Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Palghar401301

PTPRATHAMESH TAWADE
Mar 27, 2026 13:53:31
Virar, Maharashtra
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
MAMILIND ANDE
Mar 27, 2026 15:02:05
Wardha, Maharashtra:मधाच्या मोहात अस्वलींचा थरार; बोर अभयारण्यात अनोखा नजारा.. झाडावर चढली अस्वल, विडिओ व्हायरल मधाच्या मोहात अस्वलींचा थरार; बोर अभयारण्यात अनोखा नजारा.. झाडावर चढली अस्वल, विडिओ व्हायरल बोर अभयारण्यात अस्वलींचे अनोखे जग या अभयारण्यात सुमारे ६० ते ७० अस्वली असून त्यांचे वेगळेच जग आहे. अस्वल हा बुद्धिमान प्राणी मानला जातो आणि त्याला परिसरातील रस्ते व ठिकाणे सहज लक्षात राहतात. थंडीच्या दिवसांत अन्नटंचाईमुळे अस्वले ‘हायबरनेशन’ अवस्थेत गुहेत झोप घेतात. विशेष म्हणजे येथे काही दुर्मिळ ल्युसिस्टिक अस्वलीही आढळतात, ज्या २०२० पासून दिसू लागल्या आहेत. मधासाठी अस्वलींची झाडावर सरसर चढाई मध हे अस्वलींचे अत्यंत आवडते खाद्य असल्याने ती झाडावर क्षणात चढून मधमाश्यांची पोळी शोधून काढतात. मधमाश्यांच्या डंखाची पर्वा न करता राठ केसांमुळे त्यांना विशेष त्रास होत नाही. अर्जुन व मोहाच्या झाडांवर मोठ्या प्रमाणात पोळे आढळतात, कारण येथे बारा महिने फळे व पाण्याची उपलब्धता आहे. त्यामुळे अस्वलींची झाडावरची चपळाई आणि मधासाठीची धडपड पाहणे हे खरोखरच थक्क करणारे दृश्य ठरते.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 27, 2026 14:36:25
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - दहशतीला कंटाळलेल्या नागरिकांनी एकत्रित येत,सराईत गुन्हेगाराला बेदम चोप देत काढली धिंड.. अँकर - एका सराईत गुन्हेगाराच्या दहशतीला वैतागलेल्या नागरिकांनी,संबंधित गुन्हेगाराला बेदम चोप देत रस्त्यावरून धिंड काढली आहे,स सांगलीच्या मिरजेमध्ये हा प्रकार घडला आहे.खून,मारामारीं,असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या इशरत बारगीर याची मिरज शहरातील दर्गाह परिसरामध्ये मोठी दहशत आहे,यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता,अखेर संतापलेल्या नागरिकांनी एकत्रित येत संशयित इशरत बारगिर याला बेदम चोप देत रस्त्यावरून त्याची दिंड देखील काढत दहशत मोडून काढली आहे.संशयिताच्या दहशतीला कंटाळून परिसरातील नागरिकांनी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
957
comment0
Report
SKSudarshan Khillare
Mar 27, 2026 14:34:40
Lasalgaon, Maharashtra:लासलगाव के पति-पत्नी हज-उमराह पर सऊदी अरब में फंसे, युद्ध के कारण लौट नहीं पा रहे। लासलगाव के मुनीर अहमद पटेल और रियाना मुनीर पटेल यह पती-पत्नी 12 फरवरी को लासलगाव से मुंबई गए, वहां से विमान से मक्का-मदिना के लिए रवाना हुए थे। यात्रा पूरी होने के बाद 22 मार्च को भारत वापस आने वाले थे, लेकिन अमेरिका, इजरायल और ईरान के बीच युद्ध जैसी स्थिति के कारण विमान सेवाओं पर असर पड़ा है और समय पर विमान उपलब्ध नहीं हो रहा है। पिछले पांच दिनों से ये दंपत्ति सऊदी अरब में फंसे हैं, जिससे पटेल परिवार में चिंता बढ़ी है। केंद्र और राज्य सरकार से आग्रह है कि हज-उमराह यात्रियों को सुरक्षित भारत वापस लाने के लिए तात्कालिक कार्रवाई करें।
890
comment0
Report
JMJAVED MULANI
Mar 27, 2026 14:10:53
