Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416
Sangli mein mahavikaas aaghaadi ke netaon ke padon ke liye ummedvar ki bhidaar, chunav ki baat ne te...
SMSarfaraj Musa
Mar 18, 2026 07:05:54
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
अपडेट - सांगली ब्रेकिंग सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडीला सुरुवात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या संगीता पाटील यांनी भरला अध्यक्षपदाचा अर्ज संगीता पाटील या वाळवा तालुक्यातल्या कासेगाव जिल्हा परिषद गटाच्या सदस्य आणि आमदार जयंत पाटील यांच्या नातेवाईक उपाध्यक्ष पदासाठी काँग्रेसच्या ऋषिकेश पाटील यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज ऋषिकेश लाड पलूस तालुक्यातल्या कुंडल जिल्हा परिषद गटाचे सदस्य व आमदार विश्वजीत कदम यांचे भाचे भाजपाकडुन स्वप्नाली मासाळ यांनी दाखल केला उमेदवार अर्ज स्वप्नीला मासळ जत तालुक्यातील डफळापूर जिल्हा परिषद गटाचा सदस्य तर उपाध्यक्ष पदासाठी कामेरी गटाचे जयराज पाटील यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
ABATISH BHOIR
Mar 18, 2026 08:50:41
Kalyan, Maharashtra:केडीएमसी अंतर्गत कचरा उचलणाऱ्या सुमित कंपनीच्या कंत्राटी कामगारांचे वेतन रखडल्याने शहरातील कचरा व्यवस्थापन यंत्रणा ठप्प होण्याच्या मार्गावर पोहोचली आहे. अचानक पुकारलेल्या कामबंद आंदोलनामुळे अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर आजच पगार देण्याचे आश्वासन देण्यात आल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. मात्र, पगार न मिळाल्यास उद्यापासून एकही कचरा गाडी रस्त्यावर उतरू देणार नाही, असा इशारा कामगार संघटनेने दिला आहे. केडीएमसी हद्दीत कचरा उचलण्याचे काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांचे वेतन पुन्हा एकदा रखडल्याने कामगारांमध्ये तीव्र नाराजी पसरली. वेतन न मिळाल्याच्या निषेधार्थ कामगारांनी अचानक कामबंद आंदोलन पुकारल्याने सकाळपासूनच शहरातील कचरा उचलण्याची संपूर्ण यंत्रणा ठप्प झाली.या आंदोलनाचा फटका नागरिकांना बसला असून शहरातील अनेक भागांमध्ये कचऱ्याचे ढीग साचले आहेत. विशेषतः डोंबिवली-ठाकुरली परिसरात परिस्थिती गंभीर बनली असून दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.दरम्यान, लोकनेते पुंडलिकशेठ म्हात्रे संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यानंतर कामगार संघटनेचे पदाधिकारी, भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रे और केडीएमसीचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी सुमित कंपनीच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. या चर्चेनंतर आजच कामगारांचा पगार देण्याचे आश्वासन कंपनीकडून देण्यात आले.या आश्वासनानंतर कामगारांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले असले तरी, आज पगार न मिळाल्यास उद्यादून एकही कचरा गाडी रस्त्यावर येऊ देणार नाही, असा स्पष्ट इशारा संघटनेने दिला आहे. तसेच पुढील काळातदर महिन्याच्या दहाव्या तारखेपर्यंत पगार न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. उपायुक्त घनकचरा विभाग यावेळी केडीएमसी प्रशासनानेही सुमित कंपनीला कडक शब्दांत इशारा दिला. कामगारांना वेळेवर वेतन देणे ही कंपनीची जबाबदारी असून त्यात कसूर झाल्यास पुढील महिन्यापासून कठोर कारवाई करण्यात येईल, असे उपायुक्त रामदास कोकरे यांनी स्पष्ट केले. तसेच पालिकेला वेळेवर बिल न सादर करता कामगारांना वेतन न देणे आणि अशा प्रकारे कामबंद आंदोलन घडवून आणणे सहन केले जाणार नाही, असेही घनकचरा विभागाकडून सांगण्यात आले आहे.एकूणच, या संपूर्ण प्रकारामुळे केडीएमसीच्या कचरा व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
0
comment0
Report
GMGajanan MAchindar
Mar 18, 2026 08:50:06
Parbhani, Maharashtra:अँकर- राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने आम्हाला धोका दिला असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश विटेकर म्हणजे, रंग बदलणारा सरडा असल्याची घाणघाती टीका, शिवसेना शिंदे गटाचे परभणीचे संपर्कप्रमुख आनंद जाधव यांनी केली आहे. परभणी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची आज निवड होणार होती. यासाठी भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी एकत्रित येऊन सत्ता स्थापन करणार, अशी रात्रीपर्यंत चर्चा सुरू होती. यामध्ये भाजप अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष पद, तर शिवसेना शिंदे गटाला सभापती पद देण्यात येणार होते. परंतु ऐनवेळी आम्हाला उपाध्यक्ष ऐवजी, सभापती पद देण्याचे ठरवल्याने, आम्ही सत्तेत बसणार नाही. असं सांगत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटावर टीका केली आहे..
