Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422303

निफाड के रूट की खराब सड़कें, ग्रामस्थों का उपोषण शुरू; नेताओं ने समर्थन दिया

SKSudarshan Khillare
Oct 15, 2025 02:01:36
Niphad, Maharashtra
निफाड तालुक्यातील रुई फाटा ते खेडलेझुंगे यासह खेडलेझुंगे ते कोळगाव या रस्त्यांची अतिशय वाईट दुरवस्था झाली असून सदरचे रस्ते दुरुस्त करावे या मागणी करता ग्रामस्थांनी उपोषणाला सुरुवात केली होती या उपोषणाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट, स्वाभिमानी शेतकरी संघटना आदींच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन पाठिंबा दिला असून लवकरात ललक उपोषणकरत्यांच्या मागण्या मान्य कराव्या अशी मागणी करण्यात आली
14
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SMSarfaraj Musa
Oct 15, 2025 07:46:22
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Oct 15, 2025 07:35:32
Vasai-Virar, Maharashtra:मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक प्रचंड कोंडी. वन मंत्री आणि पालघरचे पालकमंत्री गणेश नाईकदेखील अडकले. कोंडीतून सुटकेसाठी गाड्यांचा विरुद्ध दिशेने टाकून मार्ग काढला. पालकमंत्र्यांच्या कृतीने सामान्य नागरिकांमध्ये संताप. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या महामार्गावर अवस्था चिंतनशील झाली असून काल संध्याकाळपासून कोंडी कायम रहिली. गणेश नाईक पालघर येथे नियोजन समितीच्या बैठकीसाठी जात होते. या वेळी वसईहद्दीत मोठी वाहतूक कोंडी असल्याने पालकमंत्र्यांनी आपल्या गाड्यांचा ताफा विरुद्ध दिशेने टाकला. त्यांच्या या कृतीमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त झाला. अखेर गणेश नाईक यांनी महामार्गावरून जाण्याऐवजी रो रो सेवेचा वापर करून बैठकीचा ठिकाण गाठले.
2
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Oct 15, 2025 07:32:28
Ratnagiri, Maharashtra:तिकिटासाठी भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्या पायावर लोटांगण घालणारे आरोप आणि प्रतिक्रिया ही बातमी म्हटली जाते. खेती- गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भास्करराव जाधव यांनी एकेकाळी आमदारकीचे तिकीट मिळवण्यासाठी शिवसेना नेते रामदास कदम यांच्या पायावर लोटांगण घातले होते, असा गंभीर आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण यांनी केला आहे. खेड तालुक्यातील सुसेरी जिल्हा परिषद गटात आमदार भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, “आज भास्कर जाधव रामदास कदम यांच्यावर स्वार्थी असल्याचे आरोप करतात, पण 2004 साली जेव्हा त्यांना आमदारकीचे तिकीट हवे होते, तेव्हा त्यांनी खुद्द रामदास भाईंच्या पायावर लोटांगण घातले होते. मी स्वतः तो प्रसंग पाहिला आहे. त्या वेळी त्यांनी बापूसाहेब खेडेकर यांचे तिकीट कापून स्वतःला संधी मिळावी म्हणून प्रयत्न केले होते.” यावेळी चव्हाण पुढे म्हणाले, “तेव्हा रामदास भाई योग्य वाटले आणि आज तेच स्वार्थी वाटतात, हीच भास्कर जाधव यांची दुटप्पी भूमिका आहे. त्यांनी केवळ स्वार्थासाठी शिवसेना सोडली, आणि आता वक्तव्य करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण जनता सगळं लक्षात ठेवते.” शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणाले की, “रामदास कदम हे हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. त्यांनी कोकणातील युवकांसाठी रोजगारनिर्मितीच्या अनेक योजना राबवल्या. काजू उद्योगासाठी स्वतःच्या नावावर घेतलेले कर्ज तेवढ्या प्रामाणिकपणे फेडले. भास्कर जाधव यांनी मात्र आपल्या राजकीय स्वार्थासाठी अनेकांना फसवले.” शेवटी शशिकांत चव्हाण म्हणाले, “भास्कर जाधव यांनी आत्मपरीक्षण करावे. येणाऱ्या निवडणुकीत गुहागर मतदारसंघातील जनता त्यांना योग्य उत्तर देईल. सुसरी गटातील आमचे तीनही उमेदवार पाच हजार मतांच्या फरकाने विजयी होतील, असा मला विश्वास आहे.”
