Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Satara415001

सातारा में बिबटियों की बढ़ती संख्या से प्रशासन सतर्क, 20 पिंजरे उपलब्ध

TTTUSHAR TAPASE
Dec 25, 2025 13:06:44
Satara, Maharashtra
सातारा जिले में पिछले दो महीनों से बिबटियों की संख्या बढ़ी है। सातारा प्रशासन नागरिक सुरक्षा के उपाय कर रहा है; पिंजरे बढ़ाकर 20 पिंजरे उपलब्ध कराए गए हैं। दुर्गम क्षेत्रों में स्थित खतरनाक गांवों में लगाए गए पिंजरे में अभी बिबटा फंसा नहीं है, लेकिन जहाँ बिबटा दिख रहा है वहाँ ग्रामसभा कर ग्रामस्थों को जनजागृति दी जाएगी और नागरिकों से सतर्क रहने की अपील की गई है।
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PTPRATHAMESH TAWADE
Dec 25, 2025 14:33:08
Mira Bhayandar, Maharashtra:मीरा-भाईंदरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठं बळ मिळालं आहे. भाजपचे माजी नगरसेवक नरेश पाटील आणि अमजद शेख यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश जिल्हाध्यक्ष प्रमोद कांबळे यांच्या नेतृत्वात, तर माजी खासदार आनंद परांजपे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी महिला जिल्हाध्यक्षा ममता मॉरिस आणि युवक प्रदेश सरचिटणीस साजिद पटेल यांचीही उपस्थिती होती. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश राष्ट्रवादीसाठी ताकद वाढवणारा ठरेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला आहे. बाईट – प्रमोद कांबळे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, मीरा-भाईंदर
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Dec 25, 2025 14:03:51
Dharashiv, Maharashtra:धाराशिवमें नगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर भाजप आणि शिवसेना ठाकरे गटामधील संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. भाजपकडून शहरात लावलेल्या बॅनरमुळे थेट खासदार ओमराजे निंबाळकर यांना लक्ष्य केल्याची चर्चा असून, त्यावर ठाकरे गटाकडून सोशल मीडियावरून जोरदार प्रतिउत्तर देण्यात आलं आहे. नेमकं काय आहे हे ‘पोस्टर वॉर’… पाहूयात हा रिपोर्ट… धाराशिव जिल्ह्यातील आठ नगरपालिकांच्या निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारत धाराशिव, तुळजापूर आणि नळदुर्ग नगरपालिकांवर सत्ता मिळवली आहे. या यशानंतर भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या समर्थकांनी शहरात वादग्रस्त बॅनर लावत राजकीय शक्तिप्रदर्शन केल्याचं पाहायला मिळालं. या बॅनरवर माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार राणा पाटील यांचे फोटो झळकत असून, त्यावर “बाळ नाद करायचा नाही” असा मजकूर छापण्यात आला आहे. हा मजकूर थेट ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना उद्देशून असल्याची चर्चा sध्या जिल्हाभर रंगली आहे. या पोस्टर बाजीला शिवसेना ठाकरे गटाकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून जशास तसं उत्तर देण्यात आलं आहे. “हिंमत असेल तर बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, नाद कुणाचा आहे ते कळेल,” अशा शब्दांत भाजपला आव्हान देण्यात आलं आहे. तर “लोकसभेत मिळालं लीड विसरू नका, एका पराभवाने कुणी संपत नसतं,” अशा टीका करत शिवसैनिकांनी भाजपवर निशाणा साधला आहे. या वादात आता ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनीही उडी घेतली आहे. युवती सेना जिल्हाप्रमुख श्वेता दुरुगकर यांनी भाजपला सणसणीत टोला लगावला आहे. या पोस्टर वॉरमुळे धाराशिवमध्ये राजकीय वातावरण अधिकच तापलं असून, खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील या दोन्ही नेत्यांमधील संघर्ष आगामी काळात आणखी तीव्र होण्याची चिन्हं आहेत.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 25, 2025 14:03:06
kolhapur, Maharashtra:नागपूर विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, अकोला आणि अमरावती या चार महानगरपालिकाच्या निवडणुकांसाठी पक्षाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत, मृदा संवर्धन मंत्री संजय राठोड यांच्यासह पक्षाचे विदर्भातील आमदार व इतर महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित आहे.. विदर्भातील चारही महानगरपालिकांमध्ये भाजप आणि इतर मित्र पक्षांसोबत युती करण्या संदर्भात उदय सामंत आणि संजय राठोड स्थानिक कार्यकर्त्यांशी बोलणार आहे.... नागपूर, अकोला, अमरावती या तीनही ठिकाणी स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या भाजपच्या स्थानिक नेत्यांसोबत महायुती संदर्भात आधीच चर्चा झाल्या आहेत.. आता पक्षाच्या वरिष्ठ नेत्या ंच्या माध्यमातून भाजपसोबत अंतिम चर्चा करून महायुतीचे अंतिम चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.. त्याच अनुषंगाने उदय सामंत आणि संजय राठोड आज पक्षाच्या विदर्भातील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेत आहे....
