Back
पिता को पैसे के लिए सुरा से धमकाकर अपहरण, बेटे ने खंडणी मांगी
PPPRANAV POLEKAR
Oct 14, 2025 15:35:03
Ratnagiri, Maharashtra
खंडाणीसाठी मुलानेच बापाच्या मानेवर सुरा ठेवून केले अपहरण
व्हॉटसअॅॅपवर पाठवला हात-तोंड बांधलेला फोटो पाठवून मागितली १ लाखांची खंडणी!
रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख येथील घटना
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात बाप - मुलाच्या नात्याला काळीमा फसणारी घटना समोर आलीय. 80 वर्षीय वडिलांचे पैशासाठी अपहरण करणाऱ्या मुलाला चिपळूण पोलिसांनी गजाआड केले आहे. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. ही घटना मंगळवारी दुपारी 3.30 वाजता उघडकीस आली. त्याने आपल्या वडिलांचे मंगळवारी पहाटेच्या सुमारास अपहरण केले. श्रीकांत दत्तात्रय मराठे (वय ४५, रा. चोरप-या, ता. संगमेश्वर) असे मुलाचे नाव आहे. त्याने आपल्या जन्मदात्या वडिलांना पैसेासाठी मानेवर सुरा ठेवून पळवून नेले आणि नंतर व्हॉटसअॅपवर हात-तोंड बांधलेला फोटो पाठवून एक लाख रुपयांची खंडणी मागितली. या प्रकाराची देवरूख पोलीस ठाण्यात तक्रार त्याच्या आईने सौ. सुनिता दत्तात्रय मराठे (वय ७४) यांनी दाखल केली. त्यांच्या दिलेल्या फिर्यादीवरून संपूर्ण प्रकरणाचा धक्कादायक उलगडा झाला आहे.
घटना कशी घडली?
मिळालेल्या माहितीनुसार,सेवानिवृत्त शिक्षक दत्तात्रय मराठे (वय ८०) यांना पेन्शन मिळते. पैशाच्या मागणीवरून वारंवार वाद घालणारा मुलगा श्रीकांत याने काल रात्री ११ वाजता घरातच थरार माजवला.
आई आणि नातीसमोरच सुराने वडिलांच्या मानेवर धाक दाखवत, “आता एक लाख रुपये द्या नाहीतर ठार मारतो” अशी धमकी दिली. वडिलांना जबरदस्ती कपडे घालून टू-व्हिलरवर बसवून देवरुख शहरातील सह्याद्रीनगरच्या दिशेने पळून गेला.
खंडणीचा फोटो आणि धमक्या
पहाटेपर्यंत काहीच संपर्क न झाल्याने कुटुंब चिंतेत असतानाच सकाळी नातिच्या मोबाईलवरून अपहरण झालेल्या वडिलांच्या मोबाईलवरून व्हॉटसअॅप कॉल आला.त्यात वडिलांचा हात-पाय आणि तोंड प्लास्टिक टेपने घट्ट बांधलेला फोटो दिसला.
श्रीकांतने त्या फोटोसोबत एक लाख रुपये खंडणी मागितली आणि नकार दिल्यास “मी आता मागे हटणार नाही” अशी धमकी दिली.
आईचे धाडस, पोलिसांचा तत्पर तपास
या घटनेनंतर आई सुनिता मराठे यांनी धाडस दाखवत थेट देवरुक पोलिस ठाणे गाठले आणि मुलाच्या विरोधात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी तत्पर कारवाई करत चिपळूण परिसरातून श्रीकांत मराठेला ताब्यात घेतले.
सध्या देवरुख पोलीस पुढील तपास करत असून, आरोपीवर खंडणी, अपहरण आणि जीवे मारण्याच्या धमकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
लोकेशन - देवरुख, रत्नागिरी
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAASHISH AMBADE
FollowOct 14, 2025 17:47:0614
Report
ABATISH BHOIR
FollowOct 14, 2025 15:34:4614
Report
PPPRANAV POLEKAR
FollowOct 14, 2025 13:53:5714
Report
TTTUSHAR TAPASE
FollowOct 14, 2025 13:52:1514
Report
SRSHRIKANT RAUT
FollowOct 14, 2025 13:40:0914
Report
PNPratap Naik1
FollowOct 14, 2025 13:15:2511
Report
YKYOGESH KHARE
FollowOct 14, 2025 12:45:3611
Report
PNPratap Naik1
FollowOct 14, 2025 12:07:114
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowOct 14, 2025 12:06:443
Report
JMJAVED MULANI
FollowOct 14, 2025 11:46:243
Report
JMJAVED MULANI
FollowOct 14, 2025 11:46:073
Report
APAMOL PEDNEKAR
FollowOct 14, 2025 11:45:514
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowOct 14, 2025 11:40:390
Report
VKVISHAL KAROLE
FollowOct 14, 2025 11:34:020
Report