Rui, Maharashtra:पिस्तुलाचा धाक दाखवत 32 वर्षीय महिलेवर अत्याचार..... दौंड पोलीस ठाण्यात दाखल झाला गुन्हा..... आरोपी अमोल काळेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या..... दौंड तालुक्यातील कुरकुंभ परिसरात एका 32 वर्षीय महिले वरती जबरदस्तीने अत्याचार करण्यात आलाय. यासंदर्भात दौंड पोलीस ठाण्यामध्ये पीडित महिलेच्या तक्रारीवरून आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 25 मार्च 2026 रोजी रात्री नऊ वाजण्याच्या sुमारास मुकादमवाडी कुरकुंभ हद्दीत हा संपूर्ण प्रकार घडलाय. आरोपींने संबंधित महिलेला लिफ्ट देण्याचा बहाना केला आणि त्यानंतर तिला पिस्तुलाचा धाक दाखवत तिच्यावरती अत्याचार केल्याची तक्रार दौंड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. दौंड पोलिसांनी खडकी येथील संशयित आरोपी अमोल साहेबराव काळे याला बेड्या ठोकल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस करत आहेत.
926
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 27, 2026 14:05:46
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपूर महानगरपालिकेचा ७४६ कोटींचा आणि २८ कोटी ७६ लक्ष रुपये शिलकीचा अर्थसंकल्प सादर, शहराच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देत पायाभूत सुविधा, आरोग्य, स्वच्छता व पाणीपुरवठा यावर विशेष भर अँकर:-- चंद्रपूर महानगरपालिकेचा सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी सुमारे ७४६ कोटींचा आणि २८ कोटी ७६ लक्ष रुपये शिलकीचा अर्थसंकल्प आज झालेल्या सर्वसाधारण सभेत स्थायी समिती सभापती मनस्वी गिऱ्हे यांनी सादर केला. शहराच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देत पायाभूत सुविधा, आरोग्य, स्वच्छता व पाणीपुरवठा यावर यात विशेष भर देण्यात आला आहे. अमृत 2.0 अंतर्गत पाणीपुरवठा योजनेसाठी ८० कोटी, मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्पासाठी १०० कोटी, तसेच रस्ते बांधकामासाठी ३ कोटी आणि नाली बांधकामासाठी २ कोटींची तरतूद करण्यात आली आहे तसेच कुठल्याही करात वाढ करण्यात आलेली नाही. नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात याकरिता २२.४९ कोटी रुपयांचा निधी राखून ठेवण्यात आला आहे. महापालिका रुग्णालयांचे सक्षमीकरण आणि औषधोपचारांसाठी हा निधी खर्च केला जाईल. महिलांचे सक्षमीकरण आणि बालकांच्या विकासासाठी २.२८ कोटी रुपयांच्या विविध योजना राबवल्या जातील. दिव्यांगांच्या कल्याणासाठी १.४२ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. चंद्रपूरला सुंदर आणि हरित करण्यासाठी चौक सौंदर्यीकरणासाठी १ कोटी, तर शहर  सौंदर्यीकरणासाठी ५० लाख रुपयांची तरतूद आहे. 'माझी वसुंधरा' अभियान आणि ई-बस सेवेच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनावर भर दिला जाईल. स्थानिक प्रभागातील तातडीची कामे मार्गी लावण्यासाठी नगरसेवक स्वेच्छा निधीत वाढ करण्याची मागणी महापौर व सभापतींनी मान्य केली. पूर्वीचा ५ लाख रुपयांचा निधी आता १५ लाख रुपये (प्रति नगरसेवक) करण्यास सर्वसाधारण सभेने मान्यता दिली आहे. दुसरीकडे विरोधी नगरसेवकांनी मात्र या अर्थसंकल्पावर टीका केली असून या आधीच्या महापालिका आयुक्तांनी टेंडर टेररिझम चालविले होते. त्याची चौकशी करण्यात येणार असल्याने हा आपला विजय असल्याचं ते म्हणाले.
