Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421301

कल्याण पूर्व के सत्यम डांसबार पर बार-बार तोड़फोड़, मालिक बोले ब्लैकमेलर का दबाव

ABATISH BHOIR
Mar 27, 2026 12:18:15
Kalyan, Maharashtra
कल्याण पूर्वेतील सत्यम उर्फ गणेश भुवन डान्सबार पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हा बार शासकीय जागेत असल्याने गेल्या दीड वर्षात या बारवर दोन वेळा कारवाई झाली होती मात्र हा बार पुन्हा एकदा सुरू झाला. आज पुन्हा तहसीलदाराचे पथक प्रचंड पोलीस फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले आणि या बार वर तोडक कारवाई केली. तहसीलदारांच्या पथकाच्या या कारवाईला बार चालकासह बारमधील कर्मचाऱ्यांनी जोरदार विरोध केला. जेसीबीच्या खालीच बारचे कर्मचारी व चालक बसून राहिले. त्यामुळे कारवाईला काही काळ अडथळा निर्माण झाला. अखेर तहसीलदारांच्या पथकाने पोलीस फौजफाटा मागवून ही कारवाई पुन्हा एकदा सुरू केली. यावेळी बार चालकाने तहसीलदारांचे पथक ही कारवाई आकस बुद्धीने करत आहे प्रत्यक्षात ही शासकीय जमीन असेल तर येथील संपूर्ण परिसर शासकीय जमिनीवर वसलेला आहे मात्र कारवाई फक्त आमच्याच बार वर सातत्याने होते. आम्ही सगळे टॅक्स भरतोय, आमच्याकडे कायदेशीर परवानगी आहे मात्र केवळ आणि केवळ काही ब्लॅकमेलरची पैशांची मागणी आम्ही पूर्ण केले नाही त्यांनी शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून आकस बुद्धीनेच हे कारवाई सुरू असल्याचा आरोप केला.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement

PTPRATHAMESH TAWADE
Mar 27, 2026 13:53:31
Virar, Maharashtra:
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 27, 2026 13:46:34
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगलीच्या तासगाव आणि मिरज तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस. मनेराजुरी परिसरामध्ये जोरदार अवकाळी पाऊस पडला आहे. मनेराजुरी परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसामुळे द्राक्षबागांना मोठा फटका बसलेला आहे. वादळी वाऱ्याचा प्रचड वेग असल्याने रस्त्याकडेला असणाऱ्या दुचाकी खाली पडल्या, तर या वाऱ्यामुळे रस्त्यावरच्या अनेक ठिकाणची झाडे देखील उन्हाळून पडली. मिरज तालुक्यातल्या सिद्धेवाडी, भोसे आसपासच्या परिसरासह रत्नागिरी-नागपूर महामार्गावर विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस पडला आहे. सकाळपासून प्रचंड उकाडा वाढला होता, दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण झालं होऊन अनेक भागात अवकाळी पाऊस आणि हजेरी लावली आहे.
0
comment0
Report
HPHARSHAD PATIL
Mar 27, 2026 13:32:56
Palghar, Maharashtra:Pearl ग्रुप स्कैम – निवेशकों की जमीन का क्या हुआ? भारत के सबसे बड़े पोंजी स्कीमों में से एक (2014 में उजागर) Pearl Agro Corp Ltd (PACL) और ग्रुप कंपनियों के नेता निर्मल सिंह भांगू (2024 में निधन) ने 5–6 करोड़ निवेशकों से ₹48,000–60,000 करोड़ इकट्ठा किए। कृषि भूमि प्लॉट्स + उच्च रिटर्न का वादा करके फर्जी एलॉटमेंट लेटर दिए, लेकिन कोई असली जमीन नहीं दी गई। पैसा शेल कंपनियों और विदेशी प्रॉपर्टीज में साइफन किया गया। CBI ने 2014 में छापेमारी की। ED ने 169+ प्रॉपर्टीज अटैच कीं। सुप्रीम कोर्ट ने जस्टिस आर.एम. लोधा कमिटी को एकमात्र कॉस्टोडियन बनाया – केवल वही अटैच्ड एसेट्स बेच/डिस्पोज कर सकती है, ताकि पीड़ितों को रिफंड मिले।
953
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 27, 2026 13:32:35
