Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413001

सीएम फडणवीस की सोलापुर यात्रा: सोलापुर से मुंबई विमान सेवा 16 साल बाद शुरू

AAABHISHEK ADEPPA
Oct 15, 2025 01:31:34
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूरच्या दौऱ्यावर, तब्बल सोळा वर्षानंतर सोलापूर ते मुंबई विमानसेवेचा होणार शुभारंभ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूरच्या दौऱ्यावर - बहुप्रतिक्षेत असणाऱ्या सोलापूरकरांचे सोलापूर ते मुंबई विमानसेवेचे स्वप्न अखेर तब्बल सोळा वर्षानंतर पूर्ण होणार - सोलापूर ते मुंबई आणि सोलापूर ते बंगळुरू विमानसेवेच्या शुभारंभाची जय्यत तयारी - केंद्रीय नागरी विमान वाहतुकी राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांची असणार प्रमुख उपस्थिती - 2009 मध्ये किंगफिशर ने सेवा दिल्यानंतर आता 2025 मध्ये स्टार एअरलाइन्स देणार विमानसेवा - विमानसेवा सुरू होत असल्याने सोलापूरकरांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण
13
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
YKYOGESH KHARE
Oct 15, 2025 04:01:57
Nashik, Maharashtra:Anchor त्र्यंबक रोडवरील नियंत्रण रेषेअंतर्गत येणाऱ्या शेतकरी व व्यावसायिकांच्या हक्कांवर गदा येत असल्याचा आरोप करत नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक ते त्र्यंबकेश्वर रस्त्याचे रुंदीकरण व विस्तारीकरण आहे. एनएमआरडीएने त्र्यंबक रोडवरील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे नियोजन केले असल्याची नोटीस प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे बाधितांमधून तीव्र असंतोष व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, ही कारवाई ऐन दिवाळीच्या तोंडावर होत असल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Oct 15, 2025 04:00:35
Amravati, Maharashtra:AMT_VOTER_LIST दोन फाईल आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयोगाचा बोगस कारभार चव्हाट्यावर; अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील अनेक गावे मतदार यादीतून गायब अँकर :– स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयोगाचा बोगस कारभार चव्हाट्यावर आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील अनेक गावे मतदार यादीतून गायब झाले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीच्या तोंडावर निवडणूक विभागाचा अजब कारभार चव्हाट्यावर आला आहे. निवडणूकीपूर्वी निवडणूक विभागाने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार याद्यात अख्खे गावे गायब आहे. पंचायत समितीचे माजी सभापती शशिकांत मंगळे यांचा हा आरोप असून शशिकांत मंगळे यांनी जिल्हाधिकारी यांकडे तक्रार केली आहे. बाईट :– शशिकांत मंगळे, माजी सभापती, पंचायत समिती
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Oct 15, 2025 03:54:59
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:धाराशिव – दिवाळीचा उत्सव साजरा करण्यासाठी या वेळी राज्याचे परिवहन आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी वेगळाच मार्ग निवडला. महापुराच्या विळख्यात सापडलेल्या भूम तालुक्यातील साडेसांगवी या गावात सरनाईक यांनी आपल्या कुटुंबासह गावकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली. पत्नी, मुले, सुना, नातवंडांसह सरनाईक साडेसांगवीत दाखल झाले आणि गावकऱ्यांना दिवाळीचं साहित्य, आकाशकंदील, फटाके, आणि दिवाळी किटचे वाटप करण्यात आले. गावातील प्रत्येक कुटुंबाला पाच हजार रुपयांची आर्थिक मदतही करण्यात आली. पूराच्या कालात तुटलेल्या दोन पुलांमुळे गावाचा संपर्क तुटला होता. त्याच पुलांची आणि रस्त्याची उंची वाढवून नव्याने बांधणी करण्याच्या कामाचं भूमिपूजनही यावेळी करण्यात आलं. पुढील पावसाळ्यापूर्वी ही कामं पूर्ण करण्याचं आश्वासन पालकमंत्री सरनाईक यांनी दिलं. “ही दिवाळी कायम आमच्या लक्षात राहील. माझ्या कुटुंबाप्रमाणेच गावकऱ्यांचीही दिवाळी व्हावी म्हणून आलो,” असं सरनाईक म्हणाले. तर त्यांच्या पत्नीनेही गावकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करत आनंद व्यक्त केला.