1026
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 27, 2026 13:46:34
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगलीच्या तासगाव आणि मिरज तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस. मनेराजुरी परिसरामध्ये जोरदार अवकाळी पाऊस पडला आहे. मनेराजुरी परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसामुळे द्राक्षबागांना मोठा फटका बसलेला आहे. वादळी वाऱ्याचा प्रचड वेग असल्याने रस्त्याकडेला असणाऱ्या दुचाकी खाली पडल्या, तर या वाऱ्यामुळे रस्त्यावरच्या अनेक ठिकाणची झाडे देखील उन्हाळून पडली. मिरज तालुक्यातल्या सिद्धेवाडी, भोसे आसपासच्या परिसरासह रत्नागिरी-नागपूर महामार्गावर विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस पडला आहे. सकाळपासून प्रचंड उकाडा वाढला होता, दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण झालं होऊन अनेक भागात अवकाळी पाऊस आणि हजेरी लावली आहे.
1055
comment0
Report
HPHARSHAD PATIL
Mar 27, 2026 13:32:56
Palghar, Maharashtra:Pearl ग्रुप स्कैम – निवेशकों की जमीन का क्या हुआ? भारत के सबसे बड़े पोंजी स्कीमों में से एक (2014 में उजागर) Pearl Agro Corp Ltd (PACL) और ग्रुप कंपनियों के नेता निर्मल सिंह भांगू (2024 में निधन) ने 5–6 करोड़ निवेशकों से ₹48,000–60,000 करोड़ इकट्ठा किए। कृषि भूमि प्लॉट्स + उच्च रिटर्न का वादा करके फर्जी एलॉटमेंट लेटर दिए, लेकिन कोई असली जमीन नहीं दी गई। पैसा शेल कंपनियों और विदेशी प्रॉपर्टीज में साइफन किया गया। CBI ने 2014 में छापेमारी की। ED ने 169+ प्रॉपर्टीज अटैच कीं। सुप्रीम कोर्ट ने जस्टिस आर.एम. लोधा कमिटी को एकमात्र कॉस्टोडियन बनाया – केवल वही अटैच्ड एसेट्स बेच/डिस्पोज कर सकती है, ताकि पीड़ितों को रिफंड मिले।
1075
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 27, 2026 13:32:35
Nagpur, Maharashtra:नागपुरात बीएड सीईटीचा पेपर तांत्रिक अडचणींमुळे खोळंबला.. त्यामुळे नागपुरातील वैनगंगा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट येथे परीक्षार्थी गोंधळात होते. दरम्यान कॉलेज प्रशासनकडून सांगण्यात आले की MH CET कडून पेपरसाठी Assesinfra इन्फ्राला जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनी EDUpark या कंपनीला सॉफ्टवेअर आणि इतर तांत्रिक बाबीकरता नियुक्त केले . मात्र आज परीक्षार्थी पेपरसाठी आले असता परीक्षार्थींना कॉम्प्युटर व नेटवर्क उपलब्ध नसल्याचे सांगितले. त्यामुळे एकच गोंधळाचे वातावरण झाले. राज्यातील इतर परीक्षा केंद्रांवरील असा गोंधळ उडाल्याची माहिती मिळत आहे... दरम्यान दुसऱ्या सत्राची ही परीक्षा तांत्रिक कारणांमुळे पुढे ढकल ण्यात आल्याची माहिती ही राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष कडून देण्यात आलेली आहे ------- नागपूर - बीएड सीईटी परीक्षेच्या परीक्षा केंद्रावर गोंधळ निर्माण झाल्याने परीक्षा पुढे ढकलण्याची वेळ.. - कंत्राटदार कंपनीच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याने परीक्षार्थी मोठा मनस्ताप सहन करावा लागला. - नागपूरच्या वैनगंगा अभियांत्रिकी महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर दुपारी ३ वाजता परीक्षा नियोजित होती. - मात्र, ऐनवेळी सर्व्हरमध्ये बिघाड झाल्यामुळे परीक्षा केंद्रावर गोंधळ उडाला. - त्यामुळे आजचा पेपर पुढे ढकलण्यात आला असून, पुढील वेळ परीक्षार्थी ईमेल किंवा एसएमएसद्वारे कळविण्यात येणार आहे. - यंदा बी.एड. अभ्यासक्रमाच्या सीईटीसाठी १ लाखाहून अधिक परीक्षार्थी नोंदणी केली आहे. यात तीन दिवस पेपर असणार आहे. मात्र पहिल्याच दिवशी गोंधळ उडल्यानं मनस्ताप सहन करावा लागला.. - शिवाय परीक्षा केंद्रावर अजून परत जावे लागल्यामुळे आर्थिक फटका ही परिक्षार्थीना बसला..