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Dec 25, 2025 13:52:09
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या उपस्थितीत चंद्रपूर शहर मनपासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती, महायुतीत निवडणूक लढवायची भूमिका स्थानिक स्तरावर मते जाणून घेतल्यानंतर वरिष्ठ ठरवणार असल्याची दिली माहिती चंद्रपूर शहर महानगरपालिका निवडणुक्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून तयारीला वेग आलााय. चंद्रपूर शहरातील १७ प्रभागांतील ६६ इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती एन.डी. हॉटेल येथे घेण्यात आल्या. या मुलाखतीदरम्यान शहरातील प्रमुख स्थानिक प्रश्न, नागरी सुविधा, विकासाचे मुद्दे तसेच आघाडी करून निवडणूक लढवायची की स्वतंत्रपणे मैदानात उतरायचे, यावर सखोल चर्चा करण्यात आली. या बैठकीला पक्ष निरीक्षक राजीव जैन, राज्यमंत्री इंद्रनिल नाईक, जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, शहराध्यक्ष राजीव कक्कड, माजी नगराध्यक्ष दीपक जयस्वाल यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) सोबत युती करणार का? विचारले असता स्थानिक नेत्यांच्या मतानुसार युती करायची की नाही याचा निर्णय घेण्यात वरिष्ठ स्थरावर घेण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले. एकंदरीत, महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक तयारी अंतिम टप्प्यात असून लवकरच उमेदवारांची अधिकृत घोषणा करण्यात येईल.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 25, 2025 13:01:38
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेमध्ये जागावाटपाचा पेच अधिक गडद होताना दिसत आहे. गुरुवारी छत्रपती संभाजी नगर साठी या दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची सलग पाचवी बैठक पार पडली. मात्र, जागांच्या आकड्यावरून दोन्ही पक्षांनी आपली भूमिका ताणून धरल्याने ही बैठक देखील कोणत्याही ठोस निर्णयाविना संपली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप या निवडणुकीत ५५ जागांवर लढण्यासाठी आग्रही आहे. तर भाजपने शिवसेनेला ३५ जागांवर लढण्याचा प्रस्ताव दिला आहे. मात्र, शिवसेनेला हा आकडा मान्य नाही.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Dec 25, 2025 12:50:45
Kalyan, Maharashtra:मुलांना स्वावलंबी बनविण्यासाठी शिवसेनेच्यावतीने बालसंवर्धन शिबिराचे आयोजन कर्जत येथे झाले असून कल्याण शिवसेना शहर शाखेच्या वतीने गेल्या १४ वर्षांपासून लहान मुलांकरिता घेण्यात येत असलेल्या शिबिरासाठी विद्यार्थ्यांच्या बसेसला भगवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले. या शिबिराचे आयोजन २५ ते २८ डिसेंबर दरम्यान करजात येथील जामरुंग येथे करण्यात आले आहे. या शिबिरात ८ ते १२ वयोगटातील विद्यार्थी विद्यार्थिनींना प्रवेश देण्यात येतो. या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वावलंबी जीवन जगणे, तंबूत राहून निसर्गाचा आनंद घेणे, एअरगनने नेमबाजी, पदभ्रमण, घोडेस्वारी, पक्षीनिरीक्षण, कवायत, जंगल भ्रमंती, सायंकाळी प्रार्थना, कथाकथन, अंताक्षरी, शेकोटी आदी भरगच्च कार्यक्रम घेण्यात येतात. या बलसंवर्धन शिबिरामुळे विद्यार्थ्यांना स्वावलंबी जीवन जगण्यासाठी आत्मविश्वास मिळत असल्याची माहिती यावेळी शहरप्रमुख रवि पाटील यांनी दिली.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Dec 25, 2025 12:36:14