1
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Oct 15, 2025 03:54:39
Ratnagiri, Maharashtra:Anchor - मिसाईल मॅन आणि माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा आज जन्मदिवस. आजचा हा दिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून देखील ओळखला जातो. आजच्या दिवसानिमित्त कोकणातली ही बातमी. रत्नागिरी जिल्ह्यातल्या धामणसे गावामध्ये वाचन संस्कृती जपावी आणि वाढावी यासाठी ग्रंथालय चालवले जातेय. या ग्रंथालयाला 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. दुर्गम आणि ग्रामीण भागात असलेल्या ग्रंथालयामध्ये तब्बल 21 हजारहुन जास्त पुस्तक आहेत. कवितासंग्रह, कथा आणि कादंबऱ्या तसेच विविध ग्रंथ यासह स्पर्धा परीक्षांसाठी लागणारि पुस्तके देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचा फायदा होतोय. तंत्रज्ञानाच्या या जमान्यामध्ये वाचन संस्कृती जपावी आणि ती वाढावी यासाठी प्रयत्न देखील केला जातोय. त्याला चांगला प्रतिसाद देखील मिळतोय. लोकेशन - धामणसे, रत्नागिरी
4
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Oct 15, 2025 03:54:20
Akola, Maharashtra:गेल्या दोन महिन्यांपासून झालेल्या सलग आणि अवकाळी पावसामुळे अकोला जिल्ह्यातील शेतीला मोठा फटका बसला आहे. या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले असून, त्यात अळीच्या प्रादुर्भावाने भर टाकली आहे. विशेषतः सोयाबीन आणि कपाशी या प्रमुख पिकांवर अळीचा तीव्र प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.अळीने पिकांतील रस शोषून घेतल्यामुळे शेतं ओसाड झाली आहेत आणि त्यांचं एकमेव उत्पन्नाचं साधन धोक्यात आलं असल्याच शेतकऱ्यांनी म्हंटलय. दिवाळीसारख्या सणाच्या तोंडावर आलेल्या या संकटामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. शेतकऱ्यांनी आता शासनाकडे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदतीची मागणी केली आहे. कृषी विभागाने त्वरित लक्ष देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
2
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Oct 15, 2025 03:52:20
Vasai-Virar, Maharashtra:ढिसाळ वाहतूक नियोजनामुळे विद्यार्थ्यांच्या 12 बस वाहतूक कोंडीत अडकल्या मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी संध्याकाळी पाच वाजल्यापासून विद्यार्थी वाहतूक कोंडीत अडकले तहान आणि भुकेमुळे शेकडो विद्यार्थी झाले व्याकूळ वाहतूक व्यवस्था कोलमडलेली असताना वाहतूक पोलीस मात्र गायब ठाणे घोडबंदर महामार्गाच्या दुरुस्तीसाठी अवजड वाहनांना घातलेल्या बंदीचा फटका सामान्य नागरिकांना सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष सुशांत पाटील यांनी याबाबतची माहिती मिळताच त्यांच्या सहकाऱ्यांसह बस पर्यंत पोचून विद्यार्थ्यांना पाणी आणि खाण्यासाठी बिस्किट उपलब्ध करून दिले. तसेच वाहतूक कोंडीतून बस बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले.