0
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Oct 15, 2025 07:22:23
Ratnagiri, Maharashtra:लोटे गुरुकुल प्रकरणात शिवसेनेचा पुढाकार — पीडित मुलीच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च शिवसेना उचलणार जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण यांनी दिले आश्वासन, “न्याय मिळेपर्यंत शिवसेना तिच्या पाठीशी ठाम उभी राहील” खेड -लोटे येथील “आध्यात्मिक वारकरी गुरुकुल” मध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणानंतर खेड तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर पीडित मुलगी आणि तिच्या पालकांनी न्यायासाठी थेट खेड तालुका शिवसेना कार्यालय, भरणे येथे धाव घेतली. त्यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना आपली व्यथा सांगत न्याय मिळवून देण्याची मागणी केली. या घटनेची दखल घेत शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण यांनी तत्काळ मुलगी आणि तिच्या पालकांची भेट घेतली. त्यांनी या प्रकरणात पूर्णपणे पाठिंबा देण्याचे आश्वासन देत, पीडित मुलीच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च शिवसेना संघटनेच्या वतीने उचलला जाणार असल्याची घोषणा केली. “मुलगी पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात येईल, तिचे भविष्य सुरक्षित राहील, याची जबाबदारी आता शिवसेनेची आहे,” असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. यावेळी शशिकांत चव्हाण म्हणाले, “ही घटना अत्यंत संतापजनक असून, समाजात अध्यात्म आणि संस्काराच्या नावाखाली घडणारे असे प्रकार अक्षम्य आहेत. या प्रकरणातील आरोपींना कायद्याने कठोर शिक्षा मिळावी यासाठी आम्ही प्रशासनाकडे सतत पाठपुरावा करू. न्याय मिळेपर्यंत शिवसेना तिच्या पाठीशी ठाम उभी राहील.” यावेळी खेड तालुका शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनीही एकमुखाने पीडित मुलगा आणि तिच्या कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याचा निर्धार व्यक्त केला. दरम्यान, लोटेतील या गुरुकुल प्रकरणाची चौकशी खेड पोलिसांकडून सुरू असून जिल्ह्यातील शिवसेनेच्या या पुढाकाराचे विविध सामाजिक संघटना आणि महिलानी स्वागत केले असून, “राजकीय पक्ष फक्त भाषणापुरते नव्हे तर प्रत्यक्ष मदतीला पुढे येत आहेत, हे समाजासाठी सकारात्मक उदाहरण आहे,” अशा प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत आहेत.
4
comment0
Report
YKYOGESH KHARE
Oct 15, 2025 07:17:05
3
comment0
Report
YKYOGESH KHARE
Oct 15, 2025 07:01:12
2
comment0
Report
KJKunal Jamdade
Oct 15, 2025 06:47:53
Shirdi, Maharashtra:अकोले तालुक्यातील देवठाण गावातील शेळके वस्ती परिसरात दुर्दैवी घटना... तीण वर्षीय कविता लहानु गांगड या बालिकेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू... बिबट्याने उचलून नेत केले भक्ष... काल सायंकाळी घराच्या अंगणात खेळत असताना बिबटयाने केला हल्ला... मृतदेह ऊसाच्या शेतात सुमारे ३०० मीटर अंतरावर आढळला... गावकऱ्यांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण... यापूर्वीही मे महिन्यात देवठाण येथे बिबट्याच्या हल्ल्यात विठावाई काळे या 57 वर्षीय महिलेचा झाला होता मृत्यू... वारंवार बिबटयाच्या हल्ल्यांमुळे अकोले तालुक्यात दहशतीचे वातावरण... वनविभागाने नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी नागरिकांची मागणी... मृतदेह ग्रामीण रुग्णालय कोतुळ येथे शवविच्छेदनासाठी पाठवला...
7
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Oct 15, 2025 06:46:56
Satara, Maharashtra:सातारा - शिवसेना पक्षाचा कार्यकर्त्यांचा मेळावा आज साताऱ्यात पार पडतोय. या मेळाव्याला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री शंभूराजे देसाई कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमी या मेळाव्याला महत्त्व प्राप्त झालं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं कार्यकर्त्यांना कशा पद्धतीने संबोधित करतात हे पहावं लागणार आहे. त्याचबरोबर महायुतीमध्ये राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत प्रत्येक पक्षाला जो तो मानसन्मान मिळाला पाहिजे असं शंभूराजे देसाई यांनी सांगितला आहे आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी... शंभूराजे देसाई वन टू वन
6
comment0
Report
KJKunal Jamdade
Oct 15, 2025 06:46:32
Shirdi, Maharashtra:Akole News Flash अकोले तालुक्यातील देवठाण गावातील शेळके वस्ती परिसरात दुर्दैवी घटना... तीन वर्षीय कविता लहानु गांगड या बालिकेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू... बिबट्याने उचलून नेत केले भक्ष... काल सायंकाळी घराच्या अंगणात खेळत असताना बिबटयाने केला हल्ला... मृतदेह ऊसाच्या शेतात सुमारे ३०० मीटर अंतरावर आढळला... गावकऱ्यांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण... yापूर्वीही मे महिन्यात देवठाण येथे बिबट्याच्या हल्ल्यात विठावाई काळे या 57 वर्षीय महिलेचा झाला होता मृत्यू... वारंवार बिबटयाच्या हल्ल्यांमुळे अकोले तालुक्यात दहशतीचे वातावरण... वनविभागाने नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी नागरिकांची मागणी... मृतदेह ग्रामीण रुग्णालय कोतुळ येथे शवविच्छेदनासाठी पाठवला...
