठिंबा दर्शविला. लोहारडोंगरी येथील लोह खाण रद्द व्हावी या मागणीसाठी बंडू धोत्रे यांचे गेल्या आठ दिवसांपासून अन्नत्याग सत्याग्रह सुरू आहे आणि या सत्याग्रहाला समाजाच्या विविध स्तरातून पाठिंबा मिळताना दिसतोय.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Mar 12, 2026 11:05:36
Kalyan, Maharashtra:युद्धाची झळ भारताला.. गॅस सिलेंडर घेण्यासाठी गॅस गोडाऊन बाहेर नागरिकांच्या रांगा. विद्यार्थ्यांना देखील तासान तास उभे राहून घ्यावे लागत आहे गॅस सिलेंडर. अमेरिका इस्राईल इराण च्या युद्धाचा फटका भारताला देखील पडला आहे युद्धामुले गॅस सिलेंडर चे दर वाढ झाले आहे तर व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नसल्याने काही हॉटेल देखील बंद बंद झाले आहेत तर घरघुती गॅस सिलेंडर च्या तुटवडा असल्याने गॅस वितरक गॅस पुरवठा होतं नसल्याने गॅस गोडाऊन च्या बाहेर सकाळ पासूनच नागरिकांच्या भर उन्हात रागेत उभे राहून गॅस घेत आहेत तर गॅस घेण्यासाठी बारावी आणि दहावी च्या बोर्डाच्या परीक्षा सुरु असलेल्या विध्यार्थ्यांना देखील तासनं तास रागेत उभे राहून गॅस घेण्यासाठी उभे राहावं लागतं आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 12, 2026 11:02:27
Akola, Maharashtra:अकोला शहरात काही महिन्यांपासून समाजकंटकांकडून शहरातील वातावरण बिघडवण्याचे प्रकार वाढत असल्याचा आरोप करत हिंदू संघटनांनी पोलिसांकडे कडक कारवाईची मागणी केली आहे. याबाबत हिंदू संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले. अलीकडच्या काळात काही समाजकंटकांकडून व्यापाऱ्यांना शिवीगाळ करत थेट दुकानात जाऊन मारहाण करण्याचे प्रकार घडत असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी सराफा बाजार परिसरात एका व्यक्तीने दुकानासमोर उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड केली तसेच दुकानमालकाला शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली होती. मात्र दहशतीच्या वातावरणामुळे व्यापाऱ्यांनी या समाजकंटकांविरोधात तक्रार करण्यास धजावले नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर आज हिंदू संघटनांच्या वतीने पोलीस अधीक्षकांना निवेदन देत संबंधित समाजकंटकांवर त्वरित कारवाई करून व्यापाऱ्यांना भयमुक्त वातावरण द्यावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच पोलिसांनी वेळेत कारवाई न केल्यास हिंदू संघटना स्वतःच्या पद्धतीने उत्तर देतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Mar 12, 2026 10:52:42
Nasik, Maharashtra:नाशिक , हर्षवर्धन सपकाळ बाईट पॉईंट ऑन शिबीर - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस चिन्ह घेऊन निवडणूक लढवले त्या सर्वांना एकत्र घेऊन कार्यशाळा - पुढच्या वर्षभरात कृती कार्यक्रम या ठिकाणी नक्कीच होईल - पदाधिकारी या नात्याने संघटनेमध्ये सामावून घेण्यासाठी राज्यभरात कार्यशाळा होत आहे आज नाशिकमध्ये दोन दिवसीय कार्यशाळा आहे ऑन विधानसभा बॉम्ब - कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने महाराष्ट्राची परिस्थिती नाजूक - विधानभवनापर्यंत अशा स्वरूपाच्या बातम्या येत असतील तर हे चिंतनीय बाब आहे - अफवा पसरवणारे सरकार आहे - अफवा किती वाईट आणि विचित्र असतात हे त्यांनी समजून घ्यावे आणि येणाऱ्या काळात त्यांनी अफवा पसरवू नये कायद्याचे राज्य आणावे - पोलिसांनी सदरक्षणाय खलनिग्रणाय काम करावं ही अपेक्षा व्यक्त करतो - खलत्वाचा संरक्षण पोलीस करत आहेत, आणि सज्जनांना त्रास देत आहे त्याचाच फटका हा कुठेतरी विधानभवनाला बसला आहे ऑन परिणय फुंके टीका - ज्ञानाची मक्तेदारी ही आमच्या जवळच आहे अशा प्रकारचा हेका साडेतीन वर्षांपासून बघायला मिळत आहे यामध्ये अनेकांचे बळी गेले - छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ज्या मानसिकतेने नाकारला , माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कसं सोडणार - हे नवीन नाही हा संघर्ष जुना आहे या संघर्षातून मोठी परंपरा लाभली आहे - शाहू फुले आंबेडकरा या संघर्षातून तयार झाले मी पण एक तोच कार्यकर्ता आहे. - या टीकेला एवढेच म्हणेल - त्र्यंबकेश्वर भूमीतून फडणवीस यांच्यासाठी प्रार्थना करेल सुबुद्धी दे , दुर्बुद्धी दूर कर - अटल बिहार वाजपेयी यांचे वाक्य आठवते छोटे दिल कोई बडा नाही होता आणि तुटे दिली खडा नाही होता याचा उल्लेख करतो हेच उत्तर या टीकेच्या अनुषंगाने - मुख्यमंत्र्यांनी याच आत्मचिंतन करावे ऑन गॅस तुटवडा - सरकार एक संघ म्हणून अपयशी ठरत आहे - भारतात अश्या पद्धतीची आणीबाणी पहिल्यांदा नाही भारत थेट लढती लढत असताना अशी परस्थिती निर्माण झाली - पहिल्या दुसऱ्या महायुद्धात आशि परस्थिती निर्माण झाली मात्र त्यावेळी केंद्र सरकारने त्याच वेळच्या पंतप्रधान यांनी देशाला सावरले - मात्र सध्या कोणताही राष्ट्रीय संवाद नाही, विरोधकांना एकत्र करूनभूमिका ठरवणे नाही त्यामुळे अश्या पद्धतीचे चित्र निर्माण झाले ही राजकारणाची वेळ नाही - पंतप्रधान यांनी त्यांचा अहंकार आणि अमेरिकेचा दबाव हा त्यांना राष्ट्र म्हणून एकसंघ करण्यात अडथळा ठरत आहे . - इंग्रजांच्या जुलमी सरकार विरोधात महात्मा गांधी यांनी सत्याग्रह करण्याचा मार्ग पुकारला तशा पद्धतीने शेतकऱ्यांना सत्याग्रह करण्याचा गरज आहे - अमेरिकेसोबत केलेला करार रद्द करण्यासाठी दांडीया तुमची प्रेरणा घेऊन संघर्ष पुकारण्याची आवश्यकता - एक्स्टीन फाईल च्या अनुषंगाने सरकार आपली पावर इंधन नियंत्रित मिळवण्याचा बघत आहे - मिठावर इंग्रजांनी नियंत्रण मिळवण्यासाठी इंधनावर अमेरिका पकड बनविच्छित आहे - आजच्या दांडीयात्रेच्या निमित्ताने अमेरिकेचे ट्रेड डील मी अमेरिकेचा दबाव धड काढून टाकण्यासाठी काँग्रेस संघर्षाची भूमिका स्वीकारेल असं म्हटलंस योग्य ठरेल ऑन काँग्रेस आंदोलन - गॅसच्या दरवाढी विरोधात काँग्रेसचे आंदोलन आहे - सामन देशाची भूमिका असली तरी भाव वाढीच्या विरोधात आज आंदोलन आगामी काळात देखील अमेरिकन ट्रेडडील रद्द करण्यासाठी आम्ही संघर्ष करू
0
comment0
Report
Advertisement
Back to top