Kalyan, Maharashtra:हवा कोणाची. कल्याण डोंबिवली महानगरपालिका २०२५. कल्याण डोंबिवली महापालिकेत १९९५ सालापासून २०२० पर्यंत शिवसेना भाजपची सत्ता आहे. मधली अडीच वर्षे आघाडीची सत्ता होती. यंदाची निवडणूक शिंदे सेना आणि भाजपने महायुतीत लढविण्याचे संकेत दिलेत तर दुसरीकडे ठाकरे बंधूंनी मुंबईत युतीची घोषणा केल्याने कल्याण डोंबिवलीत आता महायुतीसमोर ठाकरेंचा आव्हान असणार आहे त्यामुळे महापालिकेवर कुणाचा झेंडा फडकणार याकडे लक्ष लागले आहे. राजेश मोरे ( आमदार शिवसेना ) तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यात अद्यापही जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही ठाकरे बंधूंनी युती झाली असली तरी अद्यापही काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासोबत जागा वाटपाबाबत चर्चा झालेले नाही त्यामुळे महाविकास आघाडीतील संभ्रम कायम आहे शिंदे सेना आणि भाजपकडून महापौर महायुतीचा बसणार असा दावा केला जात आहे. महापालिका निवडणूकीच्या आधीच शिंदे सेना आणि भाजपने एकमेकांच्या पक्षाती मात्तबर माजी नगरसेवक गळाला लावले. त्यातून त्यांनी त्यांच्या पक्षातील पॅनल सुरक्षित केले. शिंदे सेना आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून युती संदर्भात वाटाघाटी सुरू असल्या तरी दोन्ही पक्षातील कार्यकर्ते आणि पधिकाऱ्यांनी स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा सूर लावला आहे मात्र याबाबत स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून मात्र सावध पवित्रा घेतला जातोय वरिष्ठांचा निर्णय अंतिम असेल असे सांगत वरिष्ठांनी युती केल्यास तो निर्णय सर्वांना मान्य असेल असं स्थानिक नेत्यांकडून स्पष्ट केले जातंय. नरेंद्र पवार ( माजी आमदार भाजप ) आत्ता महायुतीत निवडणूका लढण्याच संकेत मिळाल्याने स्वबळावर लढण्याचा नारा मागे पडला. त्यामुळे पक्ष प्रवेश करुन उड्या घेणार्यांची मात्र गोची झाली. मात्र आत्ता शिंदे सेना आणि भाजपमध्ये उड्या घेणाऱ््यांना उमेदवारी देण्यात येईल का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे आत्ता काय आहेत राजकीय समीकरणे ?महायुतीत शिंदे सेना आणि भाजप एकत्रित लढणार असले तरी महायुतीमधील अजित पवाराची राष्ट्रवादी महायुतीत नसेल असे वरिष्ठांनी स्पष्ट केले असतील. स्थानिक पातळीवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी शिंदे सेनेबरोबर महायुतीत निवडणूक लढविण्याचा मानस व्यक्त केला आहे. कोणते मुद्दे ठरतील निर्णायक ? १. महापालिका क्षेत्रात वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम आहे. सीसीटीव्ही, सिग्नल यंत्रणा कार्यान्वीत करुन उड्डाणपूल, रस्ते विकसीत केले जात असले तरी काही प्रकल्प प्रगतीपथावर असल्याने वाहतूक कोंडीतून तोपर्यंत सुटका नाही. २.महापालिकेची स्वतंत्र पाणी पुरवठा योजना आहे. २७ गावात अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु आहे. पाणी प्रश्न आहे. महापालिकेस स्वतंत्र धरणाची गरज आहे. ३. घनकचरा व्यवसथापनाचा प्रश्न आहे. तीन प्रभाग सोडता अन्य प्रभागात कचरा खाजगीकरण करण्यात आले आहे. त्याचबरोबर सुपर स्पेशालिटी रुग्णालय कागदावर आहे. ४.