Back
भिवंडी महापौर के लिए घोड़ाबाज़ी तेज, कांग्रेस-भाजप-शिवसेना के खेले बिगड़े समीकरण
UJUmesh Jadhav
Feb 05, 2026 14:15:41
Thane, Maharashtra
भिवंडीत महापौर पदाच्या सत्तेचे घोडे अडले... काँग्रेस-भाजप-शिवसेनेच्या आकड्यांच्या खेळात..
अँकर:-
साडेतीन वर्षांच्या प्रशासकीय राजवटी नंतर सर्वांनाच लोकप्रतिनिधींच्या सत्तेचे वेध लागले असताना मुंबई सह ठाणे जिल्ह्यातील महापौर पदाच्या निवडणुका पार पडल्या, पण याला अपवाद ठरले ते भिवंडी महानगरपालिका.
भिवंडी पालिका महापौर पदाच्या निवडीसाठी मुहूर्त कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित होत असून भिवंडी पालिका महापौर पदाच्या निवडीनुसार कोकण विभागीय आयुक्त यांच्याकडून अजूनही कोणताही कार्यक्रम जाहीर होत नसल्याने अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. परंतु अशा परिस्थितीत भिवंडी पालिकेत 30 सदस्यांसह मोठा पक्ष असलेल्या काँग्रेससह भाजपा व शिवसेना यांनी सुद्धा महापौर पदावर दावा केला असून त्यांना मॅजिक फिगर 46 जमवण्यासाठी समाजवादी पक्षाच्या 6, कोणार्क विकास आघाडीच्या 4 व भिवंडी विकास आघाडीच्या 3 नगरसेवकांची गरज आहे. त्यामुळे महापौर पदाच्या निवडणुकीत घोडेबाजार होणार अशी चिन्हे आहेत.
विवो 01:-
भिवंडीत काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी ( श.प.) व समाजवादी पक्षाच्या सोबतीने भिवंडी सेक्युलर फ्रंट स्थापन करण्यात आला आहे.काही मुद्द्यांवर वाद असतात ते येत्या दोन दिवसात संपुष्टात आणू. समाजवादी पक्षाच्या नगरसेवकांची आमदार रईस शेख यांच्यावर नाराजी आहे त्य्या दूर करू. भाजपा शिवसेना काही आघाड्या या आपला उमेदवार अजून निश्चित करू शकले नाहीत. त्यामुळे महापौर निवडणुकीची तारीख शासनाच्या दबावामुळे जाहीर करण्यासाठी उशिर केला जात आहे. आमच्याकडे उमेदवार निश्चित आहे. त्यामुळे ठाम पणे पालिकेचा महापौर काँग्रेस पक्षाचाच असेल असा विश्वास काँग्रेस शहराध्यक्ष रशीद ताहीर मोमिन यांनी व्यक्त केला आहे. साडेतीन वर्ष प्रशासक बसले होते. नागरिकांची कामे होत नव्हती आता नगरसेवक निवडून आले पण निवडणूक लावायला शासन घाबरत आहे असा आरोप रशीद ताहीर यांनी केला आहे.
बाईट:- रशीद ताहीर मोमिन - काँग्रेस शहराध्यक्ष
Vio 02 :-
महायुती म्हणून भाजपा शिवसेने कडे 34. संख्याबळ आहे. इतर काही गट आमच्या सोबत तर काही शिवसेने सोबत आहेत. एक चांगलं गट आम्ही तयार केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे एकत्र बसून निर्णय घेतील. शिवसेनेने भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला आहे. आमची एकत्र बैठक होऊन तशी मोर्चे बांधणी भाजपा कडून सुरू आहे. त्यासाठी आमचे नगरसेवक कॅम्प मध्ये बाहेर गेले आहेत. शहराच्या विकासा साठी महापौर हा महायुतीचाच बसणार असा विश्वास भाजपा गटनेता संतोष शेट्टी यांनी व्यक्त केला आहे. शहराची मागील आठ वर्षात जी परिस्थिती झाली आहे ती सुधारण्यासाठी राज्याच्या सत्तेतील पक्ष पालिकेत सत्तेवर हवा या भावनेतून भाजपा नियोजन करीत आहे. काहीजण या महापौर निवडीला सुद्धा जातीय धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करीत आहेत ते चुकीचे आहे असे शेवटी संतोष शेट्टी यांनी स्पष्ट केले.
Byte:- संतोष शेट्टी - भाजपा गटनेता
Vio 03:-
पालिकेत समाजवादी पक्षाचे सहा नगरसेवक निवडून आले आहेत. भाजपा सोडून इतर धर्मनिरपेक्ष पक्ष सोबत जाऊन महापौर निवडावा असे स्पष्ट निर्देश समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू असीम आजमी यांनी दिले आहेत. नगरसेवक नॉट रिचेबल वगैरे काही नसून ते थेट प्रदेशाध्यक्ष अबू आजमी यांच्या संपर्कात आहेत. भिवंडी सेक्युलर फ्रंट मध्ये समाजवादी पक्षाच्या गटाचा महापौर असावा असा प्रस्ताव दिला आहे अशी माहिती समाजवादी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष अजय यादव यांनी दिली आहे.
Byte:- अजय यादव - प्रदेश उपाध्यक्ष समाजवादी पक्ष
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JJJAYESH JAGAD
FollowFeb 06, 2026 03:17:210
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowFeb 06, 2026 03:16:490
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 06, 2026 02:47:420
Report
PNPratap Naik1
FollowFeb 06, 2026 02:46:470
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 06, 2026 02:46:170
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 06, 2026 02:45:350
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 06, 2026 02:45:190
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 06, 2026 02:32:320
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 06, 2026 02:32:070
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 06, 2026 02:30:460
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 06, 2026 02:30:140
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 06, 2026 02:17:530
Report
AKAMAR KANE
FollowFeb 06, 2026 02:17:260
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowFeb 06, 2026 02:16:490
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowFeb 06, 2026 02:16:140
Report