7
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Oct 15, 2025 06:10:07
Mumbai, Maharashtra:गोवंडी मध्ये आमदार अबू आझमी यांना स्थानिक नागरिकांनी विभागातील प्रश्नांवरून धारेवर धरले याच वेळी त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांना नागरिकांनी बेदम चोप दिला गोवंडी शिवाजी नगर वॉर्ड क्रमांक १३६ मध्ये समाजवादी पक्षाचे आमदार अबू आजमी यांच्या सहकाऱ्यांसोबत मैदानाच्या सुशोभीकरण कामाच्या शुभारंभ करिता गेले असता तेथील काही नागरिकांनी अबू आजमी यांना विभागातील प्रश्नांवरून धारेवर धरले यावेळी अबू आझमी यांचे जवळचे सहकारी पदाधिकारी फाद आझमी व कार्यकर्त्यांना बेदम चोप दिला आहे याप्रकरणी शिवाजीनगर गोवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलिस करत आहे
7
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Oct 15, 2025 06:07:13
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:यंदाचा पाऊस मराठवाड्याच्या मुळावर उठला होता, अनेकांची स्वप्न या पावसामुळे झालेल्या चिखलात रुतले आणि उद्ध्वस्त झाले; विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा बोझ उडाला. बीड जिल्ह्यातील параळी तालुक्यातील कौडगाव घोडा येथील विजय राठोड हा BA MS च्या तिसऱ्या वर्षात शिकत होता. गावाकडून शेतात मुलाचा शिक्षणासाठी पापोबरोबर मेहनत घेऊन शिकत होता, डॉक्टर बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून संभाजी नगर गाठले. त्यासाठी MBBS न जाता BA MS घेतला कारण परिस्थिती अनुकूल नव्हती. यंदा 2 एकरात कापूस लावलेला परिसर पावसामुळे चिखलात गेला; साहेबराव राठोड आणि निलाबाई यांची मेहनत चिखलात उध्वस्त झाली. शिक्षणाचे खर्च, रुम भाडे, जेवण इत्यादी आता कसे भागणार याची चिंता पुढे आली. संपूर्ण कुटुंब हा प्रश्न तेजावत असताना मुलाचे शिक्षण थांबू नये म्हणून आत्ता समाजाने पुढं यावे अशी आर्त हाक आहे. विजयला शैक्षणिक आधाराची गरज आहे; अत्यंत गरीब कुटुंबातील हा तरुण तुमची साथ मिळाल्यासच त्याचा शिक्षणाचा जाज्वल्य स्वप्न पूर्ण होऊ शकतो. या झी 24 तासाच्या मोहीम अंतर्गत विजयच्यासाठी पाठीशी उभे राहा, त्याला धीर द्या. गूगल pay: 9322126432; bank name: महाराष्ट्र ग्रामीण बँक, शिरसाळा ब्रांच 4540, परळी तालुका, बीड; अकाउंट no: 8007139489-1; IFSC: MAHG0004540.
9
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Oct 15, 2025 05:51:44
Bhandara, Maharashtra:डव्वा ग्रामपंचायतीत अविश्वास प्रस्तावावरून गोंधळ... पोलिसांचा लाठीचार्ज! माझी वसुंधरा अभियानात देशात पहिला क्रमांक मिळवलेल्या गावात तणावपूर्ण वातावरण गोंदिया जिल्ह्यातील डव्वा ग्रामपंचायतीत काल मोठा गोंधळ झाला. माझी वसुंधरा अभियानात देशात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या या गावात, महिला सरपंच योगेश्वरी चौधरी यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला. मात्र बहुमत न मिळाल्याने तहसीलदारांनी प्रस्ताव फेटाळला, आणि त्यानंतर गावात तणाव निर्माण झाला. स्थिती हाताबाहेर जाताच पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. डव्वा ग्रामपंचायत गोंदिया जिल्ह्याचं नाव देशपातळीवर नेणारे हेच गाव. मात्र, काल इथे घेतलेल्या ग्रामसभेत अविश्वास प्रस्तावावरून गोंधळ उडाला. ग्रामपंचायतीत एकूण १२ सदस्य असून, सरपंचासह ८ सदस्य अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने होते. परंतु प्रस्ताव पारित होण्यासाठी ९ सदस्यांचे बहुमत आवश्यक असल्याने तो अपयशी ठरला. प्रस्ताव फेटाळताच सभागृहात आणि बाहेर गावकऱ्यांमध्ये संताप उसळला. तणाव वाढू नये म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र परिस्थिती चिघळताच पोलिसांना लाठीचार्ज करून जमाव पांगवावा लागला. या घटनेमुळे डव्वा गावात एकच खळबळ उडाली आहे. ज्या गावाने जिल्ह्याला देशपातळीवर पोहोचवलं, त्या गावातच आता राजकीय वादामुळे तणाव निर्माण झाला आहे. या घटनेनंतर डव्वा ग्रामपंचायतीची चर्चा संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात रंगली आहे. डव्वा ग्रामपंचायतीत झालेल्या या गोंधळानंतर प्रशासन सजग झालं असून, पुढील ग्रामसभा सुरळीत पार पडावी यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येत आहेत.
6
comment0
Report
Advertisement
Back to top