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Oct 15, 2025 03:50:09
Satara, Maharashtra:सातारा - साताऱ्यातील सासपडे येथे अल्पवयीन मुलीच्या खुनानंतर जिल्ह्यात संतप्त वातावरण आहे. संबंधित संशयित आरोपी राहुल यादव याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी आक्रोश मोर्चे काढले जात आहेत. या मृत मुलीच्या आई वडिलांची घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना मदतीसाठी लोक पुढे येऊ लागले आहेत. सुशील मोझर यांच्या रक्षक प्रतिष्ठानच्या वतीने या कुटुंबाची भेट घेऊन या मृत मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी उच्च न्यायालयापर्यंत मोठा वकील देऊन कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्याच बरोबर पीडित कुटुंबाचा घरातील लोकांना पूर्ण मदत रक्षक प्रतिष्ठानच्या वतीने केली जाणार आहे。
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Oct 15, 2025 03:48:52
2
comment0
Report
YKYOGESH KHARE
Oct 15, 2025 03:48:33
Nashik, Maharashtra:सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य शासनाकडून निधी देताना त्यात जवळपास २५ टक्के महापालिकेला हिस्सा द्यावा लागणार आहे. नियमित वार्षिक अंदाजपत्रकातील निधीव्यतिरिक्त महापालिकेकडून निधी उभारण्याचा भाग म्हणून ४५० कोटी रुपयांच्या ठेवी मोडल्या जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. महापालिकेलाही हिस्सा पोटी यासाठी २०० कोटी रुपयांचे हरित कर्जरोखे (ग्रीन बॉन्ड) व २०० कोटी रुपयांचे म्युनिसिपल बॉण्ड उभारले जातील. अर्बन चॅलेंज फंडातूनही जवळपास २२५ कोटी रुपये उभे केले जाणार आहेत. त्यासाठी जागतिक बँकेकडून एक हजार कोटी रुपये कर्ज काढले जाईल. कर्ज काढण्यासंदर्भात महापालिका मुख्यालयात मंगळवारी जागतिक बँकेच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यात आली. महापालिकेच्या बाराशे कोटी रुपयांच्या ठेवी विविध बँकांमध्ये आहेत. यात ४०० कोटी रुपयांच्या ठेवी जनरल फंडातील असून, सिंहस्थ कामांसाठी तरतूद करण्यात आलेल्या निधीसाठी ४५० कोटींच्या ठेवी मोडल्या जाणार आहेत.
4
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Oct 15, 2025 03:46:18
4
comment0
Report
ABATISH BHOIR
Oct 15, 2025 03:45:42
Kalyan, Maharashtra:कल्याण डोंबिवली क्षेत्रात खड्डेच खड्डे.. कल्याण डोंबिवली शहर गेले खड्यात.. रस्त्याला केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल असे दिले नाव. पावसाने उगडीप देऊन सुद्धा रस्त्यावर खड्डेच खड्डे. नागरिक हैराण. कल्याण डोंबिवली महानगरपालिका ही स्मार्ट सिटी मध्ये येतं असली तरी स्मार्ट सिटी नावापुरताच आहे. एक आठवड्यापासून पावसाने उगडीप देऊन सुद्धा कल्याण डोंबिवली क्षेत्रतील रस्त्यावर खड्डे पडले आहेत तसेच कल्याणच्या पत्रिपुल ते न्यू गोविंदवाडी रस्त्याची चालणं झाली आहे खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे हे कळतं नाही या रस्त्याला नागरिकांनी केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल असे या रस्त्याला नागरिकांनी नाव देखील दिलं आहे अनेक तक्रारी करून सुद्धा दखल देत नसल्याने रस्त्याला नाव दिले आहे त्यामुले आता तरी लक्ष देणार का हे पहावं लागणार आहे याचा आढावा घेतला आहे
3
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Oct 15, 2025 03:34:06
4
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Oct 15, 2025 03:33:56
1
comment0
Report
YKYOGESH KHARE
Oct 15, 2025 03:33:30
Nashik, Maharashtra: कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील बेकायदेशीर बांधकामे पाडण्याच काम आजपासून सुरू करण्यात येतेय.या निर्णयावर 'एनएमआरडीए' ठाम असून स्थानिकांचा विरोध झुगारून लावला आहे. दिवाळीपर्यंत राहत्या घरांना अभय देण्याच आश्वासन आयुक्त जलज शर्मा यांनी दिले असले तरी थोड्याच वेळात सुरू होणाऱ्या या कारवाईवरून संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.कुंभमेळ्याच्या धर्तीवर नाशिक ते त्र्यंबकेश्वर रस्ता सहापदरी करण्यात येणार आहे. त्यासाठी पिंपळगाव बहुला ते पेगलवाडी या भागातील व्यावसायिक व शेतकऱ्यांना नाशिक महानगर विकास प्राधिकरणाने सात दिवसांची नोटीस बजावली होती. त्याची मुदत सोमवारी संपल्यावर आता प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात होत आहे. मुख्यमंत्री फडणवीस हे शिष्टमंडळाला न भेटल्याने कारवाईला अधिक गती मिळाली आहे.
1
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Oct 15, 2025 03:30:26
2
comment0
Report
Advertisement
Back to top