Back
कल्याण डोंबिवली महापालिका में महायुती बनाम ठाकरे बंधुओं की चुनौती, सत्ता किसके हाथ?
ABATISH BHOIR
Dec 25, 2025 12:36:14
Kalyan, Maharashtra
हवा कोणाची. कल्याण डोंबिवली महानगरपालिका २०२५. कल्याण डोंबिवली महापालिकेत १९९५ सालापासून २०२० पर्यंत शिवसेना भाजपची सत्ता आहे. मधली अडीच वर्षे आघाडीची सत्ता होती. यंदाची निवडणूक शिंदे सेना आणि भाजपने महायुतीत लढविण्याचे संकेत दिलेत तर दुसरीकडे ठाकरे बंधूंनी मुंबईत युतीची घोषणा केल्याने कल्याण डोंबिवलीत आता महायुतीसमोर ठाकरेंचा आव्हान असणार आहे त्यामुळे महापालिकेवर कुणाचा झेंडा फडकणार याकडे लक्ष लागले आहे. राजेश मोरे ( आमदार शिवसेना ) तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यात अद्यापही जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही ठाकरे बंधूंनी युती झाली असली तरी अद्यापही काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासोबत जागा वाटपाबाबत चर्चा झालेले नाही त्यामुळे महाविकास आघाडीतील संभ्रम कायम आहे शिंदे सेना आणि भाजपकडून महापौर महायुतीचा बसणार असा दावा केला जात आहे. महापालिका निवडणूकीच्या आधीच शिंदे सेना आणि भाजपने एकमेकांच्या पक्षाती मात्तबर माजी नगरसेवक गळाला लावले. त्यातून त्यांनी त्यांच्या पक्षातील पॅनल सुरक्षित केले. शिंदे सेना आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून युती संदर्भात वाटाघाटी सुरू असल्या तरी दोन्ही पक्षातील कार्यकर्ते आणि पधिकाऱ्यांनी स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा सूर लावला आहे मात्र याबाबत स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून मात्र सावध पवित्रा घेतला जातोय वरिष्ठांचा निर्णय अंतिम असेल असे सांगत वरिष्ठांनी युती केल्यास तो निर्णय सर्वांना मान्य असेल असं स्थानिक नेत्यांकडून स्पष्ट केले जातंय. नरेंद्र पवार ( माजी आमदार भाजप ) आत्ता महायुतीत निवडणूका लढण्याच संकेत मिळाल्याने स्वबळावर लढण्याचा नारा मागे पडला. त्यामुळे पक्ष प्रवेश करुन उड्या घेणार्यांची मात्र गोची झाली. मात्र आत्ता शिंदे सेना आणि भाजपमध्ये उड्या घेणाऱ््यांना उमेदवारी देण्यात येईल का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे आत्ता काय आहेत राजकीय समीकरणे ?महायुतीत शिंदे सेना आणि भाजप एकत्रित लढणार असले तरी महायुतीमधील अजित पवाराची राष्ट्रवादी महायुतीत नसेल असे वरिष्ठांनी स्पष्ट केले असतील. स्थानिक पातळीवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी शिंदे सेनेबरोबर महायुतीत निवडणूक लढविण्याचा मानस व्यक्त केला आहे. कोणते मुद्दे ठरतील निर्णायक ? १. महापालिका क्षेत्रात वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम आहे. सीसीटीव्ही, सिग्नल यंत्रणा कार्यान्वीत करुन उड्डाणपूल, रस्ते विकसीत केले जात असले तरी काही प्रकल्प प्रगतीपथावर असल्याने वाहतूक कोंडीतून तोपर्यंत सुटका नाही. २.महापालिकेची स्वतंत्र पाणी पुरवठा योजना आहे. २७ गावात अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु आहे. पाणी प्रश्न आहे. महापालिकेस स्वतंत्र धरणाची गरज आहे. ३. घनकचरा व्यवसथापनाचा प्रश्न आहे. तीन प्रभाग सोडता अन्य प्रभागात कचरा खाजगीकरण करण्यात आले आहे. त्याचबरोबर सुपर स्पेशालिटी रुग्णालय कागदावर आहे. ४.कल्याण स्टेशन परिसर बकाल झालं आहे.. स्टेशन चे स्मार्ट सिटी च्या माध्यमुतून कासव गतीने काम, कल्याण डोंबिवली मध्ये अरुंद रस्ते, त्यामुळे होणारी ट्राफिक जाम. २७ गावातील संघर्ष समितीचा महानगरपालिके सोबत निवडणूक चा विरोध.. स्वतंत्र नगरपालिका करावी यासाठी आग्रही. झालेली प्रगती पथावर.. कल्याण डोंबिवली मध्ये मुख्य काँक्रीटचे रस्ते , स्मार्ट सिटी च्या माध्यमातून तलावाचे शुशोभीकारण, कल्याण तळोजा मेट्रो चे काम सुरु, पाच वर्षाचे प्रशासकीय राज संपणारमहापालिकेची यापूर्वीची निवडणूक २०१५ मध्ये झाली होती. तिचा पंचवार्षिक कालावधी २०२० मध्ये संपूष्टात आला. त्यावेळी कोरोना महामारी होती. कोरोनामुळे महापालिकेची निवडणूक पार पडली नाही. त्यामुळे २०२০ पासून महापालिकेत प्रशासकीय राजवट होती. होऊ घातलेल्या निवडणूकीमुळे प्रशासकीय संपुष्टात येणार आहे. एकूण पॅनल -३१चार सदस्यांचे पॅनल-२९तीन सदस्याचे पॅनल-२एकूण सदस्य संख्या-१२२ महापालिकेत....२०१५ शिवसेना-५३भाजप-४३काॅंग्रेस-४राष्ट्रवादी-२मनसे-९बसपा-०१एमआयएम-१अपक्ष- ९ एकूण फोडाफोडी चे राजकाकरण नंतर.. शिवसेना.. 67 ubt... 4 भाजापा.. 53 मनसे.. 2 राष्ट्रवादी.. sp 0 राष्ट्रवादी अजित पवार 1 कोग्रेस... 0 मतदार-१४२४७४८पुरुष-७४५४७०महिला-६७८७२६इतर- ५५२ वाढलेल्या मतदारसंख्येचा फायदा कुणाला होणार ?मागच्या निवडणुकीच्या तुलनेत आत्ता १ लाख ७४ हजार १०२ मतदार वाढले आहे. वाढलेल्या मतदानाचा फायदा हाेणार आहे. महापालिकेत यापूर्वी सत्ता शिवसेना भाजपची होती.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
DPdnyaneshwar patange
FollowDec 25, 2025 14:03:510
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 25, 2025 14:03:210
Report
AKAMAR KANE
FollowDec 25, 2025 14:03:060
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 25, 2025 13:52:090
Report
TTTUSHAR TAPASE
FollowDec 25, 2025 13:06:440
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 25, 2025 13:01:380
Report
ABATISH BHOIR
FollowDec 25, 2025 12:50:450
Report
VNVishal Nagesh More
FollowDec 25, 2025 12:23:170
Report
SNSWATI NAIK
FollowDec 25, 2025 12:07:140
Report
SKShubham Koli
FollowDec 25, 2025 12:06:180
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 25, 2025 12:05:310
Report
AKAMAR KANE
FollowDec 25, 2025 12:04:300
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowDec 25, 2025 11:21:570
Report
PNPratap Naik1
FollowDec 25, 2025 11:21:420
Report