Nagpur, Maharashtra:नागपुरात बीएड सीईटीचा पेपर तांत्रिक अडचणींमुळे खोळंबला.. त्यामुळे नागपुरातील वैनगंगा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट येथे परीक्षार्थी गोंधळात होते. दरम्यान कॉलेज प्रशासनकडून सांगण्यात आले की MH CET कडून पेपरसाठी Assesinfra इन्फ्राला जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनी EDUpark या कंपनीला सॉफ्टवेअर आणि इतर तांत्रिक बाबीकरता नियुक्त केले . मात्र आज परीक्षार्थी पेपरसाठी आले असता परीक्षार्थींना कॉम्प्युटर व नेटवर्क उपलब्ध नसल्याचे सांगितले. त्यामुळे एकच गोंधळाचे वातावरण झाले. राज्यातील इतर परीक्षा केंद्रांवरील असा गोंधळ उडाल्याची माहिती मिळत आहे... दरम्यान दुसऱ्या सत्राची ही परीक्षा तांत्रिक कारणांमुळे पुढे ढकल ण्यात आल्याची माहिती ही राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष कडून देण्यात आलेली आहे ------- नागपूर - बीएड सीईटी परीक्षेच्या परीक्षा केंद्रावर गोंधळ निर्माण झाल्याने परीक्षा पुढे ढकलण्याची वेळ.. - कंत्राटदार कंपनीच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याने परीक्षार्थी मोठा मनस्ताप सहन करावा लागला. - नागपूरच्या वैनगंगा अभियांत्रिकी महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर दुपारी ३ वाजता परीक्षा नियोजित होती. - मात्र, ऐनवेळी सर्व्हरमध्ये बिघाड झाल्यामुळे परीक्षा केंद्रावर गोंधळ उडाला. - त्यामुळे आजचा पेपर पुढे ढकलण्यात आला असून, पुढील वेळ परीक्षार्थी ईमेल किंवा एसएमएसद्वारे कळविण्यात येणार आहे. - यंदा बी.एड. अभ्यासक्रमाच्या सीईटीसाठी १ लाखाहून अधिक परीक्षार्थी नोंदणी केली आहे. यात तीन दिवस पेपर असणार आहे. मात्र पहिल्याच दिवशी गोंधळ उडल्यानं मनस्ताप सहन करावा लागला.. - शिवाय परीक्षा केंद्रावर अजून परत जावे लागल्यामुळे आर्थिक फटका ही परिक्षार्थीना बसला..
920
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Mar 27, 2026 13:01:02
Beed, Maharashtra:बीड : “मी सव्वा वर्ष गप्प होतो…कारण माझ्या गप्प राहण्यातच एवढी ताकद आहे.. बोललो तर काय होईल?” धनंजय मुंडेंचा इशारा बीड जिल्ह्यातील भायाळा गावात नारळी अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगतेच्या कार्यक्रमाला आज राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळालं… माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांचे येथे जल्लोषात स्वागत करण्यात आलं… मात्र याच मंचावरून बोलताना धनंजय मुंडे यांनी गेल्या दीड वर्षातील घडामोडींवर अप्रत्यक्षपणे जोरदार भाष्य केलं… “मी जन्माला आलो तेव्हापासून माझ्या पाठी संघर्ष आहे… अनेक संकटं आली पण तुमच्या आशीर्वादामुळे वेळ कधीच आली नाही”… असं म्हणत टीकाकारांनाही त्यांनी सूचक इशारा दिला… “जे बोलायचं ते बोलू द्या… मी सव्वा वर्ष गप्प राहिलो… कारण माझ्या गप्प राहण्यातच ताकद एवढी ताकद आहे.. बोलल्यानंतर काय होईल… असंही मुंडे म्हणाले… तर “रथावर घोडंच बसतं… मोर नाही”… असं म्हणत त्यांनी कर्ण-अर्जुनाच्या उदाहरणातूनही राजकीय टोला लगावला..
913
comment0
Report
UPUmesh Parab
Mar 27, 2026 12:32:00
Ranbambuli, Maharashtra:सिंधुदुर्ग --- बांधकाम व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या.. सिंधुदुर्ग हदरला.. कणकवली तालुक्यातील बांधकाम व्यावसायिक सुशांत दळवी यांची गोळ्या घालून करण्यात आली निर्घृण हत्या.. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घटना घडल्याचा पोलीसांचा अंदाज.. दळवी यांची हत्या नेमकी का झाली? कारण गुलदस्त्यात... श्वविच्छेदनासाठी मृतदेह नेला जाणार कोल्हापूरला... डोक्यात गोळी लागल्याने बांधकाम व्यवसायिकाचा झाला मृत्यू... अधिक तपासासाठी आवश्यक आहे श्वविच्छेदन रिपोर्ट.. मात्र ही सुविधा सिंधुदुर्ग जिल्ह्यात नसल्याने मृतदेह नेण्यात येणार कोल्हापूर येथे, वैध्यकीय सूत्रांनी दिली माहिती... सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह... बांधकाम व्यावसायिक सुशांत दळवी यांच्या खुणानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात उडालीय खळबळ... सिंधुदुर्ग पोलीस करत आहेत अधिक तपास...
