Back
तळोजा गांव में भटकते कुत्ते के हमले से 5 घायल, गांव में डर का माहौल
SNSWATI NAIK
Oct 14, 2025 04:51:52
Navi Mumbai, Maharashtra
anchor- तळोजा गावात शुक्रवारी सायंकाळी एका भटक्या कुत्र्याने अक्षरशः दहशत माजवत अवध्या २० मिनिटांच्या कालावधीत पाच जणांवर हल्ला चढवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात चार लहान मुलासह एकूण पाच जण गंभीर जखमी झाले असून यातील दोन लहान मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या समस्येमुळे सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. हा धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला आहे. या घटनेमुळे तळोजा गावातील पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. कुत्र्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला तीन वर्षेयन मुस्तफा हा शुक्रवारी सायंकाळी आपल्या घराच्या दरवाजाजवळ उभा असताना, अचानक त्याठिकाणी आलेल्या एका भटक्या कुत्र्याने मुस्तफावर झडप घालून त्याच्यावर हल्ला चढवला. हा सर्व भयावह प्रकार मुस्तफाच्या १७ वर्षीय बहिणीसमोर घडला. तीने कुत्र्याला हुसकावुन लावल्यामुळे मुस्तफा यातून बचावला. या हल्ल्यात मुस्तफा गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीने मुंबईतील नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कुत्र्याच्या हल्ल्यात मुस्तफाच्या ओठावर तसेच चेहऱ्यावर अनेक खोल जखमा झाल्या आहेत. त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर पुर्रचना शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती नायर रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली. दरम्यान, याच कालावधीत तळोजा गावातील सात वर्षीय इसा गुलबर हा त्याच्या घराजवळ असलेल्या मेडिकलच्या दुकानात औषध खरेदीसाठी गेला असताना, सदर भटक्या कुत्र्याने अचानक त्याच्यावर देखील झडप घातली. यावेळी सदर कुत्र्याने इसा याचा चावा घेण्यास सुरुवात केली असताना, आजूबाजूच्या लोकांनी दगड मारुन सदर कुत्र्याला हुसकावून लावले, अन्यथा कुत्र्याने त्याचे लचके तोडले असते, असे इसा गुलबर याचे वडील मुबाशीर यानी सांगितले. ईसा गुलबर याच्यावर सध्या वाशी येथील महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याच्यावर देखील Shस्त्रिया करावी लागणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. या भटक्या कुत्र्याने आणखी दोन मुले व एका व्यक्तीवर देखील अशाच पद्धतीने हल्ला केला आहे. मात्र त्यातून ते थोडक्यात बचावले असले तरी ते देखील या कुत्र्याच्या हल्ल्यात किरकोळ जखमी झाले आहेत. भटक्या कुत्र्याने लहान मुलांवर हल्ला केलेल्या परिसरात शाळा आणि धार्मिक स्थळे असल्यामुळे त्या भागात नेहमी मुलांची व नागरीकांची गर्दी असते. त्यामुळे भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलांच्या कुटुंबियांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे गावात फिरणे धोकादायक झाल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. त्यामुळे येथील रहिवाशांनी या समस्येवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली आहे. त्यानंतर महानगरपालिकेच्या पथकाने तातडीने कारवाई करत सदर कुत्र्याला पकडले आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSudarshan Khillare
FollowOct 15, 2025 02:01:360
Report
SKSudarshan Khillare
FollowOct 15, 2025 01:46:104
Report
SRSHRIKANT RAUT
FollowOct 15, 2025 01:45:532
Report
AKAMAR KANE
FollowOct 15, 2025 01:45:362
Report
AKAMAR KANE
FollowOct 15, 2025 01:45:181
Report
SKSudarshan Khillare
FollowOct 15, 2025 01:33:053
Report
HPHARSHAD PATIL
FollowOct 15, 2025 01:32:472
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 15, 2025 01:32:224
Report
HPHARSHAD PATIL
FollowOct 15, 2025 01:31:533
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowOct 15, 2025 01:31:342
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 15, 2025 01:31:223
Report
HPHARSHAD PATIL
FollowOct 15, 2025 01:30:370
Report
ABATISH BHOIR
FollowOct 15, 2025 01:30:190
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 14, 2025 17:47:0614
Report
PPPRANAV POLEKAR
FollowOct 14, 2025 15:35:0314
Report