1098
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Mar 27, 2026 13:01:02
Beed, Maharashtra:बीड : “मी सव्वा वर्ष गप्प होतो…कारण माझ्या गप्प राहण्यातच एवढी ताकद आहे.. बोललो तर काय होईल?” धनंजय मुंडेंचा इशारा बीड जिल्ह्यातील भायाळा गावात नारळी अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगतेच्या कार्यक्रमाला आज राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळालं… माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांचे येथे जल्लोषात स्वागत करण्यात आलं… मात्र याच मंचावरून बोलताना धनंजय मुंडे यांनी गेल्या दीड वर्षातील घडामोडींवर अप्रत्यक्षपणे जोरदार भाष्य केलं… “मी जन्माला आलो तेव्हापासून माझ्या पाठी संघर्ष आहे… अनेक संकटं आली पण तुमच्या आशीर्वादामुळे वेळ कधीच आली नाही”… असं म्हणत टीकाकारांनाही त्यांनी सूचक इशारा दिला… “जे बोलायचं ते बोलू द्या… मी सव्वा वर्ष गप्प राहिलो… कारण माझ्या गप्प राहण्यातच ताकद एवढी ताकद आहे.. बोलल्यानंतर काय होईल… असंही मुंडे म्हणाले… तर “रथावर घोडंच बसतं… मोर नाही”… असं म्हणत त्यांनी कर्ण-अर्जुनाच्या उदाहरणातूनही राजकीय टोला लगावला..
995
comment0
Report
UPUmesh Parab
Mar 27, 2026 12:32:00
Ranbambuli, Maharashtra:सिंधुदुर्ग --- बांधकाम व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या.. सिंधुदुर्ग हदरला.. कणकवली तालुक्यातील बांधकाम व्यावसायिक सुशांत दळवी यांची गोळ्या घालून करण्यात आली निर्घृण हत्या.. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घटना घडल्याचा पोलीसांचा अंदाज.. दळवी यांची हत्या नेमकी का झाली? कारण गुलदस्त्यात... श्वविच्छेदनासाठी मृतदेह नेला जाणार कोल्हापूरला... डोक्यात गोळी लागल्याने बांधकाम व्यवसायिकाचा झाला मृत्यू... अधिक तपासासाठी आवश्यक आहे श्वविच्छेदन रिपोर्ट.. मात्र ही सुविधा सिंधुदुर्ग जिल्ह्यात नसल्याने मृतदेह नेण्यात येणार कोल्हापूर येथे, वैध्यकीय सूत्रांनी दिली माहिती... सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह... बांधकाम व्यावसायिक सुशांत दळवी यांच्या खुणानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात उडालीय खळबळ... सिंधुदुर्ग पोलीस करत आहेत अधिक तपास...
1086
comment0
Report
Advertisement
Back to top