कल्याण स्टेशन परिसर बकाल झालं आहे.. स्टेशन चे स्मार्ट सिटी च्या माध्यमुतून कासव गतीने काम, कल्याण डोंबिवली मध्ये अरुंद रस्ते, त्यामुळे होणारी ट्राफिक जाम. २७ गावातील संघर्ष समितीचा महानगरपालिके सोबत निवडणूक चा विरोध.. स्वतंत्र नगरपालिका करावी यासाठी आग्रही. झालेली प्रगती पथावर.. कल्याण डोंबिवली मध्ये मुख्य काँक्रीटचे रस्ते , स्मार्ट सिटी च्या माध्यमातून तलावाचे शुशोभीकारण, कल्याण तळोजा मेट्रो चे काम सुरु, पाच वर्षाचे प्रशासकीय राज संपणारमहापालिकेची यापूर्वीची निवडणूक २०१५ मध्ये झाली होती. तिचा पंचवार्षिक कालावधी २०२० मध्ये संपूष्टात आला. त्यावेळी कोरोना महामारी होती. कोरोनामुळे महापालिकेची निवडणूक पार पडली नाही. त्यामुळे २०२০ पासून महापालिकेत प्रशासकीय राजवट होती. होऊ घातलेल्या निवडणूकीमुळे प्रशासकीय संपुष्टात येणार आहे. एकूण पॅनल -३१चार सदस्यांचे पॅनल-२९तीन सदस्याचे पॅनल-२एकूण सदस्य संख्या-१२२ महापालिकेत....२०१५ शिवसेना-५३भाजप-४३काॅंग्रेस-४राष्ट्रवादी-२मनसे-९बसपा-०१एमआयएम-१अपक्ष- ९ एकूण फोडाफोडी चे राजकाकरण नंतर.. शिवसेना.. 67 ubt... 4 भाजापा.. 53 मनसे.. 2 राष्ट्रवादी.. sp 0 राष्ट्रवादी अजित पवार 1 कोग्रेस... 0 मतदार-१४२४७४८पुरुष-७४५४७०महिला-६७८७२६इतर- ५५२ वाढलेल्या मतदारसंख्येचा फायदा कुणाला होणार ?मागच्या निवडणुकीच्या तुलनेत आत्ता १ लाख ७४ हजार १०२ मतदार वाढले आहे. वाढलेल्या मतदानाचा फायदा हाेणार आहे. महापालिकेत यापूर्वी सत्ता शिवसेना भाजपची होती.
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Dec 25, 2025 12:07:14
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईत शिवसेना आणि भाजप युती शक्यता ही धूसर असून,दोन्ही पक्षांनी स्थानिक पातळीवर 111 जागा लढवण्याची तयारी सुरू केली आहे , यात शिंदे गटाचा बैठकांचा धडाका सुरू आहे , शिवसेना उपनेते विजय चौगुले आणि संपर्क प्रमुख अंकुश कदम यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेण्यात येत आहे,मनपा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर प्रत्येक विभागातील इच्छुकांसह बैठक घेण्यात येत असून, प्रत्येक प्रभागातून 10 ते 20 इच्छुक असल्याने. आम्ही सर्व 111 जागांवर तयारी करत आहोत, युतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल.युती झाली तर युती अन्यथा एकला चलो रे ची आमची तयारी असल्याची माहिती शिवसेना पदाधिकारी यांनी दिली।
0
comment0
Report
SKShubham Koli
Dec 25, 2025 12:06:18
Thane, Maharashtra:Thane flash *शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे byte pointer* *ऑन ठाणे शिवसेना मनसे एकत्र* कालच महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात होतं हे खऱ्या अर्थाने कालचा दिवस हा महत्त्वाचा दिवस होता. आज आम्ही शिवसेना आणि मनसे पदाधिकाऱ्यांसोबत आमचे ठाण्याचे दैवत धर्मवीर आनंद दिघे साहेब तसेच महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही एकत्र आलो होतो. मी निवडणूक महाराष्ट्रातला महानगरपालिकेत होत आहे. २३ जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांचा १०० जन्म जयंती आहे. शतक महोत्सव संपूर्ण महाराष्ट्र मध्ये साजरा होत आहे. जे बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं. 80 टक्के समाजकारण 20% राजकारण त्याला अनुसरून दोन्ही पक्ष पुढे चालले आहेत. आमचे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील मनसे अध्यक्ष राज ठाकरे असतील. दोन्ही बंधू एकत्र आल्याने महाराष्ट्र मध्ये चैतन्य वातावरण झालेला आहे. आमच्या दैवत आनंद दिघे साहेब यांच्या देखील 27 तारखेला जन्मदिवसाच्या आहेत. मुंबई महानगरपालिका असेल ठाणे महानगरपालिका असेल त्यांचं जे काही स्वप्न आहेत. ते स्वप्न साकार करण्यासाठी मी ठाणेकर जनतेला आवाहन करेल. त्यासोबत महाराष्ट्राच्या जनतेला