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Mar 18, 2026 08:49:46
Yeola, Maharashtra:इंदोर–पुणे महामार्गावरील वाढती वाहतूक कोंडी व अपघातांचे प्रमाण लक्षात घेऊन प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून २४ मार्चपासून दिवसा अवजड वाहतुकीवर बंदी घालण्यात येणार आहे. हा निर्णय येवला–मनमाड–मालेगाव या मार्गावर लागू राहणार असून येथील नागरिकांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे येवला परिसरात अलीकडील काळात अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली असून येवला व मनमाड दरम्यान वारंवार मोठी वाहतूक कोंडी निर्माण होत होती या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मुंबई येथे मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक पार पडली या बैठकीस नाशिक, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी उपस्थित होते बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, २४ मार्चपासून इंदोर–पुणे महामार्गावर दिवसा अवजड वाहतुकीस बंदी राहणार असून रात्री १० ते सकाळी ७ वाजेदरम्यान अवजड वाहतुकीस परवानगी देण्यात येणार आहे मात्र अत्यावश्यक सेवांतील अवजड वाहनांना या निर्बंधातून वगळण्यात आले आहे या निर्णयाबाबतचा अधिकृत आदेश नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जारी केला है
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 18, 2026 08:37:11
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली महापालिकेच्या सभेत काँग्रेस नगरसेविका पाणी प्रश्नावर आक्रमक - सभेमध्ये चक्क मोकळ्या घागरी आणून काँग्रेस नगरसेविकांचे लक्षवेधी आंदोलन अँकर सांगली महापालिकेच्या महासभेत आज काँग्रेस नगरसेविका पाणी प्रश्नावर आक्रमक झाल्या. यावेळी सभेमध्ये चक्क मोकळ्या घागरी आणून काँग्रेस नगरसेविकांनी लक्षवेधी आंदोलन केले. यावेळी काँग्रेस नगरसेविकांनी पीठासनावर महापौर धीरज सूर्यवंशी आणि आयुक्त सत्यम गांधी तसेच उपमहापौर गजानन मगदूम यांना मोकळ्या घागरी भेट दिल्या. यावेळी जनतेला पाणी द्या, अशा घोषणाबाजी करत काँग्रेस नगरसेवकांनी आक्रमकपणे पाणी प्रश्नाचा मुद्दा मांडला. त्यामुळे काही काळ सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
879
comment0
Report
KPKAILAS PURI
Mar 18, 2026 07:50:02
1091
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 18, 2026 07:03:21
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : आ. जितेंद्र आव्हाड यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करा - शिवव्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे - आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करा - सुप्रसिद्ध शिवव्याख्याते शिवरत्न शेटे यांची सरकारकडे मागणी - आमदार जितेंद्र आव्हाड यांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीतले विधान बिन बुडाचे आणि कपोलकल्पित आहे - शिवाजी महाराजांचा अवमान करणारा आमदार, खासदार किंवा कोणीही असला तर त्याच्यावर गुन्हा दाखल करावा - जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याला इतिहासात कोणताही आधार नाही. - त्यामुळे कोणत्याही महापुरुषांची बदनामी करणाऱ्या व्यक्तींवर फौजदारी गुन्हा दाखल करावा. याविषयी शिवचरित्रकार डॉ. शिवरत्न शेटे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी
1002
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 18, 2026 06:34:17
Akola, Maharashtra:भगवान श्रीराम यांच्या जन्मोत्सवाच्या पावन पर्वावर, रामनवमी निमित्त अयोध्येत भक्तीचा अनोखा सोहळा रंगणार आहे. या दिवशी अकोला शहरातील अभ्यंकर परिवाराच्या हस्ते तब्बल ३ लाख राजगिरा लाडूंचे प्रसादरूपाने वाटप करण्यात येणार आहे. मागील वर्षीही अभ्यंकर परिवाराने १ लाख लाडूंचे वाटप करत सेवाभाव जपला होता. यंदा हा आकडा तिप्पट करत त्यांनी आपली श्रद्धा आणि भक्ती अधिक दृढ केली आहे. राम मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने अभ्यंकर परिवाराला ही सेवा देण्याची विनंती करण्यात आली होती. सध्या अकोल्यात ३ लाख राजगिरा लाडू तयार करण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. या उपक्रमासाठी सुमारे १५०० किलो गूळ आणि १५०० किलो राजगिरा लाहीचा वापर करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, अभ्यंकर परिवाराच्या सदस्यांसोबतच त्यांच्या या कार्यात अकोलेकर नागरिकही निस्वार्थ भावनेने हातभार लावत असून, वातावरण पूर्णपणे भक्तिमय झाले आहे. २२ मार्च रोजी हे सर्व लाडू ट्रकद्वारे अयोध्या येथे पाठवण्यात येणार असून, रामभक्तांना मोफत प्रसाद म्हणून वितरित केले जाणार आहेत. अभ्यंकर परिवाराच्या या सेवाभावी उपक्रमामुळे अकोल्याचे नाव देशभरात उजळले असून, श्रद्धा, सेवा आणि भक्तीचा हा अनोखा संगम सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.