1086
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 27, 2026 12:07:30
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपूर शहरातील डॉक्टर आंबेडकर महाविद्यालयात बीएड सीईटी परीक्षेत दरम्यान गोंधळ, महाविद्यालयातील संगणक लॅब अद्ययावत नसल्याने परीक्षार्थींना सहन करावा लागला त्रास अँकर:--चंद्रपूर शहरातील डॉक्टर आंबेडकर महाविद्यालयात बीएड सीईटी परीक्षेत दरम्यान गोंधळ बघायला मिळाला. महाविद्यालयातील संगणक लॅब अद्ययावत नसल्याने परीक्षार्थींना नाहक त्रास सहन करावा लागला. महाविद्यालयात सोयीचं नसल्याने परीक्षा दीड तास उशिरा घेतली गेली मात्र ती पूर्ण झाली नसल्याने वर्ष वाया जाण्याची भीती परीक्षार्थींनी व्यक्त केली. परीक्षार्थींच्या तक्रारींकडे कोणीही लक्ष दिले नसल्याने संबंधितांवर कारवाईची मागणी परीक्षार्थींनी केली आहे. बाईट १) पीडित परीक्षार्थी
1079
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 27, 2026 12:04:06
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:शिराळा तालुक्यातल्या वाकुर्डे बुद्रुक सिंचन योजनेच्या पाणी वाटपावरून आमदार सदाभाऊ खोत यांनी पाटबंधारे अधिकाऱ्यांना चांगलं धारेवर धरलं. तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये तलाव कोरडे पडत असल्याने नागरिकांच्या कडून पिण्याच्या पाण्याची मागणी होऊ लागलेली आहे, या पार्श्वभूमीवर आमदार सदाभाऊ खोत यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन कोरड्या तलावांची पाहणी केली, यावेळी सिंचन योजनेच्या रखडलेली काम आणि कोरड्या तलावांमध्ये पाणी सोडण्यात येत नसल्यास वरून आमदार सदाभाऊ खोत यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलंचं धारेवर धरले. ज्या ठिकाणी पाण्याची टंचाई नाही, त्याठिकाणी योजनेचे पाणी दिल जात आहे, मात्र ज्या ठिकाणी पाणीटंचाई आहे, त्या ठिकाणी पाणी दिलं जात, नसल्याचा आरोपदेखील सदाभाऊ खोत यांनी केला आहे.
1085
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 27, 2026 11:35:57
Shirur, Maharashtra:ब्रेकिंग आंबेगाव प्रांत कार्यालयात खळबळ: प्रांत अधिकारी लाच प्रकरणात अटक प्रांत अधिकारी गोविंद शिंदे आणि कर्मचारी खैरनार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. या घटनेमुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. VO -आंबेगाव तालुक्यातील प्रांत कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून मोठी कारवाई केली. प्रांत अधिकारी गोविंद शिंदे आणि त्यांचे सहकारी कर्मचारी खैरनार यांना 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित कामासाठी तक्रारदाराकडून लाच मागितल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाली होती. त्यानंतर अधिकाऱ्यांनी सापळा रचत ही कारवाई केली. ठरल्याप्रमाणे लाच स्वीकारताना दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असून मंचर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, थेट प्रांत अधिकारीच लाच प्रकरणात अटकेत सापडल्याने प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेची चर्चा संपूर्ण परिसरात सुरू असून नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
1093
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 27, 2026 11:18:15
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यातील इस्पुर्ली पोलिसांनी बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरणाचा छडा लावून यातील प्रमुख आरोपी डॉक्टर युवराज पाटील याला यापूर्वी जेरबंद केलं. डॉक्टर युवराज पाटील हा बिद्री मधील श्रद्धा हॉस्पिटल मध्ये राजरोस गर्भलिंग निदान करत होता, त्याच बरोबर हजारो रुपये घेऊन याच हॉस्पिटलमध्ये आईच्या पोटातच मुलीच्या हत्या करत गर्भपात करत होता. इस्पुर्ली पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळाशी जावून तपासला सुरुवात केल्यानंतर अनेक सहभागी आरोपीची नावे समोर येत आहेत. पोलिसांनी यापूर्वी डॉक्टर युवराज पाटील आणि संभाजी शिंदे यांना अटक करून लाखो रुपये जप्त केले होते. त्यानंतर आता या प्रकरणाचा तपास करत असताना आणखी सहा जणांचा सहभाग दुष्कृत्यात आढळून आला आहे. पोलिसांनी डॉक्टर युवराज पाटील यांच्या सोबत हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या मनीषा दिनकर कांबळे आणि नंदा ईश्वरा गुरव यांच्यासह बाजीराव तोकडे, विक्रम आनंदा पाटील सुखदेव पाटील, सुनील सदाशिव गुरव यांना अटक केली आहे.
1086
comment0
Report
Advertisement
Back to top