आव्हान करीन. या शतक महोत्सव साजरा होतोय. त्यानिमित्ताने मुंबई महानगरपालिका ठाणे महानगरपालिका सह इतर जे महानगरपालिका आहेत. जनतेने भरगोस मताने. त्या ठिकाणी असलेल्या जे कोणी लोकप्रतिनिधी आहे. त्यांना निवडून द्यायचं आहे. हा शतक महोत्सव आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा करणार आहोत. महाराष्ट्राचे दोन पुरुष यांनी या संबंध जी वाटचाल केली त्या वरती त्यांच्या आदर्श घेऊन आम्ही पुढे जात आहोत. *ऑन इंजिन आणि मशाल अशा प्रकारे पुढे वाटचाल असेल* मशाल आणि इंजिन सोबत असल्याने ते लोक कामाला लागले आहेत. महाराष्ट्र जनता दोन्ही ठाकरे बंधूंच्या मागे राहील. *ऑन संजय राऊत* दिघे साहेब व त्यांचे एकटाचे आहेत का ? ते कुठले विचार घेऊन चालले. दिघे साहेब शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेनेच्या चार अक्षरावर होते. दिघे साहेबांनी कार्यकर्ते घडवले. दिघे साहेब कोणी एकाचे नव्हते त्यांनी कोणाच्या पाठीत खंजीर खुपसला नव्हता.या लोकांनी केला आहे. दिघे साहेब कार्यकर्त्यांबरोबर होते या लोकांनी कार्यकर्ते फोडण्याचे काम केलं आहे. पण जनता सुदने आहे. महाराष्ट्र मध्ये ड्रग्सचा वापर वापर जोराने सुरू आहेत. ड्रग्स केंद्रबिंदू हे ठाण्यामध्ये आहे. सगळे व्यसनाधीन असेल. भ्रष्टाचार करून ठाणे महानगरपालिका लुटली आहे. मी ठाणेकरांना आवाहन करीन. यावेळी बाळासाहेब ठाकरे असताना तुम्ही ठाण्यामध्ये एक हाती सत्ता दिली. त्याच पद्धतीने ठाणेची जनता आणि मुंबईची जनता सत्ता देईल. *ऑन जागावाटप फॉर्मुला* आमच्या सगळ्या वाटाघाटी झालेले आहेत. आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन चाललेलो आहोत. महाविकास आघाडी असेल मनसे आमच्या सोबत आहे. जे आमच्या सोबत येतील त्यांन आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Dec 25, 2025 12:05:31
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपूर मनपाच्या भाजप निवडणूक रचनेत नाट्यमय घडामोडी, आ. किशोर जोरगेवार पुन्हा एकदा निवडणूक प्रमुख, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी काढले स्पष्ट पत्र, संपूर्ण निवडणूक दिग्गज भाजप नेते आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात व्हावी असा आहे उल्लेख अँकर:--चंद्रपूर मनपाच्या भाजप निवडणूक रचनेत पुन्हा एक नाट्यमय घडामोड पुढे आली आहे. स्थानिक भाजप आमदार किशोर जोरगेवार यांची पुन्हा एकदा निवडणूक प्रमुख नियुक्ती करण्यात आली आहे. नागपुरात चंद्रपूर मनपातील तिकीतवाटपासंदर्भात चंद्रपूरच्या भाजप नेत्यांची बैठक पुढ्यात असताना प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी हे स्पष्ट पत्र काढले आहे.  चैनसुख संचेती यांची चंद्रपूर जिल्ह्याचे निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. चैनसुख संचेती हे भाजपचे बुलढाणा जिल्ह्यातील ज्येष्ठ आमदार आहेत, तर माजी खासदार अशोक नेते यांना जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी म्हणून कायम ठेवण्यात आले आहे. मात्र विशेष म्हणजे  संपूर्ण निवडणूक दिग्गज भाजप नेते आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात व्हावी असा पत्रात उल्लेख आहे. आ. जोरगेवार यांना याविषयी बोलते केले असता माझी नियुक्ती कायम होती. माध्यमांनीच चुकीच्या बातम्या पेरल्या अशी प्रतिक्रिया. बाईट १) किशोर जोरगेवार, आमदार, चंद्रपूर विधानसभा आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
comment0
Report
christmas
Advertisement
Back to top