1039
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 18, 2026 06:30:51
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली के मिरज तालुक्यात काल झालेल्या गारपिटीने द्राक्ष शेतीसह इतर पिकांना मोठा फटका बसला आहे. द्राक्षबागांना गारपिटीचा सर्वाधिक फटका बसल्याचा समोर आले आहे. मिरज तालुक्यातल्या अनेक द्राक्ष बागांची मोठी पडझड झाली आहे, हात तोंडाशी आलेले द्राक्षांचे घड्यांवर गारपिटीचा मोठा मारा झालाय, त्यामुळे द्राक्षांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेला आहे, त्याचबरोबर गहू शाळा व भाजीपाला पिकांना देखील याचा मोठा फटका बसलेल्या असं समजतं, असमानी संकटामुळे आता द्राक्षबाग शेतकऱ्यांच्या समोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले असून सरकारने तातडीने पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.
1025
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Mar 18, 2026 06:24:23
Amravati, Maharashtra:दोन फाईल आहे वनवा रोखा जंगल वाचवा मेळघाटात आगीच्या घटना टाळण्यासाठी वन विभागाची जनजागृती मोहीम; आपणच आपले जंगल वाचवा वन विभागाचे स्थानिक आदिवासींना आवाहन अँकर :- मेळघाटात उन्हाची तीव्रता वाढताच जंगलात वणवा पेटण्याच्या घटनांना सुरुवात झाली. उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात वनसंपदा जळून खाक होतं असते. या आगी मुळे मेळघाटातील जैवविविधता धोक्यात आली असून वन्यप्राण्यांच्या जिवालाही मोठा धोका निर्माण झाला आहे. याच अनुषंगाने सिपना वन्यजीव विभागा अंतर्गत वन विभागाच्या वतीने मेळघाटामध्ये ठिकठिकाणी आदिवासी पाड्यांमध्ये जाऊन वन विभागाचे कर्मचारी अधिकारी आगीच्या घटना टाळण्यासाठी जनजागृती करीत आहे. सुमीता गावात वन विभागाच्या कर्मचारी अधिकारी जनजागृती करत आहे.
1092
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 18, 2026 06:22:18
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावतीच्या आयुध निर्माणी वसाहतीत बॅडमिंटन खेळताना कोसळून १६ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू. १६ वर्षीय अनुष्का अजय यादव (वय १६) ही इयत्ता ११ वी मध्ये शिक्षण घेत होती. हे कुटुंब आयुध निर्माणी वसाहतीत वास्तव्याला आहे. मंगळवारी सायंकाळी आपल्या क्वार्टरसमोरील मोकळ्या मैदानावर ती मैत्रिणींसोबत बॅडमिंटन खेळत होती. दरम्यान, खेळताना तोल जाऊन ती मुख्य रस्त्यावर डोक्याच्या भारावर जोरात पडली. या अपघातात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. तातडीने तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
1029
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 18, 2026 06:16:05
Shirur, Maharashtra:Shirur (Pune) Dahivydi में बारह वर्षीय लड़के का संशयास्पद शव मिला; पड़ोस में हंगामा. दहिवडी गांव की मांजरे बस्ती में साईराज गणेश मांजरे (वय 12) इस सहावीत पढ़ने वाले छात्र का शव घर के पास स्थित कुएं के इलाके में पाया गया. शव अर्धनग्न स्थिति में मिलने से मामला संदेहपूर्ण माना गया. इसके पहले भी 21 जून 2024 को यहीं 11 वर्ष के यश शरद गायकवाड की इसी तरह मौत हो चुकी थी, जिसे लेकर गहरा संदेह बना हुआ है. ग्रामस्थों ने घटना के खिलाफ जोरदार विरोध प्रदर्शन किया और तब तक शव नहीं हटाने का फैसला किया जब तक मामला दर्ज नहीं होता. बाद में पुलिस ने मामला दर्ज कर गहन जांच की आश्वासन दिया. एक संदिग्ध आरोपी को हिरासत में लेने की जानकारी मिली है, जो मृत बच्चे का दोस्त बताया जा रहा है. आरोपी के साथ समलिंगी संबंध की बात पर हत्या का शक जताया गया है. आगे की जांच चल रही है.
1056
comment0
Report
Advertisement
Back to top